मायबोली गणेशोत्सव २०१८ - समारोप

Submitted by संयोजक on 3 October, 2018 - 02:34

समारोप २०१८.jpg

मायबोली गणेशोत्सवाचे यंदाचे १९ वे वर्ष आहे. उत्सव ऑनलाइन असला तरी आरास झाली, श्लोक झाले, आरत्या झाल्या. विविध प्रकारच्या नैवेद्यांची रेलचेल झाली. जगाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या मराठी माणसांचा ह्यात सहभाग असल्याने दिवसाच्या कोणत्याही प्रहरी गणेशोत्सव गजबजलेला होता.
शब्दखेळ ह्या उपक्रमालाला मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षीही अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ह्यावर्षी विविध लेखक, कादंबऱ्या, शालोपयोगी वस्तू, सिनेमा यांचा एक संग्रहशब्दखेळ ह्या उपक्रमामुळे तयार झाला. झब्बूची सुरुवात दणक्यात झाली पण शेवटी शेवटी मात्र तो थंडावला. पाककृती स्पर्धांना ह्यावेळी चांगला प्रतिसाद मिळाला. व्यक्तिचित्रण स्पर्धेला थोड्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असला तरी अपेक्षित प्रतिसाद नक्कीच नाही मिळाला.
काव्य अंताक्षरीलाही अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला. मजेशीर कोट्या चॅलेंजमध्ये सुद्धा सर्व कोट्या वाचताना मजा आली. सुरवात नव्या बदलाची उपक्रमाच्या माध्यमातून ह्यावेळी पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा कसा करता येई, त्यासाठी काय काय करायला हवे, ह्या बद्दल तुम्ही सगळ्यांनी मांडलेली मते पुढे मायबोलीकरांना नक्कीच उपयोगी ठरतील.
मुलांच्या उपक्रमांना नेहमी प्रमाणे उदंड प्रतिसाद मिळाला. इथून पुढे मुलांसाठी अजुन वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवता येतील.
मायबोली ही सर्वांची' myबोली' आहे याचा प्रत्यय संयोजक मंडळात तर आलाच पण इतर मायबोलीकरांनीही जी अनमोल मदत केली त्याबद्दल संयोजक मंडळ ऋणी आहे.
थोडक्या वेळात एस्टीवाय लिहिल्याबद्दल mi_anu, द्वादशांगुला, किल्ली, अस्ट्रॉनॉट विनय यांचे आभार .
गणेश प्रतिष्ठापनेवरील अथर्वशीर्ष गायन :- स्वाती आंबोळे,
स्वरचित आरती, तुमच्या गावाचा गणपती व घोषणा धागा यासाठी श्लोक लेखन:- शशांक पुरंदरे
आमच्या घरचा बाप्पा, तुमच्या गावाचा गणपती प्रकाशचित्र :- मैत्रेय (अक्षयच्या विनंती वरून)
शुद्धलेखन संबंधी कल्पमुख व विपु मधून व इतर माध्यमातून मदत करणाऱ्या सर्वांना धन्यवाद.
सर्वात शेवटी - नेहमीप्रमाणेच , अॅडमिन आणि वेबमास्तरांचेही सर्व प्रकारच्या सहाय्याबद्दल आणि उत्तेजनाबद्दल आभार!
नजरचुकीने कुणाचे आभार मानायचे राहून गेले असतील तर माफी असावी.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि भाग घेतलेल्या सर्वांचे अनेक आभार!
एवढे बोलून आपली रजा घेतो! भेटत राहू इथेच!!
गणपतीबाप्पा मोरया!! पुढल्यावर्षी लवकर या!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणपती बाप्पा मोरया!
मला तर खुप मजा आली मंडळात काम करताना! नविन ओळखी झाल्या, मैत्री झाली.
बाकी वरती लिहिलेच आहे.
गणपती बाप्पा आणि अखिल माबोकरांचे आभार!

एक गोष्ट मात्र खटकली, ती म्हणजे ह्यावेळेस लोकांनी एस्टीवाय ह्या उपक्रमाला खुपच थन्ड प्रतिसाद दिला.
(विनय, जुई, अनु ह्यांनी उत्कृष्ट कथा देउनही असं झालं)
असं का झालं ते पाहायला हवं.

संयोजक, वाचक, स्पर्धक, बालचमू, इ. सर्वांच्या सहकार्याने साकारलेला सर्वांगसुंदर गणेशोत्सव....
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद... Happy

______/\_____

STy मध्ये लिहिण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद मंडळ.
रिस्पॉन्स बद्दल: दुसऱ्याला रोचकपणे वाढवता येईल अशी कथा पार्टली लिहिणे हेही कौशल्याचे काम आहे.आपल्याला जे आवडतं,जे आपल्या स्टाईल ने पूर्ण करावं वाटतं ते लिहिणं वेगळं आणि तो कथाभाग दुसऱ्याला आपलासा वाटून त्याला त्यावर लिहावं वाटावं, कथा तितकी फ्लेक्झिबल आणि ओपन एंडेड असणे वेगळे.माझ्या बाबतीत ते झाले असावे.
पण मजा आली लिहिताना!!!

Sty हा सर्वांसाठी उपक्रम वाटला नाही. कथा लिहीने कौशल्याचे काम आहे. सगळे पार्टीसिपेट कसे करणार.

उत्सव छान झाला. नेहमीप्रमाणे शब्द खेळ खेळायला मजा आली.
Sty बद्दल, नेहमी Sty दोनच असतात आणि त्यातली एकच पूर्ण होते. यावर्षी चार चार दिल्यामुळे लोकांना कुठे लिहू असा प्रश्न पडला असावा.

Sty बद्दल, नेहमी Sty दोनच असतात आणि त्यातली एकच पूर्ण होते. यावर्षी चार चार दिल्यामुळे लोकांना कुठे लिहू असा प्रश्न पडला असावा.>> असं वाटतं नाही. कारण तसं असतं तर निदान एखादी तरी एसटीवाय पूर्ण झाली असती... कदाचित एस्टीवाय म्हणजे काय हे सगळ्यांना माहित नसल्यामुळे प्रतिसाद कमी मिळावा असेल.

च्रप्स - एसटीवाय मधे कोणीही लिहू शकतं कारण त्यात फक्त आधीचा धागा पुढे खेचायचा असतो आणि तो तसाच सोडून द्यायचा असतो, पुढचा लिहिणारा तो धागा पुढे घेऊन जातो. मधे मधे फिलर्स कोणालाही भरता येतात, फक्त शेवट करणार्‍याची कसरत असते , कारण सगळे धागे एकत्र आणायचे असतात.

एकूण मायबोलीवरचा लोकांचा वावर कमी झाल्यामुळे कदाचित एसटीवायला प्रतिसाद कमी मिळाले असावेत, किंवा किती वर्षं सूत कातायचं आता नवीन काहीतरी पाहिजे म्हणून सुद्धा एसटीवायला प्रतिसाद कमी असावेत...

एकूण उत्सव दणक्यात पार पडला.

यंदाची जाहिरात मात्र कमी जाणवली, सगळ्या जाहिराती चांगल्या होत्या पण पाहिजे तितक्या प्रमाणात दिसत नव्हत्या..

सगळ्या जाहिरातींचा एक वेगळा बाफ काढा, एकत्र बघायला आवडतील.

उत्सव नेहेमीप्रमाणे उत्तम झाला. Happy
संयोजकांचेही मनापासून कौतुक Happy कारण वेळात वेळ काढून जाहीराती तयार करणे, फिरवणे, कॉल्स वर हजर राहाणे आणि बाकी ही असंख्य कामं वेळेत पार पाडणं हे जरा जिकीरीचं असतं.

उत्सव छान पार पडला,
संयोजकांचे अभिनंदन,
आणि त्यात भाग घ्यायची संधी दिल्याबद्दल आभार Happy

सर्व संयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन!

गणेशोत्सव छान आयोजित करून पार पाडला. वेगवेगळ्या उपक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करून आम्हाला सहभागी व्हायची संधी दिली त्याबद्दल अनेक आभार!

यावर्षी गणेशोत्सवाच्या संयोजन मंडळात काम करण्याची संधी दिल्याबद्दल अ‍ॅडमिन आणि वेमांचे आभार.
खुप मजा आली मंडळात काम करताना! नविन ओळखी झाल्या, मैत्री झाली. >+१

@हिम्सकूल, एकूण जाहिरातीपैकी काही जाहिराती एकत्र खाली दिल्या आहेत.
R1_0.jpgR2_2.jpgIMG-20180918-WA0005.jpg

छान. संयोजकांचे आणि सहभागी होणाऱ्या सगळ्यांचे अभिनंदन आणि आभार >>>> +११११

फक्त संयोजकांपैकी एक श्री दुधाळ चोर निघाल्याने थोडे गालबोट लागले पण वेमांची त्यांच्यावरची क्रुपाद्रुष्टी पाहता
चालायचच

छान. संयोजकांचे आणि सहभागी होणाऱ्या सगळ्यांचे अभिनंदन आणि आभार >>>> +११११

फक्त संयोजकांपैकी एक श्री दुधाळ चोर निघाल्याने थोडे गालबोट लागले पण वेमांची त्यांच्यावरची क्रुपाद्रुष्टी पाहता
चालायचच

नवीन Submitted by Mmmmm on 4 October, 2018 - 15:50> 11111111

हो ना
ह्या अक्षय दुधाळवर का इतकी मेहेरबानी काय माहीत

मस्त झाला गणेशोत्सव! Happy छान वाटलं.

Sty साठी लिहिण्याची संधी दिल्याबद्दल आभार.. Happy

दुसऱ्याला रोचकपणे वाढवता येईल अशी कथा पार्टली लिहिणे हेही कौशल्याचे काम आहे.आपल्याला जे आवडतं,जे आपल्या स्टाईल ने पूर्ण करावं वाटतं ते लिहिणं वेगळं आणि तो कथाभाग दुसऱ्याला आपलासा वाटून त्याला त्यावर लिहावं वाटावं, कथा तितकी फ्लेक्झिबल आणि ओपन एंडेड असणे वेगळे.>>> +१११११

दुसऱ्याला रोचकपणे वाढवता येईल अशी कथा पार्टली लिहिणे हेही कौशल्याचे काम आहे.आपल्याला जे आवडतं,जे आपल्या स्टाईल ने पूर्ण करावं वाटतं ते लिहिणं वेगळं आणि तो कथाभाग दुसऱ्याला आपलासा वाटून त्याला त्यावर लिहावं वाटावं, कथा तितकी फ्लेक्झिबल आणि ओपन एंडेड असणे वेगळे.>>> +१११११
पटलंय Happy