अफवेचे बळी

Submitted by हेला on 3 July, 2018 - 14:28

देशभरात मागच्या महिन्यात अफवेचे २५-२६ बळी गेलेत. कारण काय? तर मुलं पळवणारे संशयित म्हणून मारहाण झाली. कहर म्हणजे या मेलेल्यांपैकी एकही मुलं पळवणारा नव्हता. आसाम कि अरुणाचल मध्ये तर या अफवेबद्दल लोकांमध्ये जनजागृती कारण एक सरकारी अधिकारीच लोकांच्या मूर्खपणाला बळी पडला. परवा एकाला मारहाण करून पोलीस स्टेशन ला नेमल्यावर लक्षात आलं कि तो मुलगा त्याचाच होता. काल मालेगाव मध्ये अशीच दंगल झाली. पण या सगळ्या घटनेवर कळस केलाय परवाच्या धुळ्यातील घटनेने. अगदी मृतदेहांवरही लोक वर करत होते. रक्ताचा मांसाचा खच पडलेला होता. आणि यात त्यांना समाधान वाटत होत? कसलं होत हे समाधान ? कुणाला तरी मारल्याचं? कुणावरचा तरी राग बाहेर काढल्याचं? आपल्या मनातला न्यूनगंड मारल्याचं? कि उगाच टाईमपास करायचा म्हणून पाच मुडदे पडले याचं ?

लोक किती विकृत झालेत आणि किती बिनडोक आहेत याच या सध्या घडणाऱ्या घटना ज्वलंत उदाहरण आहेत. किमान सारासार विचार करण्याची मानसिकता सुद्धा आपण सोडून दिलेली आहे. झुंडशाही हि अजगरासारखी असते हे कधी कळणार आपल्याला काय माहित. आज ते आहेत उद्या आपण असू एवढं सुद्धा कुणाच्या लक्षात येत नाहीये.

काय आहे अफवा ? ग्रामीण भागात लहान मुलं पळवणारी टोळ्या आल्यात म्हणून... याला पुष्टी देण्यासाठी काही महाभाग कुठले तरी व्हिडीओ सुद्धा प्रसारित करत आहेत. सध्या कोणत्याही गावात गेलं तरी याच अफवेची चर्चा. कुणी म्हणतंय अमक्या गावात मागच्या आठवड्यात चार जण पकडले, त्या गावात कॉल केल्यावर तर ते म्हणतात आम्हाला तुमच्या गावात लोक पकडल्याचे कळालंय... किती हा बावळटपणा? गावातले विचारवंत जेष्ठ म्हणावेत असेही या अफवेला बळी पडलेत. कुणीतरी थोडा विचार तर करावा ?

लहान मुलांच्या अपहरणाचा मुद्दा देशात गंभीर आहे.. सोबतच तरुण मुली पळवण्याचे प्रकारही खूप वाढत आहेत.हि लहान मुले या तरुण मुलींचा थांगपत्ताही लागत नाहीये. यांची तस्करी होते हेही सर्वश्रुत आहे, पण हि एक मोठी इंडस्ट्री असल्यामुळे सगळे गप्प आहेत.
पण हे मुलं पळवणारे असे गावागावात फिरत नाहीत. गावात तर शक्यतो हे लोक जातच नाहीत. कारण ग्रामीण भागात आपला परका लगेच ध्यानात येतो. हे लोक शहरी भागातच गुन्हे करतात. सोबत अशा टोळ्यात न फिरता पूर्ण प्लॅन करून अपहरण करतात. पण आता तेही पहिल्यासारखे सोपे राहिले नाही. एका टोकाची बातमी दुसऱ्या टोकापर्यंत सेकंदात पोहचू शकते, यामुळे अशी अपहरणे आता कमी होत आहेत.

यापेक्षाही पोट धरून हसावे अशी एक अफवा. म्हणे या टोळ्या किडनी हृदय सुद्धा पळवतात. अक्कल गहाण टाकल्याचा इतका मोठा पुरावा कुठला असू शकतो? किडनी हृदय हे या खेळण्याच्या वस्तू आहेत का? खिशात हात टाकून चोरल्या... शरीराचे असे भाग हे फक्त हॉस्पिटल मधेच काढले जाऊ शकतात. हृदय तर जास्तीत जास्त ६ तास जिवंत राहू शकते. असले अवयव चोरून नेण्यासाठी मोठमोठ्या लॅब सोबत घेऊन फिरावे लगेल. असे पायी चालणारे वा कार ने फिरणारे असले काम करूच शकत नाहीत. इतके साधे लॉजिक... पण आपल्याकडे लॉजिक चालत नाही, झुंडशाही चालते. मेंढरासारखे चालायचे हे आपल्या DNA मधेच आहे.

हे अफवांचे पीक हळूहळू शमेलही पण तोपर्यंत किती बळी घेईल माहित नाही. यामुळे आता एक वेगळीच समस्या समोर येणार आहे. आपल्या लहान मुलांना कुठे घेऊन जाणेही लोकांना अशक्य होणार आहे. कुठे मुलगा रडायला लागला तरी लोक मारायला सुरुवात करतील. याहीपुढे जाऊन काही शक्यता पाहुयात. तुम्ही प्रवासात एखाद्या गावात गेलात. तिथल्या स्थानिकांशी काही कारणाने वाद झाला... त्यांनी फक्त मुले चोरणारी टोळी म्हणू बोंब मारावी, लोक शेकड्याने येऊन तुम्हाला मारायला सुरुवात करतील. आणि तुमचा जीव घेऊनच थांबतील. या निमित्ताने आपले एखादे जुने वैर पूर्ण करण्याचा सुद्धा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखाद्याला लुटण्यासाठी अशीच आरोळी ठोकायची. चार पाच जणांनी मारायला सुरवात करायची सगळं काही चोरायचं, आणि मग मुलं चोर म्हणून ओरडायचं, लोक येऊन मारायला लागतील, चोर राहिले बाजूलाच. एखादा अनोळखी अशाच प्रकारे रस्त्यात अडवून त्याच्याकडून खंडणी मागितली जाऊ शकते, नाही दिली तर आरडाओरडा करील अशी धमकी दिली कि तो जवळच सगळं काही काढून देईल. कितीतरी भयंकर शक्यता या प्रकारांमुळे समोर येत आहेत. आत्तापर्यंत घडलेल्या सगळ्या घटना सुद्धा फक्त अफवेचेच बळी असतील अशी शक्यता सुद्धा आपण गृहीत धरू शकत नाही. अफवेच्या असून कुणीतरी आपले इप्सितही साध्य केले असेल... या घटना अशाच याचा पर्यटनावर सुद्धा गंभीर परिणाम होऊ शकतो.

प्रत्येक अनोळखी नवखा चोर आहे असेच समजून मारहाण केली जात आहे. या बिनडोक लोकांच्या च्या हेही लक्षात येत नाहीये कि आपलं गाव सोडलं तर आपणही बाहेर गावासाठी अनोळखी असतो. शहरात तर कुणीच कुणाला ओळखत नाही. हि परिस्थिती आपल्यावरही येऊ शकते. पोलीस म्हणतात संशयितांना पकडून आमच्या ताब्यात द्या. प्रत्येक अनोळखी संशयित म्हटला तर लोकांचं फिरणं अवघड होऊन जाईल. दिसला कि पकड आणि दे पोलिसात, पोलिसांनी त्याची चौकशी करून एक दोन दिवस डांबून मग सोडावे. सगळी अनागोंदी माजणार नाही का असल्या प्रकारामुळे ?

यापेक्षा पोलिसांनी सरळ सरळ प्रत्येक गावातील सरपंचांना, ग्रामसेवकांना गावकऱ्यांचे शंका निरसन करण्यासंबंधी निर्देश द्यायला हवे. लोकांना कायदा हातात घेऊ नये अशी सक्त ताकीद द्यावी. गावातील प्रतिष्ठित लोकांनी आपल्या गावकऱ्यांच्या डोक्यात वाळवळणारा हा अफवेचा किडा बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेत. ठरवलं तर आठ दिवसात हे प्रकार बंद होऊ शकतील. गावागावात स्थानिकांना निर्देश देणे अवघड नाही. सरकारकडून तरी अजून ठोस अशी काही भूमिका दिसत नाहीये. आणि सरकार यावर ठोस कारवाई करत नसेल तर या प्रकरणामागे आणखी काही वेगळे प्लॅन आहेत का अशी शंका घ्यायला निश्चित जागा राहील.
_

श्रीकांत आव्हाड

https://www.facebook.com/shrikant.avhad/posts/2073791532687517

Group content visibility: 
Use group defaults

याच भावनेतून (तिथल्या तिथे शिक्षा) अशा घटना घडतात, अशी वृत्ती बळावते. पोलीसही आपल्याच समाजाचे भाग आहेत आपल्या सारखीच सामान्य माणसे पोलीसात भरती झाली असतात. तेव्हा घटनेचे गांभीर्य पोलीसांना कळत नाही सामान्य लोकांना कळते अशा अर्थाचे ब्लन्केट स्टेटमेंट योग्य आहे का? ते ही त्या लोकांनी निरपराध्यांचे बळी घेतलेत हे माहित असताना.

स्वतःच्या मुलीबरोबर प्रवास करणाऱ्या माणसाला kidnapper समजून हल्ला ---- हा माणूस स्वतःच्या दोन वर्षे वयाच्या मुलीला मारत होता!
नवीन Submitted by राजसी on 9 July, 2018 - 10:55
>>>>>>>>
तुम्हाला नक्की काय म्हणायचंय?

तो माणूस २ वर्षांच्या मुलीला (ती त्याची स्वतःची मुलगी असली तरी) पब्लिक प्लेस मध्ये मारणे टाळू शकला असता. असे राजसी सुचवित असाव्यात.

स्वतःच्या मुलामुलीला पब्लिकप्ल्रेसमध्ये रागावल्यास-मारल्यास झुंडशाहीने तिथल्या तिथे निकाल लावावा असे काही लोक सुचवत आहेत.

त्या धुळ्याच्या घटनेत डोके ताळ्यावर असणार्‍या काहि लोकांनी, त्या पाच जणांना ग्रामपंचायत कार्यालयात बंद करुन पोलीसांना फोन केला, मात्र घटनेचे गांभिर्य ओळखून ताबडतोप घटनास्थळी पोहचायच्या ऐवजी पोलीसांना यायला तीन-चार तास लागले. यावरुनच तिथल्या कायद्याचे रक्षण करणारे पोलीस किती कार्यक्षम आहेत हे लक्षात येते.
<<
जरा किमान गूगल मॅप काढून पोलिस कुठे होते अन हा पाडा कुठे आहे, ते बघा. हायवेटच बिल्डिंगा नसतात या. अन खेड्यापाड्यात पोलिस आउटपोस्टही २-३ तास अंतरावर असते.

**

अश्या गुन्हेगारांना जागच्या जागेवर शासन करणे हेच योग्य आहे.
<<
कायदा व पोलिस यंत्रणा तुमच्यासारख्या लिंचिंगच्या समर्थकांना समजत नाही, कारण तुम्ही कधी स्वतःच्या माहितीतला कुणी खोट्या गुन्ह्यात अडकून्/किंवा मॉब जस्टिसचा व्हिक्टिम बनला नाहीत व बनणारच नाही अशी तुमची समजूत आहे.

एकदा कुणीतरी त्याची चव तुम्हाला चाखवल्याशिवाय तुम्हाला हे समजणार नाही, ती चव तुम्हाला लवकर चाखायला मिळो ही सदिच्छा.

झुंडशाहीचा आणि धुळ्यातल्या त्या घटनेचा तीव्र निषेध आणि मरण पावलेल्यांच्या आत्म्यांसाठी प्रार्थना.

त्याचबरोबर,

कायदा व पोलिस यंत्रणा तुमच्यासारख्या लिंचिंगच्या समर्थकांना समजत नाही, कारण तुम्ही कधी स्वतःच्या माहितीतला कुणी खोट्या गुन्ह्यात अडकून्/किंवा मॉब जस्टिसचा व्हिक्टिम बनला नाहीत व बनणारच नाही अशी तुमची समजूत आहे.
एकदा कुणीतरी त्याची चव तुम्हाला चाखवल्याशिवाय तुम्हाला हे समजणार नाही, ती चव तुम्हाला लवकर चाखायला मिळो ही सदिच्छा.
>>>>>>>>

या मनोवृत्तीचा आणि विचारांचाही तितक्याच तीव्रपणे निषेध.

<< तो माणूस २ वर्षांच्या मुलीला (ती त्याची स्वतःची मुलगी असली तरी) पब्लिक प्लेस मध्ये मारणे टाळू शकला असता. असे राजसी सुचवित असाव्यात. >>

------ दोन वर्षाच्या मुलीला मारले म्हणुन तिचे रडणे होते हे कुणाला माहित ?

मार बसल्यावरच मुल रडते असे नाही.... रडण्याचे कारण काही वेगळे असण्याची पण शक्यता असते. तिचे रडणे चॉकलेट घेतले नाही, आवडते डोराचे चित्र असलेले खेळणे घेतले नाही किव्वा अजुन काही कारणाने असेल, वडिलान्ची आर्थिक स्थितीत प्रत्येक हट्ट पुरवणे जमत नसेल. पण मुल रडत होते असे बघितले म्हणजे मारलेच असणार, आता बाप तर मारु शकत नाही म्हणजे मुल पळवलेले आहे हे सर्व चुकीच्या गृहितकावर आधारलेले आहे.

पुन्हा सन्शय आला म्हणुन तुम्ही कायदा हातात घेऊ नका.... टोळके करुन सन्शयिताला मारु नका तर त्या व्यक्तीला पोलीसान्च्या हवाली करा... पोलीसान्ना त्यान्चे कर्तव्य बजावू द्या.

खोट्या सन्शयाने मारले गेलेले त्या रडणार्‍या मुलीचे वडिलच होते... सबन्ध आयुष्यभरासाठीचे हक्काचे सुरक्षेचे छत्र त्या निरागस मुलीपासुन कायमचे तोडले हे उद्या कळाल्यावर आपण काय साधले ?

<< मुळात ज्या देशात पोलीसच दिवसाढवळ्या महिलांचे विनयभंग करतात, लोकांकडून चिरिमीरी गोळा करत फिरत असतात त्या देशात गुन्हेगाराला पोलींसांच्या हातात देऊन काय फायदा ? उलट पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत ते गुन्हेगारच एक-दोन जणांना खलास करतील. अश्या गुन्हेगारांना जागच्या जागेवर शासन करणे हेच योग्य आहे. >>
----------- त्यान्ना गुन्हेगार ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कुठल्या व्यावस्थेने दिलेला आहे ? निव्वळ सन्शय, आरोपी, गुन्हेगार यात खुप मोठे फरक आहे. प्रत्येक आरोपी व्यक्ती त्याच्यावरचे आरोप सिद्ध होत नाही तोपर्यन्त निर्दोष असतो हे तत्व तुम्हाला मान्य आहे का ?

<< त्या धुळ्याच्या घटनेत डोके ताळ्यावर असणार्‍या काहि लोकांनी, त्या पाच जणांना ग्रामपंचायत कार्यालयात बंद करुन पोलीसांना फोन केला, मात्र घटनेचे गांभिर्य ओळखून ताबडतोप घटनास्थळी पोहचायच्या ऐवजी पोलीसांना यायला तीन-चार तास लागले. यावरुनच तिथल्या कायद्याचे रक्षण करणारे पोलीस किती कार्यक्षम आहेत हे लक्षात येते. >>
---------- पोलीसान्ची कार्यक्षमता हाच मुख्य प्रश्न असेल तर तो सोडवण्याचा प्रयत्न करा.... त्यान्ची तथाकथित (अ)कार्यक्षमता हे निर्दोष व्यक्तीना मारण्याचा परवाना ठरु नये.

खोट्या सन्शयाने मारले गेलेले त्या रडणार्‍या मुलीचे वडिलच होते... सबन्ध आयुष्यभरासाठीचे हक्काचे सुरक्षेचे छत्र त्या निरागस मुलीपासुन कायमचे तोडले हे उद्या कळाल्यावर आपण काय साधले ?

मला वाटतं या केस मध्ये बाप वाचला. त्याने ओरडून ओरडून ही माझीच मुलगी आहे सांगितलं आणि पोलीस आल्यावर खात्री करण्यात आली.आईला बोलावण्यात आले.

(मी मॉब लिंचींग चे समर्थन करत नाही.)

अशीच एक घटना बीदर मध्येही घडली आहे. आपल्याकडे असलेली इम्पोर्टेड चोकलेट्स लहान मुलांना देण्याची साधी कृती जिवावर उठली. धुळे मधेही एका मुलीकडे बोट दाखवून ती माझ्या मुलीसारखी दिसते असे म्हणणे महग पडले.
हे भयंकर आहे. आपण कोणीही सुरक्षित नाही. एखाद्या खेड्यात एखाद्या लहान बाळाकडे पाहून हसणेही महाग पडू शकते. कदाचित इतक्या लवकर इतक्या मोठ्या संख्येने लोकांच्या हातात मोबाईल व व्हॅट्सॅप देणे चुकिचे आहे ? माझे मत काहींना एलिटिस्ट वाटेल. मलाही वाटते. पण ज्या वेगाने स्मार्टफोन चा प्रसार झाला तो जास्त होता. स्मार्टफोन म्हणजे काडेपेटीच आहे.
गावात अलेले लोक मुले पळविणारी टोळी आहे असा गैरसमज होणे एकवेळ समजू शकते पण त्यांना अक्षरशः ठेचून मारण्याइतकी क्रूरत कुठून आली? की ती आधीच होती व स्मार्टफोनने वाट करून दिली?

स्मार्टफोन केवळ निमित्त आहे.... स्मार्टफोन नसता तर दुसरे अजुन काही तरी निमित्त मिळाले असते... कर्णोपकर्णी... किव्वा कागदी जाहिरात...

ती आधीच होती व स्मार्टफोनने वाट करून दिली >> अर्थात आधीच होती. देशात बिना फोनचा गणपती दूध प्यायला लागलेला.

गावात नवा चेहेरा आलेला आहे म्हणुन सन्शय येणे समजतो... एव्हढा मोठा समुह होता तर त्यान्ना (अनोळखी सन्शयीताना) बन्दिस्त करा पण जिवानेच मारुन टाकणे अजिबात समजत नाही, समर्थन करता येत नाही.

हे बघा कर्नाटकात भाजपचे सरकार नाहीये त्यामुळे सगळं रामराज्य आहे. लोक जबाबदारी नी वागतात, जबाबदार लोकांकडे स्मार्टफोन आहेत, त्यामुळे कर्नाटकात काही कोणी अफवांचे बळी नाहीत.

त्या बिदरच्या घटनेत पुरोगाम्यांच्या लाडक्या धर्माच्या लोकांना मारहाण होऊनही, अजून एकाही पुरोगाम्यांने या घटनेला गोरक्षकांबरोबर कसे काय जोडले नाहि हेच कळत नाही. भाजपा व श्री नरेंद्र मोदींवर बेताल टिका करायची इतकी चांगली संधी पुरोगामी व निधर्मांध इतक्या सहजासहजी सोडतात म्हणजे काय ?

कायदा व पोलिस यंत्रणा तुमच्यासारख्या लिंचिंगच्या समर्थकांना समजत नाही, कारण तुम्ही कधी स्वतःच्या माहितीतला कुणी खोट्या गुन्ह्यात अडकून्/किंवा मॉब जस्टिसचा व्हिक्टिम बनला नाहीत व बनणारच नाही अशी तुमची समजूत आहे.

एकदा कुणीतरी त्याची चव तुम्हाला चाखवल्याशिवाय तुम्हाला हे समजणार नाही, ती चव तुम्हाला लवकर चाखायला मिळो ही सदिच्छा.>>>>>

इथे कुणी समर्थन केलेय लिंचिंगचे?

एक बातमी वर आली, त्या अनुषंगाने राजसी यांनी त्याबद्दल अजून माहिती दिली, तर त्या लिंचिंग समर्थक? बरे, आहेत त्या समर्थक, तर त्यावर उतारा काय?तर त्यांनाही अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागुदे ही इच्छा. त्या इथे समोर असत्या तर कदाचित....

मायबोलीवरसारख्या वर्चुअल ठिकाणी देखील तडकाफडकी प्रो व अंगेंस्ट ठरवले जाते व प्रो ना तश्याच लिंचिंगला सामोरे जावे लागुदे ही इच्छाही व्यक्त केली जाते. मग इथे लिंचिंग वाईट म्हणणाऱ्या लोकांच्या विचारसरणीत व प्रत्यक्ष लिंचिंग करणाऱ्या रस्त्यावरच्या लोकांच्या विचारसरणीत काय फरक आहे?

Pot calling the kettle black.

साधना,
प्रतिसादाचा विपर्यास करून अफवा पसरवणे टाळाल का, कृपया?

एक बातमी वर आली, त्या अनुषंगाने राजसी यांनी त्याबद्दल अजून माहिती दिली, तर त्या लिंचिंग समर्थक?
>>>>>>
त्यांना नक्की काय म्हणायचे आहे असे विचारले, जे त्यांनी अजून सांगितले नाहीये, एक्साक्टली 5 प्रतिसदानंतर त्या प्रतिसादाबद्दल बोलणे बंद झालंय.

>>>>>>, आहेत त्या समर्थक, तर त्यावर उतारा काय?तर त्यांनाही अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागुदे ही इच्छा. त्या इथे समोर असत्या तर कदाचित....>>>
राजसी यांच्या बद्दल कोणीही, काहीही इच्छा व्यक्त केली नाहीये.

जी इच्छा व्यक्त केली आहे ते " जे लोक मारले गेले ते तसेच मारले जाणे योग्य होते " या अर्थाच्या प्रतिसादावर व्यक्त केले आहे.

मुळात ज्या देशात पोलीसच दिवसाढवळ्या महिलांचे विनयभंग करतात, लोकांकडून चिरिमीरी गोळा करत फिरत असतात त्या देशात गुन्हेगाराला पोलींसांच्या हातात देऊन काय फायदा ? उलट पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत ते गुन्हेगारच एक-दोन जणांना खलास करतील. अश्या गुन्हेगारांना जागच्या जागेवर शासन करणे हेच योग्य आहे.
---
Submitted by समीर.. on 9 July, 2018 - 11:14

या मूळ प्रतिसादावर आपण कसे बरे रिऍक्ट व्हाल?

बिदरची घटना भयंकर आहे.
(असे होऊ नये म्हणून परक्या एरियात गेल्यावर काय काळजी घ्यावी, कसे वागावे हे सांगणारी मराठी, हिंदी आणि इंग्लिश पोस्ट तयार करुन ती व्हायरल करावी का?मारणार्‍यांनी मिडीया वेगाने त्यांना हव्या त्या पोस्ट पसरवायला वापरले.वाचवणारेही वापरु शकतात.)

या मास लिंचिंगबद्दल एका अक्षरानेही खेद व्यक्त न करता त्याबद्दल काही लिहिणार्‍यांवरच आसूड उगवणार्‍यांच कौतुक करावं तितकं थोडंच.

मुळात दुसर्‍या ऐरियात गेल्यावर तिथल्या लहान मुलांकडे ढुंकून देखिल पाहू नये, अगदी एकादे मुल कितीही अडचणीत असले तरी. आजकाल भारतातल्या बहुसंख्य लोकांकडे स्मार्टफोन आले मात्र ते हाताळायची अक्कल त्यांना अजून यायची आहे. त्यात स्मार्टफोन वापरणार्‍या गावढंळ लोकांबद्दल तर न बोललेच बरे ! म्हणून 'आपण बरे व आपले काम बरे' या मोड मध्ये राहिले तरच भारतात माणूस सुरक्षीत राहू शकतो अन्यथा फुकटची समाजसेवा करायला गेलात की फटके पडलेच असे समाजायचे.

हे सगळं पद्धतशीरपणे, नियोजनपूर्वक केलं जातंय, असं मानायला वाव देणारी बातमी
Police investigations have revealed that these videos either do not belong to locations listed in WhatsApp forwards or were edited deliberately to distort their content.

या मास लिंचिंगबद्दल एका अक्षरानेही खेद व्यक्त न करता त्याबद्दल काही लिहिणार्‍यांवरच आसूड उगवणार्‍यांच कौतुक करावं तितकं थोडंच.
नवीन Submitted by भरत. on 15 July, 2018 - 17:16
<<

या मास लिंचिंगबद्दल तुम्ही-आम्ही खेद व्यक्त करुन काय घंटा फरक पडणार आहे. मुळात इथल्या (भारतातल्या) बहुसंख्य लोकांची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तो पर्यंत अश्या घटना अजिबात कमी होणार नाहित. उद्या फेसबुक, व्हॉट्सअप सारख्या सोशल फोरमवर सरकारने सेंन्सॉरशीप लागू केली तर सर्वात आधी 'आमच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर सरकारने घाला घातला' म्हणत सर्वात आधी 'अ‍ॅवार्ड वापसी गॅंग' बोंबलत समोर येईल तेंव्हा देशातील नागरिकांनी स्वत: जागृत व्हायची सध्या गरज आहे.

{{{ या मास लिंचिंगबद्दल एका अक्षरानेही खेद व्यक्त न करता त्याबद्दल काही लिहिणार्‍यांवरच आसूड उगवणार्‍यांच कौतुक करावं तितकं थोडंच.
नवीन Submitted by भरत. on 15 July, 2018 - 17:16 }}}

१९४८ च्या मास लिंचिंगबद्दल खेद व्यक्त न करता उलट "गोडश्यांची अवलाद" अशीच ठेचली पाहिजे म्हणणार्‍यांबद्दल आपले काय मत आहे?

Pages