पर्याय (टुन्ना_किरणुद्दीनच्या_कथा)

Submitted by किरणुद्दीन on 11 September, 2018 - 21:44

टुण्णा किरणुद्दीनच्या बायकोला वांगं आवडत असे. तिने आजूबाजूच्या बायकांना सोबत घेऊन टुन्नाच्या डोक्यात वांगं ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे असे भरवले. रोज एकेक मैत्रीण येऊन टुन्नाच्या बायकोशी मोठ्या आवाजात चर्चा करायची. वांगं सोडून प्रत्येक भाजी कशी निकम्मी आहे यावर त्यांचा खल व्हायचा. हळू हळू टुन्नाचं डोकं काम करेनासं झालं.

मग टुन्नाच्या घरी रोजच वांगं बनू लागलं. रोज वेगळ्या रूपड्यात पण वांगच बनत असे. कधी भरीत, कधी वांग्याच्या फोडीला मसाला लावून हाफ फ्राय, वांगं बटाटा, वांग्याचीच उसळ, वांग्याचा झणझणीत रस्सा...

असं तीन वर्षे चाललं. आता वांग्यामुळे टुन्नाला वाताची समस्या सुरू झाली.
टुन्ना वांग्याबद्दल तक्रार करू लागला.

आता बायकोलाही वांग्याचे जादाचे फायदे सांगता येईनात. मग तिने पेच टाकला

"पण पर्याय काय ?"

टुन्नाची विकेट निघाली. कारण बटाटा, भेंडी, पालक, मेथी, रताळे, वाटाणा, घेवडा, पडवळ, घोसावळे, दोडका, भोपळा, शेपू, अंबाडी, कांद्याची पात इ. इ. सर्वच भाज्या निकम्म्या आहेत आणि वांगे एकटेच कामाचे आहे हे त्याच्या मेंदूवर कोरण्यात आले होते.
टुन्नाला जाच होऊ लागला.

कसेबसे अजून एक वर्ष गेलं.

मग टुन्ना म्हणाला " हे बघ मला निकम्मी असली तरी चालेल पण दुसरी भाजी पाहीजे, काही झाले तरी मला आता वांगे नको "
बायको म्हणाली "असा वांगेद्वेष बरा नव्हे"

टुन्ना म्हणाला " पर्याय नसला तर नसू दे, पण मला आता काहीही चालेल "

बायको म्हणाली "आता वांगेच खा. आजपर्यंत तुला काही झाले नाही, आता का ओरडतोस ?"

असं करता करता पाच वर्षे सरली. टुन्नी खूष होती. टुन्नाची जिरली होती. एकदाचं २०१९ साल उजाडलं. मे महिना आला.
एक दिवस टुन्नी बाजारातून वांगं घेऊन आली आणि बघते तो काय...

घरातून मिक्स भाजीचा खमंग वास येत होता. तिने रागाने आत पाऊल टाकले आणि तिला दुसरा धक्का बसला.

घरात एक अतिशय सुंदर स्त्री टुन्नाला जेवू घालत होती. टुन्नीने रागाने विचारले "ही कोण ?"
टुन्ना म्हणाला " आजपासून हीच या घरात स्वयंपाक बनवणार आणि हिचेच राज्य चालणार कारण ही वांगे खात नाही. वांगे बदलले नाहीस म्हणून मी तुलाच बदलले "

तात्पर्य : प्रत्येक गोष्टीला पर्याय हा असतोच

#टुन्ना_किरणुद्दीनच्या_कथा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप रे २०१८ पासून ही कथा ठसठसत असल्याने वाचूनही ठसठस सहन केली वाटतं....
थेट निकाल लागल्यावरच भडास व्यक्त झाली.

पण निकालाचा आणि या कथेचा काही एक संबंध नाही. कशाला ओढवून घ्यायचं स्वतःवर ?
झालात कि नाही हास्यास्पद ?
Rofl

पण इथे निकलाबरोबर कथेचा संबंध कुणीच जोडलेला दिसत नाहीय. फक्त तुम्ही जो 2019 चा उल्लेख केलाय त्या 2019 मध्येही टुन्ना वांगच खातोय असं एकाने म्हटलंय.

तुम्हाला ते ठसठसतंय का? सांगा मग सगळ्यांना , की ही तुमची कथा आहे आणि त्यात कुणीही बदल करू नये . Lol

तात्पर्य : प्रत्येक गोष्टीला पर्याय हा असतोच

Submitted by किरणुद्दीन on 12 September, 2018 - 07:14

चूक. प्रत्येक गोष्टीला पर्याय असतोच असे नाही. ज्या गोष्टींना पर्याय नसतो त्यांचा उल्लेख करताना इंग्रजी भाषेत त्यांच्या आधी द हे उपपद लावतात.

द सन
द मून
द अर्थ

शिवाजी द ग्रेट

२०१९ मध्ये यात अजून एका नावाची भर पडली आहे.

साध्वी का ?

नवीन Submitted by किरणुद्दीन on 25 May, 2019 - 14 >>>

अगदी बरोबर, आता कसे लाईनीवर आलात.

मग कोण ?

विवेक ओबेरॉय ?

रच्चाकने, किती धंदा झाला सिनेमाचा?
धो धो चालला असेल नाही ?

नरेंद्र मोदींवरचा सिनेमा ब्लॉकबस्टर सारखा चालणार नाही हे सर्वांना माहीत होतं. पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे भारतीय जनता, मोदी या व्यक्तीवर नाही तर त्या व्यक्तीने केलेल्या कामावर फिदा आहे.

एका नेत्याला त्याच्या कामाची व भारतीय जनतेला तिच्या सुज्ञ असण्याची यापेक्षा मोठी पावती मिळाली नसेल.

विवेक ओबेराई ला बघायला कोण पैसे देऊन जाणार. परेश रावळ ला दिला पाहिजे होता रोल.

Submitted by च्रप्स on 28 May, 2019 - 22:35 >>>

सहमत

विवेक ओबेराय खूपच देखणा आहे परेश रावलपेक्षा. जिथे अभिनयाचा कस लागण्याची जरूर नाही तेथे परेशपेक्षा विवेकला पडद्यावर पाहाणे अधिक सुसह्य ठरेल.

>>एका नेत्याला त्याच्या कामाची व भारतीय जनतेला तिच्या सुज्ञ असण्याची यापेक्षा मोठी पावती मिळाली नसेल.<<

You said it man!

" आजपासून हीच या घरात स्वयंपाक बनवणार आणि हिचेच राज्य चालणार कारण ही वांगे खात नाही. वांगे बदलले नाहीस म्हणून मी तुलाच बदलले "
पर्याय बाकी भारीच.

विवेक ओबेराय खूपच देखणा आहे परेश रावलपेक्षा. जिथे अभिनयाचा कस लागण्याची जरूर नाही तेथे परेशपेक्षा विवेकला पडद्यावर पाहाणे अधिक सुसह्य ठरेल.
Submitted by हीरा on 29 May, 2019 - 10:03

काय हे? प्रियंकातैंनी मोदींना उत्कृष्ट अभिनेता म्हंटलंय आणि मोदींची भूमिका करायला अभिनयाचा कस लागणार नाही असं कसं म्हणू शकता?

भारी आहे गोष्ट ! थोडक्यात वा,ग्याने टुन्नीला वेडे बनवले. आता टुन्नी पण गेली बाराच्या भावात !

Lol मस्त लिहिलेय

<<तात्पर्य : प्रत्येक गोष्टीला पर्याय हा असतोच>> +१११११११

फक्त तो वेळीच निवडता आला पाहिजे☺️

पर्याय या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हिट झालेल्या कथेनंतर नवीन दमदार कथा
https://www.maayboli.com/node/70198

( पर्याय वाचून चडफडत राहून २२३ दिवसांनी प्रतिक्रिया दिलेले आता ताबडतोब प्रतिसाद देतील ही अपेक्षा आहे)

Pages