अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा ट्राय केली पण परत कधीच नाही करणार?

Submitted by कटप्पा on 7 July, 2018 - 00:24

Long वीकएंड साठी फ्लोरिडा आलो आहे. मी 2 अशा गोष्टी ट्राय केल्या ज्या परत कधीच नाही करणार.

१. ऑक्टोपस - हो मी ऑक्टोपस खाल्ला. मजेत खाल्ला आणि खाऊन १ तासात उलटी केली. सगळी रात्र पोट दुखत होते.

२. सिगारेट -पहिल्यांदा सुट्टा ओढला- 4 तास गुंगीत होतो. कानावर खडा आता. नेव्हर अगेन !!!

तुमच्या पण असे अनुभव असतील जे एकदा ट्राय केले पण परत कधीच नाही करणार?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बॅचलर असताना पल्सरवर लोणावळ्याला निघालेला आमचा ग्रुप. मित्र गाडी चालवत होता अन मी मागे बसलेलो. तेव्हा मित्राच्या सांगण्यानुसार चालू गाडीवर मी पुढे झालो अन तो मागे येऊन बसला. थोड्या वेळाने पुन्हा मी मागे (चालू गाडीवरच) गेलो अन तो पुढे आला.

पुन्हा कधी नाही केला अस प्रकार

भाऊ, Lol

स्लीपर कोच मध्ये त्रास झाला तर उशी उलट्या बाजूला ठेवून (डोक्याच्या बाजूने ओढले जाण्याची सोय) झोपायचं डोक्यात आलं नाही का? Wink

>> उशी उलट्या बाजूला ठेवून (डोक्याच्या बाजूने ओढले जाण्याची सोय) झोपायचं डोक्यात आलं नाही का?

ते सुचणे स्वाभाविक आहे ना? ते केले गेले नाही म्हणजे तो पर्याय उबलब्ध नसणार हे डोक्यात यायला हवे खरे तर Happy
उशी फिक्स असते. निदान त्या ट्रॅवल मध्ये तरी होती. लेदरची. बेडचा भाग म्हणूनच खिळ्यांनी फिक्स केलेली. तिच्यावर पाय ठेवून डोके उशी नसलेल्या अवस्थेत असा एक असफल प्रयत्न करून पाहिला होता तरीही.

लहानपणी मला ट्रकच्या पुढच्या ड्रायव्हर च्या बाजूला बसून प्रवास करायची इच्छा होती.
नंतर एकदा तसा योग आला. मुलांची व्यायाम प्रात्यक्षिके होती त्यामुळे ती टीम मागच्या बाजूला बसलेली. मला नाइलाजाने पुढे बसायला लागले. पण त्यानंतर अर्धा तास प्रवास करताना तो ड्रायव्हर मधुनच जे कटाक्ष टाकून भयंकर गाणी म्हणत होता, त्या वेळी कशी बशी गप्प बसले व नॉर्मल वागण्याचा प्रयत्न केला पण नंतर कधी अशा हौशी नको रे बाबा

नाही च्रप्स.. मी नाही बसवले :त्यांची मल्ल खांब प्रात्यक्षिके चालत्या ट्रकमध्ये होती.. मला हौस बघण्याची म्हणून मी सुद्धा गेले होते.. पण नंतर आणखीन मुले येऊन संख्या वाढली नि मला नाईलाजाने (रात्री उशीर झालेला त्यामुळे रिक्षा शोधत बसण्यापेक्षा) पुढे बसायला लागले

मेझा 9 ला मी आणि मैत्रीण 'सॅलड खाऊ' तापात पालक पापडी चाट नावाची डिश घेतली.यात चार पालक पानांची तळलेली भजी, भरपूर खारे दाणे,10 ग्रॅम उकडलेले बटाटे आणि कांदे होते.आमच्या दोघींच्या दाताची कामं नुकतीच झाल्याने पुढचा अर्धा तास 'सिझलर घ्यायला हवं होतं' या हळहळीत 40 रु चे खारे दाणे 200 रु ला मूठभर खाऊन बाकी डिश टाकून देऊन काढली.तात्पर्य: ऑर्डर देताना मनात काही गृहीत न ठेवता घटक विचारणे.

एका अपरिचित व भिन्नलिंगी व्यक्तीशी संवाद साधायचा प्रयत्न केला होता. जाणीवपूर्वक केला होता. आयुष्यात एकदा हे पण करून पहायचं होतं म्हणून केला. एका बार मध्ये ह्या म्याडम भेटल्या होत्या. आपल्या मैत्रिणीसहित आल्या होत्या. ड्रिंक घेताना आमची नजरानजर होत होती. इकडून इंटरेस्ट होता तिकडून पण दिसत होता. दोन पेग झाल्यावर मैत्रीण शोर्ट ब्रेकसाठी गेली तेंव्हा मी धाडस केले आणि उठून जवळ गेलो आणि अदबीने म्हटले "आपल्याला पूर्वी कुठेतरी पाहिल्यासारखे वाटते". ती पट्कन म्हणाली "सॉरी नॉट इंटरेस्टेड". मी म्हणालो "इट्स ओके. चिअर्स". झाले इतकेच. पुन्हा येऊन जाग्यावर बसलो. पुन्हा बघितले सुद्धा नाही.

Pages