"कट्टी बट्टी" - झी युवा

Submitted by परीस on 6 April, 2018 - 01:43

झी युवा वाहिनी वर नवीन मालिका 'कट्टी बट्टी' सुरु झाली आहे. यात अभिनेत्री अश्विनी कासार सोबत पुष्कर शरद हा एक नवीन चेहरा पाहायला मिळत आहे. यावरील विषयी चर्चा/ गप्पा मारण्यासाठी हा धागा.
Katti-Batti-–-Zee-Yuva-Serial_0.png

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पपी सोबत लक्ष्मी काका sangamnerla गेला होता का?
कसं काय बुवा तिला एकटीला सोडू राहिले बोराडे आप्पा.... की director विसरला, पपी साध्या क्लास साठी सुद्धा काकाला सोबत घेऊन जाते ना... IMG_20170812_061508.jpg

Lol

ते परागचे अतोबा अति आहेत, पराग काहीच बोलला नाही. त्याचे बाबा आधी तरी बोलत होते. आता अनुष्का लग्नातून पळून जाताना accident, मग पराग तिच्यामागे. आत्याला आवडत नाही नवरा बोलतो ते. पण काही बोलत नाही.

जा ब्वा पराग तू अनुष्काशी लग्न कर. पुर्वा तू लग्न नको करू, फक्त पी एच डी कर. बोअर होत चालली सिरीयल.

तो टायटल साँग भांडण सीन मस्ट आहेना मग पहीलं आता लग्न मोडणार, आत्तापर्यंत भांडणं झाली नाहीत ना ती आता होणार.

मग अचानक दोघांच्या भेटीगाठी वाढत जाणार आणि दोघे प्रेमात पडणार. आता अनुष्काला ग्रे शेड करतील बहुतेक मिन्स तो तिचा आधीचा बीएफ म्हणतो ना, की तू अनुष्काला ओळखत नाहीस ती काही करु शकते, असं काहीतरी.

पण आता बोअर होणार.

<<<परागला अनुष्का आवडते तर पूर्वाला झुलवणं चुकीचचं आहे.>>>
तो पराग म्हणजे .... त्याला काही कळतच नाही त्याला स्वतःला काय वाटते, काय करायचे. एका बाजूला दुसर्‍याला मदत करायची वृत्ति, दुसर्‍या बाजूला मोठ्या माणसांची भीति. घरच्यांनी म्हंटले पूर्वाशी लग्न कर, मित्र म्हणतात अनुष्काशी. हे घरचे लोक मधे मधे नसते तर पूर्वा नि पराग दोघेहि सुखी झाले असते.

आता मी साइडला ब्रेक अप नावाची सिरियल बघतो आहे. तिथेहि घरचे लोक मधे मधे, त्यातून ती आई तर जाम कारस्थानी! स्वतःच्या मुलाच्या विरुद्ध कारस्थाने. मुलीकडचेहि कमी नाहीत. पण मुलगा मुलगी थोडे तरी खंबीर आहेत. तरी शेवटी ती आई मुलाला चक्क फसवून त्याचा साखरपुडा त्याला नको असलेल्या मुलीशी घडवते!!!
पोरांनी १८ वर्षाचे झाल्यावर सरळ घरातून बाहेर पडावे. त्यांचे त्यांना निर्णय घेण्याची अक्कल येते. स्वतःला ठेच लागल्याशिवाय शहाणपणा येत नाही. दोन पिढ्यांची विचारसरणी वेगळी असते. मधे मधे न करता भरपूर प्रेम आई वडील नि मुले यांच्यात असू शकते, दाखवता येते. इथे अशी अनेSSSक उदाहरणे आपल्या भारतीय, महाराष्ट्रीय कुटुंबांत आहेत.

देव जाणे कधी सांगणार! दोघेहि अगदी अंत बघताहेत. मुखदुर्बळ लोक! घरी ठीक आहे, पण बाहेर तर सरळ सरळ न भिता बोलावे ना!
आता काय बोहोल्यावर चढल्यावर काही दबंग वगैरे करणार की काय?

प्रीकॅपमधे दाखवलं आहे आज सांगणार पुर्वाला, पुर्वाला हुश्श होणार.

आता ते स्वप्नं नसेल म्हणजे मिळवलं.

कदाचित सिरियल लिहिणार्‍यांना नवीन काही सुचत नसेल म्हणून ते जुनेच उगाळून उगाळून दाखवताहेत.
आपणच इथपासून पुढे STY चालू करू मायबोलीवर.

आज खूप दिवसांनी एपि बघितला. पराग पूर्वाला नक्की काय सांगतो. अनुष्कावर प्रेम आहे हे नाही सांगत का. हे लोक एवढं ऊडत ऊडत का बोलतात, घडाघडा बोलत नाहीत, समोरचा वाट्टेल ते अर्थ काढतोय तर त्याला थांबवत नाहीत. पूर्वा नुसती डोळे मोठे करून बघत बसली. हरीशकाकाने जावयाचा छान अपमान केला, त्याला असंच पाहिजे. एवढे हमरीतुमरीवर का आलेत बोराडे. उद्या खरी भांडणाला सुरूवात होईल.

नीट सांगतो पराग. हे पपी ध्यान बावळट, स्वतः ला पी एच डी करायची आहे म्हणून लग्न करायचं नाही हे नाही सांगत तर त्यांच्या काहीतरी problem आहे सांगते असं अर्धवट बोलते आणि पुढे सांगणार असते नीट तर तो दाढीवाला काका problem ह्या शब्दाचा अनर्थ करतो आणि तिला बाहेर पाठवतो. पप्पीची चूक आहेच, लगेच जाते बाहेर ही.

पराग घरी सांगू शकत नाही पण जो काही गोंधळ होतो तो पूर्वाच्या आणि तिच्या घरच्यांच्या मूर्खपणामुळे, अर्धवटपणामुळे.

बिनसलं का सगळंच??? Sad

मी किती दिवसांत बघितलीच नाहीये. Zee5 चा काहीतरी प्राॅब्लेम झालाय. इकडे दिसतच नाही.

पूर्ण एपिसोड काल फालतूपणात घालवला. मला लग्न करायचं नाहीये असं वडलांच्या फोटोसमोर बोलते म्हणून आजोबा, तो दुसरा दाढीवाला काका विचारतात तर त्यांचा problem आहे म्हणते, धड सांगत नाही की त्याचं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे मग काका सुतावरून स्वर्ग गाठतो आणि भलते समजतो आणि समज करून देतो तेव्हा ह्या आपल्या पूर्वा बाईसाहेब गायब असतात.

<<<घरी सांगितलं का त्याने???>>
तो,मुलुखाचा मुखदुर्बळ! तो गाडीत वसून साखरपुड्याला निघाला आहे! त्याच्या आत्याचा नवरा इतका स्वतःला लै शाना समजून सगळे स्वतःच ठरवतो कुणि काय करायचे!
आता परागच्या वडीलांनी ऐकले नि ते पूर्वाच्या घरी जाताहेत. मस्त तमाशा होणार.

झी ५ वर कुठे बघता तुम्ही ? मला ओझी आणि झी५ दोन्ही दिसत नाहीये आता.

"प्रॉब्लेम आहे" एवढं ऐकून लीला काका पूर्वाला बाहेर काढतो. पूर्वा-पराग दोघही घडाघडा बोलले तर मालिका संपून नाही का जाणार ? मला वाटतं आता झालेले गैरसमज दूर करण्यासाठी त्या दोघांच्या भेटी होतील. अनुष्का आपल्या टाइपची नाही असा परागला साक्षात्कार होईल मधल्या काळात.

zee 5 मी desktop वर बघते ग. इवल्या मोबाईलवर मला नाही बघायला आवडत. दिसतंय ग भारतात.

प्राजक्ता तू पुढे लिहिलेलीचं स्टोरी आहे, मागे वाचलेलं त्यामुळे मला बैठकीत वाजेल असं वाटलेलं. पण हा गैरसमज जरा अतिचं झाला.

'सोचा ना था' सिनेमा ची कथा आहे ही. अभय देओल आणि आयेशा टाकिया.
ओ यारा रब रुस जाने दे हे सुंदरसे गाणे आहे त्यात.

हो का.

आजचा भाग अतिरेकीपणाचा कळस. किती खालच्या पातळीला उतरले सर्व. ती एक पुण्याची काकूच फक्त समजावत होती. ती मुखदुरबळ पुर्वा, एक मुस्कटात द्यावीशी वाटली तिच्या, समोरच्या मुलाच्या chara वर इतके शिंतोडे उडत असताना, जोरात ओरडून थांबवलं पण नाही तिने, गप्प बस म्हटली की गप्प, हतबल.

अगं अंजूताई शांत हो, मुळात पूर्वाला तरी कळलं का "प्रॉब्लेम" म्हणजे तिच्या घरचे काय म्हणत आहेत ते Proud

एकदा अपमान झाल्यावर परागच्या घरचे का थांबतील तिकडे बोराडेंनी बाहेर काढेपर्यंत ? पूर्वा नाहीच बोलली पण परागसुद्धा सांगू शकला असता की मला नको आहे हे लग्न.

अगं अंजूताई शांत हो, मुळात पूर्वाला तरी कळलं का "प्रॉब्लेम" म्हणजे तिच्या घरचे काय म्हणत आहेत ते >>> हो समजलं की, मग शॉक्ड ती. पराग पण म्हणाला पुर्वा मॅडम मी तुम्हाला असं म्हणालो का तर अहो नाही करत बसली. पण ओरडून दोघांनीही सांगितलं नाही.

असे वाटते, तिथे जाऊन एकेकाच्या डोक्यात सोटा घालून म्हणावे गप्प बसा जरा नि ऐका. मग स्प्ष्ट शब्दात काय आहे ते सांगावे.
मग एकदाची ही सिरियल बंद होऊन दुसरी कुठलीतरी बरी सिरियल चालू करतील.

Pages