अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा ट्राय केली पण परत कधीच नाही करणार?

Submitted by कटप्पा on 7 July, 2018 - 00:24

Long वीकएंड साठी फ्लोरिडा आलो आहे. मी 2 अशा गोष्टी ट्राय केल्या ज्या परत कधीच नाही करणार.

१. ऑक्टोपस - हो मी ऑक्टोपस खाल्ला. मजेत खाल्ला आणि खाऊन १ तासात उलटी केली. सगळी रात्र पोट दुखत होते.

२. सिगारेट -पहिल्यांदा सुट्टा ओढला- 4 तास गुंगीत होतो. कानावर खडा आता. नेव्हर अगेन !!!

तुमच्या पण असे अनुभव असतील जे एकदा ट्राय केले पण परत कधीच नाही करणार?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तसेच केळ्यांची गोडसर भजी देखील <<< फ्राईड बनाना विथ आईस क्रिम अशी थाई स्विट डिश मस्त लागते.
पुढच्या वेळी आईस क्रिम बरोबर स्विट डिश म्हणुन खाउन बघा...

मला चहा आणि (फक्त ब्रिटानियाचेच) मारी खूप आवडते.
लोक मारी म्हणून पार्ले मारी किंवा सनफिस्ट मारी देतात ती क्रूर थट्टा वाटते.मारीला इतर गोड बिस्किटाबरोबर एका डब्यात ठेवून मारीचा न्यूट्रल वास बिघडलेलाही चालत नाही.
,मारी सारखे बिस्कीट नाही.बाकी सगळे बोअर.

अमितव Proud

आता मी गाडी रुळावर आणते.

मित्रमंडळींच्या प्रेमळ आणि खूपखूप आग्रहाखातर एकदा रेड वाईन जराशी चाखून पाहिली होती. अजिबातच आवडली नाही ती चव... आत्ताही लिहिताना माझं तोंड वेडंवाकडं झालंय Lol

मित्रमंडळींच्या असल्या आग्रहाला परत कधीच बळी पडणार नाही Proud

@योकु,

वैशाली = उत्तमात उत्तम लोकेशन + नरकीय भंगार चव

ह्यात अर्ध्याहून जास्त धंदा लोकेशन फॅक्टरमुळेच आहे बाकी कवडीची चव नाही. त्यापेक्षा उत्तम साऊथ इंडियन कोथरुडात आयडियल कॉलनी जवळ, गीताई मॉल समोर असलेल्या अण्णांच्या कळकट हॉटेलमध्ये (बंगाली रोलवाल्याच्या शेजारी, दुर्गाच्या लायनीत) मिळून जाईल, पण अण्णा लोकेशन अन प्रेझेंटेशन मध्ये डब्बा गोल आहे!.

प्रभा विश्रांती गृहाचा साबुदाणा वडा अशीच तारीफ ऐकून एकदा खाल्ला. काहीतरीच होता.
पुण्यात मला वाटतं स्थानमहात्म्य या एका फॅक्टरवर अनेक गोष्टी खपून जातात.
वैशालीचा डोसा मी आता अजिबात खाणार नाही. आधी बर्याच वेळा खाल्लाय, पण आता नाही आवडत.
वर बेडेकर मिसळीचं वर्णन ( गोडमिट्ट) वाचून आता तीही ट्राय करणार नाही.

औंध शिवसागर (लोकप्रिय) मध्ये स्वीट कॉर्न सूप खाल्ले.त्यात पिठाच्या गुठळ्या होत्या आणि भरपूर (खरी, कृत्रिम) साखर होती.भरपूर म्हणजे खीर या लेव्हलची.त्यांनी 'स्वीट' कॉर्न सूप असा अर्थ घेऊन बनवले असावे. तिथे परत कधी गेलो नाही.
तिथून तडक उठलो आणि फाउंटन इन मध्ये गेलो.आत भटार्खान्यात काय चालत असेल ते असूदे, हे आमचे आतापर्यंत अतिप्रिय हॉटेल होते.आता एक वर्षापूर्वी रस्ता रुंदीकरण्/मेट्रो यापैकी कश्यासाठी तरी तोडून टाकले आहे.

मारी बिस्कीट खाताना पुठ्ठा चहात बुडवून खाल्ल्यासारखा लागतो,  >>> पुठ्ठा Rofl ह्या दृष्टीने कधी पाहिलंच नाही. आता पुढच्यावेळी मारी बिस्कीट खाताना नेमकं हेच मनात येईल. पण मला तर मारी बिस्कीट आवडते.

पुरेपुर कोल्हापुरी मधलं जेवण कोल्हापुरी नाही. आणखी एक म्हणजे कोल्हापुरी जेवण म्हणजे तिखटजाळ, मटण थाळी एवढच नाही.
कोल्हापुरात भाज्या मुबलक आणि उत्तम मिळतात. खव्याच्या पोळ्या , शेंगदाण्याच्या पोळ्या, उत्तम बासुंदी, खोबर्‍याची चटणी, शेंगदाण्याची भरपुर तेल सुटलेली चटणी, झुणक्याच्या वड्या, अंबांडीची भाजी, कोरडं पीठल, वाघरा ,वांग्याची भाजी(काटेरी हिरव्या वांग्याची), हळद घातलेली साबुदाण्याची खिचडी (पांढरी पण असते), कडीपत्त्याची चटणी, पळणीट, तुरीची आमटी, तुरीची उसळ , पोकळ्याची भाजी, श्रावणातल्या सोमवारी पांढर्‍या मुळाच्या कोशिंबीरी ने सजलेल केळीच हिरव्या पानाच ताट, मोठ्या चपात्या, भरपुर दुध घातलेल्या दशम्या हे काही अस्स्ल शाकाहारी कोल्हापुरी पदार्थ . Happy कुणाच्यातरी शक्य असेल तर मराठा, जैन घरचे खावून बघा. बाकीच्या घरी पण बनत असतील. मैत्रिणी, स्वतःच्या घरी यांच्यामध्ये हे कंसिस्टटली दिसलं म्हणून लिहिल. ब्राम्हण मैत्रिणींकडे थोड पुणेरी स्टाईल जास्त वाटल कोल्हापुरपेक्षा. (सरसकट विधान नव्हे तर पर्सनल अनुभव )

प्रेझेंटेशन वरून आठवले. फ्रांस मध्ये एका हॉटेलमध्ये दिसायला अतिशय आकर्षक (खायची इच्छा होईलच असे प्रेझेंटेशन) पाहून एक फ्रेंच पदार्थ मागवला होता. पहिला तुकडा तोंडात टाकताच हॉरिबल चव लागली Lol

आता परत मुळ विषयावर.
मुंबईला एकदा लोकलने प्रवास करायचा प्रयत्न केला. धसका घेतलाय मी. Sad
भारतात गेल्यावर टेलरने दिलेल्या तारखेवर विश्वास ठेवून काहीतरी प्लॅन करणं. प्रत्येकवेळी हे टेलर लोक काहीतरी घोळ घालतात. कधी म्हणुन त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. Sad

@सीमा: वाह! एक नंबर लिस्ट. यात अजून: माईनमुळ्याचे लोणचे (हे मी कोल्हापुरातच खाल्लेय), पोकळ्याची भाजी (पुण्यात लाल माठ मिळतो तो नव्हे), कोल्हापुरी काकडी (तिकडे वाळूक म्हणतात. ते पुण्यात मिळत नाही). कोल्हापूरला पुन्हा जायची इच्छा झाली Happy (धाग्याच्या विषयाच्या विरुद्ध प्रतिक्रिया Proud )

भारतात रेल्वेने फारसा प्रवास केला नाही. एकदाच पुण्याहून गोव्याला गेलो होतो (गोवा एक्स्प्रेस?). चूक झाली. रेल्वेत मिळणारे जेवण आणि एकंदरच त्या सगळ्या प्रवासाने शिसारी आली. चार दिवस आजारी पडलो. पुन्हा कधीही असा प्रवास रेल्वेने नाही.

हो अतुल ते लिहायलाच हवं.
माईनमुळ्याच लोणच, मॅकिनकाई म्हणुन बेळगाव साईडला एक फळ मिळत त्याच लोणच, कोरट्याच पळु, बुंदीचे लाडु,शेंगुळ्याचे लाडु, मक्याच्या दाण्याचा चिवडा, धपाटी,फुग्याच थालीपीठ, वांग्याच/ हिरव्या सोलाण्याच थालीपीठ ,कोहळ्याचे सांडगे , वाळविलेल्या मुळ्याचा शेंगा हे अजुन काही पदार्थ, आता बास करते. नाहीतर कटप्पा नविन बाफ काढणार नाहीत. बाकी त्यांच्यामुळ मजा येती आहे लिहायला. सतत तेच वाचायचा कंटाळा आलेला.

< नाहीतर कटप्पा नविन बाफ काढणार नाहीत. बाकी त्यांच्यामुळ मजा येती आहे लिहायला. सतत तेच वाचायचा कंटाळा आलेला. >>>
हा हा हे बाकी खरं आहे +१ Lol

मारी हे बिस्कीट आजारी माणसांचे असते, जसे दालखिचडी आजारातच बरी वाटते तशी..

सीमा, मस्तच एकदम

कोल्हापुरी जेवण, मग ते शाकाहारी असो वा मांसाहारी , दोन्ही खुप चविष्ट असते, अन म्हणुनच कोल्हापुरी लोक अगदी गर्वाने वर्णन करतात त्याचे.

माईनमुळ्याचे लोणचे >>>> मला खुप आवडते, पण कोवळ्या मुळांचे पाहीजे, जुनं असेल तर दाताखाली कचकच लागते. पण हे लोणचे कोल्हापुरी नसुन कर्नाटकी असावे, कारण बेळगावात जास्त पिकले अन विकले जाते

मारी हे बिस्कीट आजारी माणसांचे असते, जसे दालखिचडी आजारातच बरी वाटते तशी.. >>>> नाही हा, हे दोन्ही पदार्थ, असेही छान लागतात, नेहमी गोडमिट्ट बिस्कीट अन मसालेदार खाण्यापेक्षा, हे कधी कधी छान लागते

एका खाजगी ट्रॅव्हलच्या "स्लीपिंग कोच" बसने हैद्राबादहून पुण्याला येत होतो. ती पहिलीच वेळ. त्या आधी सेमिस्लीपरनेच जाणेयेणे होते. या "स्लीपिंग कोच" मध्ये उशी मागच्या दिशेला आणि पाय ड्रायवरच्या दिशेला अशी रचना होती. त्यामुळे पायाच्या दिशेने उलटे ओढत नेल्यासारखे विचित्र फिलिंग रात्रभर येत होते. यामुळे तास दोन तासातच पोटात ढवळायला सुरवात झाली. अतिशय त्रासदायक प्रवास. पुन्हा तसे कधीच गेलो नाही.

अवांतराचा रोष पत्करुनः
गोड असलेल्या चहाला संतुलित करायला मारी सारखं अगोड बिस्किटच छान.शिवाय मारी ची न विरघण्याची प्रॉपर्टी गप्पा मारताना खूप उपयोगी पडते.
इतके बोलून मी माझे अवांतर पूर्ण करते.जयहिंद जय महाराष्ट्र Happy

अवांतराचा रोष पत्करुनः
मारी आवडते मलासुद्धा. योगायोगाने हेच बिस्कीट खात प्रतिक्रिया लिहित आहे.

भारतात रेल्वेने फारसा प्रवास केला नाही. एकदाच पुण्याहून गोव्याला गेलो होतो (गोवा एक्स्प्रेस?). चूक झाली. रेल्वेत मिळणारे जेवण आणि एकंदरच त्या सगळ्या प्रवासाने शिसारी आली. चार दिवस आजारी पडलो. पुन्हा कधीही असा प्रवास रेल्वेने नाही.

तुम्ही फारच जास्त हायजीन कॉन्शयस वगैरे आहात काय सर? असलात तर सावरा अजूनही, इतकं नाजूक राहून जगात कसं चालेल, आज रोजी दीड महिन्याची झालेली माझी छोकरी उण्यापुऱ्या नऊ दिवसांची असताना रेल्वेतून १८०० किलोमीटर प्रवास केला हल्लीच, छोकरी-छोकरीची आय- छोकरीचे आज्जी आजोबा सगळे ठणठणीत राहिले. Lol Lol Lol

सलीपर कोच मध्ये जास्तीत जास्त बारा तासाचा प्रवास करावा त्यावर करत जाता होत काही नाही फक्त उष्णता वाढते थोडी अंगातली.

Atul you are right about Indian Railway. It's quality is going down day by day. Last month I travelled from Pathankot to Delhi by 2nd AC. Horrible experience dirty toilets, bad food. A big no no to travel by train in India especially long journey. Flights are cheap now a daya especially on Delhi Mumbai or Pune route.

>> तुम्ही फारच जास्त हायजीन कॉन्शयस वगैरे आहात काय

माहित नाही. पण हे खरे कि एकेकाळी अजिबात नव्हतो. शेवटी, माणूस सवयीचा गुलाम Happy

अतुल सर, प्रांजळपणासाठी तुमचं कौतुक करावे तितके कमीच. मुद्दा काय आपल्याच भल्यासाठी अतिरेक टाळणे इष्ट. बाकी काय चालूच राहते दुनियादारी

atuldpatil, तुम्ही एकदा कर्नाटक स्टेट ट्रान्सपोर्टच्या स्लीपर बसने ( अंबारी) प्रवास करून पहा. स्लीपर बसबद्दल तुमचं मत बदलेल Happy बंगळूर ते पुणे ( अनेक वेळा) आणि बंगळूर ते हैदराबाद ( एकदा) असे दोन्ही अनुभव उत्तम आहेत आमचे.
भारतीय रेल्वेबाबतही काही हॉरिबल म्हणण्याइतका अनुभव कधीच आला नाही. अर्थात प्रत्येकाचे मत वेगळे.

फ्लाईट रिशेड्युलिंगमधे २ वेळा भयानक पैसे वाया गेलेत. यापुढे कधीही त्या भानगडीत पडणार नाही.

चुकून आदल्या दिवशीचं विमान तिकिट काढून एकदा १२-१५ हजाराचा सणसणीत फटका बसला आहे. तेव्हापासून तिकीट काढताना तारीख प्रत्येकी ४-४ वेळा दोघेही तपासतो Happy

>> स्लीपर बसबद्दल तुमचं मत बदलेल

त्या स्पेसिफिक स्लीपर कोच चा त्रास झाला (एके काळी खाजगी बसेस मध्ये यांचे नाव खूपच प्रसिद्ध होते). त्यामुळे त्यातून पुन्हा नाही गेलो. अशी उलटी झोपायची अरेंजमेंट असेल तर तो त्रास होणारच असे माझे मत आहे. शिवाय हायजीन हा भाग आहेच. पुणे हैद्राबाद खाजगीसुद्धा काही अतिशय चांगल्या बसेस आहेत (नाव सांगायला हरकत नाही: ऑरेंज, एनटीआर). हायजीन वगैरे खूपच उत्तम मेंटेन करतात.

चितळेंच्या चकल्या आणि पोह्यांचा चिवडा. किंमतही अव्वाच्या सव्वा होती. एनाराय स्पेशल असणार Wink

चितळेंच्या चकल्या आणि पोह्याचा चिवडा (पिवळा, आपण घरी करतो तसा) अमेरिकेत नाही पोचला अजुन. Wink
उपवासाचा बटाट्याचा, तळलेला पोह्यांचा, मक्याचाच मिळतो अजुन. बाकरवड्या मात्र 365 X 24 X 7 मुबलक मिळतात.

Pages