तुमचा जोडीदार तुमचा वाढदिवस लक्षात ठेवतो का?

Submitted by पाथफाईंडर on 23 June, 2018 - 06:45

नमस्कार माबोकरहो;

माझ्या मागील धाग्यास प्रतीसाद दिल्याबद्दल धन्यवाद

https://www.maayboli.com/node/65034

स्वतःच्या वाढदिवसाची महिनाभर आधीपासून अडून अडून आठवण करून देणारे आस्मादिकांचे अर्धांग नवर्याचा वाढदिवस साफ विसरलेले दिसते आहे.

आपणा सर्वांचे अनुभव वाचायला आवडतील.
( जोडीने माबोवर असणार्यांनी आपल्या हिमतीवर लिखाण करावे)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओ अन्जुतै,
Men will be men series. सुमीत राघवन च्या हिर्याच्या अंगठीची आठवण करून दिलीत. Happy

@बोका,
३ गोष्टी ( माझ्याच पैशाने) मिळाल्या, नवीन Hidesign चे वाॅलेट,
"The 7 habits of highly effective people" पुस्तक
मोठ्ठी सिल्क कॅडबरी .

पहिल्या २ गोष्टी खुप दिवसापासून घ्यायच्या होत्या. Happy माझ्या गरजेच्या गिफ्ट मिळाले.

बायका ठेवतात लक्षात, नवरे विसरतात mostly.
>>>>>

उलट नवरे बायकोच्या भितीने लक्षात ठेवतात. एकवेळ स्वत:चा विसरतील...

अर्थात बायकाही नवरयाचा लक्षात ठेवतात पण त्यामागे साधारण अशी भावना असते की मी तुझा लक्षात ठेवला, आता तुझी काय बिशाद माझा विसरायची...

थोडक्यात, बायकांना विसरणे माफ असते, उलट नवरयाला थोडेसे हायसेच वाटते, चला बाबा ही सुद्धा विसरली..
पण नवरयांना स्वत:ला विसरणे मात्र माफ नसते.

तरी एखादा नवरा एखाद वर्षी विसरलाच तर ते त्याचे आयुष्यातील पहिले आणि शेवटचे विसरणे ठरते..

एकाच आयुष्यात दोन वेळा बायकोचा वाढदिवस विसरलेला नवरा अजून लग्नाला यायचा आहे !

या वेळेस बायकोने वाढदिवस आवर्जून लक्षात ठेऊन, कोरोना काळात घरी वापरून वापरून झिजलेल्या दोन, तीन चतुर्थांश विजारीना (3/4 pant) पर्यायी म्हणून ३ नवीन घेऊन दिल्या. (२ वर १ मोफत होती)

Rofl
भरत जी सही पकडे है.

मस्त मस्त मस्त... बिलेटेड बडे विशेस...
हाच फरक आहे नवरा आणि बायकोत... बायको गिफ्ट म्हणून काहीही देऊ शकते.. तीन चतुर्थांश विजार देखील... हिम्मत आहे का एखाद्या नवऱ्याची ट्रॅक पॅन्ट वगैरे बड्डे गिफ्ट म्हणून बायकोला द्यायची...

नवरा ढीग देईल हो ट्रॅक पॅन्ट वगैरे बड्डे गिफ्ट, पण इतक्या स्वस्तातली गिफ्ट बायकोला चालेल का? हा महत्वाचा मुद्दा आहे. Wink

पाफा, वाढदिवसाच्या शुभेच्छा.

नवरा ढीग देईल हो ट्रॅक पॅन्ट वगैरे बड्डे गिफ्ट, पण इतक्या स्वस्तातली गिफ्ट बायकोला चालेल का? हा महत्वाचा मुद्दा आहे. 

Submitted by उपाशी बोका on 30 July, 2020 - 19:17
>>>>
हे बाकी खरे आहे. Wink

पाफा शुभेच्छा.
माबोकरांकडून वादिच्या शुभेच्छा मिळविण्यासाठी असा धागा काढण्याचा फंडा भारी आहे. Wink

@हाडळीचा आशिक, Rofl

धन्यवाद. धाग्याचा मुळ उद्देश वादिच्या शुभेच्छा मिळवणे नाहीये. हा धागा व्यत्यास आहे. बायकोने तिच्या वादिला गिफ्ट साठी लावलेल्या भुणभुणीसाठी काढलेला वेगळा धागा आहे.
तीने माझा वादि न लक्षात ठेवणे या फ्रस्टेशन मधे हा धागा काढला होता.

मागे वळून बघताना,
नवरा आणि बायको दोघांच्या वादि वर मी काढलेल्या धाग्यांची प्रतिसाद संख्या बघता माबोवर स्त्री दाक्षिण्य मुबलक आहे याची खात्री पटते Rofl

Pages