हिपोक्रसी ४ - smoking

Submitted by कटप्पा on 13 July, 2018 - 13:03

एका कॉर्पोरेट ऑफिस मधील दोन कलिग्स ऑफिस बाहेर गप्पा मारत आहेत.
प्रसंग १ :
ती - अरे तो राहुल आहे का फायनान्स डिपार्टमेंट चा? स्मोक करतोय.
तो - हो तोच दिसतोय.
ती - मला स्मोकिंग करणारी मुले बिल्कुल आवडत नाहीत. किती घाणेरडी सवय आणि किती घाण दिसते ही मुले स्मोक करताना.
तो- हो माझं पण तेच मत आहे!

प्रसंग २ - तेच दोघे काही दिवसानंतर बाहेर.
ती - अरे ती अर्पिता आहे का HR मधली?
तो - हो.
ती - मला नव्हतं माहीत ती स्मोक करते.
तो - हो ना. मला अजिबात आवडत नाहीत मुलींनी स्मोक केलेलं. वाईट दिसतं.
ती - तुम्ही पुरुष किती चीप असता, मुलींना व्यक्तिस्वातंत्र्य आहे की नाही?तिला जे आवडेल ते ती करेल ना. मुलींनी स्मोक केलेले वाईट दिसते म्हणे? How dare you? You are so sexist.You should be ashamed of yourself!!!

हिपोक्रसी -4

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

__/\__

Screenshot_2018-07-15-10-09-49.png

फोनवरून (तुमच्या शब्दांत हुशार भ्रमणध्वनीवरून टाइप (टंकलेखन) करताना श टाइप केलं, की शची बाराखडी येते, त्यातल्या शा'खाली ख आहे. माझं बोट शा ऐवजी ख वर पडलं.

हा तुमच्यासाठी माझा शेवटचा प्रतिसाद.
तुमच्या आधीच्या अवताराकडे केले , तसे याही अवताराकडे यापुढे संपूर्ण दुर्लक्ष.

त्यातल्या शा'खाली ख आहे. माझं बोट शा ऐवजी ख वर पडलं.
>>>
ओके हे मान्य आहे. स्क्रीनशॉट तसदीबद्दल आभार.
पण यापुढे टंकलेखनातील चुकांचीही काळजी घ्या. चूक टंकलेखनातील असो वा शुद्धलेखनातील. परीणाम तोच Happy
किंबहुना टंकलेखनातील चूक अर्थाचा अनर्थ करण्याची शक्यता जास्त असते.

आता हेच बघा ना, तुमच्या या एका चुकीने धाग्यात शाहरूख आला.
आता कोणीतरी ईथे शाहरूख कसा चेन स्मोकर आहे याचा उल्लेख करेन.
मग त्यानंतर ......
असो,
एक विषयाशी संबंधित अवांतर प्रश्न - चेन स्मोकर कि चैन स्मोकर?

तिथे डॉक्टरांनाही तुम्ही कसे चूक आणि मीच माझ्या रोगाचं केलेलं निदान कसं बरोबर हेच सांगायचे असेल. Proud
>>>>

भास्कराचार्य तुम्हाला असे म्हणायचे आहे का की डॉक्टरांचे कधी चुकतच नाही. किंवा ते जे सांगतील ते डोळे झाकून करावे. जी गोळी देतील ती निमूटपणे खावी. जी ट्रीटमेंट देतील ती मुकाटपणे घ्यावी..

मग मला वाटते आपले डॉक्टरांचे अनुभव फार तोकडे आहेत.
मला एक आयुष्यभर पुरणारा आजार आहे.
आणि त्याचे निदान होईपर्यंत मी कित्येक वर्षे कित्येक डॉक्टर वेड्यासारखे फिरलोय.
डॉक्टरला आपण देवाचा दर्जा देतो. कारण तो आपला जीव वाचवतो. पण असतो तो माणूसच. तो ही चुकतोच. वा चुकीचा असू शकतो.

तू खरंच एकदा डॉक्टरांकडे जाऊन ये रूनम्या.... काळजी वाटते तुझी फार...
>>>>

हो पावसाळा सुरू झाल्यापासून गेले काही विकेंड सलग पावसात भिजल्याने आज फायनली सर्दी झालीय. थोडे अंगही गरम वाटतेय. वाफ, ओवा, गरम दूध असे घरगुती उपाय चालू आहेत. विचार करतोय थोडी दारू पिऊन बघावी.
असो त्रास वाढला तर नक्की डॉक्टरकडे. बाकी या संडेला पावसात भिजत डॉक्टर शोधायचा हे सुद्धा नकोसे वाटते.

हे मी काय वाचतोय
शाहरुख चेन स्मोकर आहे म्हणे???
आणि दारुडा ही आहे???

आणि इथे दारुवरून इतरांना आगाऊ सल्ले देणारा आयडी त्याचा भाट आहे म्हणे???

जबराट

आशु,

सत्य हे दारू व सिगारेटच्या धुरासारखेच कटू असते. पण ते शारूक प्रेमाचा आव आणणार्‍यांना समजत नाही.

अत्यंत whine केल्यासारख्या आवाजात बोलणारा. लिमिटच्या बाहेर लघळपणा करून मुलीच्या मागे लागणारा, दीडशहाणा असा शारूक कोणे एके काळी सिनेमात पाहिला अन त्यानंतर पुन्हा कधीही त्याच्या सिनेमाला जायचे नाही असे ठरवले. ते आजतागायत पाळलेले आहे. असो व्यसनांचाही चॉइस असतो. टु ईच हिज ओन.

बाकी प्रत्येकच विषयात भंभाजीरावांना (माझ्यासारखीच) गती असूनही, शेजारच्याने सिगारेट ओढून होणारे पॅसिव्ह स्मोकिंग व कुणी शेजारी बसून दारू पिणे, याच्यात फक्त (दारूच्या अग्दी मुंबईबारमधे दाटीवाटीने बसल्यावरच येणार्‍या) वासाचे साम्य आहे म्हणून दारू व सिगारेट, या दोघांचे उपद्रवमूल्य सारखेच, असे प्रतिसाद टंकल्यावर काय बोलावे?

पिण्याचे अल्कोहोल इन लिमिटेड क्वांटिटी, चहाकॉफीसारखे स्टिम्युलंट पेय, अगदी अन्नपूरक घटक म्हणूनही वापरले जाते. न पिण्याच्या अल्कोहोलचे उपयोग वेगळेच.

पण तंबाखू, ही सर्व प्रकारांत म्हणजे, खाण्याची, तपकीर म्हणून हुंगण्याची मिश्री म्हणून लावण्याची विडि, सिगारेट, चिरूट, पाईप, सिगार, चुट्टा, चिलिम अन तसल्या अनेक प्रकारांनी धूम्रपान केलेली, व कितीही कमी क्वांटीटीत नेहेमीच वाईट.

***
शारूक अवांतर.

त्या सँट्रो कार वाल्यांनी लाँचिंगच्यावेळी शारुकला घेऊन 'सँट्रोवाले है' अशी एक अत्यंत इरिटेटिंग अ‍ॅड सिरिज काढलेली होती. म्हणजे अतीशय डोक्यात जाणारं काहीतरी करायचं अन 'सँट्रोवाले है' म्हणून सोडून द्यायचं, अश्या त्या अ‍ॅड्स होत्या.

केवळ त्यातल्या शारूकमुळे व एकंदर इरिटेटिंग कन्सेप्टमुळे माझ्या डोक्यात त्या हुंदाई गाड्यांविषयी अत्यंत घृणा निर्माण झालेली आहे.

एक मिनिट आरारा,
मला कुठेही तंबाखू आणि दारूची तुलना करण्यात जराही ईंटरेस्ट नाही.
माझ्यासाठी दोन्ही वाह्यातच व्यसने आहेत ! आणि राहणार ...

पण आपली पोस्ट वाचून मला एक गंमत आठवली, दारूच्या समर्थनार्थ लोकं बोलत होते की दारू वाईट नाही तर अतिरेक वाईट आणि मग तो कुठल्याही गोष्टीचा वाईट, अगदी पाण्याचाही वाईट.
तर पाण्याचा अतिरेक आणि दारूचा अतिरेक यांची एकाच पातळीवर तुलना करणार्‍यांबद्दल काय म्हणाल?

असो,
आता माझ्या शाहरूखबद्दल बोलूया,
तर मुळात हे लक्षात घ्या सर्वजण, माझा विरोध दारूसिगारेट या व्यसनांना आहे. मी त्या व्यसनांना वाईट समजतो.
सिगारेट दारू पिणार्‍यांना वाईट समजत नाही की त्यांचा राग करत नाही. किंबहुना मला त्यांच्याबद्दल सहानुभुतीच आहे म्हणून ईथे आपला जीव आटवत असतो.
शाहरूख सिगारेट आणि दारू पितो याचे मला वाईटच वाटते. तो ही व्यसने करतो म्हणून लगेच मी या व्यसनांचे समर्थन करायला धडपडणार नाही. जे वाईट आहे ते वाईटच आहे !

पण म्हणून मी व्यसन करतो या कारणासाठी माझ्या आवडत्यांना दूर लोटावे का? अश्याने कित्येक मित्र दुरावतील माझे. माझी तत्वे वेगळी आहेत. जर कोणी मित्र व्यसनाच्या आहारी गेला असेल तर त्याला सोडून जाऊ नये, उलट तेव्हाच त्याला आपल्या मैत्रीच्या आधाराची सर्वात जास्त गरज असते.

मग ईथल्या कोण्या त्रयस्थ माणसाला मी दुतोंडी वा ढोंगी वाटत असेन, की हा बघा मायबोलीवर दारूसिगारेट विरोधात लिहितो, पण तो अमुकतमुक दारू पिणारा त्याचा मित्र आहे, बाहेर त्याच्या गळ्यात गळे घालून फिरतो, असे जर कोणाला वाटत असेल तर खुशाल वाटू दे. माझी तत्वे माझ्यापाशी !

केवळ त्यातल्या शारूकमुळे व एकंदर इरिटेटिंग कन्सेप्टमुळे माझ्या डोक्यात त्या हुंदाई गाड्यांविषयी अत्यंत घृणा निर्माण झालेली आहे.
>>>>>

तुमच्यासारखे लोकं मूठभर असतात, पण बहुतांश लोकांना शाहरूख हा आवडतो आणि त्यामुळे त्या प्रॉडक्टला मार्केट तयार होते. म्हणून तो मोठमोठ्या ब्रांडच्या जाहीरातीत दिसतो. हे मार्केटींगचे गणित आहे. तिथे लोकप्रिय चेहराच लागतो, जो शाहरूख आहे. अन्यथा तो जाहीरातीतील ईतका मोठा ब्रांड नसता.

सगळेच मत मांडतायत - मी पण :
1.शाहरुख एक अभिनेता - सुरुवातीला impressive, नंतर तोच तोच पना.. ओव्हरओल आवरेज.
2 शाहरुख एक बिननेसमेन - excellent !!!

बहुतांश लोकांना शाहरूख हा आवडतो आणि त्यामुळे त्या प्रॉडक्टला मार्केट तयार होते. म्हणून तो मोठमोठ्या ब्रांडच्या जाहीरातीत दिसतो. हे मार्केटींगचे गणित आहे. तिथे लोकप्रिय चेहराच लागतो, जो शाहरूख आहे. अन्यथा तो जाहीरातीतील ईतका मोठा ब्रांड नसता.

यावर तू कोलांटी उडी मारणार याची खात्री आहे तरीही बोलतो.
वर उल्लेख केलेल्या मुद्द्यामुळेच शाहरुखचे दारू पिणे किंवा त्याची जाहिरात करणे जास्त धोकादायक आहे. तो उघड उघड त्याच्या चाहत्यांना दारू पिण्यास प्रोत्साहन देतो. यश साजरा करण्यासाठी दारू पिणे योग्य आहे असा संदेश तो जाहिरातीतून देतो.

जाहिराती बघणारे सगळेच सुज्ञ नसतात आणि तुझा लाडका हजारो लोकांना व्यसनाच्या विळख्यात ढकलतो याबद्दल तुझ्या तोंडून एक निषेधाचा शब्द नाही उलट त्याची फुकट पीआर गिरी सुरू असते.

एककीकडे दारू कशी वाईट हे बोलून बोलून वीट आणायचा आणि दुसरीकडे दारूची जहिरात करणाऱ्याला डोक्यावर घेऊन नाचायचे इतका दांभिकपणा तूच करू शकतोस

एककीकडे दारू कशी वाईट हे बोलून बोलून वीट आणायचा आणि दुसरीकडे दारूची जहिरात करणाऱ्याला डोक्यावर घेऊन नाचायचे इतका दांभिकपणा तूच करू शकतोस
>>>>>>

दारूची जाहीरात करणे हे एकच काम करतो का तो?
अहो मी त्याचा चाहता आहे ते ईतर कलागुणांसाठी.
त्याच्या वाईट गुणांना मी वाईटच म्हणतो आणि वाईट कृत्यांचा निषेधच करतो.
माफ करा आशूचॅम्प, पण तुम्हाला ऋन्मेष अजून समजलाच नाही.
तसेही फार कमी जणांना हा फरक समजतो. त्यामुळे आपल्या दांभिकपणाच्या आरोपाचे काही विशेष वाटले नाही.
मी नंतर फुरसतीने यावर एक सर्वसमावेशक धागा काढेन, तिथे सविस्तर बोलेन Happy

तुला माबोवर येऊन किती वर्षे झाली यात तू निषेध कुठे आणि किती वेळा केला आहेस सांग पाहू बेंबट्या

त्याच्या एकट्यापुरता दारू आणि सिगरेट ओढत असता तर काही म्हणणे नव्हते पण पैसे मिळवण्यासाठी आणि आपल्या सो कॉल्ड कलागुणांचा गैरवापर करून त्याने हजारो चाहत्यांना दारू पिण्यासाठी प्रवृत्त केलेच ना?

एवढे करूनही त्याच्या आरत्या गाताना थकत नाहीस याला दांभिकपणा सोडून अजून काही म्हणत असल्यास माहिती नाही.

आणि डोंबल मी कशाला तुला समजून घेऊ, मला सच्चे लोक आवडतात, भेकडपणे ड्युआयडी काढून ओळख लपवणारे नाही, त्यामुळे तुझी खोटी ओळख तुझ्यापाशी

तुला माबोवर येऊन किती वर्षे झाली यात तू निषेध कुठे आणि किती वेळा केला आहेस सांग पाहू बेंबट्या
>>>>>>>

कमाल आहे !
दारू विरोधात मी ईतके लिहिले बोलले आहे लोकांना त्याचा वीट येऊ लागलाय, आणि तुम्ही म्हणत आहात कुठे?
तुम्ही सुद्धा माझ्या निवडक पोस्ट वाचून बाकी इग्नोर करता का? Happy

आशु तुम्ही एवढे मनावर का घेताय. चिडचिड तुम्हालाच होणार आहे.
बादवे - हे नाही पटले-
त्याच्या एकट्यापुरता दारू आणि सिगरेट ओढत असता तर काही म्हणणे नव्हते पण पैसे मिळवण्यासाठी आणि आपल्या सो कॉल्ड कलागुणांचा गैरवापर करून त्याने हजारो चाहत्यांना दारू पिण्यासाठी प्रवृत्त केलेच ना?

>>> तो कधी म्हणाला दारू प्या?

आणि डोंबल मी कशाला तुला समजून घेऊ, मला सच्चे लोक आवडतात, भेकडपणे ड्युआयडी काढून ओळख लपवणारे नाही, त्यामुळे तुझी खोटी ओळख तुझ्यापाशी
>>>>>

ईथे मी लग्नासाठी मुलगी शोधायला येत नाही जे माझी ओळख माझी माहीती प्रत्येकाला देत सुटेन.
तसेही सोशलसाईटवर किती माहिती द्यावी आणि काय नाही याबद्दल आपल्याकडे अवेरनेस कमीच आहे. मग मागाहून काही झाले की तेव्हा फक्त रडत बसतात.

अवांतर - मला नाही वाटत आशुचॅप हे आपले खरे नाव आहे. अर्धा शब्द ईंग्लिश आहे यात Happy

त्याच्या एकट्यापुरता दारू आणि सिगरेट ओढत असता तर काही म्हणणे नव्हते पण पैसे मिळवण्यासाठी आणि आपल्या सो कॉल्ड कलागुणांचा गैरवापर करून त्याने हजारो चाहत्यांना दारू पिण्यासाठी प्रवृत्त केलेच ना?
>>>>>

याचे उत्तर त्या वर उल्लेखलेल्या स्वतंत्र धाग्यात..... तुर्तास शुभरात्री Happy

ईथे मी लग्नासाठी मुलगी शोधायला येत नाही जे माझी ओळख माझी माहीती प्रत्येकाला देत सुटेन.
>>> लोल... पहिल्यांदा भास्कर तात्यांशी सहमत ! माबोवर कशाला हवी खरी ओळख.

आशुचँप, तुम्ही शंकर पाटलांची धिंड ही कथा वाचली आहे का? नसेल तर लवकर वाचा. कथा मिळत नसेल, तर तिचं टीव्हीसाठी झालेलं सादरीकरण पहा.

निषेध शाहरुख चा करण्याबद्दल चाललं आहे पण भाभुला वेड पांघरून पेडगावला जाण्याची जुनी सवय आहे त्यामुळे त्याला सोयीस्कर तेवढेच घेतो तो.

https://youtu.be/cxLOwiqZo2A

https://youtu.be/6ccab3UyF2A

https://youtu.be/Fu3BR8uiSz8

याबद्दल कधी शख्याचा निषेध केलाय का भाभु ने?
आता तो मियाँ पाय वर करून म्हणेल या तर सोड्याच्या जाहिराती।आहेत दारूचा कुठे उल्लेख आहे.

त्यामुळे माझी ही शेवटची पोस्ट.

भ भा, तुमची मनशांती हल्ली लवकर ढळते असे दिसायला लागले आहे,
आणि घेतलेल्या "मी अजिबात चिडत नाही " बेअरिंगमुळे होणारी चीडचीड तुम्हाला व्यक्त करता येत नाही,
या कोंडमाऱ्यामुळे तुमची गोची होतेय.

फक्त एक निरीक्षण नोंदवतोय.

>>तो टायपो नाही हे मी सिद्ध करू शकतो !
.
.
.
>>ओके हे मान्य आहे.

आउच......मघाशी जो मोठ्ठा आवाज झाला तो सडकुन तोंडावर आपटण्याचा होता तर Lol

>>पण यापुढे टंकलेखनातील चुकांचीही काळजी घ्या.
Lol Lol Lol देखो भाईयो और बहनों मै मु पे गिरा तो भी मेरी नाक उपर Lol Lol Lol

एक निरीक्षण खरं आहे. पण हल्ली अख्खी मायबोली डोस्क कूल ठेवून गुरुची विद्या गुरूला फळली म्हणत दात घशात घालत असते. ते बघून सुडोमि फीलिंग येतं.

आशूचँप, तुम्ही शाहरूख आणि स्मोकिंग संदर्भात विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे ईथे मिळतील वा दिली जातील.
https://www.maayboli.com/node/66805

उगाच आणखी एक धागा शाहरूखने हायजॅक केले असे व्हायला नको Happy

तुझ्या धाग्याला टीआरपी मिळायला दुसरे प्रयत्न कर बाळा, हे फंडे जुने झाले.
शक्य असेल तर तुझे मियाँ छाप उत्तर दे इथे नाहीतर सोड

Pages