सलमान चा अभिनय खराब होत आहे का?

Submitted by कटप्पा on 22 June, 2018 - 23:31

रेस 3 तुम्ही पाहिलाच असेल, सगळे शो हाऊसफुल आहेत.
मी पहिला आणि जाणवले की सलमान ची अभिनयक्षमता कमी झाली आहे.

रेस 3 म्हणजे एक रोजगार योजना वाटली. जे फालतू कलाकार चालत नाहीत त्याना सलमान ने काम देण्यासाठी बनवलेला चित्रपट असेच फक्त वर्णन करता येईल.

तोच सलमान ज्याने बजरंगी मध्ये नवाज ला कच्चा खाल्ला होता, कुछ कुछ होता है मध्ये शाहरुख पेक्षा जास्त भाव खाऊन गेला होता,सुलतान मध्ये तर अत्युत्तम अभिनय होता, ज्याचा दबंग मी 15 वेळा पहिला त्या सलमान कडून असली अपेक्षा नव्हती.

रेस3 पाहून पस्तावलो... घरी आलो आणि दबंग पहिला परत, मागच डोकेदुखी गेली.

तुम्हाला काय वाटते, सलमान चे अभिनय कौशल्य कमी होत आहे का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भभा भाऊ
अहो तुम्ही तुमच्या तनात मनात शाखा आहे म्हणालात, म्हणून तुमच्या धनात पण तो आहे का? हा प्रश्न होता. त्याचे स्टेटस नव्हते विचारले.
भरत भाऊ
काड्या पुरवायचा छंद नाहीये. तसे वाटले असल्यास क्षमस्व.
या प्रकरणात कायमच "मान ना मान मै तेरा मेहमान " असते.

अमेझॉन prime वर आलाय, काल बघितला. इतकी भंकस स्टोरी आणि अकॅशन आहे की सिन बाय सिन खिल्ली उडवत पहिला आणि जाम मजा आली.

अरे बाप्रे
ते भरत मयेकर, आरारा आणि सिम्बा यांचे इथेही ड्युआयडी ओळखा स्पर्धा चालू होते का ? कुठलाही आयडी आला की यांना ओळखायचा ठेका मिळालेला दिसतोय. ४० पैसे / आयडी !! Lol
आणि माझ्यावर हेच आरोप लावत होते.
आता तर काय मी ज्याला ओळखत नाही त्याच्या नावाने हाका मारताहेत.
म्हणूनच वेमा लक्ष घालेनात त्यांना तडाखे दिल्यावर. वो सब जानते है !

चांगला कधी होता??
<<<
सलमानने ओ ओ जाने जाना ढूंढे तुझे दिवाणा गाण्याच्या चित्रपटात काजोलसह धर्मेंद्र अरबाझ आदींना खाल्ले होते.

हम साथ साथ है एक टुक्कार रटाळ मालिकाछाप चित्रपट आहे.
पण उत्तरार्धात त्यावर सलमानच आपली छाप सोडून जातो.

हाच कारनामा त्याने अमिताभसोबत बागबानमध्ये केला आहे.

दरवेळी अभिनय हाच एक निकष लागत नाही. अदाकारी सुद्धा एक चीज असते. हम आपके है कौन मध्ये माधुरीला जे होमपिच भेटलेले त्यात त्याच अदाकारीच्या जीवावर सलमानने तिला बरोबरीची टक्कर दिली..

Baghi

बागी तर एक नंबर
तो टायगर श्रॉफ अजूनही त्या नावाचे पिक्चर काढत असतो.
हातो से तेरा शृंगार करू
बाहो मे भर के प्यार करू..
सलमान कसला रोमांटीक दिसायचा त्यात

अरे मित्रा ऋन्मेषा, अशी कशी गडबड केलीस. तुझ्या या आयडीने शाहरुख, स्वजो आणि सई ताम्हणकर यांचीच ठायी ठायी तारीफ करायची आणि धागा भरकटवायचा असं ठरलंय ना ! मग आयडी न बदलता सलमानची स्तुती !! इतका मुरलेला आयडी तू.. अशी कशी गडबड केलीस Wink

अहो सर जुना सलमान माझ्या आवडीचा आहे. शाहरूखसोबत सहकलाकार म्हणून काम करतानाही त्याने बरीच धमाल उडवली आहे. करन अर्जुन चित्रपटाच्या उत्तरार्धात फाईट सीनमध्ये त्याने शाहरूखलाही खाल्ले आहे.

Pages