पालक आणि मेथीची भाजी -ताक घालून

Submitted by maitreyee on 8 July, 2018 - 11:34
palak methi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पालक चिरलेला - २-३ वाट्या
चिरलेली मेथी मूठभर किंवा मेथी दाणे/डाळ कुटून अर्धा चमचा - किंवा कसुरी मेथी अर्धा चमचा
लाल मिरच्या ४
आले लसूण पेस्ट अर्धा - ते १ चमचा
कढिपत्ता - ५-६ पाने
दही किंवा आंबट ताक दीड वाटी
बेसन २-३ चमचे
तेल, फोडणीचे साहित्य.

क्रमवार पाककृती: 

मी ही भाजी खूप वेळा करते. अगदी नेहमीचीच रेसिपी असल्याने कधी लिहायचे डोक्यात आले नव्हते, पण डीजे ने परवा विचारले तेव्हा वाटले की माबो वर ही रेसिपी नाहीये आणि मी इतक्या वर्षात थोडे व्हेरिएशन्स ही केले आहेत ज्यामुळे भाजी जरा वेगळी लागते चवीला. म्हटले चला इथेच लिहावी.
पालक आणि मेथी चिरून घ्यावी. पालकची भाजी असली तरी मेथीचा स्वाद ताकातल्या भाजीला वेगळीच खुमारी आणतो हे गुजराती कढी वगैरे वरून लक्षात आले होते. ताजी मेथी नसेल तर मी कसुरी मेथी किंवा मग इथे बारीक केलेली मेथीची डाळ मिळते तीही वापरते.
p2.JPG
(अ‍ॅक्चुअली कधी मेथी नाही म्हणुन किंवा कधी चिरायचा कंटाळा आला म्हणून उलट तीच जास्त वापरली जाते) पण तिन्हीपैकी एक काहीतरी नक्की वापरा मात्र . त्याने चवीत फरक पडतो. एकीकडे ताक आणि बेसन नीट हलवून किंवा ब्लेंड करून एकत्र करावे.
मोहरी , भरपूर जिरं, कढिपत्ता आणि लाल मिर्च्या घालून फोडणी करावी. त्यात आले लसूण, पालक आणि मेथी/ मेथीची डाळ घालून जरासेच परतावे. आले लसणाचा कच्चट वास गेला की लगेच ताक आणि बसनाचे मिश्रण त्यात घालावे. नीट हलवून लागेल त्याप्रमाणे पाणी घालावे आणि उकळी आणावी. ताज्या मेथीऐवजी कसुरी मेथी वापरणार असाल तर तीही या स्टेज ला घालावी. मीठ आणि साखर घालावे. ( बिना साखरेची चांगली लागणार नाही ) ! भाजी तय्यार!
भाजीची कसिस्टन्सी पिठल्यापेक्षा जराशी पातळ अशी असते. आंबट-गोड -तिखट अशी थोडी कढीच्या जवळ ची चव असते. पोळी किंवा गरम भातासोबत मस्त लागते.
फोटो नसल्याने निम्मे मार्क जाणार याची नम्र कल्पना आहे. पण पुन्हा केली की टाकेन नक्की! Happy

ता.क. : ७/१७/१८ - फायनली आज केली गेली ही भाजी, नशीब फोटो काढायचा लक्षात राहिला.
आजचं लंच Happy
IMG_7989.JPG

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांकरता ही वरच्या प्रमाणातील भाजी पुरावी.
अधिक टिपा: 

माझी आई ताकातली चाकवताची भाजी करते, ती मला आवडायची खूप. इथे चाकवत नाही मिळत म्हणून मी पालक वापरून तशी करायला प्रयत्न केला. पण आई हिरवी मिरची घालते त्या ऐवजी मी लाल मिर्च्यांची फोडणी वापरली, त्याने खमंगपणाआला. नंतर मेथी तर गेम चेन्जर म्हणतात तशी ठरली Happy तर सांगायचा मुद्दा हाच की करणार असाल तर आधी अशी च्या अशी करून पहा. मग ते लाल ऐवजी हिरवी मिरची, नो- मेथी, पालकाऐवजी बटाटे, ताकाऐवजी वरण, दगडा ऐवजी धोंडे वगैरे व्हेरिएशन्स करा Happy

माहितीचा स्रोत: 
आई आणि मी :)
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

भारीच...! स्ल.....र्प आहे एकदम..!!!

मैत्रेयी, तुम्ही रेसिपी लिहिलीत आणि मला २ वर्षांनी वाचायला मिळाली.. असं कसं झालं बरं..? कुठल्या ग्रुपात लिहिली होती काय माहीत.. आज सापडली Bw

योगायोगाने आज पालक आणि मेथी निवडुन ठेवलेल्या आहेत.. दह्याच ताक बनवुन लगेच करतो. धन्स..! Bw

बनवली आज दुपारीच अन सर्वांनी गट्टम पण केली.. ! पण मी त्यात व्हेरिएशन करुन कढेपत्ता न टाकता हळद आणि हिंग पण फोडणीत टाकलं. त्यामुळे म्मी केलेली भाजी पिवळी धम्मक झाली अन तुम्ही सांगितल्या प्रमाणे मेथीच्या भाजीमुळे अन बेडगी मिरच्याच्या तडक्यामुळे कडक्क स्वाद आला. भाजी बनतानाच असा काही खमंग वास सुटला की ती धड उकळवु द्यायला पण संधी न देता घरच्यांनी एका दमात वाढुन घेत फोटॉ काढण्याची संधीही मिळु दिली नाही. Biggrin

घरातल्या सर्वांना फार आवडली... मस्त पाकृ दिल्याबद्दल मनापासुन धन्स..!! Bw

हायला! किती दिवसांत ताकातली भाजी केली नाहीये हे ही रेसिपी बघून आठवलं!

मी पालक मोठामोठा चिरून घेते, त्यातच चण्याची डाळ, दाणे आणि उभी चीर दिलेल्या हिरवी मिरच्या घालून अगदी अंगासरसं पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घेते. शिजल्यावर त्यातलं पाणी वेगळं काढून ठेवते आणि भाजीत बेसन घालून चांगलं घोटून घेते. मग त्यात मीठ, साखर, ताक आणि फोडणी घालून चांगली खळखळून उकळी आणते. भाजी ऑलरेडी शिजलेलीच असते, बेसन शिजलं आणि सगळं खटलं मिळून आलं की झालं!

आता तुझ्यासारखं मेथी आणि आलंलसूणही घालून बघेन. Happy

स्वाती Happy सायोने अशीच रेसिपी लिहिली आहे मागच्या पानावर. बहुतेक तीच कॉमनली केली जात असावी जास्त. माझा तशी करायचा मुहुर्त लागलेला नाहीये अजून. आता करते.

Pages