अफवेचे बळी

Submitted by हेला on 3 July, 2018 - 14:28

देशभरात मागच्या महिन्यात अफवेचे २५-२६ बळी गेलेत. कारण काय? तर मुलं पळवणारे संशयित म्हणून मारहाण झाली. कहर म्हणजे या मेलेल्यांपैकी एकही मुलं पळवणारा नव्हता. आसाम कि अरुणाचल मध्ये तर या अफवेबद्दल लोकांमध्ये जनजागृती कारण एक सरकारी अधिकारीच लोकांच्या मूर्खपणाला बळी पडला. परवा एकाला मारहाण करून पोलीस स्टेशन ला नेमल्यावर लक्षात आलं कि तो मुलगा त्याचाच होता. काल मालेगाव मध्ये अशीच दंगल झाली. पण या सगळ्या घटनेवर कळस केलाय परवाच्या धुळ्यातील घटनेने. अगदी मृतदेहांवरही लोक वर करत होते. रक्ताचा मांसाचा खच पडलेला होता. आणि यात त्यांना समाधान वाटत होत? कसलं होत हे समाधान ? कुणाला तरी मारल्याचं? कुणावरचा तरी राग बाहेर काढल्याचं? आपल्या मनातला न्यूनगंड मारल्याचं? कि उगाच टाईमपास करायचा म्हणून पाच मुडदे पडले याचं ?

लोक किती विकृत झालेत आणि किती बिनडोक आहेत याच या सध्या घडणाऱ्या घटना ज्वलंत उदाहरण आहेत. किमान सारासार विचार करण्याची मानसिकता सुद्धा आपण सोडून दिलेली आहे. झुंडशाही हि अजगरासारखी असते हे कधी कळणार आपल्याला काय माहित. आज ते आहेत उद्या आपण असू एवढं सुद्धा कुणाच्या लक्षात येत नाहीये.

काय आहे अफवा ? ग्रामीण भागात लहान मुलं पळवणारी टोळ्या आल्यात म्हणून... याला पुष्टी देण्यासाठी काही महाभाग कुठले तरी व्हिडीओ सुद्धा प्रसारित करत आहेत. सध्या कोणत्याही गावात गेलं तरी याच अफवेची चर्चा. कुणी म्हणतंय अमक्या गावात मागच्या आठवड्यात चार जण पकडले, त्या गावात कॉल केल्यावर तर ते म्हणतात आम्हाला तुमच्या गावात लोक पकडल्याचे कळालंय... किती हा बावळटपणा? गावातले विचारवंत जेष्ठ म्हणावेत असेही या अफवेला बळी पडलेत. कुणीतरी थोडा विचार तर करावा ?

लहान मुलांच्या अपहरणाचा मुद्दा देशात गंभीर आहे.. सोबतच तरुण मुली पळवण्याचे प्रकारही खूप वाढत आहेत.हि लहान मुले या तरुण मुलींचा थांगपत्ताही लागत नाहीये. यांची तस्करी होते हेही सर्वश्रुत आहे, पण हि एक मोठी इंडस्ट्री असल्यामुळे सगळे गप्प आहेत.
पण हे मुलं पळवणारे असे गावागावात फिरत नाहीत. गावात तर शक्यतो हे लोक जातच नाहीत. कारण ग्रामीण भागात आपला परका लगेच ध्यानात येतो. हे लोक शहरी भागातच गुन्हे करतात. सोबत अशा टोळ्यात न फिरता पूर्ण प्लॅन करून अपहरण करतात. पण आता तेही पहिल्यासारखे सोपे राहिले नाही. एका टोकाची बातमी दुसऱ्या टोकापर्यंत सेकंदात पोहचू शकते, यामुळे अशी अपहरणे आता कमी होत आहेत.

यापेक्षाही पोट धरून हसावे अशी एक अफवा. म्हणे या टोळ्या किडनी हृदय सुद्धा पळवतात. अक्कल गहाण टाकल्याचा इतका मोठा पुरावा कुठला असू शकतो? किडनी हृदय हे या खेळण्याच्या वस्तू आहेत का? खिशात हात टाकून चोरल्या... शरीराचे असे भाग हे फक्त हॉस्पिटल मधेच काढले जाऊ शकतात. हृदय तर जास्तीत जास्त ६ तास जिवंत राहू शकते. असले अवयव चोरून नेण्यासाठी मोठमोठ्या लॅब सोबत घेऊन फिरावे लगेल. असे पायी चालणारे वा कार ने फिरणारे असले काम करूच शकत नाहीत. इतके साधे लॉजिक... पण आपल्याकडे लॉजिक चालत नाही, झुंडशाही चालते. मेंढरासारखे चालायचे हे आपल्या DNA मधेच आहे.

हे अफवांचे पीक हळूहळू शमेलही पण तोपर्यंत किती बळी घेईल माहित नाही. यामुळे आता एक वेगळीच समस्या समोर येणार आहे. आपल्या लहान मुलांना कुठे घेऊन जाणेही लोकांना अशक्य होणार आहे. कुठे मुलगा रडायला लागला तरी लोक मारायला सुरुवात करतील. याहीपुढे जाऊन काही शक्यता पाहुयात. तुम्ही प्रवासात एखाद्या गावात गेलात. तिथल्या स्थानिकांशी काही कारणाने वाद झाला... त्यांनी फक्त मुले चोरणारी टोळी म्हणू बोंब मारावी, लोक शेकड्याने येऊन तुम्हाला मारायला सुरुवात करतील. आणि तुमचा जीव घेऊनच थांबतील. या निमित्ताने आपले एखादे जुने वैर पूर्ण करण्याचा सुद्धा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखाद्याला लुटण्यासाठी अशीच आरोळी ठोकायची. चार पाच जणांनी मारायला सुरवात करायची सगळं काही चोरायचं, आणि मग मुलं चोर म्हणून ओरडायचं, लोक येऊन मारायला लागतील, चोर राहिले बाजूलाच. एखादा अनोळखी अशाच प्रकारे रस्त्यात अडवून त्याच्याकडून खंडणी मागितली जाऊ शकते, नाही दिली तर आरडाओरडा करील अशी धमकी दिली कि तो जवळच सगळं काही काढून देईल. कितीतरी भयंकर शक्यता या प्रकारांमुळे समोर येत आहेत. आत्तापर्यंत घडलेल्या सगळ्या घटना सुद्धा फक्त अफवेचेच बळी असतील अशी शक्यता सुद्धा आपण गृहीत धरू शकत नाही. अफवेच्या असून कुणीतरी आपले इप्सितही साध्य केले असेल... या घटना अशाच याचा पर्यटनावर सुद्धा गंभीर परिणाम होऊ शकतो.

प्रत्येक अनोळखी नवखा चोर आहे असेच समजून मारहाण केली जात आहे. या बिनडोक लोकांच्या च्या हेही लक्षात येत नाहीये कि आपलं गाव सोडलं तर आपणही बाहेर गावासाठी अनोळखी असतो. शहरात तर कुणीच कुणाला ओळखत नाही. हि परिस्थिती आपल्यावरही येऊ शकते. पोलीस म्हणतात संशयितांना पकडून आमच्या ताब्यात द्या. प्रत्येक अनोळखी संशयित म्हटला तर लोकांचं फिरणं अवघड होऊन जाईल. दिसला कि पकड आणि दे पोलिसात, पोलिसांनी त्याची चौकशी करून एक दोन दिवस डांबून मग सोडावे. सगळी अनागोंदी माजणार नाही का असल्या प्रकारामुळे ?

यापेक्षा पोलिसांनी सरळ सरळ प्रत्येक गावातील सरपंचांना, ग्रामसेवकांना गावकऱ्यांचे शंका निरसन करण्यासंबंधी निर्देश द्यायला हवे. लोकांना कायदा हातात घेऊ नये अशी सक्त ताकीद द्यावी. गावातील प्रतिष्ठित लोकांनी आपल्या गावकऱ्यांच्या डोक्यात वाळवळणारा हा अफवेचा किडा बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेत. ठरवलं तर आठ दिवसात हे प्रकार बंद होऊ शकतील. गावागावात स्थानिकांना निर्देश देणे अवघड नाही. सरकारकडून तरी अजून ठोस अशी काही भूमिका दिसत नाहीये. आणि सरकार यावर ठोस कारवाई करत नसेल तर या प्रकरणामागे आणखी काही वेगळे प्लॅन आहेत का अशी शंका घ्यायला निश्चित जागा राहील.
_

श्रीकांत आव्हाड

https://www.facebook.com/shrikant.avhad/posts/2073791532687517

Group content visibility: 
Use group defaults

फक्त चॉकलेट घटनेबद्दल, घटना वर लिहिली आहे तशीच झाली असेल तर कोण अनोळखी मुलांना चॉकलेट देईल?(मी बातमी वाचलेली अथवा ऐकलेली नाही, सकाळी काहीतरी टीव्हीवर न्यूज म्हणून डिबेट/बघे आलं होतं,मी टीव्ही बंद केला) आपल्या लहानपणापासून आपण काय ऐकत लहानाचे मोठे झालोय की अनोळखी व्यक्तीने दिलेले काहीही especially चॉकलेट/प्रसाद खाऊ नये. मी तर ओळखीच्या लोकांची पण पुरेशी ओळख झाल्याशिवाय त्यांच्याकडे खाऊ, पिऊ नये मताची आहे, लहान-मोठे कोणीही!
सध्या सगळीकडे moving population इतकं झालंय की कोणाचा कोणाला थांग पत्ता नसतो. शेजारच्या वर विश्वास टाकावा अशी परिस्थिती राहिलेली नाही. शेजारी हे फक्त 11महिन्यांचे असतात.
सहसा कोणतीही वाईट घटना लोकांसमोर झाली की आधी काय बातमी व्हायची इतके लोकं होते आणि कोणीही पुढे आलं नाही. सध्या काय होतंय की दोन जण पुढे आले की दोनशे होतात. कशाचं हसावं का रडावं तेच कळत नाही. इंटरनेट पब्लिक पण जे झालं त्याचा अगदी विरुद्ध टोकाचे धागे काढते. कोणी नीट माहिती देत नाही. एकतर ही बाजु नाहीतर ती बाजू.
निर्भया प्रकरणात जमावाने लक्ष घातले असते तर चालले असते का?नवरा दारू पिऊन किंवा हुंडा किंवा कोणत्याही कारणामुळे बायकोला मारहाण करतो तेव्हा जमावाने लक्ष घातले तर चालेल का? मुलींना / बायकांना गर्दीच्या वेळी किळसवाण्या स्पर्शना आणि धक्क्यांना सहन करावे लागते तेव्हा कोणी बघितलं आणि बघून घेतलं तर चालेल का? मुलीला होणारी कोणती मारहाण तिची निर्भया करणार नाही ह्याची काही समीकरणे असतील तर वाचायला आवडेल. मुलींना इतकं मारलं तरी कोणी लक्ष घालू नये, अमुक लेव्हल च्या पुढे मुलीला मारहाण व्हायला लागली तर लक्ष आजूबाजूच्या लोकांनी फक्त ह्याच लेव्हल पर्यत लक्ष घालावे.
तारतम्य हवं हे बरोबर. आता ह्या तारतम्याचे मूल्यशिक्षण समाजाला कोणी आणि कसे द्यायचे हे बघण्याइतकी माझी तरी पात्रता नाही.

तुमच्या गाडीत नेहमी बिस्किटांचे पुडे ठेवा आणि रस्त्यावरच्या मुलांना वाटा, असे फंडेसुद्धा फेसबुकवरून पसरवले जातात.
मायबोलीवरही आहे बहुतेक .
उन्हाळ्यात गार पाण्याच्या बाटल्या गाडीत ठेवा..लोकांना द्या , हेही.

पण हे असे मुलं पळवणाऱ्यांबद्दलचे संदेश आताच का येऊ लागलेत?

राजसी,
>>>>>>>>
निर्भया प्रकरणात जमावाने लक्ष घातले असते तर चालले असते का?नवरा दारू पिऊन किंवा हुंडा किंवा कोणत्याही कारणामुळे बायकोला मारहाण करतो तेव्हा जमावाने लक्ष घातले तर चालेल का? मुलींना / बायकांना गर्दीच्या वेळी किळसवाण्या स्पर्शना आणि धक्क्यांना सहन करावे लागते तेव्हा कोणी बघितलं आणि बघून घेतलं तर चालेल का? मुलीला होणारी कोणती मारहाण तिची निर्भया करणार नाही ह्याची काही समीकरणे असतील तर वाचायला आवडेल. मुलींना इतकं मारलं तरी कोणी लक्ष घालू नये, अमुक लेव्हल च्या पुढे मुलीला मारहाण व्हायला लागली तर लक्ष आजूबाजूच्या लोकांनी फक्त ह्याच लेव्हल पर्यत लक्ष घालावे.>>>>>>>

परत एकदा, 2 पूर्ण वेगळ्या गोष्टींची तुलना करून
निर्भया, बायकोला मारहाण या सगळ्या प्रकारात एका व्यक्तीला फिसिकल इजा होत असते, अशा प्रसंगी इजा करणाऱ्या लोकांना थांबवबे महत्वाचे असते
(बलात्काराच्या बाबतीत थांबवण्याचा प्रयत्न करताना आरोपीचा मृत्यू झाल्यास ज्याच्या हातून खून झालाय त्याला शिक्षा होत नाही मला वाटते कलम 99 आणि 100)
तेव्हा, त्यावेळी हा हस्तकक्षेप जरूर व्हावा, जमावाचा नाही झाला तरी एकट्या दुकाट्या माणसाचा जरूर व्हावा, NGO, सरकार ऱ्याला उत्तेजनच देत आहे, (आठवा रिंग द बेल च्या जाहिराती), दुर्दैवाने तेव्हा माणसे शेपूट घालून गप्प राहतात (आठवा ट्रेन मध्ये इतर प्रवाश्यांसमोर समोर झालेला बलात्कार)

Back to mob lynching , या केस मध्ये कोणाला फिसिकल दुखापत होत होती? केवळ मुलाच्या दिशेने हात करून काहीतरी बोलणे यात झालेल्या जमावाच्या हस्तक्षेपाची तुलना तुम्ही निर्भया बरोबर करत आहात?

>>>>>
तारतम्य हवं हे बरोबर. आता ह्या तारतम्याचे मूल्यशिक्षण समाजाला कोणी आणि कसे द्यायचे हे बघण्याइतकी माझी तरी पात्रता नाही.>>>>
त्याची पात्रता माझी नाही म्हणून जे चाललंय ते चालू दे असे म्हणायचे आहे का तुम्हाला?
कृपया आपले मत स्पष्ट मांडा, अर्धवट लिहिलेल्या गोष्टींमुळे गैरसमज होतात.

अनोळखी मुलांना चॉकलेटचा मुद्दा मॉब लिंचिंगच्या समर्थनार्थ आहे का?
बाकीच्या केसेसचं काय?
एका प्रकरणात अफवा पसरवू नका असं सांगायला नेमलेल्या माणसाचाच जमावाने बळी घेतला.

सिग्नलला भीक मागणाऱ्या लोकांची proper ecosystem आहे. काय सांगा सगळयांनी पाणी, बिस्कीट देऊन ; नक्की कोणाला पैसा मिळायचा बंद झाला म्हणून कोणाच्या पोटावर पाय आला म्हणून कोणीतरी चॉकलेट, बिस्कीट देणारे मुलं पळवतात त्यांना धडा शिकवा म्हणून हे भडकाऊ viral messaging केले नसेल. आपल्या म्हणण्यात तथ्य आहे. परत hard cash फुकट मिळायला लागली की कदाचित थांबेल.

मी माझ्या अल्पमतीनुसार,अनुभवानुसार विचार करणार आणि मुद्दे लिहिणार ना! यापेक्षा जास्त अजून काही लिहायला आणि विचार करायला मला तरी जमेल असं वाटतं नाही.

आपण अशी काही प्रबोधनात्मक सोप्या भाषेत मराठी, हिंदी इंग्लिश पोस्ट लिहून व्हायरल करू शकतो का? की अनोळखी जागी, अनोळखी संस्कृतीत काय काळजी घ्या, लगेच आयडी दाखवा, लगेच जवळच्या पोलीस स्टेशन ला जा आणि परिस्थिती सांगा वगैरे?
नियोजित घटना असतील तरी मारणार्या 10 दुष्ट हाताना उरलेले 90 अडाणी हात मिळायचे तरी थांबतील.

>>अश्या गुन्हेगारांना जागच्या जागेवर शासन करणे हेच योग्य आहे.
<<
कायदा व पोलिस यंत्रणा तुमच्यासारख्या लिंचिंगच्या समर्थकांना समजत नाही, कारण तुम्ही कधी स्वतःच्या माहितीतला कुणी खोट्या गुन्ह्यात अडकून्/किंवा मॉब जस्टिसचा व्हिक्टिम बनला नाहीत व बनणारच नाही अशी तुमची समजूत आहे.
एकदा कुणीतरी त्याची चव तुम्हाला चाखवल्याशिवाय तुम्हाला हे समजणार नाही, ती चव तुम्हाला लवकर चाखायला मिळो ही सदिच्छा.<<

समीर यांची पोस्ट स्फोटक, निषेधार्ह आहे हे मान्य. पण त्यावर पातळी सोडुन दिलेल्या आरारांच्या पोस्टवर कंपुकडुन काहिच थेट प्रतिक्रिया आली नाहि. त्या पोस्टला दिलेला तो कोल्ड शोल्डर आहे कि एक प्रकारची मूकसंमती? गंमतीचा भाग म्हणजे, साधना यांनी आरारांच्या या हिणकस वृत्तीवर आक्षेप घेतल्यावर लगोलग सिम्बा यांनी त्यांच्या स्टाइलमध्ये पांघरुण टाकायचा प्रयत्न केला आणि वर भरत यांनीहि त्याची रि ओढत 'खेद प्रकट केला गेला नाहि' हे हाय्लाइट केलं.

अरे, काय चाल्लय काय? लिंचिंग प्रकार निषेधार्ह आहेच पण त्याला समर्थन, आणि समर्थन देणार्‍यांचं हि लिंचिंग केलं जावं हि इच्छा बाळगणार्‍यांना एकाच पारड्यात का तोललं जाउ नये, या प्रश्नाचं उत्तर सिंबा/भरत (किंवा कंपुतले इतर ज्यांनी आपली पायधुळ या धाग्यावर झाडलेली आहे, आणि ज्यांची सद्सद्विवेक बुद्धी अजुनहि शाबुत आहे) देउ शकतील काय?.. Angry

अनु,
तुमची सूचना चांगली आहे, प्रयत्न करून पाहता येईल,
पण झालेल्या घटना इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत की मेसेज सगळ्या शक्यता कव्हर करेल की नाही याची शंका वाटते.

उदा, अहमदाबादेत झालेल्या केस मध्ये ती व्यक्ती ओरडून सांगत होती ही माझीच मुलगी आहे, माझा भाऊ जवळ राहतो त्याला विचारू शकता, पण लोकांनी त्यांचा सारासार विचार गमावला होता.

वैयक्तिक पातळीवर , असे फेक फॉरवर्ड आहे, कोणताही मेसेज खात्री केल्याशिवाय पुढे पाठवू नका आशा अर्थाचे मेसेज बनवून वेगवेगळ्या गृप मध्ये टाकले आहेत. (यच धाग्यावरचे प्रतिसाद एडिट करून) माझ्या माहितीतल्या अजून काही id नि हे केले आहे.
तुम्ही म्हणता तो प्रयत्न वर्थ ट्राइंग आहे,
कमीतकमी, हे आपल्यासोबत होणार नाही अश्या विश्वासाच्या कोषात असणारे लोक त्या प्रिकोशन वाचून तरी जागे होतील.

राज , आता तुम्ही 2 वेगवेगळे रिप्लाय एकत्र करून id बॅशिंग करण्याच्या प्रयत्नांवर पांघरून घालायला पायधूळ झाडलीत का?
Wink

आय्डी बॅशिंग? थेट आय्डीचं नांव घेउन लेजिट प्रश्न विचारला तर ते बॅशिंग? बरं. बाकि प्रश्न समजला असेल तर त्याचं उत्तर मिळेल का?

या मास लिंचिंगबद्दल तुम्ही-आम्ही खेद व्यक्त करुन काय घंटा फरक पडणार आहे.
<<
हो. जर तुमच्या कडून "घंटा फरक पडत नाही", तर पुरोगाम्यांनी काही बोललं नाही म्हणून वर का विव्हळत होता बरं आपण?

उगं शिव्या द्यायच्या म्हणून द्यायच्या. सामोपचाराचा, सामंजस्याचा आवाज दाबून टाकायचा. पुरोगाम्यांचा आवडता धर्म म्हणे Lol तुम्ही च ठरवणार कुणाला काय आवडतं ते.

Submitted by राज on 15 July, 2018 - 19:22
<<
फुटायचं बघा.
तुमच्या सारख्या राईटविंगर्सनी पातळी सोडायची, अन आम्ही जशास तसे उत्तर दिले तर तुम्ही आम्हाला मॅनर्स शिकवायचे? अरे हूऽट! लै झाली सभ्यता.
There comes a time when it is alright to hit a nazi.

मी माझ्या अल्पमतीनुसार,अनुभवानुसार विचार करणार आणि मुद्दे लिहिणार ना!
<<
अल्पमतीनुसार हे बरोबर आहे.
सहमत.
+१

"गोडश्यांची अवलाद" अशीच ठेचली पाहिजे म्हणणार्‍यांबद्दल आपले काय मत आहे?
<<
तुमच्याशी सहमत आहे. अशीच ठेचली पाहिजे. Lol

रच्याकने, गोडश्याची अवलाद म्हणजे नक्की कोण हो?

>>नवीन Submitted by आ.रा.रा. on 15 July, 2018 - 10:14<<

हे घ्या, आले परत त्यांच्या ओरिजिनल पातळीवर. आपलं ठरलंय ना? सायलंस... Lol

अजुनहि माझा तो प्रश्न मूळात सदसद्विवेक बुद्धी बाळगणार्‍यांकरता आहे. माझी निराशा होणार नाहि याची खात्री आहे...

गुन्हेगाराला पोलींसांच्या हातात देऊन काय फायदा ? उलट पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत ते गुन्हेगारच एक-दोन जणांना खलास करतील. अश्या गुन्हेगारांना जागच्या जागेवर शासन करणे हेच योग्य आहे.>>>>>
हा मूळ प्रतिसाद , जो आता बोंबाबोंब झाल्यावर तुम्ही स्फोटक वगैरे आहे हे सांगितलेत, गेल्या 2 दिवसात साधना वगैरे याबाबत एक शब्द बोलायचे कष्ट घेतले नव्ह्तेत,
म्हणजे त्यांची मूक संमती आहे असा अर्थ काढावा का?

दुसरी गोष्ट,
प्रतिसाद ला उत्तर केवळ इकडे लिहिलेल्या 4 ओळींवरून नसते, त्या id च्या बाकी वावरावरून दिली जातात,या id मागची माणसे कोण आहेत हे तुम्हाला माहीत नसेल तरी बाकी लोकांना अंदाज असतो. तेव्हा नाही त्या ठिकाणी टची फिली होऊ नका,

त्यामुळे "अमुक एक व्यक्तीला ठेचून मारणे योग्य " असे मत व्यक्त करणाऱ्या id स असाच अनुभव तुम्हाला येवो असा साडेतिड रिप्लाय देणे चुकीचे आहे असे मला वाटत नाही.

2 दिवस मौन बाळगून दुसऱ्याचा रिप्लाय तिसर्याला चिकटवणार्या आणि तुम्ही lynching कराल असा आरोप करणाऱ्या id च्या विवेकबुद्धीचा निषेध अजून तुम्ही केला नाही आहात.

《《या मास लिंचिंगबद्दल तुम्ही-आम्ही खेद व्यक्त करुन काय घंटा फरक पडणार आहे》》
-------- मन की बात मधे यावर चर्चा झाली आहे का ?

>>गेल्या 2 दिवसात साधना वगैरे याबाबत एक शब्द बोलायचे कष्ट घेतले नव्ह्तेत,<<
माबोवर अजुन अलर्ट यायची सोय नाहि, आणि मी सगळे धागे वाचत नाहि; म्हणुन हा मुद्दा बाद. मागे हि तुम्ही हाच मुद्दा लावुन धरला होता, आणि तेंव्हाहि माझं तेच उत्तर होतं; आठवत असेल तर...

>>त्यामुळे "अमुक एक व्यक्तीला ठेचून मारणे योग्य " असे मत व्यक्त करणाऱ्या id स असाच अनुभव तुम्हाला येवो असा साडेतिड रिप्लाय देणे चुकीचे आहे असे मला वाटत नाही.<<
धन्यवाद. हे उत्तर अपेक्षित नव्हतं, पण ठीक आहे. दिशा कळली.

तुम्ही सगळे धागे वाचत नाहीत,
सबब, स्फोटक विधाने करणाऱ्या id ची इतर धाग्यांवरची मते तुम्हाला माहीत नाहीत, त्यांची तिकडची भाषा तुम्हाला माहीत नाही, तेव्हा त्यांना काय उत्तरे द्यायची यावर मत प्रदर्शने करू नका , कृपया

जो धागा वाचला आहात, आणि जिकडे प्रतिसादाची सरमिसळ करून "तुम्ही लिंचिंग कराल" असा आरोप केला आहे त्याबद्दल सुद्धा तुम्ही काही बोलला नाही आहात,
तेव्हा तुमच्या विचारांची दिशा सुद्धा कळली,
तेव्हा धन्यवाद,

"गोडश्यांची अवलाद" अशीच ठेचली पाहिजे म्हणणार्‍यांबद्दल आपले काय मत आहे?
<<
तुमच्याशी सहमत आहे. अशीच ठेचली पाहिजे. Lol

रच्याकने, गोडश्याची अवलाद म्हणजे नक्की कोण हो?
Submitted by आ.रा.रा. on 15 July, 2018 - 19:46
__________________________________________________________________________________________

त्यामुळे "अमुक एक व्यक्तीला ठेचून मारणे योग्य " असे मत व्यक्त करणाऱ्या id स असाच अनुभव तुम्हाला येवो असा साडेतिड रिप्लाय देणे चुकीचे आहे असे मला वाटत नाही.
Submitted by सिम्बा on 15 July, 2018 - 20:09

तेच म्हणतोय बिपिनचन्द्र,
ते तुमचे वाक्य आहे, माझे नव्हे.
मी फक्त तुमच्याशी सहमती व्यक्त केली आहे. त्यापुढे एक हसरी स्मायली आहे, ती तुम्ही तुमचे पूजनीय व्यक्तिमत्व गोडसे इथे आणल्याबद्दल आहे.

गांधीजींनी दुसरा गाल पुढे करा असे कधीच सांगितले नाही. साप मारायच्या ऐवजी त्याचे लाड करा असेही म्हटलेले नाही.

"गोडसेची अवलाद" हे देखिल तुमचे शब्द आहेत. ते डिफाईन करा, मग त्यापुढे तुमच्याशी सहमती ठेवायची की काढून घ्यायची, हे ठरवता येईल.

आ.रा.रा.

{{{ १९४८ च्या मास लिंचिंगबद्दल खेद व्यक्त न करता उलट "गोडश्यांची अवलाद" अशीच ठेचली पाहिजे म्हणणार्‍यांबद्दल आपले काय मत आहे? }}}

असे लिहिले म्हणजे ते माझे शब्द ठरत नाहीत. असा शब्द ब्राह्मणांविषयी वापरणारे आणि त्यांच्या मास लिंचिंगचं समर्थन करणार्‍यांविषयी मी भरत. यांचे मत विचारले होते. तुम्हालाही तुमचे मत मांडायचे असल्यास तुम्ही मांडू शकता (रादर, सहमती दर्शवित तुम्ही आधीच ते मांडले आहे.)

Tumachya mhananyala sahamat ahe, as a laughing matter. Is what I said. In completely sarcastic way. And you know it perfectly.

People like you with the way you argue, give credibility to atrocity of so called fringes . And argue on social platforms to discredit voice of reason.

The way you misquoted me, and the way you brought unrelated anecdote in discussion is typical.

So once again, there comes a time when it's ok to hit an Urban Nazi.

{{{ So once again, there comes a time when it's ok to hit an Urban Nazi.
नवीन Submitted by आ.रा.रा. on 15 July, 2018 - 22:47 }}}

By the way of mob lynching?

ज्यू. चंद्रूभाऊ,
त्याबद्दल माझे विचार मांडणारा मूळ प्रतिसाद हेच या संपूर्ण वाद चर्चेचे मूळ आहे, तो वाचा. Lol कदाचित प्रकाश पडेल.

माजी आटवन कुनी काडली? Wink

आता याबबतीत मला लिहिण्यासारखं काही उरलेलं नाही. सिंबांच्या सगळ्या प्रतिसादांना +१

आ.रा.रांनी लिहिलं, ते माझ्याकडून कधी लिहिलं जाईल का माहीत नाही, पण प्रत्येक ठिकाणी अशाच प्रकारे व्यक्त होणार्‍या लोकांना उत्तर द्यायला हीच भाषा योग्य आहे, कोणीतरी तसं लिहायलाच हवं .
आणि आ.रा.रांच्या त्या प्रतिसादावर लिहायचं, केवळ म्हणून काहींना लिंचिंगचा निषेध करावा लागला, हेही आहेच.

मलासुद्धा फक्त सेन्सिबल आयडींशीच चर्चा करायला आवडली असती, पण तशाने अड्ड्याबाहेर काही लिहायची वेळ क्वचितच येईल.

तरीपण सेन्सिबल म्हणवणार्‍या आणि इतरांवर लिंचमॉब मेंटॅलिटीचे आरोप करणार्‍यांसाठी एक प्रश्न :
तो माणूस त्या मुलाला मारत होता, तो माणूस मुलांना चॉकलेटं वाटत होता; हे ब्लेमिंग द व्हिक्टिम आहे की नाही?

Pages