पायांमध्ये गुंतलेले पाय माझे

Submitted by राव पाटील on 24 May, 2018 - 09:39

पेरना: https://www.maayboli.com/node/66236

तुझ्या खिडकीत झाले जरी युनूस वकाराय माझे,
तसे पिऊनही होणार होते काय माझे?

नको पाहुस स्वप्ने तू 5 स्टार मद्यपानाची
उद्या गुत्त्याकडेच वळतील असेही पाय माझे

टगेगिरी म्हणू वा डाका की शुद्ध उचलेगिरी ही,
कुणी पळवले इथले चिकन फ्राय माझे?

अशीच पितो कधी कधी, उगाच विनाकारण मी,
दारूत बुडवण्याइतके छोटे दु:ख न्हाय माझे

तुला देतो नवी पिंट अर्धी, घे मित्रा पिऊन घे,
पण ठेव उलट्या बाटलीतले प्रेमबिंदूपेय माझे!

विनाकारण अशी नाही बदलली चाल माझी,
माझ्याच पायांमध्ये गुंतलेले पाय माझे

लपवतो आहेस कुठे मित्रा, दे एक क्वार्टर दे,
हिच्यामुळेच झाले जिणे सुसह्य माझे!

-राव पाटील

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

टगेगिरी म्हणू वा डाका की शुद्ध उचलेगिरी ही,
कुणी पळवले इथले चिकन फ्राय माझे?

गझलेत विनोद! वाह!

<<माझ्याच पायांमध्ये गुंतलेले पाय माझे>>

पायात गुंतलेले, असतील पाय दोन्ही
तेंव्हा लिहू नका रे असली उदास गाणी!

वाह !

झकास! Lol