अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा ट्राय केली पण परत कधीच नाही करणार?

Submitted by कटप्पा on 7 July, 2018 - 00:24

Long वीकएंड साठी फ्लोरिडा आलो आहे. मी 2 अशा गोष्टी ट्राय केल्या ज्या परत कधीच नाही करणार.

१. ऑक्टोपस - हो मी ऑक्टोपस खाल्ला. मजेत खाल्ला आणि खाऊन १ तासात उलटी केली. सगळी रात्र पोट दुखत होते.

२. सिगारेट -पहिल्यांदा सुट्टा ओढला- 4 तास गुंगीत होतो. कानावर खडा आता. नेव्हर अगेन !!!

तुमच्या पण असे अनुभव असतील जे एकदा ट्राय केले पण परत कधीच नाही करणार?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पियूष हे श्रीखंड पातेले विसळलेले पाणी हे जोक म्हणून आहे. >>> हो. पुलंचे वाक्य आहे पुण्यात काही रेस्टॉ मधे केलेल्या जुगाडाबद्दल.

सुधारस फॅन क्लबच काढतो आता. पूर्वी पुण्यात लग्नाच्या आदल्या दिवशीच्या जेवणात असे. पाकात लिंबू पिळून इतक्या तीन शब्दांत त्याची बोळवण करणे हा घोर अपमान आहे. माझी फेबुवरची फ्रेण्ड लिस्ट कमी करण्याच्या पोकळ धमक्या मी अजून दिलेल्या नाहीत. ही पहिली असेल. Viscosity ही भौतिकशास्त्रातील गोष्ट ज्याच्याकडे बघून शिकावी असा घट्ट पाक, त्यात लिंबू, बेदाणे, पिकलेली केळी आणि बहुधा केशर असे काहीतरी घालत. जमला/मुरला की असला मस्त लागे. आख्खे जेवण होत असे ४-५ पोळ्या आणि सुधारस यात. नंतर मिलन स्वीट मार्ट छाप दुकाने आली आणि पाकाची व्हिस्कॉसिटी जाउन त्यास द्रवरूप अवस्था प्राप्त झाली. मिठाईवाल्यांचे नापाक इरादे! पूर्वीचे पुणे न राहण्याची सुरूवात तेथूनच झाली.

केळकरांचे बोरकूट असे लिहिणार होतो तर डायरेक्ट फोटोच आला की..

सुधारस , पाकातले गुलाबजाम केल्यावर उरलेल्या पाकात लिंबू पिळले की तयार..

चांगलं दळणाचा डब्बा भरेल एव्हढं बोरकुट आणायचो>> हायला भारीच .. मला पण जाम आवडायचं लहानपणी .. म्हणजे अजूनही आवडेल पण माहित नाही कुठे मिळतं ?/ नाही मिळत .. आता यावेळच्या भारतवारीत नक्कीच घेणार

लोल फा. मी रहाणार तुझ्या फ्रेण्ड्स लिस्टीत.
वर म्हटलंस तसं केळी, बेदाणे घालतात हे नवीनच आहे माझ्यासाठी.

पुलंचं मूळ वाक्य पीयूष ( ही एक श्रीखंडची धुवून काढलेली पातळ आवृत्ती) असं असावं. पातेलं विसळलेलं पाणी वगैरे नंतरची कुणाचीतरी ॲडिशन असावी. अर्थात माझ्या आठवणीनुसार.
जनसेवाचं पीयूष मला तरी फार आवडलं नव्हतं.
सुधारस आवडतो.

ऑक्टोपस - हो मी ऑक्टोपस खाल्ला. मजेत खाल्ला आणि खाऊन १ तासात उलटी केली. सगळी रात्र पोट दुखत होते. >> अरेरे ! तुम्ही कुठे आणि कशा पद्धतीने केलेला खाल्लात यावर अवलंबून आहे.

स्पॅनिश पद्धतीचा, ग्रिल केलेला, किंवा कलामारी ( स्क्विड) सारखा फ्राय केलेला ऑक्टोपस एकदम भारी लागतो. जाणकार लोकांच्या सोबतीने अजून एकदा खाऊन पहाच. तरिही नाही आवडला तर मोअर फॉर ( पीपल लाइक ) मी Happy

अमेरिकेत नवीन असताना तेंव्हाच्या एका बॉय फ्रेंंडने आफ्टर एट नावाच्या चॉकलेटचा बॉक्स दिला होता. चॉकलेट आणि टूथ्पेस्ट एकत्र केल्या सारखी चव होती. ते चॉकलेट परत कधी ट्राय केले नाही. तो बॉयफ्रेंड पण टिकला नाही फार दिवस .

{{{ अमेरिकेत नवीन असताना तेंव्हाच्या एका बॉय फ्रेंंडने आफ्टर एट नावाच्या चॉकलेटचा बॉक्स दिला होता. चॉकलेट आणि टूथ्पेस्ट एकत्र केल्या सारखी चव होती. }}}

मिंट फ्लेवर असतो त्यात. चॉकलेट आणि मिंट फ्लेवर हे डेडली कॉम्बिनेशन आहे. मध्यंतरी पारले हाईड अ‍ॅण्ड सीक मध्येही अशी बिस्कीटे आणली होती. तीनशे रुपये किलोला मोजून असला भयाण प्रकार खाणारे गिर्‍हाईक न मिळाल्याने लवकरच बंद झाली.

मला मिंट फिलिंग्ज्स (भावना नाही, भरलेली) असलेली डार्क चॉकलेटं फार आवडतात! जेवणानंतर मुखवास ह्या नावाखाली खाल्ली जायची. ट्रेडर जोजमधे भारी मिळतात!!

चॉकलेट आणि मिंट फ्लेवर हे डेडली कॉम्बिनेशन आहे.
<<
कन्यारत्नाने 'ग्रीन टी फ्लेवर्ड डार्क चॉकोलेट' आणलं होतं कित्येक महिन्यांपूर्वी. अजूनही फ्रीजमधे त्याचे कलेवर पडून आहे.

*

आफ्टर ८ मधे दा रू असते. मस्त चढतं ते. जीएफने बीएफला किंवा व्हिसेवर्सा देण्याचे चॉक्की आहे ते.

आफ्टर ८ मधे दा रू असते. मस्त चढतं ते. >> अमेरिकेत मिळणार्‍या, नेसले च्या आफ्टर एट चॉकलेट मधे तरी दारू नसते हो. एखाद्या सीझनल व्हेरिएशन प्रॉडक्टमधे असले तर माहित नाही.

आफ्टर 8 मिंट वाले मस्त लागते
आधीच्या छोट्या कंपनीत येणारे एक जर्मन आबा मला ख्रिसमस ला गिफ्ट रॅप करून एक छोटं आफ्टर 8 द्यायचे.मी बहुधा (उंचीने) ☺️☺️☺️ त्यांच्या नातीसारखी असेन म्हणून.

अमेरिकेत मिळणार्‍या, नेसले च्या आफ्टर एट चॉकलेट

<<

बद्दलच लिहिलं आहे मी.

जुनी स्टीरी आहे, कदाचित त्याला "ग्रीन डॉट" मिळाला असेल आता.

मिंट चॉकोलेट godiva/Ghirardelli/York चे आवडतात. छान लागतात कि. आणखी एकदा ट्राय करून पहा. कदाचीत चव डेव्हलप होईल.
मला सुशी प्रकार परत खायला जमला नाही. दोन चार वेळा ट्राय केला पण नाहीच.

सुधारस करता, अमित आणि फारेण्ड ला +१.
सुधारसात केळं हे पहिल्यांदाच ऐकलं मीही. पण एकंदर ड्राय फ्रूट्स चालतात तर फ्रेश फ्रूट्स का नको?

सुधारस आवडणे हे गोडखाऊपणाचं लक्षण असू शकेल. किंवा नॉस्टाल्जिया. अनेक वर्षं उलटली खाऊन. कदाचित आताही तेव्हढाच आवडेल किंवा नाही हे सांगणं कठीण आहे.

पूर्वी लग्नात आदल्या दिवशी साखरभात किंवा सुधारस असे. तेव्हा फार आवडिने खाल्ला जात असे. घरीही कधी कधी सुधारस पोळी असे. तीही अवडत असे. पण सशलजी म्हणतात तसा तो नोस्टॅल्जिया असेल. आज सुधारस (वा साखरभात) समोर आला तर खववेलच असे नाही. ती गोडमिट्ट चव कदाचित आवडणार नाही.

एकूण काय, सुधारस असो वा सुहास शिरवळकर, योग्य त्या वयातच अस्वाद घेणे.

सुधारस आवडणे हे गोडखाऊपणाचं लक्षण असू शकेल >>> असेलही. पण त्याची एक स्पेसिफिक चव असते. नुसता गुलाबजामचा पाक खाण्यापेक्षा एकदम वेगळी. पण ९०% साखर हे खरे आहे.

विकु - हो. हे शाळा कॉलेज च्या काळातलेच म्हणतोय. अनेक वर्षांत खाल्ला नाही. सुधारस. आजकाल तसा घट्ट पाक तरी कोठे असतो.

आजकाल तसा घट्ट पाक तरी कोठे असतो.>> फा चा आयडी चार वेळा चेक केला हे वाक्य वाचून. Proud
आज खाल्ला तर नुसती साखर खातोय या भावनेनेच खाल्ला जाणार नाही.

नुसत्याच बिया नाही किडेदेखील रगडलेले असतात. हाय प्रोटिन कंटेंट. >> बोलायच म्हणजे काहीही बोलाव का? अस तर मग बाजारात मिळणारे कुठलेही खाद्य पदार्थ तयार करताना त्यात किती "हाय प्रोटिन कंटेंट" असत असेल.

बोरकुट वाले केळकर हे माझे पणजोबा आहेत. त्यांचा कारखाना मी अनेकदा पाहिलेला आहे. ट्र्क मधून आणलेली बोर आधी धुवून, छाटून (म्हणजे किडकी बोरे वेगळी करुन) मग वाळवली जातात.

अवांतरा बद्दल क्षमस्व. पण वरची पोस्ट पाहून अगदी राहावल नाही म्हणून.

वॉव स्निग्धा! मस्तच.युवर पणबा हॅज डन अ ग्रेट इन्व्हेंशन.
बोरकूट आवडतोच.

(अवांतर : बाजारात मिळणारे बेसन कधीकधी किडक्या, डिसकार्ड कराव्या लागणार्‍या आणि त्यातल्या त्यात रियुज गवसलेल्या हरबरा डाळीचे असू शकते ही शक्यता कोणी विचारात घेतली आहे का?नेहमीच असते असे नाही पण असू शकते.बाहेरचे खाण्यात मिळणारी सोय्/वाचणारा वेळ/परदेशात असल्यास नाईलाज यापुढे अश्या काही दृष्टीआड घडलेल्या गोष्टी लहान प्रमाणात माफ कराव्या लागतात.)

बाहेरचे खाण्यात मिळणारी सोय्/वाचणारा वेळ/परदेशात असल्यास नाईलाज यापुढे अश्या काही दृष्टीआड घडलेल्या गोष्टी लहान प्रमाणात माफ कराव्या लागतात.) >> ते झालेच. पण त्यांनी "नुसत्याच बिया नाही किडेदेखील रगडलेले असतात." हे म्हटलेल नाही आवडल

हो हो.
त्याबद्दल वाद नाहीच.तुम्ही प्रत्यक्ष प्रोसेस पाहिली आहे. कोणाही उद्योजकाला स्वतः पूर्ण हायजिन पाळत असतानाही आपल्या प्रॉडक्ट वर हा आरोप झालेला ऑफेंडिंग वाटणे साहजिक.
काही मोजक्या उदाहरणांमुळे बाकी चांगले सचोटीने धंदा करणारेही रगडले जातात.

मी लहानपणापासून कधीच गव्हाचा चीक खाल्ला नव्हता, कारण आमच्या घरी करतच नाहीत. वाळवणं म्हणजे पोह्याचे पापड, मिरगुंडं, उडीद पापड, आंब्या-फणसाची साठं. नवरा पुण्यातला, त्यामुळे त्याला गव्हाचा चीक खायची सवय. आवडच. लग्नानंतर लगेच कधीतरी त्याने खास मला खायला देण्यासाठी साबांना चीक करायला सांगितला. मी तारीफ ऐकून आपण पोहे घेतो तसा खायला घेतला. आणि अजिबात म्हणजे अजिबात आवडला नाही. संपेचना. शेवटी ठेवून दिला. त्यानंतर कधी खाल्ला नाही आणि खाणारही नाही आता.

Pages