"कट्टी बट्टी" - झी युवा

Submitted by परीस on 6 April, 2018 - 01:43

झी युवा वाहिनी वर नवीन मालिका 'कट्टी बट्टी' सुरु झाली आहे. यात अभिनेत्री अश्विनी कासार सोबत पुष्कर शरद हा एक नवीन चेहरा पाहायला मिळत आहे. यावरील विषयी चर्चा/ गप्पा मारण्यासाठी हा धागा.
Katti-Batti-–-Zee-Yuva-Serial_0.png

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बास का नन्द्या " घडाघडा बोलायच नाही आणि गैरसम्ज पाइल होवु द्द्यायचे यावरच तर सिरियली चालतायत सगळ्या" तुम्ही त्याचा युअस्पीच काढायला निघालेत.

पराग - अनुष्काचं ब्रेकप झालं का??

काल इन्स्टाग्रामवर अॅड बघितली, पराग-पूर्वाचं रोमॅन्टीक साँग. पूर्वा छान दिसत होती एकदम. Happy

पराग आणि पूर्वा दोघेही घुमे आहेत नुसते. अनुष्का पहिल्यांदा परागच्या घरी येते तो एपि छान होता आणि अंगठी हरवायचा. पराग आजकाल रोज ते जीनचं शर्ट घालून फिरतो, काॅलेजमध्येही तेच. काॅलेजमध्ये फाॅॅर्मल घालायला पाहिजे ना. परागचे आईबाबा किती साधे, सरळ आणि मस्त आहेत.

सध्या चांगली चाललीय. पुर्वा परागच्या प्रेमात पडलीय. ते आज अनुष्काला कळणार, मे बी ती व्हिलन होईल. परागला मात्र माहिती नाहीये पूर्वा प्रेम करते ते. पण अनुष्का too much bored. आता जास्त दाखवतात तिला. पराग सॉलिड acting सर्वात.

अनुष्काने आजीला भेटते पहिल्यांदा तो सीन मस्त केला होता, चालून दाखवण्याचा, आजी गार.

पराग आजकाल रोज ते जीनचं शर्ट घालून फिरतो >>> Lol अनुष्काने गिफ्ट एकचं दिलं असावं.

परागचे आईबाबा किती साधे, सरळ आणि मस्त आहेत >>> अगदी अगदी.

लक्ष्मीकाका पण गोड फार.

मी बघते रोज. कधीतरी होतो missed.

पराग - अनुष्काचं ब्रेकप झालं का?? >>> नाय गो निधी. म्या वाट बघतुया. अनुष्का पिच्छा सोडत नाही, सगळं मनाविरुद्ध adjust करतेय.

मला तर त्या पाऊण लाखाच्या अंगठीचीच चिंता लागून राहीली आहे, कोण घालेल ती अंगठी अ-पचं तुटल्यावर. पराग मस्त समजावतो अनुष्काला, मला घरातल्या सगळ्यांचा विचार करावा लागतो, सगळं मिळणार पण हळूहळू. गट्ट्याला काढा मिळावा म्हणून बकरा बनवतात तेव्हाचे संवाद थोडेे अश्लीलच होते. चारूआत्या मस्त.

हो लहान वाटते चारू आता. चारू म्हणते मी उद्योजिका आहे तर तिचा नवरा म्हणतो, तू कसली उद्योजिका, मलाच दर महिन्याला त्या पार्लरमध्ये दहा हजार घालावे लागतात Proud

अन्जूताई धन्यवाद गो. प्लीज जरा अपडेट देत जा की अधूनमधून. Happy

झी5 बंद झाल्यापासून मला ही सिरियल बघताच आली नाहीये. Sad

आज स्टोरी बरीच पुढे गेली. पराग पण पुर्वाच्या प्रेमात पडलाय. त्याच्या काकाने जाणीव करून दिली त्याला. काका अनुष्काला पण भेटला, समजावलं. आता पुर्वा परागला एकत्र आणायचं सर्वांनी मनावर घेतलंय.

मस्त. अनुष्काला व्हिलन वगैरे नाही केलं हे बरं झालं. तिच्या आधीच लक्षात आलेलं थोडं.

निधी झी 5 का दिसत नाही, आता बघ, चेक कर परत ,इंटरेस्टींग आहे.

अन्जूताई, म्हणजे अनुष्का गपगुमान बाजूला झाली??

अगं ते झी5 "not available in your country " असा मॅसेज दाखवतात सारखा. अॅप पण नाही चालत आणि ऑनलाईन पण नाही दिसत. Uhoh आता मी काय परदेशात राहत नाही भारतातल्याच कोकणांत राहते. पण तरीही माझ्या देशात दिसत नाही. Wink अतिशय वैतागून, रागावून त्यांच्या गुगल पेजवर असा मॅसेज पण लिहून आलेय. पण मेल्यांवर षष्प फरक नाही. Angry

अन्जूताई, म्हणजे अनुष्का गपगुमान बाजूला झाली?? >>> हो. तिच्या लक्षात येत होतं, परागचा तिकडे ओढा आहे आणि पुर्वाच्या पुस्तकात ती परागचा फोटो बघते.

हो कालचा भाग छान होता. काका पूर्वाला परस्पर कसं बोलवतो आणि आधीपण पराग आणि अनुष्का सरांच्या घरी जातात तेव्हाच पूर्वा तिथे येते. हे प्रकार मला फार फिल्मी वाटतात, विशेष: या मालिकेत. काल पराग पू्र्वाकडे पाठ करून बोलत होता, असं कोण बोलतं प्रत्यक्ष आयुष्यात.

मला मेन हे आवडलं की अनुष्काला व्हिलन नाही केलं, निदान आत्ता तरी. तिच्या सिच्युएशन थोडी लक्षात आल्यावर आणि काकाने समजाऊन सांगितल्यावर ती समंजसपणे बाजूला झाली आता पुढे सिरीयल वाढवल्यावर काही सांगता येत नाही.

आज पराग आणि पूर्वा यशराजचे हिरो-हिरवीण वाटत होते फक्त मागे परदेशातला निसर्ग नव्हता तर सैराटसारखा गावरान परिसर होता Happy मला वाटलेलं आता पराग आणि पूर्वा काय सांगू, कसं सांगू करत बरेच एपि घालवतील पण कथा भराभर पुढे सरकत आहे. परागच्या घरचेे आता परागच्या बाॅम्ब फोडण्याला सरावले आहेत पण प्रत्येकवेळी नविन धक्का बसतोच. आता दोघांच्या घरचे कसे प्रतिसाद देतात ते इंटरेस्टींग असेल.

पराग आणि पूर्वा सिन्स मध्ये पराग फार उत्तम करतो. त्याचे डोळे बोलतात, चेहेरा बोलतो. पूर्वा म्हणजे अश्विनी सिनियर असून कमी पडते त्याच्यासमोर. वास्तविक कमलामध्ये जास्त काम चांगलं केलेलं तिने, पहिलीच सिरीयल होती तरी. ती चांगलं करते पण तो अतिउत्तम त्यामुळे तिची छाप पडत नाही त्याच्यासमोर. कमला मी सुरु झाली तेव्हा थोडे दिवस बघितलेली एक किंवा दोन आठवडे मग क्वचित एखादा सीन सर्फिंग करताना पण मला अश्विनी आवडायची तिथे त्या दीप्तीपेक्षा.

Romantic गाणे मला फार कंटाळवाणे वाटलं. पूर्वा छान दिसत होती, तो पण दिसत होता पण पूर्वा जास्त सुंदर दिसत होती. पण प्लेन साडी, स्लीव्हलेस ब्लाऊज सेम pattern फक्त रंग बदल गुलाबी, लेमन. तिला शोभून दिसत होतं पण मला गाणे बोअर झालं मात्र.

Pages