सूर नवा ध्यास नवा - छोटे सुरवीर

Submitted by सान्वी on 29 August, 2018 - 05:38

धागा काढायला बराच उशीर झाला आहे. खरंतर मागच्या पर्वाचा भरगोस प्रतिसाद पाहता या पर्वावर लवकरच धागा येईल असे वाटले होते परंतु नाही आला अजून. आणि मला मायबोलीवर स्वतःचा पहिला धागा काढण्याची संधी मिळाली. असो.
तर कार्यक्रमाबद्दल वेगळं सांगण्याची काही गरज नाही. या वेळी सूत्रसंचालिका बदलून माझी आवडती स्पृहा जोशीला घेतलं आहे, त्यामुळे तीचे ओघवते सूत्रसंचालन आणि नेहमीचे कॅप्टन अशी मस्त भट्टी जमली आहे. सगळ्यात कहर म्हणजे ती छोटी मुले, zee वरील सारेगमप लिटिल चांप्स ची जादू परत अनुभवायला मिळते आहे. रटाळ मालिका च्या भाऊगर्दी मध्ये निरागस मुलांचे सूर सुखद वाटताहेत. तुम्हाला काय वाटतं?

Group content visibility: 
Use group defaults

आधीच्या धाग्यावर चर्चा सुरू आहे परंतु हे नवे पर्व आहे लहान मुलांचे त्यामुळे नवीन पर्वसाठी नवीन धागा काढला आहे.

मी नुकतच बघायला सुरु केले...
छान आहेत सगळी मुलं..
तो छोटा मॉनिटेर केलेला मुलगा कोण आहे..कसला गोडुला आहे...अवधुत सोबत मस्त हासत होता काल...
सक्षम मस्त गायला काल...तेरे रश्के कमर मज्जा आली बघुन त्याचा पर्फॉर्मन्स....
स्पृहा चे काही काही उच्चार नाकातुन येतात का..सर्दी झाल्यासारखे...काल एका मुलीचं नाव तिने माळी असं सांगितलं ते मला बाळी असं ऐकायला आलं...
बाकी तेजु पेक्षा मला स्पृहा आवडली..मुलात मुल होउन मस्ती करु शकते ती..
काल एलिमिनेशन झाल्यावर मुले रडत होती ते बघुन कसंतरीच झालं...या पर्वातला एलिमिनेशन हा सगळ्यात अवघड भाग असणार..कारण लहान मुलं रडताना बघणं माझ्यासाठी खुप त्रासदायक असतं नेहेमीच.

बाकी तेजु पेक्षा मला स्पृहा आवडली..मुलात मुल होउन मस्ती करु शकते ती.. >> +११
काल एलिमिनेशन झाल्यावर मुले रडत होती ते बघुन कसंतरीच झालं...या पर्वातला एलिमिनेशन हा सगळ्यात अवघड भाग असणार >> +११
मला उत्कर्ष, केणे मुलगी, निलाखे मुलगी, माहूरची मुलगी आणि त्या भरतीयाचं गाणं आवडलं Happy

राशी चं गाणं छान होतं खरंतर माझ्यामते ओंकार जायला हवा होता. तो cute आहे पण गाण्याचा विचार करता राशी उजवी होती.