अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा ट्राय केली पण परत कधीच नाही करणार?

Submitted by कटप्पा on 7 July, 2018 - 00:24

Long वीकएंड साठी फ्लोरिडा आलो आहे. मी 2 अशा गोष्टी ट्राय केल्या ज्या परत कधीच नाही करणार.

१. ऑक्टोपस - हो मी ऑक्टोपस खाल्ला. मजेत खाल्ला आणि खाऊन १ तासात उलटी केली. सगळी रात्र पोट दुखत होते.

२. सिगारेट -पहिल्यांदा सुट्टा ओढला- 4 तास गुंगीत होतो. कानावर खडा आता. नेव्हर अगेन !!!

तुमच्या पण असे अनुभव असतील जे एकदा ट्राय केले पण परत कधीच नाही करणार?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लग्न. Light 1

Lol

हे लग्न माझ्या डोक्यातही आलेले.
पण दुर्दैवाने मीच तीनदा केले आहे.
त्यातही एकाच गर्लफ्रेंडसोबत दोनदा Sad

तसेही महापुरुष म्हणून गेलेत,
हम एक बार जिते है, एक बार मरते है,
प्यार भी एक ही बार होता है..
और शादी ... वो भी एक ही बार होती है !

- शाहरूख खान

अवांतर - मानवमामा, लग्न लिहिल्यावर दिवा का टाकलाय? मामी सुद्धा मायबोलीवर आहेत का Happy

एलएसडीचं इंजेक्शन घेतलं होतं एकदा "ट्राय" करायचं म्हणून. भयानक अवस्था झाली होती. परत कानाला खडा लावून रामा शिवा गोविंदा केलं.

एकदा स्वतःच कोंबडी मारून सोलली होती. लैच त्रांगडं झालतं, परत करायची इच्छा नाही, मुलाणी मामु जिंदाबाद

एकदाच कुत्रं पाळलं होतं (कारवानी होतं, रानात पाल टाकलेल्या धनगरांच्या माणसांनी दिलं होतं) खूप जीव लावून बेटं मरून गेलं, परत जीव गेला तरी बेहत्तर पण कुत्रं पाळणार नाही.

मी जाडु असल्यामुळे बॉडी शेमिंग करणाऱ्या एका स्त्री सहकर्मीला चिडून "तुझ्यायची गांx" म्हणलं होतं. पार हायर मॅनेजमेंट मध्ये जाणार होतं प्रकरण, कसंबसं आवरलं, आता कोणीही जाड्या ढोल्या वगैरे म्हणलं तरी सहन करतो. बाईमाणूस असलं तर शिस्तीत थँक्स पण म्हणून टाकतो.

एकदा बाबांच्या पाकिटातून ५०₹ चोरले होते अन मटका लावायला गेलो होतो, नंतर खूपच वाईट वाटलं. बाबांना आपली चूक सांगावी वाटली पण दरारा भयंकर मग आईकरवी (तिचा दीड तास मार खाऊन) संदेश बाबांकडे पोचवला. खूप गिल्टी वाटलं होतं.

रानात कोंबड्या डालायाचं काम एकदा केलं होतं, इतकं किळसवाणा वाटलं की नंतर महिनाभर अंडीही खाऊ शकलो नव्हतो, हळूहळू परत खायला लागलो पण आयुष्यात परत कधी कोंबडी डालणार नाही ही प्रतिज्ञा घेऊनच.

म्हशीच्या शेपटाला चिकटलेली गोखरुची काटेरी फळं काढत असताना म्हशीने सणसणीत लाथ देऊन पाचेक फूट उडवलं होतं. आयुष्यात परत म्हैशीला गृमिंग करणार नाही कधीच.

मी बर्यापैकी तिखट खातो म्हणून एकदा अत्यंत तिखट थायफुड ट्राय केलं यापुढे कधीही तिखट थायफुड ट्राय करणार नाही.
बंजी जंप पण पुन्हा मारेन की नाही आताच सांगता येत नाही.

दोन वर्षांपूर्वी Charlotte मधील एका भाची ला भेटायला गेले होते. तेंव्हा भारतातून आलेल्या दुसर्या भाचीबरोबर एक पाचेक किमी. अंतरावर असलेल्या कुठल्याश्या शाॅपिंग एरियात पायीच जायचे ठरवले.
मॅपबीप बघत चालायला सुरुवात केली. हळूहळू चक्क हाय वे वर पोचलो. दुतर्फा सुनसान जंगल व झुर्र झुर्र जवळून जाणार्या गाड्या. आसपास वस्ती नसल्याने फुटपाथ नव्हताच. गाड्यांची स्पीड पाहता घाबरून रस्त्या च्या बाजूने चालायला लागलो तर नुकत्याच पडून गेलेल्या पावसामुळे गच्च ओल्या गवतात बूट रूतू लागले..
आतापर्यंत पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. येणारे जाणारे गाडीच्या काचा खाली करून आमच्या कडे भीतीयुक्त ,
संशयित आश्चर्याने पाहू लागले. आता मात्र आमची चांगलीच घाबरगुंडी उडालेली होती. या पब्लिक मधल्या कुणी 911 ला काॅल केला तर ... पावसामुळे आम्ही दोघी पासपोर्ट घरीच ठेवून आलो होतो त्यात रस्ता भर गूगल मॅप चालू ठेवल्या मुळे दोघीं च्या मोबाईल च्या बॅटरी माना टाकण्याच्या बेतात होत्या.
नशीबाने घरचा स्ट्रीटअॅड्रेस लक्षात होता.
इथे डोक्यात हे सगळे विचार, सात किमी चालून पाय गळायला आलेले ,पावसाच्या भुरभुरीने भिजलेले कपडे ,हवेत गारवा वाढल्याने आता कुडकुडत ही होतो पण खूप दमल्याने भरभर चालता ही येत नव्हते.
शेवटी लांबून ते complex दिसू लागलं. आजूबाजूला तुरळक वस्तीही लागली. शेवटी आम्ही एकदाचे पोचलो .
अजून ही, ही गोष्ट आठवून थरकाप होतो.
या प्रकारचं adventure, Never Again.

कोंबडी डालणे म्हणजे पोटात अंडं असलेली कोंबडी ओळखायची एक थेट अश्लील(च) म्हणावी अशी प्रोसेस असते, पोटात अंडं असलेल्या कोंबड्या चरायला सोडल्या तर कुठंही अंडं देऊन येतील मग एकतर त्या अंड्याचा नाद सोडा किंवा उकिरड्यावर अंडी शोधत बसा, म्हणून वर म्हणलोय ती प्रोसेस फॉलो करून पोटात अंडं असलेली कोंबडी आयडेंटिफाय करून तिला खुरड्यातच ठेऊन दाणापाणी पुरवायचे असते.

Submitted by जेम्स वांड on 9 July, 2018 - 11:31 >>> ओह्ह , मला वाटले कोंबडी मारुन शेतात पुरायचे की काय??

करतात न असे बरेच जण म्हणुन

* वॉटरपार्क मध्ये एकदम वर जाऊन बंद पाईप मधून खूप वेळ घसरत जाऊन एकदम धप्प्कन स्विमिन्ग पुलात आदळणे.
* सेम प्रोसिजर फक्त स्विमिंग पूल ऐवजी एका प्लॅस्टिकच्या विहिरित पडून त्यात २-४ चकरा खाऊन मग पुलात पडणे.
बिग नो नो

इमॅजिका चे स्क्रिम मशिन.
परत कधीकधीकधी नाही.एकदाच बरोबर खूप मोठे मोठे बॉस डायरेक्टर लोक होते म्हणून थ्रिल चा आव आणावा लागला.
बंद क्याबिनीत बसवून फिरवा ना पाहिजे तितकं.विमानात बसतोच ना आम्ही Happy इथे उघड्या खुर्च्यावर बांधून बसून सूर्याभोवती आणी स्वतःभोवती आणि ४५ च्या अक्षात कलत्या असलेल्या उघड्या पृथ्वीवर मी का बसावं

सेम प्रोसिजर फक्त स्विमिंग पूल ऐवजी एका प्लॅस्टिकच्या विहिरित पडून त्यात २-४ चकरा खाऊन मग पुलात पडणे.
बिग नो नो>>>

किती मजेशीर आहे ते. नेहमी तेच अनुभवण्यासाठी जातो.

च्यायला तीसनं काय फरक पडतोय, इथं मॅकडॉवेल्सची ट्रिपल एक्स रमची चपटी/क्वार्टर तशीच तोंडाला लावून पित असे मी. मजा यायची, थोडं जळजळायचं पण व्हॅनिला बेस्ड ती चव आवडायची चार लार्ज प्यायचे असले तर मी सरळ चार चपट्या माझ्यापुरत्या वेगळ्या विकत घेत असे, सोबत ड्राय चकना काहीच नाही फक्त भरपूर लिंबू पिळलेल्या काकडी, कांदा , टोमॅटो, तंदुरी चिकन, उकडलेली अंडी, फारतर मसाला पापड. एक चपटी घोट घोट करत खाली उतरवली की निवांत पाऊण तास शिस्तीत खाणे, परत तीन चपट्या हेच रिपीट

(हाच प्रतिसाद तुम्ही दारू कशी पिता वरही ट्रान्सफर करतोय)

निम्म्यापेक्षा जास्त प्रतिसाद दारू आणि तत्सम व्यसनांवरच का आहेत? लाईफमध्ये याव्यक्तिरीक्तही वाईट गोष्टी आणि थ्रिल्स असतात गाईज... मेंदूला थोडा ताण द्या आणि आठवा... हा घ्या माझा क्रमांक आठवा..

८) एकदा अंगारकीला सिद्धीविनायकला गेलो होतो. पहिल्यांदाच. आणि तेव्हाच ठरवले की हे शेवटचे. आयुष्यात पुन्हा नाही. कारण गर्दीचा जो प्रकोप झाला होता त्यात माझ्या आयुष्यातील तो दिवसच अखेरचा ठरण्याची शक्यता निर्माण झाली होती. गेला बाजार मी लंगडा तरी नक्कीच झालो असतो Sad

ओ भ भा... लिहू द्या की लोकांना काय लिहायचंय ते.
इतका त्रास होत असेल तर नका वाचू धागा...

मी शाहरुख चा रा वन पहिला, आणि इतका भयाण असह्य अभिनय पाहून परत काही त्याच्या एकही चित्रपटाच्या वाट्याला गेलो नाही.

मी शाहरुख चा रा वन पहिला, आणि इतका भयाण असह्य अभिनय पाहून परत काही त्याच्या एकही चित्रपटाच्या वाट्याला गेलो नाही. >>>>>> Rofl Rofl

१. मोठ्ठ्या राईड्स

२. वसाबी पेस्ट (अतिशय उग्र वासाचे, डोक्यात, नाकात, मेंदूत झिणझिण्या आणणारे हे डीप खाल्ले होते चिप्ससोबत) - पुन्हा कधी नाही.

३. मटण

मी शाहरुख चा रा वन पहिला, आणि इतका भयाण असह्य अभिनय पाहून परत काही त्याच्या एकही चित्रपटाच्या वाट्याला गेलो नाही.
>>>>>>>>>>>>>>

तुम्ही रा वन पर्यंत तरी पोहोचलात. मी मित्रांच्या आग्रहामुळे ग्रूपबरोबर 'रामजाने' नामक छळवाद भोगून बाहेर पडताक्षणीच या फडतूस ओव्हरअ‍ॅक्टींग करणार्‍या कंडम माणसावर एक नया पैसा वाया घालवणार नाही हे ठरवून टाकलं होतं आणि आजतागायत ते पाळत आलो आहे.

Pages