सलमान चा अभिनय खराब होत आहे का?

Submitted by कटप्पा on 22 June, 2018 - 23:31

रेस 3 तुम्ही पाहिलाच असेल, सगळे शो हाऊसफुल आहेत.
मी पहिला आणि जाणवले की सलमान ची अभिनयक्षमता कमी झाली आहे.

रेस 3 म्हणजे एक रोजगार योजना वाटली. जे फालतू कलाकार चालत नाहीत त्याना सलमान ने काम देण्यासाठी बनवलेला चित्रपट असेच फक्त वर्णन करता येईल.

तोच सलमान ज्याने बजरंगी मध्ये नवाज ला कच्चा खाल्ला होता, कुछ कुछ होता है मध्ये शाहरुख पेक्षा जास्त भाव खाऊन गेला होता,सुलतान मध्ये तर अत्युत्तम अभिनय होता, ज्याचा दबंग मी 15 वेळा पहिला त्या सलमान कडून असली अपेक्षा नव्हती.

रेस3 पाहून पस्तावलो... घरी आलो आणि दबंग पहिला परत, मागच डोकेदुखी गेली.

तुम्हाला काय वाटते, सलमान चे अभिनय कौशल्य कमी होत आहे का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सलमान खान फेवरेट ऍक्टर आहे...रेस 3 पाहिला नाही,त्यामुळे नो कमेंट्स... Happy
सलमानचा बॉडीगार्ड,रेड्डी ,बजरंगी भाईजान खूप आवडतात...बॉडीगार्ड तर कितीही वेळा पाहिला तरी पुन्हा पहावासा वाटतो......

जे अस्तित्वातच नाही ते कधीही खराब होत नाही>>>>
+100
दबंग मी 15 वेळा पहिला >>> तुमच्या इथल्या संयमाचे आणि शांतपणाचे रहस्य समजले>>>>>>
+1000

सलमान आणि अभिनय या गोष्टींचा एकमेकांशी दूर दूरपर्यंत संबंध नाही.
तो कोणत्याही रोल मध्ये सलमान म्हणूनच वावरतो.

कटप्पा
तुमचे सर्वांगीण विषयावर धागे विणण्याचे कोशल्य अफाट आहे आणि कोळी कसा धागा विणून परत नामानिराळा राहतो तसेच तुम्हीही.

विशेष शिकवणी? का स्वयंभू आहात?

हो Happy

भाभु नसावा, तो स्वतःच इतका बोलुन वीट आणतो की बस
हे धागा काढतात आणि विषयाला सुरुवात करून देतात आणि मग बाकीचेच बोलत बसतात, यांचा असला तर एखादं दुसरा प्रतिसाद असतो
मराठी भाषा, लस्ट स्टोरीज, सलमान आणि दारू असे विविध विषय, आता दारू आणि सलमान ही लिंक एकवेळ मान्य पण बाकी विषय चतुरस्त्र आहेत

<सलमान आणि अभिनय या गोष्टींचा एकमेकांशी दूर दूरपर्यंत संबंध नाही.
तो कोणत्याही रोल मध्ये सलमान म्हणूनच वावरतो.>
सूरज बडजात्याला मानलं पाहिजे. मैंने प्यार, हम आपके आणि हम साथ साथ मध्ये त्याने सलमानला त्याच्यासारखं वावरायला दिलं नाही. त्याला अभिनय म्हणावं का माहीत नाही.
त्याचा चेहरा कधीच हलत नसे. स्वतःच्या डायलॉग डिलिव्हरीची टर त्यानेच उडवलीय. उरली बॉडी. तीही (पुरती) स्टिफ झाली असेल.

कुछ कुछ होता है मध्ये शाहरुख पेक्षा जास्त भाव खाऊन गेला होता,
>>>>>>>

आई ग्ग Lol Rofl Lol Rofl

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

अजून हसणे थांबत नाहीये ... Lol Rofl Lol Rofl Lol Rofl Lol Rofl

तिकडे फेसबुकवर लोक सलमानने रेस ३ मधून आठ दिवसात २०० कोटी कमावले आणि अमित शहा यांनी पाच दिवसात ७४५ कोटी फिरवले अशा पोस्टी फिरवत आहेत. अमित शहांचा काय संबंध ? ते काय सिनेमे बनवतात का ? लोकांना अवांतर खूप आवडतं.

फेसबुकचा मायबोलीशी जो संबंध तोच अमित शहांचा सलमानशी.
अमित शहा नुकतेच सलमान खानला भेटून गेले. त्याआधी माधुरी दीक्षित यांनाही भेटले. हाही संबंध.

सलमान, मला आवडतो, त्याचे मुव्ही मस्त टीपी असतात. बाकी चांगल्या (उत्कृष्ट नव्हे) अभिनयाची आशा कुठल्याच हिरोकडून नसल्याने काही फरक पडत नाही.

सलमान त्याच्या मुव्ही पेक्षा होस्ट म्हणून जास्त आवडतो. हिंदी बिबॉ फक्त त्याच्यासाठीच बघायचे.

शाखा पेक्षा काजोल भाव खाऊन गेली होती. >>> +१११११११

सलमान हा साईड ऍक्टर वाटतो त्यात>>> तो त्यात साईड ऍक्टरच आहे, पण तरी तो शहरुखपेक्षा नक्कीच भारी वाटतो.

त्या मुव्हीमध्ये काजोल, राणी, सलमान, शरूखची मुलगी , फरीदा जल्लाल अन शेवटी शाहरुख असे माझे रँकिंग आहे

या प्रतिसादात पण ड्युआयडीचाआ उल्लेख नाही, मला कंटाळा येतो वगैरे स्वमहात्म्याचे उल्लेख नाहीत. बरे वाटत नाही कि काय ?
असो. अवांतराबद्दल क्षमस्व !

VB ,
रँकिंग मध्ये जॉनी लिव्हर, तारे मोजणारा मुलगा , राहिले Proud

अरे हो की सिम्बा, असे कसे विसरले मी त्यांना . तो मुलगा तर बेस्टच होता.

Revised ranking>>>
काजोल, राणी, सलमान, तारे मोजणारा मुलगा, शरूखची मुलगी , फरीदा जल्लाल , जॉनी लिव्हर अन शेवटी शाहरुख <<<

बरेय हो अगदी. चतुरांबे अ‍ॅडमिनला प्यारे झाल्यापासून (श्रेय : सिंबा) तुमचा सहानुभूतीने विचार करायचं ठरवलं.
त्यांचं मिशन अर्धं राहिलं, तसं तुमचं होऊ नये म्हणून.
तुमच्याबद्दल माझ्या मनात अपार करुणा दाटून आली आहे.

तुम्ही तुमच्या मिशनपासून भरकटू नका म्हणजे झाले. उगाच धाग्याच्या विषयाशी संबंधित प्रतिसाद देऊ लागलात तर काळजी वाटते.
बाकी ते चतुरांबे जाता जाता अजून असे आयडी कुठून येणार ते सांगून गेले. त्यांचे आभार मानायचे राहून गेले. तुमच्याकडे मानले तरी त्यांना पोहोचतीलच म्हणा.. आभार !

असे प्रतिसाद देताना तुम्हाला कंटाळा येत नाही हे पाहून अपार आनंद जाहला. शिवाय मी पुन्हा प्रतिसाद देणार नाही बरं.. अशी प्रेमळ धमकी सुद्धा नाही. अहो तुम्ही प्रतिसाद नाही दिले तर लोकांनी काय करायचं ? हे सृष्टीचक्र ठप्प नाही का होणार भाऊ ? एक तुम्हीच तर आहात ज्यांच्या विचारांमुळे जग कसे बसे चालू आहे...

सहानुभूतीने विचार करण्याचे काहीच बंधन नाही तुमच्यावर. तुमचे ड्युआयडी या विषयावर किती प्रतिसाद मला उद्देशून आहेत हे मोजून वेबमास्तरांना कळवलेले नाही. निश्चिंत रहा. चालू द्या बिनधास्त. तुमचा तो प्रांत आहे. त्याशिवाय तुम्हाला अगदी राहवत नसेल. (स्वतःच्या ड्युआयबद्दल लिहा असा आग्रह नाही, मला ते माहीत नाहीत. तुमच्याच त्या आयडीने सांगितले म्हणून. मला कुणाचा कोण ड्युआयडी या विषयात पीएचडी नाही करायची )

Pages