" कसा आहेस ? "
" तसाच . जशी तू सोडून गेलीस , तेव्हा होतो तसाच आहे . "
" आपल्यात काही नव्हतं "
" तुझ्याबाजूने . माझ्याबाजूने तर नेहमीच होत, आहे आणि राहील "
" बाय द वे माझं लग्न झालं "
" माहित आहे मला "
" तू केलस कि नाहीस लग्न "
" जिच्यावर प्रेम आहे तिचा अजून होकार आला नाही "
" ओह्ह कोण आहे ती "
" तू आणि कोण ? "
" माझं लग्न झालय "
" माहितेय मला लग्नाचं आणि डिवोर्सचही "
तिला काय बोलावं हे सुचत नव्हतं
" तुला काय करायचं आहे ? हा माझा वैयत्तिक प्रश्न आहे "
" तुझी काळजी आहे ना "
" नको करू माझी काळजी माझी मी समर्थ आहे "
" तू असतीस समर्थ तर काय होत "
" लग्नाआधी जितकी स्ट्रॉंग होतीस त्याच काय झालं का बनून राहिलीस त्याच्या हाताच बाहुल "
" असं काही नाही "
" हो हे न कळण्याइतकं हळू तरी भांडायचं होत ना , सगळ्या सोसायटी समोर कशाला तमाशा ? "
ती रडवेली झाली होती .
" तुला काय करायचं आहे ? "
" आय एम सॉरी माझ्यामुळे तुला त्रास झाला पण जे खर आहे ते मान्य तरी कर "
" हो चुकले मी . चुकली माझी निवड . आता खुश ? "
" स्वतःला का दोष देते आहेस आणि ज्याने तुला इतका त्रास दिला तुझं व्यक्तिमत्व इतकं इतकं बदललं , बदललं म्हणण्यापेक्षा कमजोर बनवलं त्याला वाचवते आहे . खरतर तुझा नाही बऱ्याच मुलींचा हा वीक पॉईंट आहे . त्या जो त्रास देतो त्याच्याशी छान वागतात, सगळं सहन करतात आणि जो त्यांची care करतो त्याला एकतर बुद्धू समजतात किंवा बुद्धू बनवतात . "
" माहित नाही पण मुली मनाने विचार करतात डोक्याने नाही . "
" जो त्यांचं मन समजण्याचं प्रयत्न करतो त्याला तर सगळ्या प्रॅक्टिकल चाचण्यांवर चेक केलं जात आणि जो त्यांच्या मनाशी खेळतो त्याच्यासोबत ओढल्या जातात . खरंच यार ... "
" ते राहू दे तू स्वतःचा विचार कर . थोडा प्रॅक्टिकल हो . " तिला त्याला वेगळ्या विषयावर नेहू पाहत होती .
" मी नाही ना बदलू शकत स्वतःला तू तेव्हाही आवडत होतीस आणि आजही आवडतेस
तू माझ्यावर प्रेम करावं हि अपेक्षा नाही माझी . पण मला तर अडवू शकत नाहीस ना तुझ्यावर प्रेम करण्यापासून "
" का आणि कशाला हे . शोध ना कुणीतरी दुसरी आणि हो सेटल "
" तुझ्याशिवाय नाही सुचत कोणी " तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला .
" असं नको ना करू मला ऑड वाटत खूप . "
त्याने स्वतःला सावरलं आणि म्हणाला
" तू नको विचार करुस माझा तू तुझ्या फ्यूचरचा विचार कर आणि चांगला जोडीदार निवड आणि त्याच्यासोबत आयुष्य घालवं "
" आणि तुझं काय "
" तू नको ना करू माझा विचार . आजपर्यंत जगलोय तसाच पुढे जगेन "
तिने एकवार त्याच्या डोळ्यात पाहिलं .
" एक बोलू माझं ज्याच्यावर प्रेम होत त्याला मी निवडल पण तो कधी माझ्यात तितका इन्व्हॉल्व्ह झालाच नाही . माझीच फरफट झाली त्याला समजून घेताना . उद्या दुसऱ्या कुणाचा विचार केला किंवा निवड केली तरी तोही माझ्यात इन्व्हॉल्व होईल कि नाही काही माहित नाही . मी अशा कुणाच्या इमोशन बद्दल शुअर नाही . आता परत तोच त्रास सहन करण्याची माझी मानसिक तयारी नाही . मी अशाच व्यक्तीसोबत सुखी होऊ शकते ज्याच्या इमोशन माझ्यासाठी कधीही बदलणार नाहीत . "
" तुला मिळेल नक्की कुणीतरी तुझ्या इमोशन्स समजून घेणारा . "
तो अजूनही बरच काही बोलत होता पण ते तिला ऐकू येत नव्हतं .
ती न ऐकताच त्याला समजून घेत होती त्याच्या हावभावावरून , इमोशन्सवरून ...
" I want to kiss u " ती अचानक बोलली . त्याला काही कळेना . तरीही त्याने तिला विचारलं
" आपुलकी म्हणून , दया म्हणून , कि ...." तिने त्याला पुढे बोलू दिले नाही आणि स्वतःचे ओठ त्याच्या ओठावर टेकवले .
खरंच काही भावना या शब्दात नाही व्यक्त करता येत .
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
आजिबात नाही आवडली. सॉरी!
आजिबात नाही आवडली. सॉरी!
आवडली.
आवडली.
फ्रेंडझोन मधून थेट 'i want to
फ्रेंडझोन मधून थेट 'i want to kiss you' ?? काहीतरी पटेल असं लिहा.
अंगावरचे कपडे बदलल्यासारखं मनातल्या भावना एकदम बदलता येत नाहीत.
आभारी आहे
आभारी आहे
Ohh.. khupch straight forward
Ohh.. khupch straight forward .. but nice