अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा ट्राय केली पण परत कधीच नाही करणार?

Submitted by कटप्पा on 7 July, 2018 - 00:24

Long वीकएंड साठी फ्लोरिडा आलो आहे. मी 2 अशा गोष्टी ट्राय केल्या ज्या परत कधीच नाही करणार.

१. ऑक्टोपस - हो मी ऑक्टोपस खाल्ला. मजेत खाल्ला आणि खाऊन १ तासात उलटी केली. सगळी रात्र पोट दुखत होते.

२. सिगारेट -पहिल्यांदा सुट्टा ओढला- 4 तास गुंगीत होतो. कानावर खडा आता. नेव्हर अगेन !!!

तुमच्या पण असे अनुभव असतील जे एकदा ट्राय केले पण परत कधीच नाही करणार?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दहा वर्षांपूर्वी पावसाळ्यात लवासा फिरायला मित्रांबरोबर बाईक ट्रीप केली होती.
सात मित्र चार गाड्या, येताना मी एकटा.

हलके घ्या पण काही प्रश्न
१)ट्रीप ल मित्रांबरोबर गेला होतात म्हणजे बिअर वैगेरे झाली होती का?
२) तिथे काही आपसात मतभेद झाले होते का?
कारण जिवावर उदार होवून माणूस गाडी तेव्हाच चालवतो जेव्हा त्याची मानसिक स्थिती चांगली नसते.
किंवा नशेत असतो .
घाट (तो पण लोणावळ्याच्उ) उतरताना प्रचंड वेगात गाडी ती पण two wheeler आणि त्या मध्ये पावसाचे दिवस.
खुप धोकादायक.

आम्ही जिरा पावडर घेऊन किचन चीमनीतून भ्रमण करण्याचा प्रयत्न केला मावशीच्या घरी जायला......
Submitted by भांडखोर on 21 May, 2022 - 17:32

म्हणजे नक्की काय????

क्लॅम फिश स्पेगेटी ट्राय केली होती, भयकर उलट्या झाल्या होत्या इतक्या की २ दिवस काहीही खावस वाटत नव्हत.
परत कधिही खाणार नाही,
पॅनेटोन केकच खुप कौतुक एकल म्हणून आणला होता पण अजिबातच आवडला नाही.

बापरे.. फार तडजोडीचा झाला का प्रवास?
>>>>
पुछो मत. माझा एकूण प्रवास साधारण 34 तासाचा होता तो 39 तासाचा झाला. संपूर्ण वेळ बाथरूम मध्ये पाणी नाही. माझ्यासोबत 5 महिन्याचं बाळ होतं, त्याला फॉर्म्युला गरम करून द्यायला गरम पाणी द्यायला तयार नाहीत. पंपिंग ची सोय नाही.
बॅग वरती ठेवायला मदत कराल का विचारलं तर स्टाफ कडून ' एवढी सुविधा हवी तर बिझनेस क्लास चं तिकीट काढायचं, आम्ही नोकर नाही आहोत ' वगैरे उत्तरं.
काहीही विचारू नका. हे जे सांगितलं आहे ते त्रासाच्या 25% सुद्धा नाही.

बापरे, गुलमर्ग चं वाचून भीती च वाटली. मागच्या आठवड्यात 19 मे ला तिथे होतो.. फेज 1 ला पोचायला दुपारी 1 वाजला आणि खराब हवामानामुळे फेज 2 बंद केले आहे असे जाहीर केले.. खूप वाईट वाटले होते आम्हाला.. खास बर्फ बघायला आलो आणि बंद म्हणून.. पण मग फेज 1 वरून घोडे वाल्याने डोंगरात एके ठिकाणी नेले तिथे ग्लेशियर सारखी जागा होती आणि थोडाफार बर्फ मिळाला.. ..गर्दी पण फार नव्हती..मुलीने खूप मजा केली..
गुलमर्ग चा किस्सा वाचून आता वाटतेय की जे होते ते बर्यासाठीच..

आणि तिथे खटकलेली अजून एक गोष्ट म्हणजे खूप म्हातारे, थकलेले,चालायला सुद्धा त्रास होणार लोक आणि खूप लहान लहान मुलांना लोक सर्रास अशा अवघड ठिकाणी घेऊन येत होते. .. आपण जिथे जातो आहे तिथला थोडा अभ्यास लोक करत नसतील का ? लहान मुले आणि म्हातारे लोक यांना घेऊन जायला अजून सोप्या वेगळ्या जागा आहेतच की मग अशा अवघड ठिकाणी कशाला आणायचं ? काही लोक ज्यांना चालायला सुद्धा त्रास होतो त्यांना 2 हेल्पर दोन्ही बाजूला घेऊन घोड्यावरून बसवून घेऊन जाणारे लोक बघून राग आणि कीव दोन्ही वाटली....
पहालगाम मध्ये साधारण 6 महिन्याची जुळी मुले घेऊन आलेले एक कुटुंब होते.. त्या मुलांना घेऊन 2 गाईड/हेल्पर लोक पूर्ण डोंगर चढून बैसरन व्हॅली मध्ये घेऊन चालले होते आणि आई वडील घोड्यावर..

आमच्या वेळी लेव्हल 2 ला 4 महिन्याचे बाळ घेऊन आलेले एक कपल होते. नंतर 5 तास चेंगराचेंगरीत ते बाळ ठो ठो रडत होते. तिच्या आईला तिला उभ्या उभ्या ब्रेस्टफीड करण्याइतकी सुद्धा जागा नव्हती. Sad

मी एकदा सहकारनगर पुणे येथील शेलार टिव्हीएस च्या लायनीत असलेल्या न्यू पूना बेकरी चे रमबॉल खाल्ले होते.

रमबॉल कसले? बेकरीत उरलेली केकची सगळी घाण एकत्र करून त्याचा एक गोळा करून विकलाय. आयुष्यात पुन्हा रमबॉल खाणार नाही.

इतर ठिकाणी कदाचित चांगले मिळत असतीलही म्हणून मुद्दाम दुकानाचे लोकेशन आणि नाव मेंशन केलेय.

ज्युपिटर वर पहाटे निघून पुण्यावरून डोंबिवलीला गेले होते आणि त्याच दिवशी संध्याकाळी पुण्याला परत आले
नवऱ्याला गाडी चालवता येत नाही त्यामुळे मला एकटीलाच ड्रायव्हिंग करावं लागलं
परत अस करणार नाही एका दिवसात पुण्यावरून डोंबिवली आणि परत पुणे एवढा प्रवास नको

नवऱ्याला गाडी चालवता येत नाही, हे वाचून मला कल्चरल शॉक बसला
>>>
आमच्याकडेही मला येत नाही. बायकोला येते. यात कसला शॉक.

नवऱ्याला गाडी चालवता येत नाही, हे वाचून मला कल्चरल शॉक बसला.

का त्यात शॉक बसण्यासारख काय आहे
डोंबिवलीला आमचं घर स्टेशन पासून जवळच आहे शिवाय सगळ्या जीवनावश्यक गोष्टी वॉकिंग डिस्टंस वर आहेत ,प्रवास लोकलने त्यामुळे सासरी कधी गाडी घेतली गेली नाही
मी पुण्याची असल्याने मला गाडी येते

हलके घ्या पण काही प्रश्न
१)ट्रीप ल मित्रांबरोबर गेला होतात म्हणजे बिअर वैगेरे झाली होती का?
२) तिथे काही आपसात मतभेद झाले होते का?
कारण जिवावर उदार होवून माणूस गाडी तेव्हाच चालवतो जेव्हा त्याची मानसिक स्थिती चांगली नसते.
किंवा नशेत असतो .
घाट (तो पण लोणावळ्याच्उ) उतरताना प्रचंड वेगात गाडी ती पण two wheeler आणि त्या मध्ये पावसाचे दिवस.
खुप धोकादायक

>>

बिअर ई काहीही झाले नाही.
मतभेद तर बिलकुल नाही.

तारुण्याची झिंग म्हणू शकतो. आजही नाही कळत तेंव्हा इतका बेजबाबदार का झालो होतो....पण पुन्हा नक्कीच नाही (धाग्याचा विषय)

घाट नाही म्हणता येणार... सगळा उतार रस्ता होता आणि क्वचित वळणे.

10-15 km असावा.

अगदी सहमत - खूप धोकादायक ह्या विधानाशी.

नवर्याला गाडी चालवता येत नाही, हे वाचून मला कल्चरल शॉक बसला.>>>>

हाहा… माझ्याही नवर्याला येत नाही. खुप वर्षांपुर्वी जेव्हा मुलगी पुण्याला निवासी शाळेत होती तेव्हा शाळेतल्या एका कार्यक्रमाला गेलो होतो. तो सम्पायला रात्रीचे नऊ वाजले. मी नुकतीच गाडी चालवायला शिकले होते व घाटात गाडी चालवायचा अजिबात अनुभव नव्हता. रात्र होणार हे माहित होते म्हणुन एका मित्रालाही सोबत ड्रायवर म्हणुन घेतले होते. राती नवाला पुणे शहरातुन निघाल्यावर एक्स्प्रेसवे सुरु व्हायच्या आधी एका फाइन डाइन हाटेलात जायची नवर्याला हुक्कि आली. तो व मित्र दोघेही भरपेट जेवले. मला काळजीने जेमतेम जेवता आले. रात्री अकराच्या सुमारास खाली गाडीकडे येताच नवरा मागच्या सिटवर बसुन लगेच घोरायला लागला. मित्रानेही त्याला झोप येते म्हणुन जाहीर केले. मला गाडी चालवणे भाग पडले. जीव मुठीत धरुन मी गाडी मुम्बैत आणली. परत कधीही रात्र होइपर्यन्त कुठेही थांबायचे नाही हे ठरवले आणि सोबत ड्रायवर म्हणुन कोणाला अजिबातच घ्यायचेनाही हेही ठरवुन टाकले. नंतर खुप वेळा रात्री उशीरा गाडी चालवलेली आहे पण ती शहरात. शहराबाहेर रात्रीचे अजिबात ड्रायविन्ग करायचे नाही हा माझा नियम आहे. तशीच वेळ आली तर सरळ होटेलात थान्बायचे.

( माझ्या लिमिटेड डेटासेटनुसार) मला असे बरेच नवरे माहीत आहेत की ज्यांच्या बायकांना ड्रायव्हिंग येत नाही/येत असूनही सहसा करत नाहीत, पण अशी एकही बाई माहीत न्हवती की जिच्या नवर्‍याला ड्रायव्हिंग येत नाही. म्हणून शॉक बसला असे म्हटले आहे. यात योग्य/अयोग्य काही म्हटलेले नाही. मायबोलीमुळे उलट माझ्या ज्ञानात भर पडली, हा झालेला एक फायदाच आहे.

पण अशी एकही बाई माहीत न्हवती की जिच्या नवर्‍याला ड्रायव्हिंग येत नाही. >> सुनीताबाई आणि पु. ल. देशपांडे!!

नव-याला गाडी चालवता येत असेल तर तो सहसा बायकोला गाडीला हातही लावायला देत नाही, बायका सहसा असे करत नाहीत. दोघांनाही गाडी चालवता येत असेल तर त्या शोफरद्ड्रिवेन गाडीचा आनन्द घेतात. Happy (माझा डेटाबेस फार्तर १०० लोकांचा असेल)

कोणी फर्मेन्टेड सोयबीन्स नाही खल्ल्या? नाट्टो म्हणतात त्याला.
मी खाल्ल्य्या नाहीत पण वास आणि बघून पोटात मळमळायचं.
एक जपनीज कलीग खायची सकाळी नाश्त्याला. मी तिच्याबरोबर सुरुवातीला गेले एक दोन वेळा एकाच ग्रूप मध्ये काम करायचो म्हणून. पण ते चिकट प्रकरण बघून कसेतरी झाले. त्यात तिला तोंडाने ढेकर द्यायची घाण सवय. इतका घाण वास ...

तोच प्रकार, चायनीज कलीगचा, जेवणात फक्त एक बेडकाचा मोठा पाय आणि त्याच्या खाली किलोभर सफेद भात. त्यावर ती फेर्मेन्टेड सोय सोस टाकून खायची व म्हणायची सर्वात स्वस्त व मस्त जेवण आहे.
कोणाच्या जेवणाला नावं अजिबात ठेवायचा प्रश्ण नाही पण रोज ते बघून कसेतरी व्हायचे. तिला , माझा डबा खुप आवडायचा. आणि ती न चुकता, जेवुया आता का? विचारायला यायची दुपारी.

परत अस करणार नाही एका दिवसात पुण्यावरून डोंबिवली आणि परत पुणे एवढा प्रवास नको >>> ओहह.

खरंतर डोंबिवली पुणे प्रवास फार अडचणीचा कधी झाला नाही, वर्षातून एकदा तरी कारने होतोच, नेहेमी मी जाते असं नाही, कधी भाउ आणि माझा नवरा जातो, कधी आम्ही. सकाळी जाऊन संध्याकाळी परत. कोणी बरोबर नसेल तर मुद्दाम नवरा गाडी नाही काढत, इंद्रायणी किंवा प्रायव्हेट बसने जातो.

साधना ग्रेट, बाकी दोघे झोपलेले असताना, गाडी आणली.

मला नाही चालवता येत, शिकायची इच्छाही नाही.

खरंतर डोंबिवली पुणे प्रवास फार अडचणीचा कधी झाला नाही, वर्षातून एकदा तरी कारने होतोच, नेहेमी मी जाते असं नाही, कधी भाउ आणि माझा नवरा जातो, कधी आम्ही. सकाळी जाऊन संध्याकाळी परत. कोणी बरोबर नसेल तर मुद्दाम नवरा गाडी नाही काढत, इंद्रायणी किंवा प्रायव्हेट बसने जातो.

कारने किंवा बस अथवा ट्रेनने सोपं पडत टू व्हीलरच्या तुलनेत
मी पण बस , कार आणि ट्रेनने एका दिवसात हा प्रवास केला आहे पण टू व्हीलर होती आणि टू व्हीलर असेल तर जुन्या हायवेने जावं लागतं त्यामुळे खूप थकवा आला होता खंडाळा घाटात पूर्ण अंधार होता

ओहह बरोबर, ज्यूपिटर मला कार वाटली, मला टू व्हीलरबद्दल फार कमी ज्ञान आहे. टू व्हीलरने थकायला होणार हे बरोबर. कौतुक आहे तुमचं खरंतर.

सहसा गाडीला हातही लावायला देत नाही >> Lol एका नवीन धाग्याचे पोटेन्शियल आहे यात.
>>>
छे. काही पोटेन्शिअल नाही. सहसा गाडी नवऱ्याच्या कमाईत घेतली जाते तिथे हे चित्र दिसते. गाडी बायकोने आपल्या कमाईत घेतली असेल तर तिथे असली नवरेशाही चालत नाही. तिची गाडी आहे ती ठोकेल वा काहीही करेन..

Pages