सूर नवा ध्यास नवा - छोटे सुरवीर

Submitted by सान्वी on 29 August, 2018 - 05:38

धागा काढायला बराच उशीर झाला आहे. खरंतर मागच्या पर्वाचा भरगोस प्रतिसाद पाहता या पर्वावर लवकरच धागा येईल असे वाटले होते परंतु नाही आला अजून. आणि मला मायबोलीवर स्वतःचा पहिला धागा काढण्याची संधी मिळाली. असो.
तर कार्यक्रमाबद्दल वेगळं सांगण्याची काही गरज नाही. या वेळी सूत्रसंचालिका बदलून माझी आवडती स्पृहा जोशीला घेतलं आहे, त्यामुळे तीचे ओघवते सूत्रसंचालन आणि नेहमीचे कॅप्टन अशी मस्त भट्टी जमली आहे. सगळ्यात कहर म्हणजे ती छोटी मुले, zee वरील सारेगमप लिटिल चांप्स ची जादू परत अनुभवायला मिळते आहे. रटाळ मालिका च्या भाऊगर्दी मध्ये निरागस मुलांचे सूर सुखद वाटताहेत. तुम्हाला काय वाटतं?

Group content visibility: 
Use group defaults

स्वराली काय अप्रयिम गायली ‘तेरे बिन नही जिना मर जांवा ढोलना‘ , एकदम क्लास अपार्ट !
तिनी फक्त सुफी गावं , काय माहौल बनवला !

हा धागा बरेच दिवस शोधत होतो. Happy अजून कालचा भाग बघायचा आहे. नाट्यसंगीत आठवडा एकदम झकास झाला. इंगळे-भावे-राघवन त्रयीने धमाल आणली अगदी. आणि गाणीही छान झाली.

हा आठवडाच मराठी संगित्प्रेमींकरता मेजवानी आहे. श्रीधर फडक्यांच्या कामेंट्सने चार चांद लावलेले आहेत...

काल कट्यार कोणाला मिळाली ? स्वरालीच्या गाण्यानंतर अंशिकाच गाणं ऐकायचा कंटाळा आला म्हणून बंद केला टिव्ही.

काल कट्यार कोणाला मिळाली ? >> अंशिकाला.

काल सृष्टी बाहेर गेली. Sad
ती एलिमिनेट होईल असं वाटतंच होतं. पण तरीही खूप वाईट वाटलं.

काल सृष्टी बाहेर गेली >> अरेरे, असे कसे झाले छान गाते की ती

मला विश्वजा चे गाणे बिल्कुल आवडत नाही, गण्याची जाणही नाही मला तेव्ह्ढी,तरी सृष्टी आधी गेली बाहेर, हे नाही रुचले Sad

काल कट्यार कोणाला मिळाली ? >> अंशिकाला. >> अपेक्षीतच होतं.

तरी सृष्टी आधी गेली बाहेर, हे नाही रुचले >> असच मला तो पांढरे आऊट झाला तेव्हा वाटल होत.

सृष्टी आधी गेली बाहेर, हे नाही रुचले. मला विश्वजा चे गाणे बिल्कुल आवडत नाही, >>>>>>> ++++++१११११११

स्वरालीला मिळायला हवी होती कटयार. वेस्टर्न गाणे कॉन्फिडन्टली गायल तिने. Happy तन्तोतन्त सुनिधी चौहानसारखच वाटत होत.

सम्पुरण आठवडा मात्र मस्त गेला. नवीन नवीन माहिती मिळत होती श्रीधर फडके कडून आणि आनन्द माडगुळकरान्कडून.

विश्वजाच्या गाण्याचं नेहमी इतकं कौतुक होतं पण प्रामाणिक सांगायचं तर मला तिचा आवाज नेहमीच घाबरलेला, हलणारा, आत्मविश्वासाचा अभाव असलेला वाटत आलाय. मी पाहिलेल्या तिच्या परफॉर्मन्सेस पैकी एकही ‘वा!’ असा वाटला नाही. प्रत्येक वेळी तिचं इतकं कौतुक होतं (महेश आणि शाल्मलीकडूनही) की मला नक्की तिचं गाणं कळलेलं नाही असं वाटतं. तुम्हाला कोणाला असं वाटतं का?

(हे इथे लिहू की नको असे वाटत होते, पण तिच्या इतके कौतुक होणार्‍या गाण्यातली गंमत आपल्यालाही कळावी म्हणून लिहिलेच.)

हो न, मी पण हे आधी लिहिलेय की सृष्टी कशी काय गेली हिच्या आधी. मलाही गाणे कळत नाही, तरी हिचा आवाज नाही आवडला , त्यात जवळपास सगळीच गाणी सारखी वाटतात तिची . तरीही प्रत्येक वेळी सुरक्षित Angry

रच्याकने, आज कोण गेले अन कट्यार कुणाला दिली

मलाही कधीच आवडलेलं नाही विश्वजाचं गाणं. तिच्या आवाजाला गोड का म्हणायचे सगळे हा ही प्रश्न पडायचा मला.
सक्षमला बहुतेक ड्युएटने वाचवलं आज. मला त्याचंही गाणं आणि हावभाव दोन्ही आवडत नाहीत.

आज विश्वजा बाहेर आणि कट्यार मीराला.

सुरुवातीची मीरा आणि आताची मीरा एकदम चढता आलेख आहे तिचा. मला आधी ती कधीही बाहेर जाईल असं वाटायचं.. पण आता चक्क आवडतेय.
एका एपिसोडमध्ये तिने मिथलेश आणि इतर म्युझिशीयन्सनी तिला गाणं समजून घेण्यासाठी दिलेल्या टीप्स आणि केलेल्या मदतीबद्दल सांगितलं होतं. तो टर्निंगपाॅइंट होता तिच्या गाण्याच्या बाबतीत.

अजून एक म्हणजे काल सईच्या गाण्याला म्युझिशीयन्सनी काय कमाल केली. आताही आठवलं तरी अंगावर रोमांच उभा राहतो. एकदम कम्माल.

आज विश्वजा बाहेर आणि कट्यार मीराला..>> वाह बेस्ट न्यूज

इतर कोणाही पेक्षा आता विश्वाजाच बाहेर जायला हवी होती

मीरा मलाही हल्ली आवडू लागलीये, छान गाते अन दिसते सुद्धा ☺️

सक्षमला बहुतेक ड्युएटने वाचवलं आज. मला त्याचंही गाणं आणि हावभाव दोन्ही आवडत नाहीत. >>>>> सक्षम एवढा वाईट नाहीये, छान गातो की तो.

कालचा एपिसोड बघितला का ???
स्वराली खुपच छान गायली..... त्यानंतर मात्र सईचं गाणं मात्र एवढं नाही भावलं..अर्थात तिनं निवडलेलं गाणं अवघड पण होतं...सक्षमचं नाही आवडलं गाणं...

मागच्या आठवड्यात छोट्या मॉनिटरचं गाणं आणि इतक्या महिन्यांनी पहिल्यांदाच आलेल्या आईला पाहून हमसून रडणं फार वाइट वाटलं, स्पृहा जे बोलली ते अगदी मनापासून वाटलं, तेच मनात आलं! जर त्याला आईच्या आठवणीने इतके महिने लांब रहाणं शक्य नसेल तर त्याला घरी घेऊन जा, शेवटी त्याचं बालपण हरवु नये या प्रसिध्दीत हे मह्त्त्वाचं !

हो ना किती हमसून हमसून रडत होतं पिल्लू, डोळ्यात टचकन पाणीच आलंं. किती हुशार आहे, गाय आणि वासरू म्हणजे आई-मुलगा हे बरोबर कळलं त्याला. ते गाणं/कविता कोणी लिहीली आहे ते काही कळलं नाही.

डीजेने सांगितल्यामुळे बघितला तो एपिसोड. किती गोड आहे मॉनिटर. बिच्चारा! अगदी ओठ काढले त्याने गाताना. चॅनल ने तरी कशाला रडवावं असं त्याला?! असं मनात येऊन गेलंच. आय होप हे गिमिक नसावं !

अगदी भारी गातायत सारी मुलं!

आजचा भाग मस्त. >>>>>>> +++++++++११११११११

मागच्या आठवड्यात छोट्या मॉनिटरचं गाणं आणि इतक्या महिन्यांनी पहिल्यांदाच आलेल्या आईला पाहून हमसून रडणं फार वाइट वाटलं, स्पृहा जे बोलली ते अगदी मनापासून वाटलं, तेच मनात आलं! जर त्याला आईच्या आठवणीने इतके महिने लांब रहाणं शक्य नसेल तर त्याला घरी घेऊन जा, शेवटी त्याचं बालपण हरवु नये या प्रसिध्दीत हे मह्त्त्वाचं ! हो ना किती हमसून हमसून रडत होतं पिल्लू, डोळ्यात टचकन पाणीच आलंं. किती हुशार आहे, गाय आणि वासरू म्हणजे आई-मुलगा हे बरोबर कळलं त्याला. >>>>>>>> ++++++१११११११११

ते गाणं/कविता कोणी लिहीली आहे ते काही कळलं नाही. >>>>>> जितेन्द्र जोशी म्हणाला की त्याने ही कविता गावातल्या एका मुलाकडून ऐकली. कवीच नाव सुद्दा सान्गितल त्याने, ते काही आठवत नाही आता.

पाचपोळ सर. आधी कोणाचं तरी वेगळ्याचं नाव ऐकलं, मग ह्यांची कविता आहे हे कळलं, असं म्हणाला.

इथे वाचून, गेल्या आठवड्याचा मॉनिटर वाला भाग बघितला अन रडू आवरले नाही. खुप छान आहे तो बच्चू

स्पृहा पण मस्तच एकदम, बरे झाले तेजश्री नाहीये.

शाल्मलीने असा काय आय मेकप केला होता! भयंकर दिसत होती>>> ती असाच मेकप करते, एखादं वेळेला चांगली दिसली तर नाहीतर प्रत्येक वेळी अशीच भयंकर दिसते

मला तो हर्षदच्या रडण्याचा भाग बघवलाच नाही अगदी. त्याच्या आधी माझेच डोळे भरुन आलेले.
एक कडवं बाकी असतानाच रडू येत होतं त्याला. तरी रडणं कंट्रोल करुन आधी गाणं पूर्ण केलं त्याने. आणि मग शेवटी हमसून रडायला लागला. त्याचं भागात अवधूतने त्याला हसवलं ते आणि नंतर काल त्याला नाॅर्मल पाहून छान वाटलं अगदी. Happy

Pages