गरीब (यशराज फिल्म्सचा आगामी सिनेमा)

Submitted by किरणुद्दीन on 8 June, 2019 - 23:25

गरीब
====

(यशराज फिल्म्सचा आगामी सिनेमा)

शाहरूखखान उपाख्य राज मल्होत्रा हा अत्यंत गरीब असतो. त्याच्यावर एक लाख कोटींचं कर्ज असतं. त्याच्याइतका गरीब कुणीच नसतो. तो ज्याला कुणाला भेटेल त्याला विचारत असे की तुझ्यावर किती कर्ज आहे ?
कुणी म्हणे दहा हजार, कुणी पन्नास हजार तर कुणी लाख तर कुणी पन्नास लाख. या पलिकडे डोईवर कर्ज असलेला मनुष्य त्याला भेटतच नसतो. त्याने छंद म्हणून अनेक सिनेमे बनवलेले असतात. ते ही पडल्याने त्याच्या डोईवर कर्जाची भर पडत जाते.

भारत उपाख्य सलमान खान हा एक यशस्वी मनुष्य असतो. त्यालाही सिनेमांचा छंद असतो. एक दिवस शाहरूख खान त्याला न राहवून विचारतो की , "ब्वॉ तुझ्या यशस्वितेचे रहस्य काय ?"

सलमान हसून म्हणतो की, "मी माझ्या न झालेल्या पत्नीला वचन दिले होते की माझ्या सिनेमाला कधीही स्टोरी नसेल आणि तसा कोणताही दावा केलेला नसेल. माझा सिनेमा म्हणजे कथा नसलेला हे प्रेक्षकांना सुद्धा ठाऊक असेल. त्यामुळे होतं काय की ग्राहक अपेक्षाच ठेवत नाही. मग मी पडद्यावर जे काही करतो ते प्रेक्षक मुकाट्याने बघत जातो"

शाहरूख म्हणतो, "मग माझे सिनेमे का पडतात ?"
सलमान त्याला हसून उत्तर देतो की, " तुझे सिनेमे पण माझ्याच सारखे असतात. पण पूर्वी तुझ्या काही सिनेमांना किंचितशी स्टोरी होती. त्यामुळे लोक अपेक्षा ठेवतात अजून. तुम्ही त्याची अजून समजूत काढलेली नाही की ब्वो, रोज रोज काय स्टोरी दाखवणार ? हिंदी सिनेमांच्या स्टो-या संपलेल्या आहेत."

शाहरूख मग समजला
त्याला सलमान खान हा आपला मार्गदर्शक वाटू लागला.

मग त्याने आपल्या गरीबीबद्दल विचारायचे ठरवले.

सलमान म्हणाला की, " चल आज तुझ्या या शंकेचे पण समाधान करूयात.
तू गरीब का आहेस ?"
शाहरूख म्हणाला की "माझ्याकडे आता पैसे नाहीत. नवीन कर्ज मिळत नाही. खायचे वांधे झालेत."
सलमान म्हणाला की "मग तू काटकसर केली पाहीजेस.."

शाहरूख म्हणाला " म्हणजे काय ?"
सलमान म्हणाला " तुझं हेलिकॉप्टर भंगार झालंय. त्याच्चा माईलेज कमी झाला असेल. शिवाय तुझे नोकर चाकर भाजी आणायला पण हेलिकॉप्टरमधून जातात. याच्यावर तू चाप लावला पाहीजेस. म्हणजे तुझे पैसे वाचतील "

शाहरूख खूषच झाला. म्हणाला " तूच रे तूच, तूच ओळखलंस भावा "
"अजून काय "

सलमान म्हणाला " तुझ्या गरीबीची जाणिव बायकोला दे. वहिनी रोज चार्टर प्लेनने दुबईला शॉपंगला आणि जेवाय़ला जातात, ते बंद केलं तर चर्चगेटला तुम्ही दोघेही पोटभर जेवू शकाल "
शाहरूख खानच्या डोळ्यातून आता पाणी वाहत होते.

" बोलत रहा भावा"

"तुझं प्लेन तू भाड्याने दे आणि कतार एअरलाईन्सने गल्फचे दौरे करत जा. त्याचे तिकीट स्वस्त आहे. शिवाय तुला भाडं मिळाल्याने तुझे विदेश दौरे फुकटात पार पडतील "
" बोल भावा बोल "
" तू फक्त अंधेरीचा ड्युप्लेक्स फ्लॅट राहण्यासाठी वापर आणि बांद्रा, जुहू, नरीमन पॉईण्ट इथले फ्लॅट्स भाड्याने दे. मढ आयलंडचा तुझा पॅलेस सिरीयल्स ना शूटींग साठी दे. तुझे बरेचसे कर्जाचे हप्ते बंद होतील "

" भावा , माझ्या गरीबीचे दिवस संपतील असे आता मला वाटू लागले आहे. पण हे सगळं करूनही कर्ज फिटणार नाही. काय करू ?"
" हे बघ. एक जालीम उपाय आहे. पण तो सल्ला फ्री मधे मिळणार नाही "
" पैसे घेणार तू भावा माझ्याकडून ?"
" नाही, कमिशन घेणार. तुझं एक लाख कोटींचं कर्ज फिटलं की त्याच्या दोन टक्के मला द्यायचे. ते मी श्रीमंतांना वाटून टाकणार"
" म्हणजे ?"
" अरे म्हणजे धारावीच्या श्रीमंत वस्तीत वाटणार. ज्यांच्यावर किरकोळ कर्ज असतं ते "
" बरं बोल भावा "
" हे बघ, मी तुला अजून वीस हजार कोटींच कर्ज मिळवून देतो "
" पण त्याचे हप्ते ?"
" ऐक रे "
" हे पैसे तू भारत जलाओ पार्टी ला द्यायचे "
" का ?"
" अरे ते निवडून यावेत म्हणून "
" आणि नाही आले तर ?"
" असं होणारच नाही. तेच येणार."
" कसं काय ?"
" त्यांना ईव्हीएमदेव प्रसन्न आहे. "
" अच्छा असं का ?"
" हो. तू त्या फडतूस पेजथ्रीवॉल ला मत दिलेले ते पण ईव्हीएम देवाने त्यांनाच देऊन टाकले "
" ओह "
" तर मग हे वीस हजार कोटी तू त्यांना द्यायचेस "
" पण गरीबी कशी हटणार ?"
" ऐक रे, मग ते तुझं कर्ज माफ करून टाकतील "
" काय सांगतोस ?"
" इतकंच नाही, मग तू आसामचे मळे विकून त्यांना हजार कोटी रूपये द्यायचेस . लगेच ते तुझा कर माफ करून टाकतील आणि नंतरही कर भरायची गरज नाही "
" अरे यार ही तर मणिपूर लॉटरीची स्कीम सांगतोस राव "
" ये तो कुछ भी नही .. पुढं ऐक. तुझे दिवाळखोरीत निघालेले कारखाने सुमित चहा ला दाखव "
" हुं "
" तो, तुझ्या कारखान्यातून विमानं कशी बनवायची ही स्कीम तुला देईल "
" विमानं ? आणि कोण घेणार ती ? तू तर आहेत ती भाड्याने दे म्हणालास "
" ऐक रे, ती विमानं सुमित चहा घेणार. कसं खुर्चीवर सरेंडर गोधी आहे. त्याला काही स्वत:ला लागत नाही. फिरायला मिळालं की तो खूष. आणि खुर्ची मिळाली की बास्स. वाट्टेल ते करतो मग तो "
" बरं "
" तर गोधी ही विमानं लष्करासाठी घेणार. तुझ्यामार्फत. तू ती फ्रान्स मधून आणायची. त्याचे पैसे पण गोधीच देणार. "
" अरे त्यात त्याचा काय फायदा "
" वेडाच आहेस. अरे हे पैसे सरकारचे. तुला दर वर्षी एक लाख कोटी मिळणार. त्यातले निम्मे तू सुमित चहा ला द्यायचेस "
" आयला ही भारी स्कीम आहे "
" मग आता गरीबी दूर होईल ना ?"
" हो रे खरंच. इतकी चांगली पार्टी आहे माहीतच नव्हतं. खरंचच गरीबांची पार्टी आहे. सबका साथ सबका विकास. गरीबांचे सरकार आहे हे "
" बघ "
" पण तुला इतकं कसं माहीती ?"
" येड्या, मी यशस्वी आहे ना ? मग समजून जा की "
" ओह हो हो... "
" चल जाऊ का ? यशराज फिल्म्सने पण बोलवलंय "
" नवीन सिनेमा ?"
" नाही रे, तुझ्याच प्रमाणे त्यांचेही सिनेमे चालत नाहीत "
" मग ? काय सांगणार आहेस ?"
" उधळपट्टी रोखायला "
" म्हणजे ?"
" अरे उदय चोप्राला घेऊन सिनेमे काढतात ते लोक. इतकी उधळपट्टी केल्यावर कसे गरीबीतून वर येणार ते ?"
" ओह हो "
" ते बंद करून सुमित चहा वरचा बायोपिक बनवायचं कंत्राट त्यांना मिळवून देणार आहे मी "
" ग्रेट ! ग्रेट ! "
" सबका साथ...."
" सबका विकास "

पडद्यावर उदय चोप्रा दिसू लागतो.
गरीब द एण्ड ची पाटी झळकते आणि प्रेक्षक शिव्या देत बाहेर जाऊ लागतात. पण पैसे गेल्याने काहीच न करता चडफडत जाण्याशिवाय गत्यंतर नसते. सलग दहाव्यांदा यशराज फिल्म्सला शिव्या घालून आता ते भारत जलाओ पक्षाला मत द्यायला जाणार असतात....

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यांच्या महान प्रतिभेची कुवतच एवढी आहे. चकवा लागल्यागत त्याच त्या विषयाच्या परिघात ठरलेल्या त्रिज्ये पेक्षा जास्त अंतर ते जाऊ शकत नाही. ठराविक लोकांच्या द्वेषाची कावीळ झाल्यामुळे अशक्तपणा येऊन डोळ्यांवर झापड आली आहे. Get well soon.

नवीन Submitted by शक्तीराम on 9 June, 2019 - 13:50 >>

भाऊ बेगॉन प्यायलेल्या वेड्या माणसाला डॉक्टर काय करायला सांगतात? सर्वात आधी भरपूर पाणी देऊन भरपूर ओकार्या काढायला लावतात. आजूबाजूचे लोक फक्त काय चाललंय ते बघतात.

आपण आजूबाजूचे लोक म्हणून ओकार्या कशा काढल्या जातात आहेत ते बघायचं नि वेड्याला विसरून जायचं...

मला वाटलं खरच असा सिनेमा येतोय
काही सांगता येत नाही येऊही शकतो >>>>> Rofl

आशुचँप भारी.

निरू, रॉनी >>> आभार आपले.

छान कल्पना, आणि त्याचा केलेला भयाण बट्याबोळ!!!
१. सलमान शाहरुखला बिजनेस आयडिया देतोय??? जगातला २ नंबरचा सगळ्यात श्रीमंत सेलिब्रिटी आहे तो, आणि ढिगाने जरी चित्रपट फ्लॉप गेले ना, काही फरक पडणार नाही इतके त्याचे बिजनेस जोरात चालतायेत.
२. यशराज शाहरुखच्या जास्त जवळ की सलमानच्या, हे इंडस्ट्रीतल्या शेंबड्या पोराला देखील माहिती असेल. अभ्यास वाढवा.

विषय काय नी पांढरं बेणं बोलतंय काय Rofl हल्ली लोकांची सा वि बु वापरायची कूवत बरीच खालावलीय वाटते... सगळीकडे मार्मिक हुंगत बसतात. उपरोधिक टोले लिहायला पण कसब लागते हे त्या लेखकाच्या अंध भक्ताना कसे समजावे (हा प्रतिसाद जनरल समजावा. जर कुणाला लागलं असेल तर बर्नोल आहेच.)

अरे मला कसं नाही माहित या चित्रपटाबद्दल? मग मात्र हसू आलं
आणि मग हळूहळू लक्षात आलं अरेरे!! अशी मौज आहे तर...

किरण नवीन आयडी घेऊन कधी येणार? की ऑलरेडी घेऊन ठेवला होता कालच्या धुळवडीपूर्वी?

बरं वाटलं फार ब्रह्मज्ञान सांगत होता किरणू भाई. अजून असे खूप आहेत जे दुसऱ्या आयडींचं वाकून पाहतात मात्र आपलं झाकत नाहीत, त्यांना वाटतें मी मांजर आहे. खुशाल डोळे झाकून चालू असतं दूध पिणं.

यूट्यूबवर अजुन प्रोमो का दिसत नाहीत ? कोणी लिंक देवू शकाल का जरा ! शाहरुख़ इतका आवडत नसला तरी सलमानसाठी हां मुव्हि नक्की पाहू ...