i care for u

Submitted by अनाहुत on 1 August, 2018 - 10:16

" कसा आहेस ? "
" तसाच . जशी तू सोडून गेलीस , तेव्हा होतो तसाच आहे . "
" आपल्यात काही नव्हतं "
" तुझ्याबाजूने . माझ्याबाजूने तर नेहमीच होत, आहे आणि राहील "
" बाय द वे माझं लग्न झालं "
" माहित आहे मला "
" तू केलस कि नाहीस लग्न "
" जिच्यावर प्रेम आहे तिचा अजून होकार आला नाही "
" ओह्ह कोण आहे ती "
" तू आणि कोण ? "
" माझं लग्न झालय "
" माहितेय मला लग्नाचं आणि डिवोर्सचही "
तिला काय बोलावं हे सुचत नव्हतं
" तुला काय करायचं आहे ? हा माझा वैयत्तिक प्रश्न आहे "
" तुझी काळजी आहे ना "
" नको करू माझी काळजी माझी मी समर्थ आहे "
" तू असतीस समर्थ तर काय होत "
" लग्नाआधी जितकी स्ट्रॉंग होतीस त्याच काय झालं का बनून राहिलीस त्याच्या हाताच बाहुल "
" असं काही नाही "
" हो हे न कळण्याइतकं हळू तरी भांडायचं होत ना , सगळ्या सोसायटी समोर कशाला तमाशा ? "
ती रडवेली झाली होती .
" तुला काय करायचं आहे ? "
" आय एम  सॉरी माझ्यामुळे तुला त्रास झाला पण जे खर आहे ते मान्य तरी कर "
" हो चुकले मी . चुकली माझी निवड . आता खुश ? "
" स्वतःला का दोष देते आहेस आणि ज्याने तुला इतका त्रास दिला तुझं  व्यक्तिमत्व इतकं इतकं बदललं , बदललं म्हणण्यापेक्षा कमजोर बनवलं त्याला वाचवते आहे . खरतर तुझा नाही बऱ्याच मुलींचा हा वीक पॉईंट आहे . त्या जो त्रास देतो त्याच्याशी छान वागतात, सगळं सहन करतात आणि जो त्यांची care करतो त्याला एकतर बुद्धू समजतात किंवा बुद्धू बनवतात . "
" माहित नाही पण मुली मनाने विचार करतात डोक्याने नाही . "
" जो त्यांचं मन समजण्याचं प्रयत्न करतो त्याला तर सगळ्या प्रॅक्टिकल चाचण्यांवर चेक केलं जात आणि जो त्यांच्या मनाशी खेळतो त्याच्यासोबत ओढल्या जातात . खरंच यार ... "
" ते राहू दे तू स्वतःचा विचार कर . थोडा प्रॅक्टिकल हो . " तिला त्याला वेगळ्या विषयावर नेहू पाहत होती .
" मी नाही ना बदलू शकत स्वतःला तू तेव्हाही आवडत होतीस आणि आजही आवडतेस
तू माझ्यावर प्रेम करावं हि अपेक्षा नाही माझी . पण मला तर अडवू शकत नाहीस ना तुझ्यावर प्रेम करण्यापासून "
" का आणि कशाला हे . शोध ना कुणीतरी दुसरी आणि हो सेटल "
"  तुझ्याशिवाय नाही सुचत कोणी " तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला .
" असं नको ना करू मला ऑड वाटत खूप . "
त्याने स्वतःला सावरलं आणि म्हणाला
" तू नको विचार करुस माझा तू तुझ्या फ्यूचरचा विचार कर आणि चांगला जोडीदार निवड आणि त्याच्यासोबत आयुष्य घालवं "
" आणि तुझं काय "
" तू नको ना करू माझा विचार . आजपर्यंत जगलोय तसाच पुढे जगेन "
तिने एकवार त्याच्या डोळ्यात पाहिलं .
" एक बोलू माझं ज्याच्यावर प्रेम होत त्याला मी निवडल पण तो कधी माझ्यात तितका इन्व्हॉल्व्ह झालाच नाही . माझीच फरफट झाली त्याला समजून घेताना . उद्या दुसऱ्या कुणाचा विचार केला किंवा निवड केली तरी तोही माझ्यात इन्व्हॉल्व होईल कि नाही काही माहित नाही . मी अशा कुणाच्या इमोशन बद्दल शुअर नाही . आता परत तोच त्रास सहन करण्याची माझी मानसिक तयारी नाही . मी अशाच व्यक्तीसोबत सुखी होऊ शकते ज्याच्या इमोशन माझ्यासाठी कधीही बदलणार नाहीत . "
" तुला मिळेल नक्की कुणीतरी तुझ्या इमोशन्स समजून घेणारा . "
तो अजूनही बरच काही बोलत होता पण ते तिला ऐकू येत नव्हतं .
ती न ऐकताच त्याला समजून घेत होती त्याच्या हावभावावरून , इमोशन्सवरून ...
" I want to kiss u " ती अचानक बोलली . त्याला काही कळेना . तरीही त्याने तिला विचारलं
" आपुलकी म्हणून , दया म्हणून , कि ...." तिने त्याला पुढे बोलू दिले नाही आणि स्वतःचे ओठ त्याच्या ओठावर टेकवले .
खरंच काही भावना या शब्दात नाही व्यक्त करता येत .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ्रेंडझोन मधून थेट 'i want to kiss you' ?? काहीतरी पटेल असं लिहा.
अंगावरचे कपडे बदलल्यासारखं मनातल्या भावना एकदम बदलता येत नाहीत.