अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा ट्राय केली पण परत कधीच नाही करणार?

Submitted by कटप्पा on 7 July, 2018 - 00:24

Long वीकएंड साठी फ्लोरिडा आलो आहे. मी 2 अशा गोष्टी ट्राय केल्या ज्या परत कधीच नाही करणार.

१. ऑक्टोपस - हो मी ऑक्टोपस खाल्ला. मजेत खाल्ला आणि खाऊन १ तासात उलटी केली. सगळी रात्र पोट दुखत होते.

२. सिगारेट -पहिल्यांदा सुट्टा ओढला- 4 तास गुंगीत होतो. कानावर खडा आता. नेव्हर अगेन !!!

तुमच्या पण असे अनुभव असतील जे एकदा ट्राय केले पण परत कधीच नाही करणार?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वीसला असताना व्हेज सुशी ट्राय केलेली,त्याबरोबर दिलेला सॉस य्य्क्क्क्क. पुन्हा नाही त्या वाटेला गेलो

सोय सॉस असतो. आपण थोडं वसबी आणि सोय सॉस मिक्स करून पेस्ट बनवायची, आणि त्यात सुशी बुडवून तोंडात टाकायची.
तुम्ही खूप वसाबी घातलं असेल तर पुन्हा अगदी कमी घालून ट्राय करा एकदा. सी फूड खात असाल तर तेच खा. माशाला वास अजिबात नसतो, मऊ मऊ लुसलुशीत टेक्षचर जाणवेल फक्त. तोंडाची चव न्यूट्रल करायला आल्याचा काप खा मध्ये.
सुशीला इकडे टाकायच्या आधी आणखी एकदा ट्राय करा प्लीज. Happy

Sildenafil 50 mg... गरज नसताना उगाच उत्सुकतेपोटी घेतली, पण रात्रभर डोकं दुखत राहिलं फारच. पुन्हा नाही!

सुशीला इकडे टाकायच्या आधी आणखी एकदा ट्राय करा प्लीज <++१११
अमेरिकेत आल्यानंतर रुममेट्स ड्रिंक्स पिण्यार्या भेटल्या, खर तर अगदी ८०% मित्र मैत्रीणी पिणारे होते. त्याकाळात फिट इन होण्यासाठी, उच्चुक्ता म्हणुन, बाकीच्यांचा आग्रह किंवा कन्व्हीनियन्स म्हणुन म्हणा एकदाच नाहीतर अगदी ४/५ वेळा ट्राय करुन बघितल पण जमलच नाही. आता नाही म्हणायची सवय झाली आहे.:)

फार कौतुकं ऐकून एकदा सुधारस आणि पोळी असं कॉबिनेशन खाल्लं होतं एका मैत्रीणीच्या घरी. परत कधी त्या वाटेला गेले नाही .

मायबोलीवर कौतुक वाचून राजमलाई अन बोरकूट हे दोन प्रकार एका गटगला ट्राय केलेले. परत त्यांच्या वाटेला जाणार नाही.

अनेक वर्षांपूर्वी ८-१० दिवस नेवाडा, अ‍ॅरिझोना, न्यू मेक्सिको अशा ठिकाणी फिरुन सॉल्ट लेक सिटी ला पोचल्यावर ' गोविंदा' नावाचे इस्कॉन वाल्यांनी चालवलेले रेस्टॉ दिसले आणि तिथे गेलो. परत कधीही इस्कॉनवाल्यांच्या रेस्टॉ मधे जाणार नाही.

बंगलोरला असे खूप लोक भेटतात. त्यांना एवढ्या गर्दीत बरोब्बर मराठी लोक ओळखता येतात. भामटे असतात. आम्ही चला हॉटेल मध्ये काय हवं ते खायला घालतो म्हटल्यावर पळून जातात. एकदम हीनदीन दिसतात, दया ना येणे हा पर्यायच नसतो. कधी कधी मी भाषा समजली नाही असा चेहरा करुन, त्यांच्याकडे बघत बसते, मग रागारागाने निघून जातात.

सुधारस आणि पोळी असं >>>>>>
सुधारस अत्यंत ओवररेटेड पदार्थ आहे, खरेतर त्या पदार्थाला "सुधारस" नाव देणाऱ्या माणसाच्या कल्पकतेचे कौतुक केले पाहिजे Happy

सुधारस म्हणजे लिंबू पिळलेला साखरेचा पाक Uhoh सिरीअसली? हा पदार्थ आहे? एकदा म्यागीसोबत ट्राय करायला हवा. नाहीच आवडले तर या धाग्यावरची एक पोस्ट वाढेल Happy

कृपया त्या सुधारसाची पाककृती कोणी टाकेल का?
>>>
आता त्या लिंबू पिळलेल्या साखरेच्या पाकाचीही पाककृती हवी का..
साखर घ्या, उकळत्या पाण्यात टाका, ढवळा, पवळा, थंड करा, सुरी घ्या, लिंबू कापा, आणि पिळा आणि चाटा... वगैरे वगैरे?

पिळा आणि चाटा... वगैरे वगैरे?
<<
पिळणे अन चाटणे इतके सोपे आहे का? Lol

ऑन सिरीयस नोट,

सुधारस आमच्या लहानपणीचा होता. तेव्हाचं ते पक्वान्न. त्या काळी साखर घरात येणे अनेक घरांत अप्रूपाचे होते, खांडसरी आली तरी भारी वाटे, लेव्हीची, रेशनची साखर परवडणारी घरेही कमीच होती. खाऊ म्हणून खडीसाखर मिळाली तर ४ मित्रांत भाव खाल्ला जाई.

गोडधोड सणावरी, दिवाळीत वगैरे करायचे ते दिवस होते.

तेव्हाच्या काळी मुलांना पोळीला लावून खायला हे गोडाम्बट चटकमटक अप्रुपाचे होते.

आजकालच्या "राजाला रोज दिवाळी" लाईफस्टाईल मध्ये तुम्हा मिलेनियल्सनि सुधारासाला नाके मुरडलीत तर मला आश्चर्य नाही वाटत.

मी या वरच्या साईट च्या वाटी पुन्हा जाणार नाही...!

ही त्या साईटवरची रेस्पीचीसुरुवात -
सुधारस ही एक स्वीट डीश आहे. सुधारस ही डीश महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. सुधारस हा लिंबू पासून तयार करतात.... >>> सिरिअसली??? Uhoh

बाकी बोरकुट हा भंकस भयाण आयटम आहे, याबद्दल सहमत.

बोरं वाळवून, मग ती गुळाच्या पाकात उकळून खाल्लीत का कुणी इथे?

आमच्या शाळेबाहेर चणे, फुटाणे, हि असली बोरं, उकडून सोलून तिखट मीठ लावलेले बाळ बटाटे, कच्च्या चिंचा, गूळ शेंगदाण्याचे लाडू चिक्की अन रेअरली लिमलेटच्या अब गटागट च्या गोळ्या, अन हो, अस्सल खानदेशी अमुन्या विकायला एक आज्जी बसायची..

सुधारस टीप - ह्या रसामध्ये आपण अननसाच्या फोडी किंवा आंब्याच्या फोडी घालता येतात. त्याने सुद्धा सुंदर चव येते.
>>>>>
यातल्या अननसाच्या फोडी ईंटरेस्टींग आहे, चांगल्या लागतील चॉप्सी सारखे असा अंदाज

सुधारस!!! वाह! आमच्या लहानपणी आई करायची. महिनाअखेरीस सण आला तर कधी कधी सुधारस हे पक्वान्न असे. साखरेचा २ तारी पाक करून त्यात आंबट चव येईल एवढा लिंबाचा रस. त्यात वेलची कुटून घालायची. चिमटीभर केशराच्या काड्या. कुटलेल्या वेलचीचे काळे कण, केशर नाही घातलं तरी लिंबाच्या रसामुळे आलेला किंचितसा रंग. सोबत तव्यावरून ताटात आलेली गरम गरम पोळी. वरण भात तूप, बटाट्याची भाजी, ओल्या नारळाची पाट्यावर वाटलेली चटणी ... अहाहा.

यातल्या अननसाच्या फोडी ईंटरेस्टींग आहे, >>> हो फार छान लागतं. सफरचंदाच्या बारीक चिरलेल्या फोडीही मस्त लागतात.

कोण ते बोरकूट ला नावं ठेवतं?
<<
मी.
बोराच्या अठोळीची भुकटी? नाय नो नेव्हर. आतला गिद्दु छान खाऊ असतो, पण ते लाकूड? नाह

अश्विनी +१
नवरात्रीत एका दिवशी फार पसारा करायचा नसेल की एक नैवेद्यही सुधारस ठरलेला.
पियुष म्हणजे ते श्रीखंडाचं भांडं विसळलेलं पाणीच ना? >> Lol हो.

पियुष म्हणजे ते श्रीखंडाचं भांडं विसळलेलं पाणीच ना? व्हय
दादर वेस्ट ला फ्लायओवर ला लागून असलेल्या पणशीकरांकडे हा प्रकार चाखला आहे. एकदम चिल्ड पिवळ्या केशरी रंगाचं पियूष मस्त वाटलं होतं पण अतीगोड असतं हे पहिल्या दोन घोटांतच समजलं. पुन्हा नाही कधी ट्राय केलं.
पण त्यांच्याकडले बाकी प्रकार खरोखरीच सुरेख असतात...

Pages