Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे


विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
डीजे स्मिताला नाही जमत ग
डीजे स्मिताला नाही जमत ग स्वतःला प्रमोट करणं, त्यात ती म मां ना घाबरून असते. ती सर्वांत tallented असून सतत मागे मागे, सॉफ्ट टार्गेट आ स पु ची पण.
स्मिताने पुष्करला विचारलं चक्कर नाटक पण तिला हे कुठे माहिती होतं की राडा होईल, उमेदवार ठरत नव्हता. स्मिता निमित्य झाली फक्त. आधीपासूनच आ म्हणत होता की घुसूया का नडुया का या टाईप, सई पण पुरेपूर आग लावत होती की.
स्मिता खरंच चांगली आहे, बिचारीला स्वतः चं मार्केटिंग जमत नाही.
वर कोणीतरी लिहिलं की कात्री मिळत नव्हती म्हणून मेघाने तोंडाने मसाला पाकीट फोडलं, ते मलाही नाही आवडलं मेघाचे, मेघा आवडत असली तरी.
स पु पैकी कॅप्टन झाले तर मला आवडणार नाही.
स्मिताने मेघाबद्दल सहानुभूती दाखवून मिन्स दुसऱ्या दिवशी झालेल्या त्रासाबद्दल, योग्य शब्दात सांगितलं की पहिल्या दिवशी तू पुष्करशी जे वागलीस ते बरोबर नव्हतं. अतिशय नम्रपणे पण ठामपणे बोलली ते स्मिता. ती जरा चुकली की आस्ताद नावं ठेवतो, वसकन बोलतो. हे गुण तिच्याकडून त्याने घेण्यासारखे आहेत. नुसतं अंगावर धावून दादागिरी करता येते फक्त त्याला. शांतपणे बोलूनही हे सर्व सांगू शकले असते आरे सपु.
शेवटी काय
शेवटी काय
तर ‘बिग बॉस’ मध्ये या घरातील सदस्यांना रोजचे हजारो रुपये देऊन भांडण करायला मोकळे सोडले आहे.
काहीही करा पण टास्क पूर्ण करा. कारण एकादा तो टास्क पूर्ण केला की तुम्ही जिंकलात. मग भले त्यात लाबडी केली तरी चालेल.
‘खोटे बोल पण रेटून बोल’ असाच काहीसा प्रकार मेघाने केलेला दिसला. कॅप्टनपदासाठी देवेदारासाठी आपण इच्छुक नाही असा आव जर आणला तरी मनात कॅप्टनसी हवीच आहे.
मुळात बिग बॉसमध्ये दिलेले सर्व टास्कमध्ये काहीना काही तरी राडा झालेलाच आहे. नळाचा टास्क, अंड्याचा टास्क, मातीचा टास्क, फुलांचा टास्क आणि आता काय तर सासू-सुनेचा टास्क. हे असले टास्क देताना हातापायी होणार नक्कीच. यात खरे तर बिग बासने मध्ये पडून नियम तोडणाºयांना फटकराले पाहिजे. मात्र, ते टिरपीसाठी गप बसतात. सर्वच नियमावली नवी करण्याची ताकद सभासदांना देतात. मग ते मन मानेल तसा टास्क पूर्ण करतात.
सासू सुनेच्या टास्कमध्ये दूध पिऊन, पाणी पिऊन शारीरिक क्षमता कशाला पाहायची आहे. खरं तर बौद्धिक टास्क दयायला हवेत.
नाहीतर पहिले टास्क काय देणार आहेत याची एखादी चर्चा ‘मायबोली’वर बिग बॉसने करायला हवी. मग नक्कीच नवीन कल्पना बाहेर पडतील. मगच तो टास्क त्यांना दयायला हवा.
कालचा एपिसोड आज बघितला वूट वर
कालचा एपिसोड आज बघितला वूट वर, भांडणं बघून डोक सुन्न झाल.सर्वात आधी डोक्यात गेली सई ही कशाला चोम्बडे पणा करत ऐकायला गेली स्टुपिड परत बाहेर येउन मेघा ची वाक्य सांगत होती .अजिबात विश्वास ठेवायच्या लायकी ची नाही आहे ती. विजयी टीम ची बचाबाची बघुन पुष्कर अन सई ला किती आनन्द होत होता ,बाकी एक observ केल की साई मेघा ला किती पण बोलो मेघा कधिच सै ला इतरा समोर बोलत नाही ,काल पण सई पुष्कर ची बाजू घेउंंन बोलत होती तेव्हा मेघा एकदा पण सई ला बोलली नाही. शरा कड़े बोलताना पण मेघा पुष्कर बद्दल राग व्यक्त करते
धक्का दायक clip वूट वर unseen
धक्का दायक clip वूट वर unseen वाली त्यात पु रे आ सै मेघा विषयी बोलात आहेत सै सांगत आसते की मेघाने कसा तिच्या कड़े हीरा मागितला. ही सै म्हनजे खरच घरचा भेदि आहे. सर्व discussion सांगत असते पुढे clip मधे शरा बद्दल बोलताना पुष्कर म्हणाल की शरा म्हणत होती की ती इशारा करुन मेघा ला सांगत होती की पुष्कर का washroom ला जाउ दे. त्यावर हा संस्कारी आस्ताद म्हणे की या दोघी काय ब्लू फिल्म मधे कामं करतात का की ईशारे करायला त्यावर रेशम लोटपोट होउन हसत आहे .तिथेच स्त्री दक्षिण्य दाखवणारा पुष्कर बसला होता ,निषेध निषेध
Checkout Aastad gossips about Megha! on Voot https://go.voot.com/bLtwGxNgmO
बाकी एक observ केल की साई
बाकी एक observ केल की साई मेघा ला किती पण बोलो मेघा कधिच सै ला इतरा समोर बोलत नाही >>> अगदी खरं. सई खुनशी आहे, फक्त तिची खुन्नस आधी जुईवर होती पण जुई किरकिरी होती मग स्मितावर खुन्नस confused confused म्हणत, आता मेघावर खुन्नस.
मला आश्चर्य या गोष्टीच वाटतय
मला आश्चर्य या गोष्टीच वाटतय की आस्ताद ला नॉमिनेशन साठी मदत केलि म्हणून एवढे खवळलेले सै अणि पुष्कि आता आस्ताद च्या गळ्यात गले घालून बरे बसतहेत। प्रत्येक गोष्ट ऐकताहैत आस्ताद दादाची. एवढाच प्रेम होत तर मग पुष्कि ने स्वता केप्टैंशिप ऑफर करायची होती अस्ताद ला। अणि रे अणि आस्ताद या दोन येडयाना आणखी येड बनाउन मेघाला टारगेट करताहेत
काल आस्तादला साक्षात्कार
काल आस्तादला साक्षात्कार झालाय ना की या सगळ्या गदारोळामुळे मेघा weak होण्याऐवजी तिला सिंपथी वोट्स मिळतील. हो खुळ्यांनो, तिला मिळतीलंच सिंपथी वोट्स. त्यानेच जिंकेल हो ती. आणि अजून तमाशे करून तुम्ही सगळे तिला मदतच करताय. करा करा, अजून नाटकं करा. Unfair squad.
मला आश्चर्य या गोष्टीच वाटतय
मला आश्चर्य या गोष्टीच वाटतय की आस्ताद ला नॉमिनेशन साठी मदत केलि म्हणून एवढे खवळलेले सै अणि पुष्कि आता आस्ताद च्या गळ्यात गले घालून बरे बसतहेत। प्रत्येक गोष्ट ऐकताहैत आस्ताद दादाची. एवढाच प्रेम होत तर मग पुष्कि ने स्वता केप्टैंशिप ऑफर करायची होती अस्ताद ला। अणि रे अणि आस्ताद या दोन येडयाना आणखी येड बनाउन मेघाला टारगेट करताहेत>>>> दुश्मन का दुश्मन दोस्त होता है.
स्मिता आणि चौघुले कॅप्टंसीचे
स्मिता आणि चौघुले कॅप्टंसीचे उमेदवार असल्याने, दोघांपैकि एक गॅरंटीड फिनालेत जाणार. उरलेल्यांपैकि एलिमिनेट होण्याचे चांसेस - (इन दि ऑर्डर ऑफ देअर एक्झिट)
हा (बारावा) आठवडा - शर्मिष्ठा, (चौघुले), सई, मेघा, आस्ताद, (स्मिता), रेशम (पुष्कर इम्युनिटी मुळे सेफ) [चौघुले/स्मिता कॅप्टनपदाच्या स्पर्धेत हरले आणि नॉमिनेटेड असले तर]
)
पुढचा (तेरावा) आठवडा - सई, पुष्कर, मेघा, आस्ताद, रेशम (चौघुले/स्मिता, बाय वर्च्यु ऑफ कॅप्टंसी आर सेफ)
फिनाले वीक - चौघुले, पुष्कर, मेघा, आस्ताद, रेशम, स्मिता [चौघुले/स्मिता बाराव्या आठवड्यात सेफ झाले असतील तर]
टॉप थ्री - मेघा, रेशम, स्मिता (तीन देवीयाँ मॉल मध्ये जाणार...
विनर - रेशम किंवा स्मिता
आय थिंक स्मिता आणि चौगुले
आय थिंक स्मिता आणि चौगुले कॅप्टनशिप चे उमेदवार नाहीच आहेत ना? दिशाभूल होती ती. ( असे मला वाटले)
आता ४ टीम्स केल्यात म्हणजे सगळेच लढत आहेत कॅप्टनशिप साठी. या व्हॉलिबॉल मॅचेस मधे फायनली जी जोडी जिंकेल ते दोन उमेदवार असतील. किंवा दोघे / दोघी डायरेक्ट सेफ होतील.
समर्थक जोड्या, उमेदवार
समर्थक जोड्या, उमेदवार जोड्यांना जिंकायला (हरायला) मदत करण्याकरता आहेत...
तसे नाहीये. काल नियम वाचताना
तसे नाहीये. काल नियम वाचताना जे ऐकले त्यावरून दोन दोन जोड्यांमधे मॅचेस होणार. त्यातल्या विजेत्यांमधे अजून एक मॅच होणार. अॅट एनी पॉइन्ट दोन जोड्या खेळत असणार आणि दोन त्यांना बाहेरुन सपोर्ट करणार. व्हिडिओ क्लिप मधे पण एका मॅच मधे चौगुलेची टीम आणि स्मिताची दोन्ही टीम्स पूल च्या बाहेर दिसत आहेत , आस्ताद आणि पुष्कर ला सपोर्ट करताना.
मॉलमधून मेघा बाहेर पडेल??
मॉलमधून मेघा बाहेर पडेल?? शंका वाटते.
मला वाटतेय, जर या तिघी असतील तर निश्चितच रेशम बाहेर पडायला हवी.
स्मिता जिंकली तर आवडेलच.
आस्ताद व्हिलनचे काम चोख
आस्ताद व्हिलनचे काम चोख बजावतोय, इथे वुट अॅप दिसत नाही पण वुट वर काहीतरी वादग्रस्तं गॉसिप करतोय म्हणॅ !
सोशल मिडीयावर लोकांनी लिहिलय कि भांडाणापलिकडे जाऊन अजुन हा त्याही पेक्षा वाइट बोलतोय, मेघा शर्मिष्ठा पॉर्न मधे काम करतात का असं काहीतरी रेशमला बोलतोय आणि सगळे ऐकतायेत इन्कलुडींग पुष्कि सई.
प्रेक्षक आधीच पेटलेत, मेघाला खाली खेचताना तो स्वतः इतका निगेटीव झाला तर तोंड लपवत फिरावं लागेल बाहेर, बहएर आल्यावर आपली इमेज इतकी वाईट दिसेल याची पर्वा नाही, अजिबातच अंदाज नाही का या लोकांना ८२ दिवसात ?
टीमची किंमत !
टीमची किंमत !
मेघाला टीमची किंमत कळली . आणि तिच्या समर्थकांना कळेल तो सुदिन
आता रडून टीआरपी मिळवायचा .
जसे हिने टास्क केले तसे त्यांनी ही टास्क केले आहेत.
<भांडाणापलिकडे जाऊन अजुन हा
<भांडाणापलिकडे जाऊन अजुन हा त्याही पेक्षा वाइट बोलतोय, मेघा शर्मिष्ठा पॉर्न मधे काम करतात का असं काहीतरी रेशमला बोलतोय आणि सगळे ऐकतायेत इन्कलुडींग पुष्कि सई.>
हो. हे खरे आहे. रेशम खदाखदा हसतेय. स्त्रीदाक्षिण्याचा महामेरू पुजो मार्मिक स्मित देतोय. आणि सैलो आपल्या पुर्वाश्रमीच्या मैत्रिणीबद्दलची ही शेरेबाजी एंजॉय करते आहे.
आस्ताद काळे हा अगदीच गयागुजरा इसम आहे. खुपच निगेटिव्ह, खुनशी असा.
मेघा शर्मिष्ठा पॉर्न मधे काम
मेघा शर्मिष्ठा पॉर्न मधे काम करतात का?
बापरे ! असले कुठे झाले ? असे असेल तर त्यांना हाकला पहिल्यांदा
सोशल मिडीयावर लोकांनी लिहिलय
सोशल मिडीयावर लोकांनी लिहिलय कि भांडाणापलिकडे जाऊन अजुन हा त्याही पेक्षा वाइट बोलतोय, मेघा शर्मिष्ठा पॉर्न मधे काम करतात का असं काहीतरी रेशमला बोलतोय आणि सगळे ऐकतायेत इन्कलुडींग पुष्कि सई.>>> अरे!! हाच अस्ताद लास्त विक मधे म्हणत होता ना की इथुन बाहेर पडल्यावर बाहेर उत्तर द्य्यावे लागेल त्यामुळे जपुन बोलतो??
ह्या क्लिप्स दाखवाच आता घरात
30 जुलाब 5 उलट्या आणि सकाळी
30 जुलाब 5 उलट्या आणि सकाळी नाचणे ! वाईट तोंडावर पडली
सई कप्तान झाली????? कशी ?????
सई कप्तान झाली????? कशी ????? का??? कोणी बघितला का आज चा भाग ????
सई कशी होईल? स्मिता आणि
सई कशी होईल? स्मिता आणि नंदकिशोर होते ना उमेदवार?
अस्ताद असं म्हणाला असेल तर
अस्ताद असं म्हणाला असेल तर खरंच अत्यंत नीच माणूस आहे. पण शुद्ध मराठीतून बोललाय म्हटल्यावर सरांना अभिमान वाटेलच लेकाबद्दल, नाही का?
आजचा एपिसोड काही बघायला
आजचा एपिसोड काही बघायला मिळाला नाही पण fb पेजवर खूप घाण कमेंट्स आहेत. ममां मेघालाच बोलले वाटतं. रेशमसाठी ग्राऊंड तयार आहे म्हणजे.
मेघाला घरात शून्य पाठिंबा आहे
मेघाला घरात शून्य पाठिंबा आहे पण बाहेर तिचं खूप कौतुक होतंय. एलिमिनेट तर नाहीच होणार ती. बाकी बिबाॅची कृपा....बाकी सगळ्यांवर.
असं बोलला असेल तरी दाखवणार
असं बोलला असेल तरी दाखवणार नाहीत. त्याने पण काल किती थयथयाट केला होता आज कुठे मांजरेकर काही बोलले त्याला?
मेघाला घरात शून्य पाठिंबा आहे
मेघाला घरात शून्य पाठिंबा आहे >>हा जर खरच ड्रामा नसेल तर किती कठिण आहे अशा परिस्थिति मधे तग धरुन राहण . सोमी वर ममाला पण खूप शिव्या पडत आहेत मेघालाच टारगेट केल आजच्या भागात, अजून बघितला नाही एपिसोड ,कोणी सान्गेल का काय झाले
माननीय मेघा समर्थक मंडळी,
माननीय मेघा समर्थक मंडळी, आस्ताद ची ती क्लिप पाहिली, आणि खात्रीच झाली की सर्व मेघसमर्थक अतिशय वाईटरीत्या कलुषित झालेले आहेत सर्व प्रकारे,
आस्ताद शुद्ध बोलतोय की या पुष्पक फिल्म मध्ये काम करतात का? पुष्पक फिल्म बद्दल वाचून घ्या नेट वर. मुकपट आहे तो...
मेघा तर घाणेरडी आहेच... असो
मेघा तर घाणेरडी आहेच... असो
मला वाटले ममा आज शाळा घेतील
मला वाटले ममा आज शाळा घेतील चान्गली आस्ताद , रे , स पु ची, पण कसले काय ....बराच वेळ मेघाच्याच चुका उगाळत बसले ..मेघाने जिंकावे हे मान्य नाही त्यांना ..मग करून टाका म्हणा रेशम ला विनर आजच !
.सलमान ला द्यायला हवा एखादा एपिसोड ..आस्ताद सरांची खरडपट्टी काढायला ..
मेघ इतकी स्ट्रॉंग प्लेयर आहे तर कशाला पुष्कर च्या मनाचा विचार करते ... खरे disloyal तर स , पु आहेत .
जिथे बघावं तिथे मेघाचीच चर्चा
जिथे बघावं तिथे मेघाचीच चर्चा सुरू आहे, बिगबॉस न राहता 'द मेघा शो' झालाय असं वाटतंय...
Pages