हिपोक्रसी ४ - smoking

Submitted by कटप्पा on 13 July, 2018 - 13:03

एका कॉर्पोरेट ऑफिस मधील दोन कलिग्स ऑफिस बाहेर गप्पा मारत आहेत.
प्रसंग १ :
ती - अरे तो राहुल आहे का फायनान्स डिपार्टमेंट चा? स्मोक करतोय.
तो - हो तोच दिसतोय.
ती - मला स्मोकिंग करणारी मुले बिल्कुल आवडत नाहीत. किती घाणेरडी सवय आणि किती घाण दिसते ही मुले स्मोक करताना.
तो- हो माझं पण तेच मत आहे!

प्रसंग २ - तेच दोघे काही दिवसानंतर बाहेर.
ती - अरे ती अर्पिता आहे का HR मधली?
तो - हो.
ती - मला नव्हतं माहीत ती स्मोक करते.
तो - हो ना. मला अजिबात आवडत नाहीत मुलींनी स्मोक केलेलं. वाईट दिसतं.
ती - तुम्ही पुरुष किती चीप असता, मुलींना व्यक्तिस्वातंत्र्य आहे की नाही?तिला जे आवडेल ते ती करेल ना. मुलींनी स्मोक केलेले वाईट दिसते म्हणे? How dare you? You are so sexist.You should be ashamed of yourself!!!

हिपोक्रसी -4

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्हाला ईथे अवांतर चर्चा खेचायची आहे
पण तुमच्या प्रश्नांला स्वतंत्र धाग्यात उत्तर दिले तर त्यावर काही बोलायचे नाहीये.
वर लिंक दिली आहे. तिथे जाऊन उत्तर वाचा. याऊपर काही शंका मनात राहिली असेल तर तिथेच विचारा. तिचेही निरसन केले जाईल. जर शंका मिटल्या असतील तर स्वागत आहे Happy

शंका मिटलेल्या नाहीत, असे ते म्हणत आहेत.

दारूची जाहिरात करतो, म्हणजे लोकांचे आरोग्य व समाजाचेही आरोग्य सांभाळतो, असा तो नट ज्याची तुम्ही फ्री जाहिरात करता म्हणजे तुम्हीही दारू विकायला मदत करता असे काहीसे त्यांचे म्हणणे आहे.

त्याला इथे उत्तर न लिहिता दुसरा धागा काढणे, म्हणजे भूगोलाच्या पेपरातल्या प्रश्नाच्या उत्तरासाठी एंटायर पोलिटिकल सायन्स चा अख्खा नवा पेपर काढण्यासारखे आहे Lol

तसेही भभांनी आजवर इतक्या धाग्यांवर इतक्या अवांतर चर्चा केल्या आहेत, की त्यापुढे हे काहीच नाही.

भारी आजवर कित्येक धाग्यात शाखा, सई, गफ्रे चा विनाकारण उल्लेख करून चांगल्या चर्चेत माती घालणारा आज म्हणतोय की अवांतर चर्चा नको.
सौ चुहे खा के बिल्ली हज को चली ही म्हण तुझ्यावरूनच आली असावी काय रे?

तुझे धागे वाचून त्यावर काही लिहिणे तुझ्या गत जन्मीच्या आयडीच्या वेळीच सोडून दिले आहे, तू तिथे काहीही बालगीते लिही मला शून्य फरक पडत नाही.

मराठी संकेतस्थळा वर हिंदी म्हण नको असेल तर करून करून भागले, देवपूजेला लागले ही म्हणही घेता येईल

Happy Happy Happy

ही आयडीया चांगलीये खरं तर, असला भारी पाऊस पडतोय आज, मस्त घरी जाऊन पांघरूण घेऊन गुरुगुरु झोपावं वाटतंय

शंका मिटलेल्या नाहीत, असे ते म्हणत आहेत.
>>>
कारण ते माझे ऊत्तरच वाचत नाहीयेत.
असं ते म्हणत आहेत.

त्याला इथे उत्तर न लिहिता दुसरा धागा काढणे, म्हणजे भूगोलाच्या पेपरातल्या प्रश्नाच्या उत्तरासाठी एंटायर पोलिटिकल सायन्स चा अख्खा नवा पेपर काढण्यासारखे आहे
>>>>

आरारा आपल्या पोस्ट आणि उदाहरणे मला नेहमी आवडतात भले त्या माझ्या मुद्द्याच्या विरोधात का असेना.
पण ईथे आपण चुकलात.
मुळात या भूगोलाच्या पेपरात नागरीकशास्त्राचा प्रश्न विचारला आहे हे लक्षात घ्या.
ते स्वत: आणि ईतरांच्या पोस्टमध्येही हे कबूल आहे की हा विषय ईथे अवांतर होईल. मग ईथेच चर्चा करायचा हट्ट का? कि माझ्यावरचा आरोप मी मुद्देसूद आणि पुराव्यासह फेटाळला आहे हे मान्य करणे नकोय.
ते म्हणत आहेत की त्यांनी तिथे मी काय लिहीलेय हे वाचलेही नाही. पण हुमायुन नेचरचा विचार करता हे अशक्य आहे Happy

ही आयडीया चांगलीये खरं तर, असला भारी पाऊस पडतोय आज, मस्त घरी जाऊन पांघरूण घेऊन गुरुगुरु झोपावं वाटतंय
>>>>

मी खरेच आज सुट्टी घेतली पाऊस बघून. आणि आता दुपारची छान झोप पुर्ण करून चहा सोबत गरमागरम पराठ्यांचा स्वाद घेत ऑनलाईन आलोय..
जे विचार मनात येतात ते करून मोकळे व्हायचे. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त आपण मनात येईल तसे जगायला कचरायचे नाही Happy

घिसते घिसते मिट जाता, आपने अबस बदला
नंग ए सिजदा से (मेरे) संग ए आस्तां अपना!

अबस- उगाच
नंग ए सिजदा - डोकं टेकून टेकून (सजदा करून) पडलेला डाग
संग ए आस्तां- पायरी, सोपा (दाराची चौकट)

मी ज्यावर सजदा करून करून डाग पडलाय तो घासून घासून संपला असता, तुम्ही उगीच (पायरीचा दगड) बदलला.

Pages