नृशंसतेचा कडेलोट!

Submitted by अँड. हरिदास on 15 April, 2018 - 06:40

rape.jpg
नृशंसतेचा कडेलोट!

'मानवप्राणी' असा शब्द उच्चारून मानव देखील या पृथ्वीवरील एक प्राणीच असल्याचे नेहमी उद्धृत केले जाते. मात्र या प्राण्यातही माणूसपण जपले जावे, अशी अपेक्षा कुणी केली, तर ती वावगी ठरू नये. या माणूसपणात एक नैतिकता, सभ्यता, समजदारपणा, भल्या-बु-याची जाण, सद्सद्विवेकबुध्दी, हे विचार समाविष्ट करीत पूर्वापार मानवी वाटचाल होत राहिलेली आहे. मात्र सध्या अवती-भवती सातत्याने घडणा-या विविध प्रकारच्या विकृत घटनांनी माणसाला माणसाचीच भीती वाटावी, अशी स्थती निर्माण केली आहे. नुकतेच कठुआ आणि उन्नाव येथील सामूहिक बलात्कारांच्या घटना उघडकीस आल्या. एका आठ वर्षाच्या चिमुरडीवर आठ जणांनी अत्याचार करत तिची दगडाने ठेचून नृशंस हत्या केली. तर दुसऱ्या घटनेत एका १६ वर्षांच्या तरुणीवर भाजपाच्या आमदाराने व त्यांच्या बगलबच्च्यांनी अत्याचार केला. ’अमानुष’, ’अमानवी’, ’माणुसकीला काळिमा फासणारी’ हे शब्द सुद्धा जिथे तोकडे पडतील, अशा या घटनांचा जितका निषेध केला जावा तितका कमीच. मात्र या घटनांनाही धर्माचा रंग देऊन राजकारण करण्यात आले. बलात्काऱ्यांचा बचाव करण्यासाठी झुंडशाही रस्त्यावर उतरली तर दुसरीकडे अत्याचाराचे आरोप असलेल्या राजकारण्यांना वाचविण्यासाठी सत्ताधारी सरसावलेले दिसले. माणूसपण,माणुसकी आणि संवेदना स्वार्थी राजकारणासमोर थिट्या पडत असल्याचे समोर येत असल्याने आज माणसाला खरंच 'माणूसपण' ही संज्ञा वापरावी का? असा प्रश्न निर्माण होतो. हे विधान वाचून कुणालाही हे वाटेल की, आज शंभर टक्के माणसातील माणूसपण हरविले नसल्यामुळे इतकी वाईट परिस्थिती नक्कीच नाही. अर्थात, हे सत्य आहेच.. समाजातील फार थोडेच लोक विकृत प्रवृत्तीचे कृत्य करतात, मात्र त्या विकृतीवर दुर्लक्षितपणाची भूमिका घेऊन केवळ धर्माच्या आणि राजकारणाच्या नावाखाली त्या कृत्याला समर्थन करणाऱ्यांना काय म्हणावं? आपल्याला काय त्याचे, अशी मानसिकता ठेवून गैरकृत्याकडे डोळेझाक करणाऱ्यांच्या माणूसपणावरही यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही का? वाढणारा स्वार्थ आणि कमी होणारी संवेदनशीलता हे एक आव्हानच आज समाजासमोर उभे राहिल्याचं वास्तव यानिमित्ताने समोर आलं आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

जम्मू व काश्मीर राज्यातल्या कथुआ जिल्ह्यातील आठ वर्षांच्या आसिफाचे आठ नराधमांनी अपहरण केले. तिला गुंगीच्या गोळ्या खाऊ घालून तिच्यावर सामूहिक पाशवी अत्याचार करण्यात आला. बलात्कार करणार्याची वृत्ती इतकी नीच होती कि मंदिर परिसरातच या बालिकेवर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणाची बाहेर वाच्यता होऊ नये म्हणून आसिफाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. या गुन्ह्यात सरकारी अधिकारी आणि पोलिसांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. जानेवारीत घडलेल्या या घटनेला दडपण्यासाठी आटोकाट पर्यंत झाले. मात्र अखेर बिंग फुटले आणि आरोपींचे अमानुष कृत्य जगासमोर आले. सर्वसामान्यांचा संताप पाहून सरकारला या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करावी लागली. मात्र यालाही धर्माच्या राजकारणाचा रंग देण्यात आला. आरोपीविरोधात चार्जशीट दाखल होऊ नये म्हणून जम्मूमधील वकिलांची एक झुंडशाही भाजप कार्यकर्त्यांसह रस्त्यावर आली. न्यायालयासमोर घोषणा देण्यात आल्या. 'कायद्याचे राज्य' या संकल्पनेचे अक्षरशः धिंडवडे काढण्यात आले. दुर्दैव म्हणजे ज्यांच्यावर कायदे निर्माण करण्याची जबाबदारी आहे ते लोकप्रतिनिधी,कायद्यांचे रक्षणकर्ता ज्यांना संबोधले जाते ते उच्चशिक्षित वकील सुद्धा या झुंडशाहीचा एक भाग होते. वास्तविक राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकीच्या दृष्टिकोनातून अशा घटनांकडे बघायला हवे, मात्र हा सामंजश्यपणा ना राजकारण्यांना दाखविता आला ना नागरिकांना..

माणुसकीला काळिमा फासणारी दुसरी घटना आहे उत्तर प्रदेशातली. काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशामध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने सरकार स्थापन केले, तेंव्हा गुंडगिरी आणि हिंसाचारासाठी प्रसिद्ध असलेल्या यूपीत आता ‘रामराज्य’च अवतरणार, असं चित्र उभे करण्यात आले होते. मात्र त्यातील फोलपणा उन्नावच्या घटनेने समोर आणला आहे. उन्नाव गावातील एक १६ वर्षीय मुलीवर उन्नावचेच भाजप आमदार कुलदीपसिंग सेंगर यांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे.पीडितेवरील अत्याचाराबद्दल दाद मागण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिच्या वडिलांना आमदाराचा भाऊ आणि त्याच्या काही गुंडांनी बेदम मारहाण केली. या वेळी पोलिस निव्वळ बघ्याच्या भूमिकेत होते. या मारहाणीची तक्रार त्यांनी करताच या गुंडांनीही त्यांच्याविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी तिची तत्परतेने दखल घेत ‘पीडित’व्यक्तीलाच ‘आरोपी’ केले. अमानुष मारहाणीमुळे झालेल्या जखमांत संसर्ग होऊन ते कोठडीत मृत्युमुखी पडले.वडिलांचा मृत्यू झाल्यानंतरही आपले म्हणणे कोणी ऐकत नाही हे पाहून तरुणीने थेट मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहनाचा निर्णय घेतला तेव्हा देशातल्या सर्व मीडियाचे तिच्याकडे लक्ष गेले.लोकदबाव आणि न्यायालयाच्या आदेशामुळे आमदाराविरोधात अनेक दिवसांनंतर गुन्हा दाखल झाला, पण या आमदारांना अटक करण्यासाठी पोलीस गेले तेव्हा त्यांना रोखण्यासाठी आमदारांचे शेकडो समर्थक रस्त्यावर उतरले. इतकेच नाही तर योगी आदित्यनाथ यांचे सरकार सेंगर यांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करताना आढळले. त्यामुळे ऊत्तर प्रदेशात फक्त “गुंडगिरी’चा ‘रंग’ बदलला असल्याचे सत्य समोर आले.

जम्मू मधील घटना असो कि उत्तर प्रदेशातील दोन्ही घटनांमध्ये रस्त्यावर उतरणाऱ्यांच्या डोक्यात सत्तेचा उन्माद घुसला असल्याचे दिसून आले. बलात्कारासारखे अमानवीय कृत्य करणारे नराधम राक्षसी वृत्तीचे आहेतच..त्यांना रोखण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याची गरज आहेच. मात्र कुठल्याही नीती-नियमाची पर्वा न करता बलात्कारासारख्या जधन्य आरोपातील आरोपींच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरणारी झुंडशाही मनोवृत्तीही अत्यंत घातक म्हणावी लागेल. दिल्लीतील निभर्या प्रकरणानंतर संपूर्ण देश एकदिलाने निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी उभा ठाकला होता. परंतु आज कठुआ आणि उन्नाव घटनेचे राजकारण केले जात आहे. सत्ताधारी, प्रशासन या सर्वांच्याच भूमिका संभ्रमात टाकणाऱ्या आहेत. माणसाचा स्वार्थ आज माणुसकी धर्मापेक्षा वरचढ ठरू लागला असून त्याला आता कायद्याचाही धाक उरला नसल्याचं वास्तव यानिमित्ताने समोर आलं आहे. अत्याचारांचा हा कुरूप आलेख नुसता देशाचं सामाजिक स्वस्थ बिघडविणारा नाही तर माणसाच्या माणूसपणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. त्यामुळे याला कुठेतरी आवर घातला गेला पाहिजे. अपराधीक कृत्य करणारा नराधम जितका समाजासाठी घातक असतो, तितकाच त्या कृत्याकडे दुर्लक्ष करणारा किंव्हा त्याचं समर्थन करणारा गट देखील सामाजिक स्वास्थासाठी हानिकारक असतो. त्यामुळे माणसातील माणूसपण जिवंत ठेवण्यासाठी यापुढे प्रयत्न करावे लागतील. विकृतीने बेभान झालेला माणूस जर असाच नृशंसतेचा कडेलोट करत राहिला तर मानव समाज मानवी मूल्यांच्या ऱ्हासाच्या तळाशी जाईल, यात शंका नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्यात पॉझिटिव्ह फरक किती नी काय पडेल माहित नाही किंवा खरंतर तशी आशाही नाही. पण भारतात बायकांनी राहूच नये अशी परिस्थिती न होवो म्हणजे झालं. नाहीतर भारत म्हणजे ‘country without women’ वगैरे डिक्लेअर करावं लागेल. मग करु देत पुरुषांना काय करायचं ते एकमेकांबरोबर.

Submitted by व्यत्यय on 17 April, 2018 - 20:47 >> +१

===
बलात्कार झालेल्या महिलेची कोणतीही ओळख दिली जात नाही. तिची जात, तिचा धर्म जाहीर केला जाऊ नये। बहुतेक वेळा हे पाळलं जातही परंतु त्या निरागस मुलीचे फोटो आणि नावासह तिचं राहण्याचं ठिकाण आणि तिचा पोट जातीसह धर्म देण्यामागचं प्रयोजन काय असावं ?हे न उलगडणार कोंढ आहे. >>
बलात्कार + खून झाला असल्यास नावं जाहीर करतात/मुद्दाम लपवून ठेवत नाहीत.
या गुन्ह्याला धार्मिक कोन आहे त्यामुळे ती माहिती बातम्यात येतीय.

< । त्या निरागस जीवाला न्याय मिळायलाच हवा। खरे गुन्हेगार कोणीही असोत त्यांना भयंकर शिक्षा हि मिळायलाच हवी >
--------- अशा घटनात अपराध्यान्ना कितीही भयन्कर शिक्षा झाली तरी पिडीताला न्याय मिळत नसतो...

=
बलात्कार झालेल्या महिलेची कोणतीही ओळख दिली जात नाही. तिची जात, तिचा धर्म जाहीर केला जाऊ नये। बहुतेक वेळा हे पाळलं जातही परंतु त्या निरागस मुलीचे फोटो आणि नावासह तिचं राहण्याचं ठिकाण आणि तिचा पोट जातीसह धर्म देण्यामागचं प्रयोजन काय असावं ?हे न उलगडणार कोंढ आहे. >>>>>>>>

मुलगी 4 दिवस बेपत्ता आहे, पोलिस सहकार्य करत नाहीत म्हणून बकरवाल लोकांनी निदर्शने सुरू केली होती, त्यात तिचे नाव, पत्ता, जात सगळे बाहेर आले होते, त्यातच तिचा मृतदेह सापडला, त्यामुळे हे सगळे डिटेल्स आपोआप मीडिया समोर आले.

आज आणखी एक बातमी आली आहे, उत्तर प्रदेशात 8 वरशाच्या मुलीवर बलात्कार आणि खून. 18 वर्षाचा आरोपी दारूच्या नशेत तिच्या मृतदेहाजवळ सापडला.

Pedophilia may not be as rare in India as we would like to assume.

निठारी केस आठवत असेलच.

काही दिवसांपूर्वी समीर गायकवाड यांची बालवेश्याबद्दलची पोस्ट वाचलेली
https://sameerbapu.blogspot.in/2017/11/blog-post_28.html?m=1

===
असिफा केस जास्त भीतीदायक यासाठी वाटते कारण इथे आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चे, वकील आणि काही सर्वसामान्य माणसेदेखील उभी राहिली आहेत...

आसिफासोबत जे घृणास्पद कॄत्य झालंय ते तिची जातधर्म वगैरे सगळं बघून नीट ठरवून योजून केलं गेलेलं आहे. ह्यामध्ये धर्माचा प्रश्न बलात्कार करणार्‍या नराधमांनी आणला आहे. भाजपाआयटीसेलच्या बुद्धीभेद करणार्‍या पोस्ट वाचून वरवर मत बनवू नये. सत्य वाचण्यासाठी चार्जशीट आणि आरोपींचे कबुलीजबाब आहेत. आता कुणी चार्जशीट आणि कबुलीजबाबवर प्रश्न चिन्ह करत असेल तर ते ह्या गुन्ह्याचे भागीदार समजले पाहिजेत.

रश्मीताई. कपिलमिश्रा नावाचा गणंग आप पार्टीचा नाही. भाजपात सामिल आहे. जनहितार्थ जारी.

अरे देवा! त्या वॉटस अ‍ॅप वर मला जी लिंक आली त्यात त्याचा पार्टीचा ( पूर्वी आप मध्ये असेल ) नावासकट उल्लेख होता. सॉरी, लिहीण्यात चूक झाली.

असिफा केस जास्त भीतीदायक यासाठी वाटते कारण इथे आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चे, वकील आणि काही सर्वसामान्य माणसेदेखील उभी राहिली आहेत...>>>>>>

बरोबर, कित्येक वर्षे आपल्या परिचयाच्या असणाऱ्या माणसाचा मुखवटा असा निखळून पडताना पाहणे भीतीदायक असते.

मला असं पाकीस्तानात शाळेत गोळीबार झाला होता आणि लोक 'बरं झालं सापाची पिल्लं आधीच गेली' वगैरे म्हणत होती तेव्हा वाटलं
शत्रुत्व म्हणजे शत्रूच्या बायका, मुलं, प्राणी यावर जास्तीत जास्त वेदनादायक अत्याचार करुन 'आता कस्सा धडा शिकवला' म्हणणं नव्हे हे सगळ्याच धर्माचे, सगळ्याच पक्षातले लोक केव्हा समजणार?
पहिलं टारगेट बायका आणि मुलं केलं जातं. किंवा ते तसं केलं जाईल हे अझुम्ड असतं. धिस हर्ट्स. अ लॉट.

असिफा केस जास्त भीतीदायक यासाठी वाटते कारण इथे आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चे, वकील आणि काही सर्वसामान्य माणसेदेखील उभी राहिली आहेत..
<<

भारतात असा प्रकार पहिल्यांदाच घडलाय की काय ?
याआधी ही अश्या अनेक घटना घडल्या आहेत.
---
आसाराम बापू केस, बाबा राम रहिम केस, याकुब मेमन, संजय दत्त, सलमान खान, अफजल गुरु व स्वत: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अश्या अनेक केस आहेत ज्यात आरोपींच्या समर्थनार्थ सामन्य लोकच काय अगदी उच्चशिक्षीत लोक देखील रस्त्यावर उतरले होते.

स्वत: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अश्या अनेक केस आहे>>

अनिरूध्द भक्ताड याविषयी पुरावा द्यावा मग थोबाड वाजवावे,

बरे,
नुसतेच प्रश्न विचारण्या ऐवजी, अनिरुद्ध.. यांनी तुणचे म्हणणे विस्ताराने मांडावे .

अनिरुद्ध, कथुआप्रकरणी आरोपींच्या समर्थनार्थ निघालेले मोर्चे, वकिलांच्याच झुंडीने केस कोर्टात फाईल होऊ नये म्हणून केलेला दंगा या गोष्टी तुमच्यामते समर्थनीय आहेत का? हो की नाही?

अनिरुद्ध, कथुआप्रकरणी आरोपींच्या समर्थनार्थ निघालेले मोर्चे, वकिलांच्याच झुंडीने केस कोर्टात फाईल होऊ नये म्हणून केलेला दंगा या गोष्टी तुमच्यामते समर्थनीय आहेत का? हो की नाही?
नवीन Submitted by भरत. on 18 April, 2018 - 12:08
<<

नाही.

मग तुम्हाला नक्की काय खटकतयं ?
नवीन Submitted by सिम्बा on 18 April, 2018 - 12:20
<<

मला कुठे काय खटकतयं !

मी फक्त इतकेच निदर्शनात आणून दिले की या केसच्या आधी देखील, सामन्य, शिक्षीत व उच्चशिक्षीत जनतेने अनेक प्रकरणात आरोपी असणार्‍या गुन्हेगारांच्या समर्थनार्थ मोर्चे, कॅंडलमार्च व हिंसक आंदोलने केली होती.

Ok, कोणाच्याही धर्माची गय न करता दोषी लोकांना शिक्षा व्हावी , यात तुम्हाला काही खटकत नाहीये हे ऐकून आनंद झाला.

{आसाराम बापू केस, बाबा राम रहिम केस, याकुब मेमन, संजय दत्त, सलमान खान, अफजल गुरु व स्वत: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अश्या अनेक केस आहेत ज्यात आरोपींच्या समर्थनार्थ सामन्य लोकच काय अगदी उच्चशिक्षीत लोक देखील रस्त्यावर उतरले होते.}

किती "बलात्कार आणि खुन" प्रकरणांमध्ये सत्ताधारी पक्षाचे मंत्री बलात्कार्‍यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते??

गेल्या ३-४ वर्षांमधे साथीचे रोग यावेत त्याप्रमाणे बलात्काराच्या अनेक घटना वाचनात येत आहेत.आधी घडत नसतील असेही नव्हे,पण प्रमाण अतोनात वाढलंय.वाईट /निराश/वैफल्य सर्व वाटूनही काहीच उपयोग नाही.तो जीव अनन्वित हाल सोसून जातो.त्या घटनेवर बाकीचा गदारोळ उडतो,तो असहनीय आहे.
जिच्यावर अत्याचार होतो ती आपल्यातली/ दुसर्‍यातली करण्याऐवजी एका हाडामासाच्या व्यक्तीवर अत्याचार होतो,त्याविरूद्ध सर्व एक झाले पाहिजे आणि दोषींवर तातडीने कारवाई व्हावी.

https://sameerbapu.blogspot.in/2017/11/blog-post_28.html?m=1 >>>>>> ha lekh vachun potatun dhavalun aale aani tyani sangitalela cinema "aajii" ha me tari naahi baghu shaknaar, me lahan mulinbabat far mhanje far protective aahe aani yeta jaata kuthehi lahan muli ashya ektyach hindat astil (tyanchya gharasamor jari ) tari me tyana vicharate , tumchya sobat kon aahe? aai kuthey etc. ti ek paati taakli jate na ki kamjor hruday vale ye na dekhe tyatli me. ekhada movie kinva serial pahatana jara jari vaatale ki pudhchya scene madhe ase kahi bhayanak dakhvanaar aahe tar me lagech channel change karte.

<असिफा केस जास्त भीतीदायक यासाठी वाटते कारण इथे आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चे, वकील आणि काही सर्वसामान्य माणसेदेखील उभी राहिली आहेत...>
+१११११११

सामान्य लोकं आरोपींच्या नाही तर हिंदुत्ववादी मोदी/भाजप सरकारच्या समर्थनार्थ उभे राहिले आहेत. त्या सामान्य लोकांना बातम्यांद्वारे पटवून दिले आहे की ही विरोधकांची चाल आहे, सत्य काहीतरी वेगळेच आहे. आणि ते त्या लोकांना पटलेही आहे. हे हल्ली प्रत्येक घोटाळ्याबाबत होते. बलात्कार असो, रुग्णालयात मृत्युमुखी पडलेले असो, कोणी पैश्याची केलेली अफरातफर असो, एखाद्या बाबा महाराजांची भानगड असो... हा पॅटर्नच आहे सध्याच्या राजनितीचा. जो डोक्यात जातो. अर्थात यात नक्की काय खरे आणि काय खोटे ईतकी राजकारणाची अक्कल मला नाहीये, पण क्लेशकारक आहे हे सारे.

अशा घटनांबद्दल वाचून आणि लिहून , मिडियात चर्चांनी काय होते? कुणाला वाटेल की लोक शहाणे होत असतील, गुन्ह्याची भीषणता जाणवत असेल, कदाचित मुलींमधे अवेअरनेस वाढेल, मुली बाळींना अशा प्रसंगी आधार देणे वा मदत करणे अशी मेन्टॅलिटी वाढीस लागत असेल. दुर्दैवाने परिस्थिती तशी नाही असे दिसतेय. कथुआ रेप च्या स्टोरीज मिडिया मधे आल्यावर काही विकृतांनी त्या चवीने वाचल्या. पॉर्न साइट वर त्याचे वारेमाप सर्च झाले म्हणे . त्या घटने नंतर, किंवा निर्भया प्रकरणानंतर सुद्धा, तशाच सिमिलर केसेस चे प्रमाण वाढले. हे कशाचे लक्षण समजायचं?!! Sad Uhoh

मैत्रेयी+१
निर्भया प्रकरणानंतर त्याची पुनरावृत्ती होताना अनेकदा दिसली. हे विकृतीचेच लक्षण आहे. आणि यात लैंगिकतेपेक्षाही दमन करण्याच्या अघोरी इच्छा उफाळलेल्या दिसताहेत.

एक प्रतिक्रिया अशीही होती की हजारो वर्षापासून ' त्यांनी ' हिन्दूंच्या बायकंवर अत्याचार केले आहेत. एखादा रेप त्यांच्या मुलीवर झाला तर एवढे काय बोंबलायचे त्यात? अशी प्रतिकृया कोणत्या पक्षाच्या आणि कोणत्या संघटनेच्या माणसाकडून आली असावी असा तुमचा अंदाज आहे बरं ?

Pages