बिग बॉस - मराठी २

Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_6.jpgsharmishtha-raut_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

बरं बाबा मेघा च जिंकणार कारण मेघा ला सर्व कळतं, मेघा ला सगळं येतं, Lol

कारण ती सॉफ्ट स्पोकन आहे, विचार करून बोलणारी आहे, साधी आहे , अजून काय बरं....... हा ! खूप निरागस आहे. ........ अजून.....हो हे राहिलंच.... कद्धी कद्धी खोटं म्हणून नाही हो बोलत ....सालस भारीच

सई कॅप्टन झाली Sad

काल जी भीती वाटलेली तेच झालं.

मेघाला बोलले तिचे चुकलं म्हणून पण आ स पु रे ला एवढं बोलले नाहीत म मां. सई मेघा तिच्याशी बोलते ते सर्व पुष्करला सांगत होतीच आणि आता आस्तादला सांगते जाऊन जाऊन. मी अनसीन अनकट नाही बघत पण ती क्लीप काढली म्हणे. उलट ते काय समोर दाखवायला हवं होतं. आस्ताद अतिशय वाईट बोलला असेल आणि हे सगळे हसले असतील तर का लपवता आणि म मां का नाही बोलत ते.

मेघा जे बोलली ते सगळं दाखवलं, तिने तसं बोलायला नको होतं, शर्मिष्ठापण गप्प करत होती तिला, म मां नी सर्व काढलं की ते मग आस्तादचं का लपवतायेत, bb . त्यालाही बोला की.

आरेसपु ना एवढं नाही बोलले. सई तर स्मितावर कित्ती जळायची, वाटेल तसं बोलायची तेव्हा कधी म मां बोलले नाहीत. मेघाला बोलायला हवंचं होतं, ती जे रागाच्या भरात बोलली ते मला नाही आवडलं पण बाकीच्यांना सूट नको. आ ला छपरी वरून बोलले पण सई पण वाईट शब्दात काहीतरी पुष्करशी बोलली मेघासाठी ते नाही काढलं.

स्मिताचे मात्र कौतुक केलं dignity आहे तिच्यात आणि ती कधी कोणाबद्दल वाईट बोलत नाही म्हणाले, कौतुक एका वाक्यात आटपले, टीका करतात स्मितावर तेव्हा चार पाच वाक्यं असतात त्यांच्याकडे पण नशीब तेवढं तरी म्हणाले. जरा स्मिताला आस्ताद बोलला ते लगे हात त्याला सुनवायला हवं होतं.

सगळीकडे आजच्या भागाचे रिव्यु बघुन हसु येतयं आता..

रच्याकने कोणी शिल्पा शिंदे जिंकली तो बिबॉ सिझन पाहिला का ?
आत्तापर्यंतचे बर्‍यापैकी सिझन्स पाहिलेलं आहे का कोणी इथे?
मला एक शंका होती कारण, लोकं बाहेर ज्याला सपोर्ट करतात त्यालाच सलमानने व्यवस्थितरित्या टारगेट करुन शिव्या दिल्या आहे का? आणि कॉलर ऑफ द विक सुद्धा जो सॉल्लीड्ड प्लेअर असतो त्याला शिव्या घालतो हमेशा असच चालत का तिथेही?

स्मिता अख्या सोशल मिडीयावर सर्वात कमी हेटर्स अस्स्लेली स्पर्धक असावी , बघुया याचा फायदा होऊन टॉप ५ मधे जातेका ते !

रच्याकने कोणी शिल्पा शिंदे जिंकली तो बिबॉ सिझन पाहिला का ? >>> नाही ना गं. कोणी कोणी लिहिलंय सो मि वर शिल्पा शिंदेसारखी वागते मेघा, तिचे बघून.

मी पहिले तीन पाहीले हिंदी मग नाही बघावंसं वाटलं, मराठी पहीलाच बघून नको झालंय.

स्मिता अख्या सोशल मिडीयावर सर्वात कमी हेटर्स अस्स्लेली स्पर्धक असावी , बघुया याचा फायदा होऊन टॉप ५ मधे जातेका ते ! >>> डीजे मला आता भीती वाटते स्मिताची. स पु जळत होतेच तिच्यावर, हल्ली आस्ताद पण येता जाता बोलतो. ती targeted.

स्मिताकडून शिका जरा सर्वांनी हेही बोलायला हवं होतं म मां नी.

श्या यार स्मिता कॅप्टन व्हायला हवी होती.

त्यावर हा संस्कारी आस्ताद म्हणे की या दोघी काय ब्लू फिल्म मधे कामं करतात का की ईशारे करायला त्यावर रेशम लोटपोट होउन हसत आहे .तिथेच स्त्री दक्षिण्य दाखवणारा पुष्कर बसला होता ,निषेध निषेध

Checkout Aastad gossips about Megha! on Voot https://go.voot.com/bLtwGxNgmO
>>>
हा id मेघा चा आहे का..किती खोटं बोलतोय..ती क्लिप या लिंक वर अजून आहे. त्यात अस्ताद स्पष्टपणे पुष्पक फिल्म बद्दल बोलतोय..यांचे कान चेक करायला पाहिजेत..ते mob lynching असाच होत असेल..इथे इतके शिकलेले लोक असून पण पॉर्न का पुष्पक हे पण चेक करायचा प्रयत्न करत नाहीयेत..

तो आस्ताद जे बोलला तो व्हिडिओ काढला म्हणतात voot वरून. मी बघत नाही काही जाऊन. पण तो आस्ताद वाईट बोलल्याचे बऱ्याच जणांनी लिहिलंय सोशल मिडियावर आणि कोणी कोणी सई लोकूर च्या आईला tag करून पाठवलं आहे.

बाय द वे सई मेघाबद्दल वाईट काहीतरी बोलली त्याबद्दल अवाक्षर काढलं नाही म मां नी, त्याबद्दल पण काहींनी लिहिलंय. त्याबद्दल पण बरेच जण बोलतायेत कारण वीणा लोकूरने अपशब्द वापरणाऱ्याना केस करेन सांगितलं मग त्यांनी ते व्हिडीओ डिलीट केले पण तुमची मुलगीच आता असं बोलते त्याचं काय असं म्हणणे आहे काहीजणांचे.

अॅलन_ट्युरिंग >> तो विडियो एडिट केलाय पण त्याआधीचा ट्विटरवर फिरत आहे म्हणे.. मी पाहिलं नाही म्हणुन कमेंट्पन केलं नाही पण असेलही..

कोणी नोटीस केलं का, ममा स्मिताला बोलले शिर्षासनाचं , पण रेशमाने पक्षी मोजणे ,सईने रंग मोजणे / जोक सांगणे अशी सासूला न शोभणारी कामं दिलेली कि , फक्त स्मिताचंच कामं दिसलं? आज तरी बोलले नाहीत, उद्या बघू. बाकी एपिसोड पार्शिअल होताच , १ मिनिटांपूर्वी म्हणाले कि मागचं काढू नका,let bygones be bygones आणि पुढच्याच क्षणाला आस्तादने २ आठवड्यापुर्वीच्या झेंडा टास्कचं काढलं आणि त्याला ते पूर्ण बोलू दिलं. मेघाला बोलायला परवानगीच देत नव्हते. आ रे ला एवढंच म्हणे कि मला तुमचं काही पटलं नाही.
मला नाही वाटत ते बिग बॉस बघत असावेत , कोणीतरी review देत असावा किंवा स्क्रिप्ट असावी तेवढं बोला.
आणि स्वतःचेच नियम लावतात ते. हिरा म्हणे तुम्ही मिळवलेलाच पाहिजे ना मागून/चोरून कसा चालेल? तिजोरी टास्कला चोरलेले पैसे चालले तसेच. एवढा शांतपणे /निमूटपणे गेम खेळलेला खुद्द बिग बॉस ला चालत नाही हे त्यांनी कितीवेळा दाखवून दिलंय.

मांजरेकर बिबाॅ होस्ट म्हणून अगदीच भंगार ठरलेत. पार्शल, बोलात बोल नसलेले आणि सलमानच्या होस्टिंग लेवलच्या आसपासही पोहचू न शकलेले. टोटल फेल्युअर.

सलमानच्या होस्टिंग लेवलच्या आसपासही पोहचू न शकलेले. >>> अगदी अगदि मामी! मी फ्क्त एकच सिझन बघितलेला आणि त्यात तरी तो मला कधिही बायस वाटला नाही,घरात असलेल्या पैकी तो कुणाला खुप जवळुन ओळखत असला तरी तो निट सम अप करायचा.

मांजरेकर बिबाॅ होस्ट म्हणून अगदीच भंगार ठरलेत. पार्शल, बोलात बोल नसलेले आणि सलमानच्या होस्टिंग लेवलच्या आसपासही पोहचू न शकलेले. टोटल फेल्युअर.>>>>अगदी. ते पण आस्तादसारखेच वचावचा ओरडतात. त्यामुळेच कदाचित त्यांना आस्तादचं काही चुकल्यासारखं वाटत नसेल.
इथे आस्ताद पोर्न फिल्मबद्दल काही बोलला नाही यावरून वाद चाल्लेत. पण तेवढं सोडून तो बाकी काही बोल्लाच नाही का? सुर टिपेला लावून ओरडत आला मेघावर. तेही त्याचा काही संबंध नसताना. केवळ मजा करायची म्हणून आणि पुष्करला क्षणिक पाठिंबा(?) द्यायचा म्हणून. मेघा चुकीचे शब्द बोल्लीच पण समोर इतके लोक अंगावर 'कुत्र्यासारखे' ओरडत असताना कोण गप्प बसेल? तो राडा जाणूनबूजून आ रे स पु नी तयार केला आणि मेघाला नको ते बोलायला भाग पाडलं.

अहो मेघाला सपोर्ट करणं ठीक आहे, पण त्यासाठी कुणाची प्रतिमा खराब करण्यात काय अर्थ आहे?? मी जेवढे भाग पाहिलेत त्यात आस्ताद ने साधा चू# शब्द पण वापरलेला नाही, जो तुमची मेघा जप केल्यासारखी वापरते. आणि एडिट वगैरे काही नाही, न बघता विष पसरू नका. जिंकणारे जिंकतील, पण तुम्ही खोटे पसरून तुम्हाला काय मिळणार आहे? हा जर तिची pr टीम म्हणजे तुम्हीच असाल तर गोष्ट वेगळी! त्या क्लिप मध्ये 2 वेळा पुष्पक चा उल्लेख आहे, बघितलं नसेल तर बोलू नका!

I too have watched the clip....
I heard beep for whatever astad said...
I never heard word "pushpak". ...
And not sure if he said "porn" or "blue"...

Pan Pushkarla manjrekar kaheech bolale nahit, he chukiche ahe, to pan meghabaddal kiri vait bolato...

तो पुल-व्हॉलिबॉल टास्कने सई कॅप्टन झालेली पाहून धक्काच बसला. खरं तर कॅप्टनशीप लढत किंवा व्होटींग फक्त स्मिता आणि नंकि यांच्यातच व्हायला हवी होती. फक्त टीम पाडण्यासाठी म्हणून सासू-सून टास्क केला असे वाटले. स्मिताने केलेले चांगले काम फुकट गेले.

बहूतेक तो सासू-सुन टास्क मेघा आणि पुष्कर यांच्या भांडणासाठीच ठेवला असावा असे वाटले.

बाकी आस्तादने मेघाला चांगलेच सुनावले ममांसमोर. मेघासारख्या पाताळयंत्री बाईला असा डोस हवाच होता. याचा अर्थ मला सई पुष्कर आवडतात असे नाही.

आता स्मिता, रेशम किंवा आस्ताद यांच्यापैकी कोणीही एक जिंकलेला आवडेल. पहिली पसंती स्मिताच...!!

तो नेमका तेव्हाच वाईट बोलतो जेव्हा मांजरेकर BB बघताना ब्रेक घेतात. त्यामुळे त्यांना माहीतच नाही कि तो पाठीमागे बोलतो. :-प
आणि ते जे करतात ती चर्चा बाकी करतात ते बिचिंग .

Shaniwarich kahitari baher jaat aani rawiwari announcement hote.. toparyant to manus baher aalela kalat asel lokaana aani pasarat asel batami..

Andaaj

आता स्मिता, रेशम किंवा आस्ताद यांच्यापैकी कोणीही एक जिंकलेला आवडेल. >>> लोकान्ना रेशम अणी आस्ताद कसे काय आवडतात देवा ला ठाऊक!!!! परवा च्या वादा वादी मधे पण रेशम फक्त आस्ताद ची री ओढत होती, तो ओरडला की ती ओरडायची तो छद्मी मोठ्याने हसला की या बाई. पण स्वताचा काहिच कंटेंट नाही

याचा अर्थ मेघा सर्व गुण सम्पन्न सज्जन व्यक्ति आहे का तर नाही , पण तिला तिच्या विरोधात असलेल्या गोष्टीचा पण स्वताला सहानभूति gain करण्या साठी वापर करता येतो हे तिच स्किल आहे आणि बिग बॉस मधे चाणक्य नीति किवा दुनियादारी करनरया लोकांचा निभाव लागतो आणि सध्या तरि तिला कोणी नाही competition. त्या घरात हे रेशम वगैरे फक्त हवा केलिए

आधिच्या एक unseen मध्ये तर आस्ताद ,सई, पुष्कर मेघा शी गप्पा मरताना suggest करत होते की तु जा हिन्दी बिग बॉस मधे वाट लाव किवा बिग बॉस साठी लोकन्चे classes घे. अजून एक किस्सा त्यात म्हणत होते की मेघा च गेम जाहिर झाल्यावर रणनिती आखुन झालेलि असते सर्वात आधी . यातन त्यानी मान्यच केला होत की ती strongest player आहे आणि हे जेन्यूईन होत सारकेस्टिक नव्हत.

ट्युरिंग, तुम्ही चुकीचं बोलता आहात. त्या क्लिपमध्ये दोन सिलॅबल्सवाला शब्द बोललाय आस्ताद शिवाय तो बीप केला गेलेला. तो शब्द ब्लु असावा असा माझा कयास आहे.
असो. स्क्र्यु हा शब्द इतका निरूपद्रवी झालाय??
अंजुताई, स्मिता तो छा गयी!! खुप छान..

शनिवार आणि रविवार दोन्ही दिवसांचे एपिसोड्स एकाच दिवशी शूट करत असतील ना. मग शनिवारीच एलिमिनेशन होत असणार. आणि तो सदस्य त्यांच्या सेटवर किंवा एखाद्या जवळच्या हाॅटेलमधे राहत असेल. पण बाहेर कुणाशी संपर्क साधायला मनाई असेल जोपर्यंत टीव्हीवर एलिमिनेशन दाखवलं जात नाही.

काल मांजरेकर मेघाला बोलले ते योग्यच होते.... जे ती चुकली आहे ते ती चुकली आहेच!
मेघाला कुणीतरी हे सगळे सांगायची गरजच होती.... तिला सगळ्यांचा टोकाचा राग आलाय मान्य पण लोकांबद्दल इतके वाईट बोलून ती सगळी सहानभूती दुसऱ्यांना मिळवुन देईल!
शरा इतकी पोटतिडकीने सांगत होती तिचे ऐकायला हवे होते मेघाने.... इतके दिवस कंट्रोल केले होते आता थोडक्यासाठी गंडू नये.... आता आस्ताद बोलायला मोकळा की आम्ही तोंडावर नावे ठेवतो पण तू तर पाठीमागे बिचींग करतेस!
कंट्रोल मेघा कंट्रोल
काल सबंध एपिसोडभर मेघाचे डोळे पाणावलेले होते

मुळात कॅप्टन्सीची स्पर्धा फक्त चौगुले आणि स्मितामध्ये होणे अपेक्षित होते.... घेता कशाला मग हिरे जमवाजमवीचे टास्क?
का स्मिता आणि चौगुले कुणालाच कॅप्टन्सी द्यायची नव्हती म्हणून आयत्यावेळी फिरवलेला निर्णय होता तो?

मेघाने काल लगेच कॅप्टन्सीसाठी सईला सपोर्ट दाखवून पॅचअपचा अजुन एक प्रयत्न केला पण नंतर सगळ्यांनीच सईला मते देउन मेघाच्या सपोर्टचे महत्वच घालवून टाकले
आस्तादने काल आता आपल्याला मते मिळणारच नाही म्हंटल्यावर लगेच सईचे नाव घेउन दिलदारपणाचा आव आणला.... हेच जर पहीले मत आस्तादला विचारले असते तर त्याने नक्कीच सईचे नाव घेतले नसते!

आता आज मांजरेकर काय करतात बघू?
सलमान अश्या वेळी एकटे पडलेल्या सदस्याला फुल्ल सपोर्ट करायचा (आठवा गौतम गुलाटी)
आता परत परत झेंड्याच्या टास्कचा विषय निघत आहेच तर रेशमने लपवलेल्या झेंड्याची क्लिप दाखवाच!

मेघाने आता कुणालाही कसलीही explanations न देता आणि कुणाकडूनही कसलीही अपेक्षा न ठेवता आपला आपला गेम खेळावा!
उरलेल्या लोकांच्यात फूट पडायची वाट बघावी कारण आत्ता घरातले कुणीही तिचे काहीही ऐकुन घेण्याच्या मनस्थितीत नाहीये.... थोडे टोन डाउन करावे आणि योग्य वेळी आपले पत्ते खेळावेत!

मेघाने आता कुणालाही कसलीही explanations न देता आणि कुणाकडूनही कसलीही अपेक्षा न ठेवता आपला आपला गेम खेळावा!
उरलेल्या लोकांच्यात फूट पडायची वाट बघावी कारण आत्ता घरातले कुणीही तिचे काहीही ऐकुन घेण्याच्या मनस्थितीत नाहीये.... थोडे टोन डाउन करावे आणि योग्य वेळी आपले पत्ते खेळावेत!>>>>> सहमत.
मेघाने खरं आता किचाट करत बसू नये. ती शांत राहीली की डोकं जास्त चालतं तिचं. उरलेल्या लोकांमधे फूट पडणारंच आहे.

Pages