सूर नवा ध्यास नवा - छोटे सुरवीर

Submitted by सान्वी on 29 August, 2018 - 05:38

धागा काढायला बराच उशीर झाला आहे. खरंतर मागच्या पर्वाचा भरगोस प्रतिसाद पाहता या पर्वावर लवकरच धागा येईल असे वाटले होते परंतु नाही आला अजून. आणि मला मायबोलीवर स्वतःचा पहिला धागा काढण्याची संधी मिळाली. असो.
तर कार्यक्रमाबद्दल वेगळं सांगण्याची काही गरज नाही. या वेळी सूत्रसंचालिका बदलून माझी आवडती स्पृहा जोशीला घेतलं आहे, त्यामुळे तीचे ओघवते सूत्रसंचालन आणि नेहमीचे कॅप्टन अशी मस्त भट्टी जमली आहे. सगळ्यात कहर म्हणजे ती छोटी मुले, zee वरील सारेगमप लिटिल चांप्स ची जादू परत अनुभवायला मिळते आहे. रटाळ मालिका च्या भाऊगर्दी मध्ये निरागस मुलांचे सूर सुखद वाटताहेत. तुम्हाला काय वाटतं?

Group content visibility: 
Use group defaults

आधीच्या धाग्यावर चर्चा सुरू आहे परंतु हे नवे पर्व आहे लहान मुलांचे त्यामुळे नवीन पर्वसाठी नवीन धागा काढला आहे.

मी नुकतच बघायला सुरु केले...
छान आहेत सगळी मुलं..
तो छोटा मॉनिटेर केलेला मुलगा कोण आहे..कसला गोडुला आहे...अवधुत सोबत मस्त हासत होता काल...
सक्षम मस्त गायला काल...तेरे रश्के कमर मज्जा आली बघुन त्याचा पर्फॉर्मन्स....
स्पृहा चे काही काही उच्चार नाकातुन येतात का..सर्दी झाल्यासारखे...काल एका मुलीचं नाव तिने माळी असं सांगितलं ते मला बाळी असं ऐकायला आलं...
बाकी तेजु पेक्षा मला स्पृहा आवडली..मुलात मुल होउन मस्ती करु शकते ती..
काल एलिमिनेशन झाल्यावर मुले रडत होती ते बघुन कसंतरीच झालं...या पर्वातला एलिमिनेशन हा सगळ्यात अवघड भाग असणार..कारण लहान मुलं रडताना बघणं माझ्यासाठी खुप त्रासदायक असतं नेहेमीच.

बाकी तेजु पेक्षा मला स्पृहा आवडली..मुलात मुल होउन मस्ती करु शकते ती.. >> +११
काल एलिमिनेशन झाल्यावर मुले रडत होती ते बघुन कसंतरीच झालं...या पर्वातला एलिमिनेशन हा सगळ्यात अवघड भाग असणार >> +११
मला उत्कर्ष, केणे मुलगी, निलाखे मुलगी, माहूरची मुलगी आणि त्या भरतीयाचं गाणं आवडलं Happy

राशी चं गाणं छान होतं खरंतर माझ्यामते ओंकार जायला हवा होता. तो cute आहे पण गाण्याचा विचार करता राशी उजवी होती.

कोणी बघतं का हा? काल साहिलने 'चमकते चाँद को' काय सुंदर गायलं! गुलाम अलींचा उर अभिमानाने भरून आला असता. छान गातायत आता मुलं. अजूनही २-३ गाणी किती जबरदस्त होती (चैतन्यचं 'आई'), आणि कालपरवाचे भागही छान झाले.

कोणी बघतं का हा? काल साहिलने 'चमकते चाँद को' काय सुंदर गायलं! >> + ११
छान गातायत आता मुलं. >> उत्कर्ष, मीरा, अंशिका, माहूरची मुलगी यांची गाणी देखिल चांगली झाली

मी बघते. मस्त कार्यक्रम.

काल साहिलने 'चमकते चाँद को' काय सुंदर गायलं! गुलाम अलींचा उर अभिमानाने भरून आला असता>> +१

काल चैतन्यने गायला सुरुवात केली आणि आमच्याकडे गडगडाटी पावसामुळे लाईट गेले. त्यामुळे पुढचा संपूर्ण भाग पाहता आला नाही. Sad

काल कोण एलिमिनेट झालं??

गेले तीन दिवस स्पृहाला बघितल्यावर पायसच्या फ्री... मधल्या फणींद्रची आठवण येत होती. त्याचे डोळे पण असेच दिसत असणार. Wink Proud

@nidhi काल ती छोटी गौरी गोसावी eliminate झाली, खूप इमोशनल वाटतं ही मुलं एक एक करून eliminate होतात तेव्हा.
मला स्पृहा आधीपासून च आवडते अन आता तिचं anchoring ही आवडतंय, खूप natural वाटतं अन ती पण छान धमाल करते मुलांसोबत मूल होऊन.

तिचं anchoring ही आवडतंय, खूप natural वाटतं अन ती पण छान धमाल करते मुलांसोबत मूल होऊन. >> मागच्या कुठल्यातरी भागात तिने साहिल साठी एक छोटीशी कविता म्हटली ती पण छान होती. आणि परवाच्या भागात तर गाण्याचे चुकीचे शब्द गाणे यावर बोलायला लागल्यावर मला ती माबो पण आहे की काय अशी दाट शंका आली Wink

आणि परवाच्या भागात तर गाण्याचे चुकीचे शब्द गाणे यावर बोलायला लागल्यावर मला ती माबो पण आहे की काय अशी दाट शंका आली Wink>> कारण कार्यक्रमाचे लेखक माबोकर आहेत Happy

कवी, गीतकार, लेखक वैभव जोशी ’सूर नवा ध्यास नवा’चे लेखक आहेत. फार पूर्वी ते मायबोलीवर लिहायचे.
मी त्यांना असोसिएट करतेय.

कवी, गीतकार, लेखक वैभव जोशी ’सूर नवा ध्यास नवा’चे लेखक आहेत. फार पूर्वी ते मायबोलीवर लिहायचे.
मी त्यांना असोसिएट करतेय>>> टाळ्यान्चा कडकडाट तुमच्यासाठी Happy

महेश काळे खूप छान बोलतो. परवा कला अनमोल असते पण उपलब्धता ची किंमत करावी. असे फार सुचक बोलला.
नांदेड ची स्वराली मस्त गाते.

नांदेड ची स्वराली मस्त गाते. >>> तिच नावं लिहील्याबद्दल धन्यवाद. मी सारखं लक्षात ठेवीन म्हणते आणि विसरते.

स्पॄहाला ड्रेस आणि केसभुषा भयानक करतात...
>>> हो ती उगाच जास्त जाड दिसते त्यात Sad

मला उत्कर्ष आणि चैतन्य आवडतायेत. सृष्टी पण क्युट आहे पण लांब पल्ल्याची वाटत नाही.
ती एक उंच मुलगी जी मागच्या वेळेला डेंजर झोन मधे होती ( जिला फस्ट क्लास मिळालेला) ती मला फार समजुतदार वाटते.

मुलींमधे गायक म्हणून कोणी फारसं आवडत नाहीये अजुन तरी, एखादा दुसरा पर्फॉर्मन्स आवडतो कोणा ना कोणाचा , अंशिका त्यातल्या त्यात ठिक वाटते. पण सगळ्याच मुली फार गोड वाटतात.

मॉनिटर सगळ्यात जास्त क्युट आहे.

अवधुत आधी पासुनच आवडतो, महेश फार सिरिअस वाटायचा पण मधे यूट्युब वर त्याचा आणि सुभोध भावे चा नंबर १ यारी मधला एपिसोड पाहिला आणि महेश पण तितकाच टवाळ आहे हे बघुन आणखीनच आवडायला लागला. श्याल्मली मला अजुनही जज म्हणून भावत नाहीये

Pages