तुमचा जोडीदार तुमचा वाढदिवस लक्षात ठेवतो का?

Submitted by पाथफाईंडर on 23 June, 2018 - 06:45

नमस्कार माबोकरहो;

माझ्या मागील धाग्यास प्रतीसाद दिल्याबद्दल धन्यवाद

https://www.maayboli.com/node/65034

स्वतःच्या वाढदिवसाची महिनाभर आधीपासून अडून अडून आठवण करून देणारे आस्मादिकांचे अर्धांग नवर्याचा वाढदिवस साफ विसरलेले दिसते आहे.

आपणा सर्वांचे अनुभव वाचायला आवडतील.
( जोडीने माबोवर असणार्यांनी आपल्या हिमतीवर लिखाण करावे)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे एकाचा वाढदिवस एक प्रॉमिनंट तारखे नंतर,
आणि दुसऱ्याचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस आणि मुलीचा वाढदिवस एका रांगेत,
त्यामुळे वाढदिवस विसरला हा प्रकार संभवत नाही:)

बाकी आज तुमचा वाढदिवस असेल तर " हॅपी बर्थडे"
दिवस संपेपर्यंत थांबा, कदाचित सरप्राईज पार्टी चा वगैरे प्लॅन असेल

Itkya varshat kiti vela visarla gelay tumachya vadhdivas. Aajavar visarla gela nasel tar aatahi kahi problem nahi Happy dont worry!

स्वतःच्या वाढदिवसाची महिनाभर आधीपासून अडून अडून आठवण करून देणारे आस्मादिकांचे अर्धांग नवर्याचा वाढदिवस साफ विसरलेले दिसते आहे.
>> हा हा हा

<महीना बाकी आहे.>
तुम्हाला वाढदिवस
साजरा करायचाय की वाढमास?

हल्लीच्या फेसबुक नोटिफिकेशन, हजार नातेवाईकांचे व्हॉटसप ग्रुप यात बडडे विसरणं ही अशक्य गोष्ट आहे.
तुम्ही तुमची डिजिटल फुटप्रिंट पुसून टाकली असेल तरच शक्य.
पण तरी खरंच असं झाले असेल तर शांतपणे 'पुढच्या तुझ्या वाढदिवसाला मी तुला काही देणार नाही, तूच मला गिफ्ट द्यायचे' म्हणून फाईन करा ☺️☺️☺️☺️

( जोडीने माबोवर असणार्यांनी आपल्या हिमतीवर लिखाण करावे)>> Lol

सौ ना पण तोच न्याय लावा,
तुम्ही पण आडून आडून हिंट्स द्या>>+1

माझं अर्धांग माझा वादि कधीच विसरलेला नाही. आमचं लग्न ठरल्यानंतर तर चुकीच्या दिवशी माझा वादि समजून भरपूर गिफ्ट माझ्या घरी पोचते केलेले. Proud

@ निधी आताही तीच परिस्थिती आहे का? गिफ्ट तेवढेच मिळतात का?
लग्नाआधीचा अन लग्नानंतरचा नवरा हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे. (काॅपीराईट रजिस्टर करतोय इथे) Wink
(प्रश्न खाजगी वाटल्यास इग्नोर करू शकता.)

बड्डे पाठ असला, तरी त्या दिवशी तो आठवतोच असे नाही.
फेसबुकवर रिमाइंडर येणे असला मूर्ख आयटम असतोच की मदतीला. वर लिहिलंय की अनु यांनी
गेला बाजार मोबाइलवर घरच्यांचे काँटॅक्ट्स असतात, त्यावर बड्डे लिहिला की आपोआप रिमाइंडर येते.

आताही तीच परिस्थिती आहे का? गिफ्ट तेवढेच मिळतात का?>> गिफ्ट तेवढेच असं नाही पण मिळतात न मागता. Wink आणि इतक्या वर्षांनंतरही लक्षात ठेवलाय ते महत्त्वाचे. Happy

सुदैवाने माझा नवरा अजूनतरी माझा वाढदिवस कधीच विसरला नाही आहे आणि मीही त्याचा Happy .

थोडसं अवांतर .. एक किस्सा आहे.
आमचा साखरपूडा माझ्या वादिच्या आदल्या दिवशी झाला होता .
घरातले थकून भागले झोपले होते त्या रात्री . मला झोपेत माझा मोबाईल २-३ वेळा वाजला , घराची बेल २ दा वाजली असं काहीतर वाटलं, शेवटी लॅण्ड लाईन वाजला तेन्व्हा मी झोपेत उचलला . कोणीतरी दरवाजा उघड , दरवाजा उघड सांगत होतं .
तो पर्यन्त माझे बाबा , भाउ जागे झाले. मी धडपडत उठले. कोणीतरी आलयं असं बरळले. आणि मी झोपेतच दरवाजा उघडला.
किती वाजले, काय चाललयं मला नीटसं कळतं नव्हतं .
दार उघडलं तेन्व्हा माझा होणारा नवरा हातात केक आणि सोबत त्याची मावसबहिण , तिच्या हातात बुके .
माझी खाडकन झोप उडाली . अजूनही आम्ही कधीतरी आठवण काढून खूप हसतो.

नवरोबांना अजूनही असं काहीतरी सरप्राईज द्यायची सवय आहे.
पण माझ्या आयुश्यातल्या त्या पहिल्या अशा birthday surprise साठी त्याच्या अजूनही बर्याच चुकांकडे मी दूर्ल़क्ष करते.

तुम्ही अलीकडे भांडलात काय बायकोबरोबर?

तिला दिलेलं गिफ्ट तिला आवडले नसेल... मग कसं लचात ठेवेल वादी तुमचस...

स्वस्ति भारी किस्सा आहे. साखरपुडा ते लग्न हा फार गोल्डन पिरीअड असतो. दुर्दैवाने माझ्या बाबतीत वेगळे झाले. आधी लग्न झाले. आणि नऊ महिन्यांनी साखरपुडा... असो, तो वेगळा किस्सा झाला
पण माझे वाढदिवस नेहमीच लक्षात ठेवून किमान ७-८ छोटेमोठे गिफ्टस देत साजरे केले जातात.. त्यात काही वेळ आणि कष्ट खर्च करत हॅन्डमेड गिफ्टही असतात. ज्यात प्रेम अगदी ओतपोत भरलले असते.
पण त्याऊलट स्वतःच्या वाढदिवसाला मात्र माझ्याकडून अशी काहीही अपेक्षा नसते. कधी मलाच वाटले तर काही सरप्राईज देतो, ते गोड मानून घेतले जाते.
आता अशी बायको मिळायला काय नवस करावा लागतो हा सुद्धा एक वेगळ्या धाग्याचा विषय झाला Happy

स्वतःच्या वाढदिवसाला मात्र माझ्याकडून अशी काहीही अपेक्षा नसते.>>>>>
अर्र्र्र्र्र्र्र्रए मी मी वाल्या माणसा, अपेक्षा ही असतेच, पण कदचित ती निर्लज्जपणे तशी बोलून दाखवत नसेल..

धन्यवाद सर्वांचे.

@भास्कर. ९ महीने वेगळ्या संदर्भात वापरतात. तुम्हाला डोहाळेजेवण म्हणायचे आहे का? Wink

पाफा,
Click bait प्रतिसाद, " माझ्या जन्माची चित्तरकथा " ऐकायची असेल तरच उत्तर द्या

@भास्कर. ९ महीने वेगळ्या संदर्भात वापरतात. तुम्हाला डोहाळेजेवण म्हणायचे आहे का?
>>

आंतरजातीय विवाह
लग्नाला घरून परवानगी नव्हती.
मग आम्ही रजिस्टर केले.
नऊ महिन्याने परवानगीसह साखरपुडा आणि लग्न.

हो.

आमच्याकडे तिथीप्रमाणे वाढदिवस साजरे करतात. लग्नानंतर बायकोलाही तोच नियम. त्यामुळे माझाच काय तिला तिचाही वाढदिवस लक्षात रहात नाही. मलाच सकाळी सकाळी “आज तुझा वाढदिवस आहे” हे सांगावं लागते. त्यामुळे वाढदिवसाला काय सरप्राईज मिळणार यापेक्षा ‘आज आपला वाढदिवस आहे’ हेच तिच्यासाठी सरप्राईज असते. Happy

हो.

हुर्रे !!!
बायकोने वाढदिवस लक्षात ठेवलाय.
धन्यवाद सर्व प्रतिसादाबद्दल.

Pages