अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा ट्राय केली पण परत कधीच नाही करणार?

Submitted by कटप्पा on 7 July, 2018 - 00:24

Long वीकएंड साठी फ्लोरिडा आलो आहे. मी 2 अशा गोष्टी ट्राय केल्या ज्या परत कधीच नाही करणार.

१. ऑक्टोपस - हो मी ऑक्टोपस खाल्ला. मजेत खाल्ला आणि खाऊन १ तासात उलटी केली. सगळी रात्र पोट दुखत होते.

२. सिगारेट -पहिल्यांदा सुट्टा ओढला- 4 तास गुंगीत होतो. कानावर खडा आता. नेव्हर अगेन !!!

तुमच्या पण असे अनुभव असतील जे एकदा ट्राय केले पण परत कधीच नाही करणार?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरारा स्थावर मालमत्ता स्वतःच्या नावावर आहे का बायका मुलांच्या? Wink
बँक कर्जे विशेषतः बिल्डर लोकांची आणि जामीन राहिलेले मित्र वा दुसरे बिल्डर हा एक सुरस किशषयांचा विषय आहे

मी एकदा (२००१ मध्ये) याहू का रिडीफ च्या चाट वरुन एका *** चॅटरुम ला कनेक्ट केलं.मग नंतर त्याच्यावर येणारे मेसेज पाहून घाबरले आणि एक्झिट केलं.
मैत्रिणीबरोबर तिच्या घरी आम्ही दोघीच होतो, आमच्या मुली झोपल्यावर एक एक टकिला घेऊन पाहिली. एकंदर त्या प्रकाराला लागणार्‍या उस्तवार्‍या चवीच्या मानाने वर्थ वाटल्या नाहीत. (मीठ, लिंबू वगैरे), मग फ्रिज मधून साधा सोडा घेतला आणि त्यात लिंबू पिळून प्यायला आणि गप्पा मारुन झोपून गेलो.

केवळ चांगल्या भावनेपोटी दोन जवळच्या व्यक्तींमधले भांडण सोडवायचा प्रयत्न केला होता एकदाच. आणि त्यांच्या समस्येशी माझा कसलाही सुतराम संबंध देखील नसताना केवळ मध्यस्ती केली म्हणून नंतर मला प्रचंड मानसिक त्रास भोगावा लागला. कुठे झक मारली आणि मध्यात पडलो असे झाले. तेंव्हापासून कानाला खडा, कोणीही असो मध्यस्ती करणे नाही. जवळचे असले तरी त्यांचे त्यांनी भांडण सोडवावे हे उत्तम.

ऑफिसने स्पॉन्सर केलेली म्हणून ती बघायला रेसकोर्स वर गेलेलो. एक कुतूहल म्हणून १० रु लावले, त्याचे ३०-४० मिळाले . मग पुढच्या रेसला सगळे लावले आणि ते गेले.
त्यानंतर आजतागायत रेसकोर्स मध्ये प्रवेश केला नाही

माझा रुममेट, अतिशय जवळच्या, मार्गदर्शक असणाऱ्या मित्राच्या आणि त्याच्या गर्लफ्रेंडच्या (तीसुद्धा जवळची मैत्रीण) रजिस्टर्ड लग्नात साक्षीदार म्हणून सही केली होती. मुलगा मल्लू टिपिकल मध्यमवर्गीय आणि मुलगी पंजाबी - वडील वेस्टर्न रेल्वेचे डीएमार. अख्खा रेल्वे पोलीस त्यांच्याहाताखाली. लग्न रजिस्टर झाले ठाण्यात. आमची फुल फाटलेली. जबर टेंशन. मुलीचा भाऊ कोचिनला भारतीय नेव्हीमध्ये कमिशनड ऑफिसर आणि डोक्यात राख घालून घेतलेला. मुलाचे आई वडील कोचिनमध्ये राहणारे. असे सगळीकडून तुफान टेंशन.
नुकत्याच नोकऱ्या सुरू झालेल्या. जर मुलगी परत गेली भेटायला म्हणून लग्नानंतर आणि abductionची केस झाली तर नसतं लचांड. आम्ही तीन मित्रापैकी एकाने ऐनवेळी घाबरून माघार घेतली. पण सही केली, पुढले काही दिवस नवरा नवरीला भारतात विविध ठिकाणी फिरवले. लै टेंशन.

पुढे खरे घडले काहीच नाही. आता तर सगळेच मस्त आहे Happy

पुन्हा असे काही हातून घडणार नाही कारण अशी नवीन घट्ट मैत्री होणे अवघड आणि झालीच तर तो /ती लग्नाची असणे जवळपास अशक्य

टवणे सर, माझ्याही रजिस्टर लग्नाला अश्याच भानगडी होत्या.
गर्लफ्रेंडतर्फे स्वाक्षरी करायला तिची आई आणि बहीणी आल्या होत्या. पण तिच्या भाऊ आणि वडिलांना याचा काहीच पत्ता नव्हता.
माझ्यातर्फे माझे तीन खास मित्र आले होते. त्यातील दोघांना ठाण्याला पोहोचल्यावर समजले की ते माझ्या लग्नाला साक्षीदार म्हणून आले आहेत.
आणि कळल्यावर ईतके सरप्राईज झाले की शिव्या घालून झाल्यावर ऐनवेळी धावपळ करून दोन गळ्यापासून पायाला पोहोचतील असे आमच्या निम्म्या वजनाचे हार घेऊन आले. तलावपाळीला आळीपाळीने एकमेकांच्या गळ्यात ते हार घालून आम्ही फोटोसेशन केले.

येनीवेज, पण ते पहिले आणि शेवटचे. त्यानंतर पुन्हा त्या रजिस्टर ऑफिसची पायरी चढलो नाही.

हिरवे मसाला चिकन

एकदा एका मित्राने खास करून आणले होते. आधी मला वाटले की हैद्राबादी मसाला चिकन आहे, पण चव घेतल्यावर काहीतरी भयानक प्रकार आहे हे लक्षात आले, पण करणार काय, आधीच कित्ती छान दिसतेय, तोपासू , एक काय बघून तर किमान दोन रोट्या खाईल वगैरे बोलून झाले होते, अन इथे तर एक घासही उतरेना घश्याखालून. फक्त त्याला वाईट वाटू नये म्हणून कशीबशी अर्धी रोटी खाल्ली होती. पण त्यांनतर त्याने कितीही आग्रह केला तरी ना ते हिरवे चिकन खाल्ले न काही हैद्राबादी डिश ट्राय केली

हैदराबाद वरून मला पण एक आठवले.
खडे चम्मच की चाय.
शादाब बिर्याणी च्या साईडला पिली होती.. yukk.. कधीच नाही पिणार आता.

हिरव्या रंगाचे चिकन हैदराबादी मला आवडते .. ते घासफूस कलर दिसत असूनही. तुम्ही खाल्ल्ले ते काही वेगळे वा गंडलेले असेन

कोणी ती प्रसिद्ध तंदूर चाय प्यायली आहे का?स्वर्गीय अनुभव वगैरे वाटला की परत कधीही करणार नाही वाला अनुभव?

एका व्यक्तीला नोकरीची गरज होती म्हणून एकीकडे शब्द टाकलेला .तर त्या व्यक्तीने तिथे असे दिवे लावले की त्या एम्प्लॉयरने मला खडे बोल सुनावले . तेव्हापासून ठरवले की या फंदात पडणार नाही कधीच !

बे**र मिसळ नावाचं मिरे घातलेला साखरेचा पाक एकदा मिसळीचा कट म्हणून खाल्ला होता. परत आयुष्यात फुकट दिली तरी ती अभद्र मिसळ खाणार नाही.

अबकड सामोसेवाले नावाचे दुकान असणाऱ्याकडचे अतिशय भिकार सामोसे ज्ञान प्रबोधिनी समोर खाल्ले होते. १००० वर्षाचा इतिहास असलेला पदार्थ इतका भंगार पद्धतीने बनवून विकला जातोय ह्यावर विश्वास बसत नाही. परत मेलो तरी खाणार नाही.

कोथरुडात एका सुप्रसिद्ध "विद्यार्थ्यांचा कॅफे" म्हणून नावाजलेल्या एमआयटी जवळच्या एका ठिकाणी चुकून अंडा बुर्जी मागवली होती, बुर्जी कोरडी होइपर्यंत परतायची असते हे कोणी सात पिढ्यात शिकले नसेल अश्या आचाऱ्याने बनवलेलं "अंड्याचं पिठलं" कसंबसं गिळलं होतं. परत काहीही झालं तरी खाणार नाही.

बे**र मिसळ नावाचं मिरे घातलेला साखरेचा पाक एकदा मिसळीचा कट म्हणून खाल्ला होता. परत आयुष्यात फुकट दिली तरी ती अभद्र मिसळ खाणार नाही.>>>

त्या दुकानात सर्वांसमोर बायडीनं रश्श्याची वाटी फेकून नाही मारली मला हे नशीब...
लई तारीफ करून घेऊन गेलो होतो...

त्या दुकानात सर्वांसमोर बायडीनं रश्श्याची वाटी फेकून नाही मारली मला हे नशीब...
लई तारीफ करून घेऊन गेलो होतो...>>> Biggrin

माझे एकदा असे झाले होते, माझे दाजी मला कोल्हापुरात एका प्रसिद्ध ठिकाणी मिसळ खायला घेऊन गेले होते. म्हणे खूप छान लागते इकडची मिसळ. मला पाहून तिथले मालक बोलले की पावणीला काय इतकी तिखट झेपणार नाय वाट्त थोडी कमी तिखट देऊ का?
तरी मी हट्टाला पेटून मस्त झणझणीत मिसळ मागवली. अन बघते तर काय मिसलच्या नावाखाली फक्त मटकीची उसळ अन फरसाण. जिला ते तिखट झंझाळ म्हणत होते ते माझ्यासाठी अगदी फिके होते. ठाण्याच्या मामलेदार मिसळीची चाहती मी, मला ती मिसळ अगदीच बघवेना, त्यात भरीस भर म्हणजे सोबत पावा ऐवजी गोडसर असे दोन ब्रेडचे तुकडे.

मला ते बघून खावेना, तर माझी ती अवस्था बघून दाजींना अन त्या हॉटेल मालकाला वाटले की ती मिसळ खूपच तिखट आहे अन मला ते इतके तिखट खाणे जमेना

फक्त ते दोघेही खूप काळजी घेत होते म्हणून ती मिळमिळीत मिसळ अन ते गोड ब्रेड खाल्ले होते कसेतरी, त्यांची मने राखायला, पण परत कधीच गेली नाही.

असो, माझे असे खूप किस्से आहेत मजेशीर, दरवेळी मला हाच प्रश्न पडतो की मीच का????

कल्याण भेळ मध्ये डिफॉल्ट (आपण बदल न करता) मिळणारी शेवपुरी एकदा खाल्ली होती.परत नाही. त्यांचे गोडाचे पाणी हे जवळ जवळ आटवलेला साखरेचा पाक आहे.त्यात कितीही तिखट पाणी मिसळले तरी चव गोड राहते.आता कधी कल्याण भेळ मध्ये खायचं झालं तर तीन वेळा बजावून 'गोड पाणी अजिबात टाकू नका, तिखट पाणी जास्त टाका, वरुन थोडी चिली पावडर मारा' इतकं सांगितल्यावर जे बनतं ते घरी लहान मुलांना द्यावं असं जुजबी तिखट असतं Happy
आम्हि पिंपळेसौदागरमिनरलीपाणीपुरीकर्ता गणेशभेळभक्त. त्याला गोड अजिबात घालू नका सांगितलं की त्याला टेस्ट चा अंदाज येऊन तो मस्त मसालेदार तिखट रगडा पॅटिस बनवतो.

कोणी ती प्रसिद्ध तंदूर चाय प्यायली आहे का?स्वर्गीय अनुभव वगैरे वाटला की परत कधीही करणार नाही वाला अनुभव?

>>>>> आजचं दोस्त लोकांनी फिडबॅक दिला.. जे चहाचे शौकीन आहेत... गंडलय ते प्रकरण .... ते या धाग्यावर लिहिते असते तर नक्कीच तंदूर चाय ला इथे स्थान दिले असते

सरपंच थाळी बद्धल पण लिहा कोणीतरी. >>>> आमेन.
मसाल्यांचा मारा, सुमार चव.
तुम्हाला त्या थाळीबरोबर फोटो काढून स्टेटस. वै ठेऊन मिरवायच असेल तरच जा... Wink

हिंदीत डब केलेला(इंग्रजी) सिनेमा.
क्राउचिंग टायगर हिडन ड्रॅगन हा सिनेमा पाहिलेला. जिथे होतो, तिथे बहुतेक हिंदी डब्ड व्हर्शन्सच दाखवत असावेत.
जायच्या आधी तो हिंदीत डब केलाय हे माहीत नव्हतं.

सगळ्या स्टाफला(ज्यात मुंबईकरांची गणना अधिक होती) घेऊन (शनिवारी- सुटीच्या दिवशी) सिनेमा पाहायला जायचं ही आमच्या बॉसची (ब्रँच मॅनेजर - १२-१४ जणांचा स्टाफ होता) कल्पना. त्याने आधीही राबवलेली, पण मी गेलो नव्हतो. या सिनेमाचं त्याने खूप कौतुक केलेलं. त्यातून ऑस्करही मिळालेला.
थेटर बाहेर पडल्यावर सगळ्यांनी सिनेमाला इतक्या शिव्या दिल्या, की बॉसनेही परत सिनेमाला जाऊ या असे म्हटले नाही.

< त्या दुकानात सर्वांसमोर बायडीनं रश्श्याची वाटी फेकून नाही मारली मला हे नशीब... >>>
हा हा Lol कपूर अँड सन्स आठवला. कुकीजची बरणीच डायरेक्ट चेहऱ्यावर. आणि तेपण सगळ्या पाहुण्यासमोर बापरे Uhoh एवढं चिडण्यासारख कारणदेखील असतं म्हणा तिथं.....

@ VB तुम्ही नवीन दिसलात म्हणुन दिली असेल तशी मिसळ >>> असेलही कदाचित तसे, पण नविन जरी असली तरी मी पण कोल्हापुरचीच , आमच्याकडे साध्या एक प्लेट पोह्यांमधे सुद्धा किमान चार पाच गडद हिरव्या मिरच्या असतात. त्यामुळे फिके जेवण आवडतच नाही

कोणी ती प्रसिद्ध तंदूर चाय प्यायली आहे का?स्वर्गीय अनुभव वगैरे वाटला की परत कधीही करणार नाही वाला अनुभव?
>>>>
माझी बहिण कट्टर चहाबाज आहे,इतकी की ती फक्त चहा प्यायला 2 तास गाडी चालवत कुठे कुठे हिंडते... तर तो तंदुरी चहा पिऊन दुसऱ्या दिवशी आजारी पडली... भयंकर वाह्यात प्रकार आहे तो... पुन्हा कधीच पिणार नाही म्हणाली

कुठे मिळतो हा तंदूर चा प्रकार? पुण्यात का? फटू वगैरे टाका... काही वाटणार नाहीच म्हणा प्यावासा पण जस्ट क्युरिऑसिटी म्हणून..

म्हणजे भट्टी चहा का? जीपीओ पाशी मिळतो, इतकाही वाईट लागत नाहीत, बऱ्यापैकी गोडमिट्ट असतो आणि नेहमीच्या चहा पेक्षा अशी धुरकट चव लागते.
मी असाही चहाबाज नसल्याने मला कोऱ्या चहापासून गुळाच्या चहापर्यंत काहीही एकदा टेस्ट करायला चालते.

मागे एक व्हिडिओ बघितलेला. कुल्हड टाईप भांडं तंदुर मध्ये टाकायचं, आणि त्या गरम मातीच्या भांड्यात चहा मिश्रण ओतायचं. आणि ते फेसाळून उतू गेलं की प्यायचं. तोच का?

Pages