बिग बॉस - मराठी २

Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_6.jpgsharmishtha-raut_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

स्मिताला आता तरी अक्कल यावी. तिने मेघा-शरा ग्रुप जॉइन करावा. आस्त्या-रेशम, पुष्कर सै या दोन्हीही जोड्या लूझर मेंटॅलिटीच्या आहेत.

सासू सून टास्क मध्ये थकवणारे house wife टाईप्स खूप कामे देण्यासारखे होते. उदा. सगले घर झाडून घेणे. पोछा मारणे, टौयलेट्स साफ करणे, बेडशिट्स बैंकेट्स धुणे, मोठी रांगोली काढणे. हे पी अन् ते पी करण्यापेक्षा. ++१११ >>>> अगदी अगदी. झाडू मारणे, भान्डी घासणे, तान्दूळ डाळ वेगळे करणे हे पटणेबल होत. पण दुध पी, पाणी पी, प्राणी पक्षी मोज हे सासु टास्क?

जगातील अशी कुठली सासू असेल जी आपल्या सुनेला 'योगा' करायला लावून छळ करेल? हे तर 'खेळणी' टास्क सारख झाल.

स्मिता बहुतेक आदर्श सुनेचा किताब पटकावेल big boss मध्ये. कित्ती प्रामाणिकपणे पक्षी मोजत होती! Lol

उर्मट मेघा दोन उलट्या केल्या म्हणून २ हिरे मागत होती, मठ्ठ कुठली. >>> मला मात्र मेघाच पटल.

शर्मिष्ठा उगिचच का इंग्रजी बोलायचा प्रयत्न करते? Uhoh मी कुणाच्या इन्फ्लुएन्स खाली टास्क करत नाही हे सांगताना तिला जे काही रडूसदृश कोसळलं होतं ते साफ खोटं वाटलं. >>>> +++११११ रात्री कशाला रडगाणे गात होती देव जाणे. हिच्यात सुशान्तचा आत्मा शिरला की काय, जेव्हा बघाव तेव्हा रडत असते.

अस्तादची स्ट्रॅटेजी मला आवडली होती. >>>> कसली? प्राणी पक्षी मोजण्याची? Proud

सईने मेघाशी patch-up केल्याच नाटक केल होत.

आस्तादने किशोरला कस छळल ते नाही दाखवल. मेबी आज दाखवतील.

मेघा एक चांगली प्लेयर असेल पण माणूस म्हणून नीच आहे. रिकी पोंटिंग सारखी आहे.>>> हो, मलाही असेच वाटतेय

पुष्कर डेन्टिस्ट आहे ना, मग त्याला उलटी कन्ट्रोल करता येत नाही इतक साध कळू नये? कमाल झाली! Uhoh>>>> मुळात तोच त्यांचा प्लॅन होता की त्यामुळे मेघाने गिव्ह अप करावे. मेघाला कदाचित एखादी उलटी झाली असेल अन बाकीच्या नाटकी, फक्त वेळ काढण्यासाठी, असे ती स्वतः बोलली भाग्यश्री ला

>>उर्मट मेघा दोन उलट्या केल्या म्हणून २ हिरे मागत होती, मठ्ठ कुठली

मला वाटतय की एका उलटीला (पुष्करला दिलेला) एक हिरा या न्यायाने तिने प्यायलेल्या एक ग्लासला एक हिरा तिला मिळायला हवा असे ती म्हणत होती!

आस्त्या-रेशम गाढवासारखे लोळत चर्चा करत होते. रेशमला वाटतं सई एपिसोडमुळे मेघा जाऊ शकते. आस्त्या म्हणतो, नाही ती स्ट्राँग आहे, ती पहिल्या पाचात असेल. शेवटच्या दोन मध्ये मात्र नसेल. कुठून एवढा कॉन्फिडन्स आणतात ही मंडळी नक्की???
ही बाहेरून निरोप घेऊन येणारी मांडळी यांचा घात करणारेत..

आस्त्या म्हणतो, नाही ती स्ट्राँग आहे, ती पहिल्या पाचात असेल. शेवटच्या दोन मध्ये मात्र नसेल>>हे वाक्य तो बहुदा मेघा साठी बोलला, overconfidence चा बादशाह Lol unseen वर आहे वाटत

>>मला हिरे हवेत नाहीतर मी राडा करीन असं जेव्हा मेघा म्हणाली तेव्हा रेशम म्हणाली कर राडा आम्हाला पहायचं आहे, त्यावर मेघा काही नाही बोलली. हाऊ फनी Proud
Lol
[जो गरजते है वोह बरसते नही!]
ईथल्या काही पोस्टी वाचून अशक्य करमणूक होते आहे. तर मेघा आणि तीच्या कं ची कोंडी झाल्याने चाललेली धुसफूस, फ्रस्ट्रेशन बघून अगदीच कीव आली. आता फॉन कॉल्स फेक काय, तर सोमि चा बागुलबुवा काय बिबॉ चे सेटींग काय.. अगदीच शेवटचे प्रयत्न सुरू आहेत. ईतके दिवस सर्व फेयर होतं ते अचानक अनफेयर झालं वाटतं.. Proud
रेशम विनर हे फिक्स आहे तर मेघा कं ईथे कशाला वेळ फुकट घालवत आहेत.. Proud
खरे तर कुणिही का जिंकेनात ईथले घमासान बघून जास्त करमणूक झाली हे खरे.
लगे रहो..

सै जावी अस मनापासुन वाटतय,पण channel काढ़नार नाहित तिला.या आठवदयात किशोर चा नम्बर लागेल .
मागे राजेश वगैरे लोक असच बोलायचे की सै कशी उद्धट आहे सतत माज घेउन रागात वावरत आसते ,पण तेव्हा त्याच लोकान्चे राडे एवढे होते की त्यात सै चे दुर्गुण shadow झालेले.आजच्या भागात पण ती आस्ताद रेशम बरोबर मेघा बद्दल बिचीन्ग करतेय अस दाखवल.सै कशी पण वागो मेघाने कधिच दूसर्या ग्रुप मधे जाउन तिच्या विषयी बोलली नाही . हे मैत्री मधे लोक वागतात जेव्हा ते आपल्या मित्रावर जेलस असतात .

सई आता मेघाला बॅकअप म्हणून वापरणार आहे. एकटा पुष्कर तिला वाचवू शकत नाही. आणि मेघा being stupid सईला खरंच सपोर्ट करणार.

मला वाटतय की एका उलटीला (पुष्करला दिलेला) एक हिरा या न्यायाने तिने प्यायलेल्या एक ग्लासला एक हिरा तिला मिळायला हवा असे ती म्हणत होती!>> मेघाने तिने प्यायलेल्या प्रत्येक ग्लास चा आधी हिरा मागितलेला. पुष्करने तिने केलेल्या उल्टीचे हिरे घेतले, कारण तिने उल्ट्या त्याला ना विचारता केल्या म्हणून .

उष्ट्राणां च विवाहेषु गीतं गायन्ति गर्दभा:| परस्परं प्रशंसन्ति अहो रुपमहो ध्वनि:|| --काळेबाई न चिपणीस साठी. चिपणीस आज स्मिता जे टास्क करत होती त्याचं अप्रुव्हल काळेबाईंकडून घेत होती. प्रचंड खुनशी आहेत दोघे, त्यांचा चेहरा कसला पडला मेघा टीम जिंकल्यावर. आज स्मिताला रडवलं काळेबाई ने, होप अंजु तै ने बघितलं असेल ☺️

खरंच, मेघा कधी खुनशी वाटत नाही त्या रे, आ, सईसारखी. तिला जिंकायचे आहे त्यानुसार ती स्ट्रॅटेजीज करते आणि मेहनतही घेते. बाळंतीण रेशम (तिचा वावर आणि बिबॉ, महेशची तिला असलेली ट्रिटमेंट पाहुन असेच वाटते) अजगर आस्ताद सारखी काड्या करत लोळत बसत नाही.
सासु झाल्यावर सईचे आजारपण पळुन गेले. हाकला तिला.
पुष्कीला मेघाची खुप भिती आहे. त्याला महित्ये तीच त्याची कॉम्पिटिशन आहे म्हणुन तो असा पिसाळलाय.

मेघाची टीम जिंकली का? गुड. आता या लेवल ला कॅप्टनशिप आणि इम्युनिटीचे महत्त्व लक्षात घेता लोक कॅप्टनशिप च्या उमेदवारीसाठी एकमेकाचा जीव घेतील किंवा कसे ते बघावे लागेल! Happy फिजिकल टास्क असेल तर अ‍ॅज युज्वल बैल लोकांना फायदा होणार.
स्मिताचे मराठी इतके काही वाईट नाहीये अ‍ॅक्चुअली. आणि असले तरी आस्त्याने काय भाषाशुद्धीचा ठेका घेतलाय की काय, हा कोण तिला बोलणारा. स्मिताला (कुठल्याच भाषेत) आर्टिक्युलेट करता न येणे हा तिचा प्रॉब्लेम वाटतो . सई चे मराठी तरी किती दिव्य आहे! रेशम पण काहीच्या काही धेडगुजरी बोलते तेव्हा हा आस्त्या का नाही टोकत तिला.

रे ने आज स्मिताला छान सांभाळून घेतलं पण, स्वतः ची स्तुती करून घेतली पण प्रत्येक गोष्टीनंतर हिरे दिले तिला. ती रडत होती तर आ ला जाऊन बोलली रे.

आज पाट्यावर वाटलं स्मिताने.

सई रे पेक्षापण मनातून उतरली. मैत्रीण आजारी तर काही वाटत नाही. कामे असली की आजारी आता उद्या task साठी उभी राहील दादागिरी, मारामारी करायला.

सासू सून टास्क मधे बिबाॅ ला नक्की कोण योग्य वाटलं हे बिबाॅ ने दुसऱया दिवशी सकाळी ८ वाजता गाणं वाजवून इनडारेक्टली सांगितलं... गाणं होतं
“बरसो रे मेघा मेघाWink

आणि स्मिता सुपर एंटरटेनिंग होती

स्मिताला तो पाटा-वरंवटा फोडायचं काम दिलं असतं तर तेही तिने मनापासून केलं असतं. रेशम तिला समजावून गेल्यानंतर कशी सांगत होती केडीला, मला टोरांटो फिल्म फेस्टीवलमध्ये बेस्ट अॅक्ट्रेसचं अॅवाॅर्ड मिळालं आहे, पण मी सांगत नाही कुणाला, मला फार निरागस वाटली ती त्यावेळी. आस्तादचंही बरोबर होतं, लेखकाचे संवाद वगैरे पण त्याचा टोन डोक्यात जाईल असाच होता. कोणालाही अपमानास्पद वाटेल. सईला पुष्की आणि मेघा दोघंही हवे आहेत. ती पुष्की पुष्की करत राहणार आणि मेघाने तिच्या मागे मागे फिरायचं का सैड्या सैड्या करत, कायपण अपेक्षा. पुष्की म्हणाला सईला की तू मेघाबरोबर वेळ घालवलास तरी चालेल याचा अर्थ मला तुझीही गरज नाही पण सईला ते कळतच नाही. सई किती खुनशी आहे, उद्याच्या भांडणातही ती मेघालाच बोलतेय, कमाल आहे सई आणि पुष्कीची.
हो ना अंजू, सईला बरं नव्हतं तर मेघा किती आपुलकी दाखवत होती आणि आज सई विचारते तुला नक्की दुधामुळेच उलट्या झाल्या का. मेघाचा संताप बरोबरच होता.

Pages