खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र १ शालेय उपयोगी वस्तू
याने आपल्या शिक्षणाची सुरवात झाली
पा_
खेळ शब्दांचा -१- शालेय उपयोगी वस्तू
Submitted by संयोजक on 13 September, 2018 - 00:07
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
दटावणी?
दटावणी?
पुरवणी बरोबर.
पुरवणी बरोबर.
नेक्स्ट क्लू मागे गेलाय सो
नेक्स्ट क्लू मागे गेलाय सो परत आणते
- डा - - ळा
Submitted by साद on 13 September, 2018 - 14:29
__गो_
__गो_
ही आता शाळांमध्ये असते का माहिती नाही, पण आमच्या वेळेस होती आणि आधीही असावी.
नक्की कोण देणार आहे क्लू?!
नक्की कोण देणार आहे क्लू?!
लगोरी?
लगोरी?
खडाफळा?
खडाफळा?
गो च्या आधी दोन अक्षरं आणि
गो च्या आधी दोन अक्षरं आणि नंतर एक.
मला लाडीगोडी आठवलं
मला लाडीगोडी आठवलं
आणि मला गारगोटी हवं ते
आणि मला गारगोटी
हवं ते सोडून बाकी आठवतंय काय काय
प्रुथ्वीगोल प्ऋथ्वीगोल
प्रुथ्वीगोल
प्ऋथ्वीगोल
पृथ्वीगोल आहे का उत्तर?
पृथ्वीगोल आहे का उत्तर? भूगोलाच्या तासाला गरगरा फिरवून दाखवतात तो?
डाळा ला क्लू पाहिजे
डाळा ला क्लू पाहिजे
माझ्या मनात पृथ्वीगोल नव्हतं,
माझ्या मनात पृथ्वीगोल नव्हतं, पण मस्त उत्तर आहे. मला चालेल.
माझं उत्तर सांगू का?
डा ळाला क्लू द्या एखादा.
Happy माझं उत्तर सांगू का?>>
Happy माझं उत्तर सांगू का?>> अजून एखादा क्लू देता येईल का ?
भाचाची वस्तू स्त्रीलिंगी आहे
भाचाची वस्तू स्त्रीलिंगी आहे असं वाटलं मला वर्णनावरून. सांग रे - नाहीतर क्लू दे.
स्त्रीलिंगी आहे, बरोबर.
स्त्रीलिंगी आहे, बरोबर. प्रयोगशाळेत असायची.
नाही बा लक्षात येत, सांग तूच.
नाही बा लक्षात येत, सांग तूच.
भेंडगोळी.
भेंडगोळी.
अरे देवा! म्ह्णजे काय?
अरे देवा! म्ह्णजे काय?
भेंडगोळी काय असतं?
भेंडगोळी काय असतं?
स्थित विद्युत समजवायला
स्थित विद्युत समजवायला वापरायचे ना! काचेचा दांडू लोकरी कापडावर खसाखसा घासा आणि भेंडगोळीजवळ न्या, मग ती भेंडगोळी त्याच्याकडे आकर्षिली जाते इ. इ. मक्याच्या कणसाच्या मगजापासून मिळते, अशी माहिती प्रयोगशाळेतल्या काकांनी दिली होती.
इंटरेस्टिंग आहे..! पहिल्यांदा
इंटरेस्टिंग आहे..! पहिल्यांदा ऐकतेय!
आम्हाला कागदाचे कपटे आणि पेन वापरायला सांगितलेलं...
डाळा ला क्लू पाहिजे. :
डाळा ला क्लू पाहिजे. :
बहुतेक काळ्या रंगाचा, वजन कमी
हायला, मला भेंडगोळी चा अर्थ,
हायला, मला भेंडगोळी चा अर्थ, आपल्याला उत्तर आले नाही म्हणजे आपल्यावर एक भेंडगोळी बसली असा असेल असे वाटुन गेले.
भेंडगोळीचा विद्युतदर्शक,
भेंडगोळीचा विद्युतदर्शक, (इलेक्ट्रोस्कोप) सुवर्णपत्रांचा विद्युतदर्शक (हा मराठी शाळेत कुठनं यायला!) इ. होते पुस्तकांमध्ये. दोन भेंडगोळ्या एकाच स्टँडला बांधून दोघांनाही भारित दांडूने स्पर्श केला, की त्या दोन्ही एकमेकांपासून लांब जायच्या. असो.
_ डा सा प ळा असे काही?
_ डा सा प ळा
असे काही?
हाडांचा सापळा , प्रयोगशाळेत
हाडांचा सापळा , प्रयोगशाळेत असायचा.
भेंडगोळी मक्याच्या कणसाच्या
भेंडगोळी मक्याच्या कणसाच्या मगजापासून नाही भास्कराचार्य, मक्याचा किंवा ज्वारीचा जो कडबा असतो किंवा त्याला ताटं म्हणतात ती सोलली की आत थर्माकोलसारखा हलका वाळलेला मगज असतो, तो कापता आणी घासता येतो, आम्ही त्याची बैलगाडी बनवायचो. त्याची मगजाची गोळी म्हणजे भेंडगोळी.
पण पाच अक्षरी हवे ना?
sonalisl, पण पाच अक्षरी हवे ना?
Pages