हिपोक्रसी ४ - smoking

Submitted by कटप्पा on 13 July, 2018 - 13:03

एका कॉर्पोरेट ऑफिस मधील दोन कलिग्स ऑफिस बाहेर गप्पा मारत आहेत.
प्रसंग १ :
ती - अरे तो राहुल आहे का फायनान्स डिपार्टमेंट चा? स्मोक करतोय.
तो - हो तोच दिसतोय.
ती - मला स्मोकिंग करणारी मुले बिल्कुल आवडत नाहीत. किती घाणेरडी सवय आणि किती घाण दिसते ही मुले स्मोक करताना.
तो- हो माझं पण तेच मत आहे!

प्रसंग २ - तेच दोघे काही दिवसानंतर बाहेर.
ती - अरे ती अर्पिता आहे का HR मधली?
तो - हो.
ती - मला नव्हतं माहीत ती स्मोक करते.
तो - हो ना. मला अजिबात आवडत नाहीत मुलींनी स्मोक केलेलं. वाईट दिसतं.
ती - तुम्ही पुरुष किती चीप असता, मुलींना व्यक्तिस्वातंत्र्य आहे की नाही?तिला जे आवडेल ते ती करेल ना. मुलींनी स्मोक केलेले वाईट दिसते म्हणे? How dare you? You are so sexist.You should be ashamed of yourself!!!

हिपोक्रसी -4

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला अजिबात आवडत नाहीत मुलींनी स्मोक केलेलं, आणि मला अजिबात आवडत नाही स्मोक केलेलं यातील फरक समजतोय का?
असो. चालू द्या.

मुलाने स्मोक केलं तर आवडत नाही, पण मुलीने स्मोक केलं तर चालेल असं म्हणणारी एकही व्यक्ती (यात मुली पण आल्याच) मला अजूनपर्यंत आयुष्यात कधी दिसली नाहीये.

मुलांमध्ये व्यसनाचे प्रमाण जास्त असते.
मुलींमध्ये तुलनेत कमी असते.
एखादा मुलगा लग्नाला मुलगी शोधताना निर्व्यसनी मुलगी शोधू लागला तर हजार मिळतील.
एखादी मुलगी लग्नासाठी निर्व्यसनी मुलगा शोधू लागली तर हजारात एक मिळेल.
थोडक्यात मुलींना व्यसन करताना बघायची डोळ्यांना सवय नसते म्हणून उत्स्फुर्त प्रतिक्रिया येते.
मलाही मुलांपेक्षा मुलीला व्यसन करताना पाहून तिच्याबद्दल जास्त वाईट वाटते.
हे हुमायुन नेचर आहे बाकी काही नाही.

मला अजिबात आवडत नाहीत मुलींनी स्मोक केलेलं, आणि मला अजिबात आवडत नाही स्मोक केलेलं यातील फरक समजतोय का? >> अगदी अगदी +१

मला अजिबात आवडत नाहीत मुलींनी स्मोक केलेलं, आणि मला अजिबात आवडत नाही स्मोक केलेलं यातील फरक समजतोय का?

Amitji - हे वाचा ना लेखकाने लिहिलेलं-
ती - मला स्मोकिंग करणारी मुले बिल्कुल आवडत नाहीत. किती घाणेरडी सवय आणि किती घाण दिसते ही मुले स्मोक करताना.

मुलाने स्मोक केलं तर आवडत नाही, पण मुलीने स्मोक केलं तर चालेल असं म्हणणारी एकही व्यक्ती (यात मुली पण आल्याच) मला अजूनपर्यंत आयुष्यात कधी दिसली नाहीये.
>>>

अशी व्यक्ती नाही हे चांगलेच आहे ना..

मुळात स्मोक करणे हे वाईटच आहे याबाबत तरी लोकांचे ईथे एकमत आहे का?
कि ईथेही स्मोकिंग वाईट नाही तर तिचा अतिरेक वाईट असे ऐकायला मिळणार आहे

मुळात स्मोक करणे हे वाईटच आहे याबाबत तरी लोकांचे ईथे एकमत आहे का?
कि ईथेही स्मोकिंग वाईट नाही तर तिचा अतिरेक वाईट असे ऐकायला मिळणार आहे
Submitted by भन्नाट भास्कर on 14 July, 2018 - 00:09

अगदी बरोबर! इथेही कदाचित तेच होईल, जे दारूच्या २-३ धाग्यांवर झाले होते!

बेसिक गोष्ट लक्षात घ्या विमु आणि भाभु
मी किंवा कोणीही तुमच्या शेजारी पार अगदी मांडीला मांडी लावून दारू प्यायली तर लिव्हर का खराब व्हायची ती माझी होईल, तुम्हाला मानसिक त्रास का काय व्हायचा तो होईल पण शारीरिक काही नाही
हेच एखादा स्मोकर बसला असेल तर त्याचा धुराच्या लोटातून तुमचे जे पॅसिव्ह स्मोकिंग होईल ते करण्याइतके तुम्हांला घातक आहे
ही गोष्ट समजली की पूढे बोलू

बेसिक गोष्ट लक्षात घ्या विमु आणि भाभु
मी किंवा कोणीही तुमच्या शेजारी पार अगदी मांडीला मांडी लावून दारू प्यायली तर लिव्हर का खराब व्हायची ती माझी होईल, तुम्हाला मानसिक त्रास का काय व्हायचा तो होईल पण शारीरिक काही नाही
>>>>

आर यू शुअर?
शेजारी माझ्या मांडीला मांडी लाऊन दारू पिणारयाच्या तोंडचा घाणेरडा वास हा मानसिक वास झाला की शारीरीक?
त्यान असंबद्ध बडबड करून माझे कान किटवले तर तो माझ्या कानांवर होणारा अत्याचार मानसिक त्रास झाला की शारीरीक?
उगाच बाचाबाची आणि मारामारीपर्यंत आमच्यात पेटले तर तो मानसिक त्रास होईल की शारीरीक?
ते ही सोडा, जर मी माझ्या फॅमिलीसोबत असेल तर मी एखाद्या पिणारया ग्रूपच्या जवळ बसेल की न पिणारया?

सिगारेट विरुद्ध दारू म्हणाल तर मी रात्रीच्या वेळी निर्जन स्थळी एकटा वा फॅमिलीसोबत चाललो आहे. समोरून दोन दारू पिऊन टुन्न वा दोन सिगारेट फुंकणारे येत आहेत तर कोणत्या दोघांपासून मला जास्त असुरक्षित वाटेल?

आणि तसे म्हणाल तर सिगारेटवालेही कुठे मुद्दाम कोणाच्या तोण्डावर धूर सोडायला जातात जे तुम्ही पासिव स्मोकिंगचा मुद्दा उपस्थित करत आहात

तरी एक बरेय मानसिक त्रास होतो हे कबूल केलेत.
याबद्दल धन्यवाद Happy

हा धागा दारू कडे का वळतोय हे कळले नाही।

जेंव्हा ती म्हणाली तिला स्मोकिंग करणारी मुले आवडत नाहीत तर तिने हे ऐकायची तयारी ठेवली पाहिजे की उद्या तो पण म्हणू शकतो की मला स्मोकिंग करणाऱ्या मुली आवडत नाहीत.
अशा वेळी मुलींना जज करतोय, सेक्सिस्ट आहे, मुलींचे व्यक्ती स्वातंत्र्य, ब्ला ब्ला ब्ला या गोष्टी ऐकवल्या गेल्या हे पूर्णपणे हिपोक्रेसी वाटली मला.

बाळ भाभु तुझ्या नजरेत दोष आहे का समजण्यात हे कळत नाही,
वास आणि बडबडी चा शरीरावर adverse इफेक्ट होतो हे तुझं अगाध ज्ञान तुझ्यापुरते का ठेवत नाहीस, आपला मूर्खपणा जळीस्थळी का सिद्ध करण्याचा अट्टाहास म्हणायच

{त्यान असंबद्ध बडबड करून माझे कान किटवले तर तो माझ्या कानांवर होणारा अत्याचार मानसिक त्रास झाला की शारीरीक?}
आरसा घ्या.
असंबद्ध पोस्टी लिहून वाचकांचे डोके उठवल्याने होणारा मानसिक आणि शखरीरिक अत्याचार.

दोन प्रश्न

1. काहीच कामे नसलेल्या माबोकरांची सोय व्हावी म्हणून कटप्पा ह्या आईडीने जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती म्हणत रोज एक धागा काढायचे असिधाराव्रत हाती घेतलेय का?

2. धागा काढण्यातले सातत्य, विषयांचे वैविध्य व धागा काढून गडप होण्याचे कसब पाहता कटप्पा हा आईडी मायबोलीवरील एका ह्या असल्या कामात पीएचडी केलेल्या आईडीचा शिष्य म्हणावा की आता उंदीर खाणे बंद म्हणत हजला गेलेली मांजर परतून आल्यावर परत उंदरांच्या मागे धावायला लागली म्हणायचे?

मी किंवा कोणीही तुमच्या शेजारी पार अगदी मांडीला मांडी लावून दारू प्यायली तर लिव्हर का खराब व्हायची ती माझी होईल, तुम्हाला मानसिक त्रास का काय व्हायचा तो होईल पण शारीरिक काही नाही.>>>>
दारूच्या वासाने मला मळमळते. हा शारीरिक त्रास नाही का???

हेच एखादा स्मोकर बसला असेल तर त्याचा धुराच्या लोटातून तुमचे जे पॅसिव्ह स्मोकिंग होईल ते करण्याइतके तुम्हांला घातक आहे>>>>
अगदी बरोबर, हे फुंके फक्त १५% धूर स्वतःच्या शरीरात ठेवतात आणि ८५% धूर बाहेर सोडतात, म्हणूनच सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यावर बंदी आहे पण दुर्दैवाने तिचे पालन होताना दिसत नाही.

रच्याक, हा 'भाभु' कोण??? Proud Proud Proud

दारूच्या वासाने मला मळमळते. हा शारीरिक त्रास नाही का???
>>>

बहुतेक नाही .
मळमळणे ही एक मनाची अवस्था आहे.
तुम्हाला सतत उलटी आल्याचा भ्रम होतो ईतकेच.

ते सुद्धा सोडा..
त्या पोस्टच्या समर्थकांनी मला सांगा
मानसिक त्रासाला ईतके हलके का लेखले जात आहे?
ते सुद्धा मायबोलीवर जिथे दर दुसरया धाग्यावर दर तिसरया आयडीला मानसोपचाराकडे जायचा सल्ला मिळतो.

जर शारीरीक त्रासच त्रास समजला जात असेल तर शिव्या घालणे, सुनेला घालून पाडून बोलणे, एखाद्या व्यक्तीला अश्लील ईशारे करून छेड काढणे सारे नॉर्मल म्हणावे लागेल.

सिगारेट वाईट तशी दारूही वाईट म्हणून मोकळे व्हावे. ईतके समर्थन का करत आहात?

रच्याक, हा 'भाभु' कोण???
>>>
भन्नाट भास्करला भाभु म्हणत आहेत. मराठी भाषेत हे असे चुकीचे शॉर्टफॉर्म बनवल्यास भाषारक्षकांची काही हरकत नसते Happy
तुमचा पण रच्याक हा शब्द चुकलाय. कर्रेक्ट मराठी शब्द रच्याकने आहे !

येनीवेज, गोड उच्चार आहे भाभु, भंभ्या वगैरे Happy

कलिंगड पूर्ण कापण्यापेक्षा अर्धे कापून त्यावर किंचित साखर भुरभुरावी आणि फ्रिजला लावावे, दुसरे दिवशी गोड कलिंगड तयार

आमच्यात विशेषनामांचं शुद्धलेखन तपासत नाहीत. ज्याने ज्याला हवं तसं वापरावं. आग्रह असलेलं नाव याआधी कोणी पाहिलं होतं का?

साधना -

दोन प्रश्न

1. काहीच कामे नसलेल्या माबोकरांची सोय व्हावी म्हणून कटप्पा ह्या आईडीने जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती म्हणत रोज एक धागा काढायचे असिधाराव्रत हाती घेतलेय का? --> हिपोक्रेसी सिरीज 1 आणि 4 माझ्यासोबत घडलेले प्रसंग आहेत. मी रोज एक धागा काढत नाही आणि तसे असते तर आतापर्यंत 300+ धागे झाले असते. जसा वेळ मिळतो तसे लिहितो.

2. धागा काढण्यातले सातत्य, विषयांचे वैविध्य व धागा काढून गडप होण्याचे कसब पाहता कटप्पा हा आईडी मायबोलीवरील एका ह्या असल्या कामात पीएचडी केलेल्या आईडीचा शिष्य म्हणावा की आता उंदीर खाणे बंद म्हणत हजला गेलेली मांजर परतून आल्यावर परत उंदरांच्या मागे धावायला लागली म्हणायचे?
>>> मी गडप होत नाही, माझ्याकडे वेळ नसतो, जेंव्हा लॉगिन करतो तेंव्हा खूप नवीन प्रतिसाद असतात. त्यातले अर्ध्याहून जास्त विषय सोडून असतात. सध्या मी जॉब चेंज फेज मध्ये आहे ( नवीन जॉब मिळाला आहे आणि सध्याच्या जॉब ची KT चालु आहे). फक्त लिहायसाठी माबो वर येतो.

पूर्ण कापण्यापेक्षा अर्धे कापून त्यावर किंचित साखर भुरभुरावी आणि फ्रिजला लावावे, दुसरे दिवशी गोड कलिंगड तयार>>>>>
फ्रीज ला लावून ठेवल्याने ...
1) फ्रिजवर डाग पडत नाहीत का?
2)कलिंगड खराब होत नाही का?

1) फ्रिजवर डाग पडत नाहीत का? >>> कलिंगडावर पडतात डाग. आणि मग इज्जत पे दाग..लेकिन दाग अच्छे है.
2)कलिंगड खराब होत नाही का? >> मेलन च्या डोसक्यात काही शिरत नाही. सो अजिबात खराब होत नाही.
स्वाध्याय: खराब, शराब, फराब वापरून कविता लिहा.

आमच्यात विशेषनामांचं शुद्धलेखन तपासत नाहीत.
>>>
भरत ओके,
आता मला आपल्या या वाक्यातील खालील धाडसी शब्दाचा अर्थ सांगा
असंबद्ध पोस्टी लिहून वाचकांचे डोके उठवल्याने होणारा मानसिक आणि शखरीरिक अत्याचार.

तो टायपो आहे, म्हणजे लेखनात झालेली चूक. भरत तुला धन्यवाद देऊन सुधारतील याची खात्री आहे.
चूक करणे आणि नंतर समजल्या नंतर सुधारणे आणि मुद्दाम करणे, चूकच कसं बरोबर असा वाद घालणे, ते बरोबर नाही सिद्ध झालं तरी मी असंच लिहिणार म्हणणे यातील फरक समजतोय का?

तो टायपो आहे, म्हणजे लेखनात झालेली चूक. भरत तुला धन्यवाद देऊन सुधारतील याची खात्री आहे.
>>>>

हे त्यांना बोलू द्या Happy

मग आपण यावर पुढे बोलू Happy

त्यानंतर तो टायपो नाही हे मी सिद्ध करू शकतो !

हो, टायपो आहे तो. टायपो म्हणजे टंकलेखनात झालेली चूक.
त्याबद्दल मी सुज्ञ वाचकांची क्षमा मागतो.

पुण्यात नवीन आलो होतो तेव्हा सिम्बायोसिसपाशी किंवा लॉ कॉलेज रोडवर मुलामुलींचा घोळका दिसायचा एकत्र सिगरेट पिताना. मी बसमधून जाताना बघायचे. फारच सेक्सी/हॉट दिसायच ते! एकतर त्यांचे कपडे चांगले असणार+ श्रीमंत घरातले असल्याने येणार स्मार्टनेस, कूल कोशण्ट, ऍटिट्यूड वगैरे. पण एकदा एक कलीग सुट्टा मारून मिंट न खाता आलेला, तेव्हा जाणवलं किती भपकारा वास येतो :(.

तरीही अजूनही लांबून बघायला अवड्तातच छान दिसणारे + सिगरेट पिणारे.

हो, टायपो आहे तो. टायपो म्हणजे टंकलेखनात झालेली चूक.
>>>>

जो ईंग्रजी शब्द एखाद्याला मराठीत समजावून सांगायला लागतो तो मराठी बोलताना वापरू नये असे मला वाटते.
हे सर्वांसाठीच लिहिलेय. माझ्या त्या मराठी बोलताना ईंग्लिश शब्द सर्रास वापरणे धाग्यावर देखील ही विनंती करतो मी.

असो, तर टंकलेखनातील चूक ,
पटत नाही !

शारीरिक आणि शखरीरिक ..

श चा काना खाल्लात. ठिक आहे.
पण एक अक्खा ख कुठून आला? ख लिहायचे झाल्यास "के, एच, ए" अशी तीन ईंग्रजी मूळाक्षरे टाईप करावी लागतात. अशी वाहावत जाणारी टाईपिंग मिस्टेक कशी झाली?

बरं ते देखील त्या पोस्टमधील "सर्वात महत्वाच्या" शब्दाबाबत ??

अजून थोडी बटणे ईकडची तिकडे दाबली असती तर " शाहरूख** " झाले असते.
अच्छा .. माझ्याशी बोलत असताना आपल्या डोळ्यासमोर शाहरूख तर येत नाही ना. आणि त्यामुळेच चुकून शारीरिक आणि शाहरूख या दोन शब्दांना एकत्र करत आपण शखरीरिक हा नवीन शब्द बनवलात Happy

** शाहरूख हा बॉलीवूडचा आजवरचा सर्वात मोठा सुपर्रस्टार आहे.

Pages