सूर नवा ध्यास नवा - छोटे सुरवीर

Submitted by सान्वी on 29 August, 2018 - 05:38

धागा काढायला बराच उशीर झाला आहे. खरंतर मागच्या पर्वाचा भरगोस प्रतिसाद पाहता या पर्वावर लवकरच धागा येईल असे वाटले होते परंतु नाही आला अजून. आणि मला मायबोलीवर स्वतःचा पहिला धागा काढण्याची संधी मिळाली. असो.
तर कार्यक्रमाबद्दल वेगळं सांगण्याची काही गरज नाही. या वेळी सूत्रसंचालिका बदलून माझी आवडती स्पृहा जोशीला घेतलं आहे, त्यामुळे तीचे ओघवते सूत्रसंचालन आणि नेहमीचे कॅप्टन अशी मस्त भट्टी जमली आहे. सगळ्यात कहर म्हणजे ती छोटी मुले, zee वरील सारेगमप लिटिल चांप्स ची जादू परत अनुभवायला मिळते आहे. रटाळ मालिका च्या भाऊगर्दी मध्ये निरागस मुलांचे सूर सुखद वाटताहेत. तुम्हाला काय वाटतं?

Group content visibility: 
Use group defaults

गेल्या आठवड्यात कोण गेले बाहेर अन कट्यार कोणाला मिळाली????>> महेश नसल्यामुळे एलिमिनेशन झाले नाही. कट्यार परत एकदा सईला मिळाली.

बर्‍याच दिवसांनी कालचा भाग पाहिला. वेगवेगळ्या वाद्यांत पारंगत असलेल्या स्त्रीवादकांना निमंत्रित करून त्यांच्या वादनाची साथ मुलांच्या गाण्यांत उपलब्ध करून देण्याची योजना फार आवडली. आपल्या हटके रूचीची, कलेची, त्यामगच्या कष्टाची अश्या प्रकारे दखल घेतली गेल्याने झालेला आनंद या कलाकरांच्या चेहर्‍यांवरून ओसंडत होता. फारच छान.

बुधवारचा एपिसोड काय धमाल होता !
हर्षल मॉनिटरच्या गोडपणाला शब्दच नाहीत, सुनध्यान च्या टिमला धन्यवाद, जवळपास २५ मिनिटं त्याला दिली !
अगदीच ५ वर्षाचं बाळ आहे ते, त्याचं अ‍ॅक्टींग, गाणं, पाठांतर, प्रेझेन्स ऑफ माइंड तरीही निरागस असा ऑल इन वन चमत्कारच आहे तो.
मांजरेकर स्पीचलेस होते, अशोक सराफनेही धमाल आणली.
मांजरेकरही चांगले गायले !
मजा आली खूप दिवसांनी या आठवड्यात.
एलिमिनेशन मात्रं अजिबात पटलं नाही, फार गुणी मुलगा आहे आदि , अवघड गाण्यांच्या चॉइसमुळे गेला बहुदा.
पण तरीही तो गेला आणि विष्वजा-सक्षम-मीरा मात्र सेफ आहेत हे काही झेपलं नाही.

दीपांजली +१
सक्षम समोर असताना आदि एलिमिनेट झाला हे पटले नाही.
हर्षद फारच गोड. महत्त्वाचे म्हणजे तो आगाऊ न वाटता निरागसच वाटतो. Happy

हर्षद फारच गोड. महत्त्वाचे म्हणजे तो आगाऊ न वाटता निरागसच वाटतो >>> + ११११

फक्त काही वेळा त्याच्याकडच्या अवाजवी अपेक्षांमुळे त्याचा हा निरागसपणा, बालपण हरवुन जावु नये असे वाटले. म्हणजे मला निट सांगता येणार नाही तरी जसे सारखे त्याच्याकडुन तो पोवाडा गावुन घेणे, तेही त्यांना हवे तसे हे चुकीचे वाटले. बिचारा पोरगा काही क्षण गोंधळला असे मला वाटले. काल पोवाडा गाताना तो पोवाड्या गाताना करतो हातवारे करतो तसे न करता त्या प्रो. धोंड सारखे करत होता तेव्हा अवधुत अन स्पृहा जे करत होते ते तितकेसे नाही आवडले नाही

डिजे, सहमत. कसला शार्प आणि ऑल राऊंडर आहे हर्षद.
व्हिबीशीही सहमत. स्पृहा आणि अवधूत काय करत होते? लक्षात येत नाहीये.

हर्षद फारच गोड. महत्त्वाचे म्हणजे तो आगाऊ न वाटता निरागसच वाटतो >>> + १

Vb सहमत.
मला वाटतं ते आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना आपल्या अतिशय हुशार मुलाचे सगळे गुण दाखवावेत/कौतुक करुन घ्यावं अशा मानसीकतेतून झालं असावं.

स्पृहा आणि अवधूत काय करत होते? लक्षात येत नाहीये. >> स्पृहा हर्षदचा हात धरून त्याला हातवारे करायला लावत होती. पण अवधूतने काय केलं?? तो तर स्वतःचे हातवारे स्वतःच करत होता. त्याने इन्सीस्ट केलेलं आठवत नाही.

हर्षद चुणचुणीत आहे यात शंका नाहिच, पण त्याचा पर्फॉर्मंसहि "स्टेज्ड" असु शकेल याची शक्यता जाणवते. विशेषतः स्पृहा बरोबरच्या प्रश्नोत्तरात...

काही गोष्टी स्टेज्ड नक्कीच असतील. पण अगदी प्रॅक्टिस केली तरी आयत्या वेळी गोंधळ वगैरे उडू शकतोच जे त्याच्या बाबतीत होताना दिसत नाही. एकदम कॉन्फिडंट आणि हजरजबाबी.

स्पृहा हर्षदचा हात धरून त्याला हातवारे करायला लावत होती. पण अवधूतने काय केलं?? तो तर स्वतःचे हातवारे स्वतःच करत होता. त्याने इन्सीस्ट केलेलं आठवत नाही.>>>>> निधी, अवधुतच्या इशाऱ्यानंतर स्पृहा ने तसे केले म्हणजे निदान मला तरी तसे वाटले

हर्षद वाला एपी आज परत बघितला
खूप खूप गोड मुलगा आहे तो
इथे कोणीतरी लिहिले होते न की या शिरेलीचे संवादलेखक आपले माबोकर आहेत, तर त्यांना मला एक विचारायचेय की ह्या गोंडस हर्षद चे संवाद पण लिहिता का तुम्ही की तो स्वतःच जसे सुचेल तसे बोलतो. म्हणजे किमान गेला एपी तर बऱ्यापैकी स्क्रिप्टड वाटला

@ सानवी , ह्या धाग्याचा ग्रुप बदलून घ्याल का? म्हणजे शोधायला बरे पडते

एलिमिनेशन मात्रं अजिबात पटलं नाही, फार गुणी मुलगा आहे आदि , अवघड गाण्यांच्या चॉइसमुळे गेला बहुदा. >>>>> अगदी ! त्या केणे मुलीने सुन्या सुन्या कसंं म्हंटलं आणि तरीही ती राहिली !
बादवे, बॉटम थ्री मधल्या मुलांना तुम्ही सेफ आहात सांगितलं की ती डायरेक्ट डोकं जमिनीला टेकवून नमस्कार काय घालतात ?? ते मलातरी फार विचित्र वाटतं.

आजपण गाण्याचा चॉईस गंडलेलाच होता !! त्या सृष्टीला तिच्या वयाला अजिबात न शोभणारं 'आओ हुजूर...' दिल होतं. अर्थातच ते गंडलं.
ते मी आले चांगलं झालं. सचिन आणि स्पृहाने डान्सपण मस्त केला. Happy

>>बॉटम थ्री मधल्या मुलांना तुम्ही सेफ आहात सांगितलं की ती डायरेक्ट डोकं जमिनीला टेकवून नमस्कार काय घालतात ??>> कुठूनतरी उचललेलं असावं. एकाने केलं की बाकी सगळे कॉपी करणार. अती नमस्कार चमत्कार बघवत नाहीत.
पिळगावकर पिळायला आले आहेत तर!! बघत नाही सध्या हेच बरं आहे.

मी पण सध्या बघत नाहीये. फक्त परवा मुद्दाम मॉनिटर साठी तो मांजरेकरांचा भाग पाहिला.
बाकी आता सगळंच तेच ते वाटायला लागलंय. मुलांच्या गाण्याचा ग्राफ वर जातोय असे वाटत नाहीये. आधीपेक्षा फार ग्रेट कोणती गाणी नाही होत आहेत.

महागुरुने दोन दिवस जास्त पिळल नाही ते बर झाल. पण सोनू निगम, मीनाकुमारी आणि निळू फुले बद्दल छान सान्गितल होत त्याने.

स्पृहा हल्ली गायला सुद्दा लागलीये. Lol पण बर गातेय.

त्या सृष्टीला तिच्या वयाला अजिबात न शोभणारं 'आओ हुजूर...' दिल होतं. >>>>> तिने त्या गाण्याच्या आधीची सुरुवात होती ते मात्र छान गायल.
सक्षम सोनावणे, सगळया मुली छान गायल्या. स्पेशली स्वराली. चैतन्यने ' खईके पान बनारसवाला' काही खास म्हटल नाही. ते सक्षमला दयायला हव होत.

अरे यार त्या म्हागृ नी फार बोर केलं राव. सारखं मी यांव न मी त्यांव .. बाकी गाणी छान झाली. दिल की तापिश सुंदर झालं

त्या म्हागृ नी फार बोर केलं राव. >>>> त्यामुळे सगळेच भाग कंटाळवाणे झाले.

दिल की तापिश सुंदर झालं >>> + ११

त्या म्हागृ नी फार बोर केलं राव. >>>>>>> ++++++११११११

दिल की तापिश सुंदर झालं >>>>>> अगदी अगदी. कट्यार त्यालाच मिळायला हवी होती.

दिल की तपिश कोणत्या भागात झालं? >>>>> कालच्या भागात.

सचिनने काही किस्से छान रंगवुन सांगितले. काही ठिकाणी इतरांचीही लाल केली स्वतः कमीपणा घेउन (जे चांगले लक्षण आहे).

कालच्या कट्यारीच्या मानकर्‍याची निवड साफ चुकली असं वाटलं. किती किनरा आवाज आहे विश्वजाचा (कधीकधी तर ऐकुही येत नाहीत तिचे शब्द) तरी तिला दिली कट्यार. मला तर अंशिकाचे गाणे खुप आवडलेले. साहिल पांढरेचेही छान झालेले.

Pages