बिग बॉस - मराठी २

Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_6.jpgsharmishtha-raut_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

स्मिता मस्तं खेळली टास्क्स, तिला स्टंट्स द्या , स्विमिंग द्या , मराठी गाणी द्या किंवा पाटा वरवंट्यावर् वाटण , टास्क्स मधे मास्तर आहे ती. ++++ ११११ तिने पक्षी न चुकता मोजले!

सईने शराचा उल्लेख 'कालपरवा घरात आलेली तिसरी चौथी व्यक्ती' असा केला.

कधि कधि?? रेशमला फुल्ल स्पोर्ट आहे चॅनेल आणि ममाचा >>> Lol खरं आहे.
सईला पण असेल आता असं वाटतंय.
>>>
ROFL..

सईने शराचा उल्लेख 'कालपरवा घरात आलेली तिसरी चौथी व्यक्ती' असा केला.>>>> आणि त्याच कालपरवा आलेल्या व्यक्तीने तिला मत दिलं नाही म्हणून तणतणत होती. डबल ढोलकी. Angry
सई म्हणजे झगामगा आणि फक्त मला बघा अशातला प्रकार आहे.

तमिळ बिग बॉस 2 सिझन सुरू झालाय गेले काही आठवडे.

तमिळमध्ये पण टँकमध्ये पाणी भरणे टास्क झाला, पण त्यांना नळावरील भांडणे अपेक्षित नसल्याने शांततेत पार पडला. लोक स्विमिंगपुलमध्ये उतरुनही पाणी भरत होती. मारामारी, धक्काबुक्की, असा काही प्रकार नाही.

एक नोकर मालक टास्क होता, त्यातही आधी सगळे पुरुष मालक आणि दुसऱ्यादिवशी बायका मालक, असा टास्क होता, त्यात एकीने पुरुषांनी अंडरवेअर धुवायला टाकली, अशी तक्रार केली. आपल्या रेशम ताईंची आठवण करून दिली.

मागचा आणि हा पण सिझन कमल हसन छानच हॅन्डल करतोय. संयमित आणि न्यूटरल बोलतो. ममांसारखा पार्शल, लाऊड, परिक्षेतल्या सारखी धडा धडा मतं मांडून,रागवून मोकळा झाल्यासारखं बोलत नाही.

तिकडचे बिबॉ सुद्धा ग्लाडीएटर सारखे ट्रीट करत नाहीयेत कंटेस्टंटस ना. कोणालाही फिझिकल हार्म पोहोचेल, असे टास्कस देत नाहीयेत.

मराठी बिबॉ, वाचत असाल, तर सुधारा जरा नेक्स्ट टाईम.. लोकांमध्ये आपापसात भांडणे लावून देणे,इथपर्यंत ठीक आहे, डायरेक्ट डिसेबल होतायत लोक इकडे आणि तुमचा हस्तक्षेप अगदीच सगळं डॅमेज झाल्यावर? हे नका करू पुढच्यावेळी.

अगदी खरंय.
चक्क जायबंदी होऊन बाहेर गेले स्पर्धक तरी पुन्हा पुन्हा तसेच टास्क्स, तीच जीवावरची जोखिम. बिचारी ऋतुजा, तिला उत्तम सूर गवसलेला, केवळ बिबॉच्या हलगर्जीपणामुळे आणि रारे टीमच्या गुंडागर्दीमुळे बिचारी गेली ते गेलीच.

मराठी बिबॉ, वाचत असाल, तर सुधारा जरा नेक्स्ट टाईम.. लोकांमध्ये आपापसात भांडणे लावून देणे,इथपर्यंत ठीक आहे, डायरेक्ट डिसेबल होतायत लोक इकडे आणि तुमचा हस्तक्षेप अगदीच सगळं डॅमेज झाल्यावर? हे नका करू पुढच्यावेळी.
<<
काहीही फरक पडत कलर्स आणि बिबॉ ला, बिग बॉस मराठीचे सर्वेसर्वा `स्वतः आनंद चव्हाण एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हंटलय (एकदा नाही अनेकदा ) कि शो ची एवढी चर्चा होतेय हेच यश आहे /खूप आहे आमच्यासाठी, कोण काय म्हणत (पॉझिटिव कि निगेटिव) अजिबात फरक पडत नाही आम्हाला.

आमच्यासाठी, कोण काय म्हणत (पॉझिटिव कि निगेटिव) अजिबात फरक पडत नाही आम्हाला.> > दुर्दैवी आहे हे Sad

पुंबा, होना! आज ऋतुजा असती, तर इक्वेशन्स वेगळी असती, मिस हर...

पुढच्या वेळी कंटेस्टंटसनीच स्वतःला जपत खेळलं पाहिजे मग आऊंसारखं. शेवटी सीर सलामत तो पगडी पचास, हेच त्यांनी लक्षात ठेवायला हवं, नाही का?

स्मिता कसली गोड आहे.. कॅप्टन टास्क साठी निवडताना किती मस्त बोलतेय ती.. जरा पण आवाज वाढवत नाहीये... एक एक मुद्दा नीट मांडते

काळेबाई म्हणाल्या "आईचा ह्यांच्या"..ममा बघू काय ऍक्शन घेईल. कसले तुटून पडलेत मेघावर. नक्कीच आता मेघा जिंकेल सिंपथी वोट्सवर.. ममा आणि रे चे मोठे सेटिंग असेल तर शक्य नाही म्हणा. काळेबाई किती कदरू आहे भिकार एकदम.

ट्विटर वर वाचलं कि लुजिंग टिम मधून एकही दावेदार असायला परवानगी नाही , अस्ताद काकु बसल्या होत्या हिरे जमवत Biggrin
आता ज्यांना भांडायचय त्यांनी भांडा, राडे करा, नाहीतर मारामार्या करा, आ.रे.स.पु पैकी कोणीही दावेदार नाही या फॅक्टमुळे मी सध्या खुष.
आता नंकि कॅप्टन झाला तरी प्रॉब्लेम नाही मला.

स्मिता आवडायला लागलीय आता.
किती कमी बोलली पण तीच लक्षात राहिली. नकि पण भारीच... सारख काय आलाव आलाव - आम्ही काय अलिबाग वरून आलाव काय Lol

नंकि चे एक्स्प्रेशन्स भारी होते बिबॉ ने नावे डिक्लेअर करायला सांगितल्यावर.

लुजिंग टिम मधून एकही दावेदार असायला परवानगी नाही , अस्ताद काकु बसल्या होत्या हिरे जमवत >>> खरंच का! तसे असेल तर फारच फनी आहे हे Lol

आस्ताद डो क्या त गेला लई..>> +1111111तो त्या मॉल टाईप टास्क मध्ये गेलातर नक्कीच मार खाईल. माजोरडा नं 1. तरी बर टिनपाड फेमस नट पण नाहीये.

Megha might be fake,drama queen,loud, manipulative ...Whatever it may be..But she has guts ....It's not easy to face so many people at a time....
Tichya jagi sai kiva Resham imagine karun bagha...Sai radat basali asati 4 tas ani resham pco madhe....
Megha ne mast fight dili public la....
Aastad kale nalayak...pushkar chya khandyawar banduk theun megha war golya jhadatoy. ...

मेघा आवडत होती, पण जाम डबल ढोलकी आहे. एकदा गेम सुरू केली की स्वतःसाठी वेगळे नियम आणि दुसर्याला वेगळे लावते . तिचे मोदी टाईप समर्थक तशेच री ओढतात. एकदा तुंबवायला सांगितलंस ना? मग लघवी असो की उलटी ! काय फरक ? रेशमला शीर्षासन सांगितले तिने गेम सोडली , मेघाला जमत नव्हता तर गेम सोडायची.
स्वतः केला तर चमत्कार दुसर्याने केला तर .....

अतिशय हलकट बाई आहे. तिने सगळ्यांना वापरून घेतले आहे. वोट विभागू नये म्हणून एक विरुद्ध बाकी सर्व असे केले आहे. सहानुभूती मिळवायला केलेले गेम आहेत. इथे मात्र मामी संत सावित्री असल्याच्या थाटात आरत्या करत असते.

एकाद्याची कायम बाजू घेतली की त्याच्या चूक सुद्धा दिसत नाही असे झाले आहे.

ती मेघा आणि पुष्की राहीला बाजुला ट्वीटरवर सगळे आस्तादला जबरदस्त ट्रोल करतायत!
कसला छद्मी आहे राव तो!

खरंय शाहिर तुमचं...
मेघा मला आधी आवडत होती पण आता जाम डोक्यात जातीये.... सारखी आपली स्वतःचीच टिमकी वाजवतीये...दुसर्यांना काही बोलूच देत नाहीये... मी म्हणते तेच खरं... अरे... नांकि बेष्ट्ट... स्वतःवर मस्त टिकून राहिला.. तो म्हणे तू आधी अस वागली तेच तुझ्यावर उलटलं..मी चांगला वागलो सो रिटर्न मध्ये ते पण चांगले वागले... आलाव वाल 1 नंबर होत.... स्मिता balanced वाटते... नेहेमी calm असते.. श रा मध्ये दम नाही... सई पुष्की चा आता कंटाळा आला..रेशम चक्क बरी वाटायला लागलीये आता आस्ताद मेघा पुष्की सई समोर...आस्ताद काय वस्ताद आहे...

हिडीस वागले आरे आणि सपु. शरा बिचारी सॅंडविच बनली यांच्यामध्ये. सई मुद्दाम त्या रूममध्ये काय गेली ऐकायला, त्यांचं ते बघतील ना. मेघाचा आवाज ऐकवत नाही तरी हौस केवढी तिला ऐकायची. पु काही बोललाच नाही नुसता आस्तादच्या मागे मागे गेला आणि मेघाला म्हणतो हिंमत असेल तर समोरासमोर बोल, अरे तुझ्यात एवढी हिंमत होती तर तू दोन गुंडं का घेऊन गेलास बरोबर. एवढं मेघाला काॅर्नर केलं तरी डोळ्यातून पाणी काढलं नाही तिने. स आणि पु काय बोर करताहेत कालपासून.

एवढ्या सर्वात स्मिता ला कोणी वाईट म्हणत नाहीये. कुठल्या कुचालक्या नाहीत , गलिच्छ पोलिटिकस नाही. गद्दारी नाही.
मीमी चा पाढा नाही, प्रामाणिकपणे टास्क खेळते.पेड ट्रोल नाहीत

स्मिता जिंकावी

मेघा पाहिले अडीच लिटर दुध वरून तीन ग्लास दूध वर आली..ते दिसत नाही वाटते इथे..अन किती ते खोटे बोलते..फक्त victim card वापरायचा आहे तिला..नंकी बरोबर बोलत होता तिला..ती बाकीच्यांना काही क्रेडिट देतच नव्हती..अन आता पण पु ला मीच कॅप्टन केला म्हणतेय..हे म्हणजे अप्पलपोटी पानाचा कळस आहे..

आताचे जाऊद्या, सुरुवातीला रे पिंकी रा कडू काळेबाई ह्या सर्व सोट्याना पुरून उरली मेघा. इथे स्मिता कमी पडली. मेघाच्या फायटिंग स्पिरिट मुळे तर मजा आली. तिने काहीतरी स्टँड घेतला ह्या लोकांविरुद्ध जो स्मिताने कधीच नाही घेतला.

आता उलट कोणी फेअर खेळणे, खरे बोलणे , मैत्रीसाठी त्याग वगैरे बोलले तर च जोक होईल तो. बाय हूक ऑर क्रूक सगळेच जिंकायचा प्रयत्न करणार. पुष्की आणि आस्ताद काय कोकलत होते ब्लॅडर वर ताण आला आणि ते किती सिरियस असते वगैरे. मग कशाला ताण येऊ दिला? आधीच क्विट करायचे होते ना !! तसेच मेघाचे. अपेक्षा काय होती तिची? तिला माहित असायला हवे होते की आज तिने जे केले उद्या तिलाही तेच भोगावे लागणार आहे. सगळेच डबल ढोलकी कुठले.

आताचे जाऊद्या, ">>>

मोदी व मेघा समर्थक गिरे तो भी टांग उपर...

फायटिंग स्पिरिट? सतत भुकंत राहण्याला फायटिंग स्पिरिट म्हणायचं ? तिला महिती आहे , बिगबॉस मध्ये फिझिकल होता येत नाही. त्यामुळे फक्त बोलते , टीआरपी साठी गलिच्छ खेळते, इंडस्ट्री मधले इथे कोणी असतील तर ते मांज्याचे आणि तिचे संबंध सांगतील

मेघा मला पण आवडत होती आधी, पण तिचं सध्याचं वागणं प्रचंड खटकण्याजोगं आहे.
तिने पुष्करला इतका त्रास दिला, त्याचं उट्ट त्याने दुसर्‍या दिवशी काढलं तर लगेच हिने तक्रार केली, उलट्या केल्या पण टास्क सोडला नाही. पुष्करला शू करायची नाही आणि करायची असेल तर क्विट करून जायचं अशी अट घातली. पुष्करने सेम अट घातली तरी ती न क्विट करता उलटी करायला गेली.
आणि आज तर प्रचंड खोटं बोलली. माझ्या मनातून उतरली.

ही पण तिची स्ट्रॅटजी असणार. आता उरलेल्या शेवटच्या दिवसात इन्डिव्हिज्युअल गेम खेळायचा ठरवला आहे तिने, अचानक अस्तादला सहमती दाखवून त्या वागण्याची नांदी केली.

Pages