हनिमून च नवदाम्पत्याच्या आयुष्यात असलेल स्थान

Submitted by बन्या on 10 April, 2012 - 02:35

सध्या झी मराठीवर एका लग्नाची दुसरी गोष्ट हि मालिका बघतोय
त्यावरून अस जाणवल कि हल्ली बरीच कपल खरच वेळ मिळत नाही म्हणून हनिमून ला जायचं टाळतात
हे योग्य आहे का?
मायबोलीकरांना काय वाटत ?
हनिमून च नवदाम्पत्याच्या आयुष्यात असलेल स्थान

विस्तृत चर्चा अपेक्षित

गुलमोहर: 

हनिमून च नवदाम्पत्याच्या आयुष्यात असलेल स्थान > अत्यंत महत्वाचे....मला महत्व कळाल्यावर नक्की अनुभव शेअर करेल.. Happy

उदय आपन समदुखी: आहोत.... Wink
अनुभव आल्यावर नक्कीच इथे शेअर करु....
फक्त तोपर्यंत धागा राहील का नाही माहीत नाही

>>> हनिमून च नवदाम्पत्याच्या आयुष्यात असलेल स्थान <<<<

श्श्श्शीऽऽ, "स्थान" काय? कैतरीच शब्द, स्थान म्हणले की मला तर अगदी यस्टीस्टॅन्ड अर्थात बसस्थानकाची आठवण होते. नैतर गेलाबाजार स्थान म्हणले की निरनिराळ्या "प्रतिष्ठाणान्ची" नावे आठवतात. Wink
हां, आता अगदीच ज्यान्ची स्वतःच्या गाडिने जायची ऐपत नसेल, अशा हनिमुनला निघालेल्या जोडप्यान्चा सम्बन्ध येत असेलही बसस्थानकाशी.
तरी पण कैच्याकै काय हो? म्हणे की, हनिमुनचे जीवनातिल "स्थान"? की हनिमुनला जाताना कम्पलसरी झालेले बसस्थानक म्हणायचय तुम्हाला?
फारच अस्थानी आहे बोवा हा स्थान शब्द! Proud (असे माझे मत)

Blush

अवांतर : मला नविन धागा काढावासा वाटतोय... भारतीय थाळीतील भाताचे स्थान .... : कॉलिंग पजो Wink

मागोवा ?? Uhoh

हल्ली बरीच कपल खरच वेळ मिळत नाही म्हणून हनिमून ला जायचं टाळतात >>> ज्याचा त्याचा प्रश्न आहे. योग्य-अयोग्य ठरवणारे माबोकर कोण? Uhoh

सध्या झी मराठीवर एका लग्नाची दुसरी गोष्ट हि मालिका बघतोय
त्यावरून अस जाणवल कि हल्ली बरीच कपल खरच वेळ मिळत नाही म्हणून हनिमून ला जायचं टाळतात

>>> सिरीयल बघुन जाणवलं? आणी ते पण ए.ल.दु.गो. सारखी फार्सिकल सिरीयल? कमाल आहे. Uhoh

आणि बरीच कपल्स म्हणजे किती? कुठे आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे का? असल्यास ती येथे दिल्यास या मुद्द्याचे गांभिर्य (?) लक्षात येईल.

Happy

गिरी Lol

>>>>ज्याचा त्याचा प्रश्न आहे. योग्य-अयोग्य ठरवणारे माबोकर कोण?

योग्य अयोग्य नका ठरवू हो..
मला अस म्हणायचं कि.. बहुतेक वेळा हल्ली लग्नाआधीच सर्व कारभार आटोपलेला असतो
म्हणून हनिमून ची क्रेझ कमी झालीये का?

हनिमून = मधुचंद्र असे लिहा आधी.

तर......मधुचंद्र म्हणजे काय? यावर आधी चर्चा होणे अपेक्षित आहे.
मधुचंद्र बाहेर जाऊनच साजरा करतात का?
घरीच मधुचंद्र साजरा केला तर?
अशा व तत्सम प्रश्नांचा उहापोह करावा.

बन्या -

१. वेळ मिळत नाही म्हणून हनीमूनला जाणे टाळणे

२. लग्नाआधीच ते केलेले असल्यामुळे हनीमूनमध्ये विशेष कुतुहल न राहणे

हे दोन भिन्न प्रकार झाले.

तरीही, हनीमूनचे वैवाहीक आयुष्यातील स्थान याबाबत अनेक प्रकारची मते येऊ शकतील याचे कारण सापेक्ष बाब असावी.

समीपता, एकांत, समाजमान्यता व नावीन्य यातून जो परिचय निर्माण होईल तो चिरकाळ टिकेल अशी संकल्पना ते सुरू करणार्‍यांच्या मनात होती की काय माहीत नाही. (कोणी ही संकल्पना प्रत्यक्षात रूढ केली तेही माहीत नाहीच).

पण एकत्र कुटुंब पद्धतीत व त्यातही जुन्या काळात हनीमूनची अधिक आवश्यकता असावी असे वाटते, याचे कारण लग्नानंतर एकमेकांना ओळखणे व समजून घेणे हे सर्वांच्या उपस्थितीत व कमी जागेत शक्य नाही.

धन्यवाद

अर्थात, आई वडील घरात असताना दोन्ही दांपत्यांना दोन स्वतंत्र शयनकक्ष असणे हे काही त्या अर्थाने एकत्र कुटुंब म्हणता येणार नाहीच. (म्हणून जुना काळ असे म्हणालो)

हनीमून ला काही लोक "पुनरूत्पादन आणि सृजनशीलता" अशा गंभीर चर्चेसाठी जातात.

सारीका >>:खोखो:

युरी Rofl

अनुसुया..
तु
दुष्ट आहेस...
दुष्ट दुष्ट दुष्ट
अस हसू नये ग

Blush

त्यात काय चर्चा करायची आहे !!! वाटलं तर जाव नाही तर नाही. हे म्हणजे हनीमुन झाला नाही तर काहीतरी भयानक घडेल असे आहे का?

एक मात्र खरं की आपलं माणुस "आपलं" आहे का नाही ते हनीमुन डेज नंतर नक्की कळतं.

हा विषय ८० दशकाच्या पुर्वि असता तर नक्किच (माहिति नाहि) स्थान असते ? आजच्या युगात नाहि वाटत Happy

Pages