पाँझी स्किम, बॅजर गेम, स्पॅनिश प्रिझनर, नायजेरिअन स्कॅम ते चेन मार्केटिंग आणि भविष्यकथन अशी अनेकविध नावं विविध ठिकाणी आपल्या कानावर पडत असतात. हॉलिवुडने तर कॉन आर्टिस्टना (कॉन्फिडन्स आर्टिस्ट) टोटल रोमॅंटिसाईझ केलंय. या वेगवेगळ्या क्लुप्त्या नक्की आहेत काय आणि त्यात आपण कसे फसवले जातो याची लिस्ट करायचा प्रयत्न करतोय.
ही सगळी माहिती पब्लिक डोमेन मधूनच शोधून लिहिली आहे. ही फसवणूक करण्यासाठी लिहिलेली कृती नसून मला याविषयावर माहिती एकत्र करावीशी वाटली म्हणून लिहिलेली वेब एन्ट्री आहे. कुणाला घोटाळ्यात अडकण्यापासून किंवा 'घोटाळा आहे' हे समजायला या माहितीचा उपयोग झाला तर उत्तमच.
अशा प्रकारची फसवणूक "भारताच्या" राजकारणात घडली असेल तरी हा धागा भारताच्या राजकारणावर नाही याची नोंद घ्या आणि शक्यतो कृपया इथे त्याचा रेफरन्स देणे टाळा.
कॉन्फिडन्स गेम किंवा विश्वास जिंकून फसवणूक करताना फसवणूक करणारी व्यक्ती मानवी मनाच्या सहज आणि पुरेशा पुराव्याशिवाय विश्वास ठेवणे, अती-निरागसता (नाईव्ह), सहवेदना आणि त्यातून पटकन मदत करणे, स्वतःच्या कर्तृत्वावर/ गुणांवर/ क्षमतेवर असलेला फाजील विश्वास, कधीतरी फायद्यासाठी अनैतिक वागणूक करणे पण ती नैतिक नाही याचे पुरेपुर भान असणे, अप्रामाणिकपणा, लोभ, संधीसाधूपणा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हाव इ. सहज प्रेरणांच्या वापर आपल्या फायद्या साठी करतात.
अशी विश्वास जिंकून फसवणूक करताना साधारण या सहा पायऱ्या वापरल्या जातात.
१. तयारी: आधी फसवणुक कशी करायची याची जय्यत तयारी केली जाते. कोणी मदत करणारा लागणार असेल मदतनिसाची नेमणूक होते.
२. सावज (व्हिक्टिम) हेरणे आणि त्याच्याशी संपर्क करणे
३. बिल्ट अप: या अन्यायग्रस्त व्यक्तीला फायदा मिळण्याची संधी उपलब्ध करणे. जेणेकरून त्याच्या मनात हाव निर्माण होईल आणि ती हाव सारासारविचार क्षमतेवर हावी होईल.
४. फायदा होणे: यात त्या व्यक्तीला थोडाफार आर्थिक फायदा होईल, आणि व्यक्तीचा एकुणात स्कीमवरचा विश्वास दुणावेल.
५. गोंधळाची परिस्थिती निर्माण करून अन्यायग्रस्त व्यक्तीला चटकन निर्णय घेण्यास भाग पाडणे
६. त्याच वेळी आजूबाजूच्या व्यक्ती (ज्या फसवणुकीत सामील आहेत) त्याच स्कीम मध्ये गुंतवणूक करत आहेत असा भास निर्माण करणे जेणे करून जे चालू आहे ते योग्य आहे हा भास कायम राहील.
काही प्रसिध्द फसवणुकीची जाळी
१. स्पॅनिश प्रिझनर: किंवा अॅडव्हान्स फी, नायजेरिअन पत्र इ. : यात फसवणूक करणारी व्यक्ती आपण एका श्रीमंत माणसाच्या संपर्कात आहोत जो/ जी स्पेन मध्ये जेल मध्ये आहे असं सांगते. त्याची श्रीमंत व्यक्तीची ओळख जाहीर केली तर त्या व्यक्तीला भयानक परिणामांना सामोरे जायला लागेल हे ही सांगते. यात कधीकधी ती व्यक्ती लांबची नातेवाईक आहे, परिचित आहे असंही भासवले जाते. त्या व्यक्तीच्या तुरुंगातून सुटकेस पैसे उभे करण्यासाठी जर तुम्ही मदत केलीत तर नंतर तिच्या संपत्तीतला वाटा आणि संपतीशिवाय काही फायदा जसे... तिच्या सुंदर मुलीशी विवाह इ. आमिष दाखवले जाते. तुम्ही एकदा मदत केलीत की थोडे दिवसांनी, त्याच्या सुटकेत आणखी काही विघ्ने येतात आणि आणखी जास्त पैशांची गरज भासू लागते.
ही फसवणूक तुमच्याकडचे पैसे संपे पर्यंत किंवा तुम्ही पैसे देणे बंद करे पर्यंत चालू रहाते.
यात कुठेतरी ठेवलेली मौल्यवान वस्तू वेअरहाउस मधून सोडवून घेणे, हरवलेल्या सामानात काही मौल्यवान आहे ते एअरपोर्ट वरून सोडवून घ्यायचे आहे, कोणा आफ्रिकन माणसाला कोट्यावधी हवाला करायचे आहेत त्यासाठी इनिशिअल रक्कम भरा, फेसबुक अकौंट हायजॅक करुन सगळ्या फ्रेंडलिस्टला ही व्यक्ती परदेशी अडचणीत आहे पैसे पाठवा मेसेज पाठवणे अशी अनेक व्हेरीएशन आज काल करण्यात येतात.
२. सोन्याची फवारणी करुन खाण आहे भासवणे (सॉल्टिंग/ सॉल्टिंग द माईन): : सोन्याच्या खाणीवर शॉटगन मधून चक्क सोने फवारणे आणि भावी खरेदीदाराला प्रचंड मौल्यवान साठा सापडला आहे असं भासवून पैसे उकळणे. डायमंड होक्स, ब्रेक्स इ. ठिकाणी याचा वापरा केला गेलेला.
३. झाकली मूठ (पिग इन अ पोक/ कॅट इन अ बॅग) : पिशवीत डुक्कर (काही तरी मौल्यवान) आहे सांगून ती विकायची, आणि न उघडताच खरेदी करणारा जेव्हा उघडून बघेल तेव्हा कवडीमोल मांजर (मीटच्या दृष्टीने कवडीमोल, मांजरप्रेमींनी स्वतःला दुखापत करून घेऊ नये) बाहेर पडेल.
letting the cat out of the bag ह्या वाक्पाराचाराचा उगम ह्या हातचलाखीत आहे म्हणतात.
ह्याचा बळी आपण कधी कधी झालोय असं वाटत रहातं.
४. बॅजर गेम: : ही अशी फसवणूक लग्न झालेल्या संसारिक माणसाची केली जाते. समजा 'क्ष' या पुरुषाचे 'य' ह्या स्त्रीशी लग्न झाले आहे. तर त्याला 'ज्ञ' ही स्त्री आपल्या प्रेमात अडकवून विवाहबाह्य संबंधात अडकवते आणि हे 'फ' बघतो, जो 'ज्ञ' चा नवरा/ भाऊ असतो. तो 'क्ष' कडून हे गुप्त ठेवण्यासाठी पैसे मागतो.
यात ज्ञ ही हा संबध जबरदस्ती तून होता सांगून बलात्कार/ विनयभंग इ. आरोप करू शकते. यात समलिंगी संबंध, लहानमुलांबरोबर संबंध,
पॉर्नोग्राफी, समाज 'अ'मान्य पद्धतीने लैंगिक भावनाचा निचरा इ. बदल असू शकतात.
आणखी एक प्रकार म्हणजे आजारी असण्याच्या बहाण्याने डॉक्टरकडे जाऊन फिजिकल चेकप मध्ये डॉक्टरने अतिप्रसंग केला असा बहाणा करणे. लैंगिक भावनाचा वापर न करता, समाजात टॅबू असणाऱ्या गोष्टी जसे दारू पिणे, मांस भक्षण इ. केल्या तर त्या झाकायला ही हा प्रकार वापरला जातो.
५. बोगस लाँड्री बिल पाठवणे: गावातल्या एखाद्या खऱ्या लाँड्रीच्या बिलाच्या अनेक प्रती सगळ्या महागड्या उपहारगृहांना पाठवून तुमच्या वेटरने अंगावर अन्न/ पेयं/ वाईन सांडली त्यामुळे आलेलं हे कपडे धुवायचं बिल भरा असं पत्र पाठवणे. 'थोडक्यात निभावलं' म्हणून अनेक उपहारगृहे हे बिल भरून मोकळे होतात. पत्ता अर्थात मेल बॉक्सचा असतो.
६. आजी/ आजोबांची फसवणूक: आजोबांना नातवाचा/ नातीचा फोन किंवा मेल येतो की तिला दुसऱ्या देशात अटक केली आहे आणि जामिनासाठी पैसे हवे आहेत. आणि तिला हे आई वडिलांपासून लपवून ठेवायचं आहे. मग काय दुधावरची साय विरघळते.
७. भविष्यकथन: अस्पष्ट दावे ऐकले की माणूस ते आपापल्या बकुवा प्रमाणे आपल्याला चिकटवून घेतो. शारीर हालचाली इ. वरून चुकीच्या माहिती वरून पटकन दूर जायचे आणि बरोबर माहिती ठसवत रहायची... की विजय असत्याचाच होतो. भविष्यकथन काही आपल्याला नवीन नाही.
८. थाई मोती (आपण श्रीलंकन मोती, केरळची वेलची, म्हैसूरचे चंदन, आणि कुठली साडी/ रेशीम इ. म्हणू): परदेशी प्रवाश्यांना ड्युटी फ्री मौल्यवान रत्ने दाखवत अनेक दुकानातून हिंडवणे आणि शेवटी आपल्याच दुकानातून साध्यासुध्या गोष्टी भरमसाठ भावात विकणे. यात अनेक स्तरांत अख्खीच्या अख्खी इंडस्ट्रीही सामील असते.
९. मेरे पिया रहे रंगून (रोमान्स स्कॅम) : ऑनलाईन डेटिंग इ. च्या माध्यमातून रोमँटिक संबंध प्रस्थापित करून मग भेटायचं आहे पण तिकिटाला पैसे मागणे. अर्थात पैसे मागण्यासाठी अनेकविध कारणे सांगता येतात. किंवा पैसे न मागता एनकॅश न होणारे चेक्स पाठवणे आणि पैसे रेमिट करायला सांगणे.
१०. वैयक्तिक माहिती जमा करणे: पे-डे लोन, किंवा इतर लोन देतो म्हणून ग्राहकांकडून माहिती मागवणे आणि नाव, पत्ता, वाहन चालक परवाना इ. माहिती मिळाली की टी विकणे ज्यातून आयडेंटिटीची चोरी करुन त्याच्या नावावर लोन घेणे, खोटी कर भरल्याची पत्रे सरकारला देऊन सोशल सिक्युरिटी इ. चे पैसे घेणे इ.
११.विमा घोटाळा : मुद्दाम वाहनाचा अपघात घडवून आणणे. जसे हा बदमाश सावजापुढे वाहत्या रस्त्यात आपली गाडी आणतो आणि त्याचा दुसरा साथीदार त्या बदमाशाच्यापुढे गाडी आणतो. आता अपघात वाचवण्यासाठी ती बदमाश व्यक्ती अचानक ब्रेक दाबतो. साथीदार वेगात पुढे जातो पण मागून सावज त्या बदमाशाच्या गाडीवर आपटतो. मग इंश्युरंस कंपनीला अवतीर्ण व्हावेच लागते आणि केस आणि खर्च वाचवण्यासाठी कितीही खोटी केस वाटली तरी ती कॉनला पैसे देऊन मोकळी होते.
१२. फिडल गेम : याच्यात दोन व्यक्ती सामील असतात. एक गबाळ्या कपड्यात भारी उपहारगृहात खायला जातो. खाऊन झाल्यावर पैशाचं पाकीट तपासतो तर ते घरी राहिलेलं असतं. मग त्याच्या जवळची कुठली तरी मौल्यवान वस्तू जसं व्हायोलीन इ. तारण ठेऊन घरी पैसे आणायला जातो. तो गेल्यावर दुसरा तिकडे येतो आणि काही अचाट रक्कम देऊन ते फिडल खरेदी करू इच्छितो. पण मग तेवढ्यात त्याला एक फोन येतो आणि तो आपलं कार्ड आणि नंबर देऊन जातो.
थोड्यावेळाने पहिला फाटका माणूस पैसे घेऊन आपलं व्हायोलीन परत न्यायला येतो. पण रेस्टॉरंट ओनर त्या दुसऱ्या व्यक्तीची ऑफर आहे समजून ते जास्त पैशात विकत घ्यायला त्याला पटवतो. नाखुशीनेच फाटका माणूस ते विकायला तयार होतो. रेस्टॉरंट ओनरला आता फायदा होणार वाटते, पण तो दुसरा कधी उगवतच नाही.
इंटरनेट वापरून अजून अनेक प्रकारे फसवणुकीचे सापळे लावलेले सापडतील. वेळ मिळाला की त्यावर लिहितो. तुम्हाला आणखी माहिती असतील तर लिहा.
आपला नंबर या लोकांकडे कोण
आपला नंबर या लोकांकडे कोण देतं?
नंबर आणि ईमेल मिळवणे ही काही
नंबर आणि ईमेल मिळवणे ही काही कठीण गोष्ट राहिलेली नाही. वाईट ह्याचं वाटते की लोक बरेचदा ॲप इंस्टॉल करताना गीतेवर हात ठेवून शपथ दिल्यासारखी खरी खुरी जनमतारिख वगैरे घालतात. मग अनायासे ह्या फ्रोड लोकांना कोण वयस्कर आहे आणि सॉफ्ट टार्गेट आहे ते शोधायला अधिक सोपे जाते. तसेच तरुण मंडळींना विशेषतः मुलांना इमेल्स येत असतात मोबाईल हॅक झालाय त्यामुळे पोर्न साईट बघता ते तुमचे व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग नातेवाईकांना पाठवेन वगैरे वगैरे आणि हे थांबवायला बिटकोईन मध्ये खंडणी मागतात. एकूण सोशल मीडिया वरील सोशल लाईफ म्हणजे मज्जा मज्जा आहे आणि सिक्युरिटी नावाने बोंबाबोंब आहे.
आपला नंबर या लोकांकडे कोण
आपला नंबर या लोकांकडे कोण देतं?>>
Demat account काढले रे काढले की नंबर लीक होतो.
मी २०१९ मध्ये काढले. दहा बारा दिवसांत कॉल्स यायला लागले. त्यात एकापेक्षा जास्त demat accounts असतील तर एका अकाऊंट मध्ये आपण काय/किती गुंतवणूक ट्रेड करतोय हे इतर ब्रोकर्सना कळते. आणि बाहेरही लीक होते. इन्शुरन्स पॉलिसिजचा डेटा निदान LIC चा तरी केव्हाच लीक झाला आहे. पॉलिसी नंबर, मॅच्युरीटी डेट, अमाउंट सगळेच.
तसा फोन आला होता एक पॉलिसी मॅच्युअर होताना, सगळी माहिती सांगुन प्रोसेसिंग फी ते पाठवतील त्या लिंकवर भरायची म्हणत होते महाशय.
Demat account काढले रे काढले
Demat account काढले रे काढले की नंबर लीक होतो. >> बाप रे!
मी जेव्हा OLX वर गाडी विकायला
मी जेव्हा OLX वर गाडी विकायला पोस्ट टाकली, तेंव्हा मला पहिल्या २ मिनिटात ७ -८ ब्रोकरचे फोन आले . पाहिल्याशी मी बोलत होतो तेंव्हा बाकीचे सगळे वेटिंगला होते. खूप त्रास झाला.
ट्रु कॉलर क्राउड सोर्सिंगवरच
ट्रु कॉलर क्राउड सोर्सिंगवरच चालतं, हे खूप आधी लक्षात आलं होतं. माझ्या फोनमधले बहुतेक काँटॅक्ट्स एकदा अचानक आणि अकारण उडाले, तेव्हा ट्रु कॉलरचा उपयोग झाला. नाहीतर मी ओळखीच्या लोकांचे कॉलही रिजेक्ट केले असते.
आता मी ट्रु कॉलर अन - इन्स्टॉल केलं तरी त्यांनी माझ्याकडून मिळ वलेला डेटा तर उडणार नाहीए.
काँटॅक्ट्स अचानक आणि अकारण
काँटॅक्ट्स अचानक आणि अकारण उडाले कसे? (माझ्या माहितीत तरी कुणाचेच असे कधी झाल्याचे ऐकले नाही.) समजा, असे काही परत झाले तर त्यासाठी बॅकअप प्लॅन तयार ठेवा.
जीमेलवरूनपण उडाले होते. कसे
जीमेलवरूनपण उडाले होते. कसे उडाले त्याबद्दल ( तांत्रिक कारण) एक शंका आहे. तिचा पाठपुरावा अजून केला नाही.
WhatsApp groups / undeleted chats मुळे फार अडचण आली नाही.
True caller इन्स्टॉल
True caller इन्स्टॉल करण्याच्या भानगडीत पडलोच नाही आणि ह्यापुढेही ते इन्स्टॉल करणार नाही.
फसवणुकीला बळी पडलेल्या व्यक्ती वर्तमानपत्र किंवा टीव्ही पहातात की नाही हा मला सतावणारा प्रश्न आहे.
गेल्या 3-4 दिवसांपासून govt
गेल्या 3-4 दिवसांपासून govt ने ऑनलाईन अटक होणे ह्यावर अलर्ट caller tune वाजवायला सुरुवात केली आहे.
Covid आणि H1N1 फ्ल्यू साठीची caller tune जशी प्रत्येक कॉल लावला की वाजायची तशी ती वाजत आहे.
आधी एकदा दोनदा बरे वाटले पण आता खूप वात आलाय.
सावधान असा पहिला शब्द उच्चारून अतिशय danger आवाजात रेकॉर्डिंग केलेले आहे.
मी जेव्हा OLX वर गाडी विकायला
मी जेव्हा OLX वर गाडी विकायला पोस्ट टाकली, तेंव्हा मला पहिल्या २ मिनिटात ७ -८ ब्रोकरचे फोन आले . पाहिल्याशी मी बोलत होतो तेंव्हा बाकीचे सगळे वेटिंगला होते. खूप त्रास झाला.>>>> हा त्रास काहीही नाही....मी एकदा जवळच्या आप्तेष्टांच्या अंत्यविधी ला लालबाग ला गेलेलो.... अंत्यसंस्काराच्या सामानाची सर्व जुळवाजुळव करायची असल्याने मी जवळच्या अंत्यसंस्कार सामानाच्या दुकानाचा दूरध्वनी क्रमांक जस्ट डायल वरुन काढून सर्व सामान तिथे मिळते की नाही याची खात्री करुन घेतली ( मला दूरध्वनी क्रमांक या एकाच कारणासाठी हवा होता ) पण त्या पुढचे ५ तास म्हणजे मी जवळपास घरी परत येईस्तोवर शहरातल्या विविध भागातील अंत्यसंस्कार सामानाच्या दुकानांतून सामान घरपोच पाठवतो म्हणून मला जवळपास ३९ कॉल्स आले, आणि वेळ अशी होती की मी फोन बंद ही करु शकत नव्हतो आणि प्रत्येक कॉल जरी अन नोन नंबरवरुन असला तरी मला तो उचलणे भाग होते....याला बोलतात त्रास.... घरी आल्यावर जस्ट डायलच्या कस्टमर केअरला एक चांगला मेल लिहीला, उत्तरादाखल अपोलॉजीचा प्रिफॉरमॅटेड मेल आला जो त्यांची प्रोसेस ते सुताच्या फरकानेही बदलणार नाहीत याची साक्ष देत होता.
बापरे ! एखाद्या गावी
बापरे ! एखाद्या गावी रेल्वे स्टेशन वा बस स्टँडवर टुरिस्ट उतरला की त्याच्यावर टॅक्सीवाले , हॉटेलवाले तुटून पडतात (धार्मिक स्थळी आणखी कोणी) त्याची ही आधुनिक आवृत्ती झाली.
अनोळखी नंबर्स उचलायचेच नाहीत
अनोळखी नंबर्स उचलायचेच नाहीत असे ठरवले कि नेमका ड्डिलीव्हरी वाला फोन करत असतो.
एकदा सप्लायरचा फोन उचलला नाही तर त्याचा ट्रक अडवला होता. चार पाच तासांनी मोबाईल पाहिला तर वीस पंचवीस कॉल्स होते बिचार्या ड्रायव्हरचे. एकदा वडलांच्या डॉक्टरांचा फोन होता हॉस्पिटलमधून. माफी मागावी लागली.
या कारणांमुळे अननोन नंबर्स उचलणे भाग असते.
आता ९ ने सुरू होणार्या नंबवरून मार्केटिंग किंवा अनवॉण्टेड बिझनेस कॉल आला तर त्याची तक्रार करता येते. तत्काळ तो नंबर बंद होईल असे सांगण्यात येत आहे. त्यांना आता १८०० / १६०० ने सुरू जोणारा नंबर अनिवार्य केला आहे. या नंबरमुळे हा मार्केटिंग कॉल आहे हे समजते.
५ महिन्या आधी पर्सनल लोन साठी
५ महिन्या आधी पर्सनल लोन साठी ICICI होम ब्रांच मध्ये apply केले होते. २ दिवसांत १२० ते १३० कॉल्स वेगवेगळ्या बँका मधून येऊन गेले.
कॉल करणारे म्हणाले की CIBIL check झाल्यावर त्यांना कळते आणि मग ते कॉल करतात. हे लोन पण भावाला हवे होते म्हणून घेतले. आता परत कधी पर्सनल लोन नको रे बाबा.
मी हल्ली कुठलाही अननोन कॉल
मी हल्ली कुठलाही अननोन कॉल उचलत नाही. रिटायर झाल्यामुळे ही चैन परवडु लागलीय
हेच ते
हेच ते ढीगभर कॉल्स. भावाला पाठवलेले sceenshots.
सध्या १४० आणि ७३१ ह्या
सध्या १४० आणि ७३१ ह्या नंबरवरुन प्रचंड प्रमाणात मार्केटिन्ग चे कॉल्स येतात
मॉल मधून सामान घेताना १
मॉल मधून सामान घेताना १ मोबाईल नंबर द्यावाच लागतो. हा नंबर वल्नरेबले होऊन जात असावा. ह्यासाठी वेगळाच १ सिम ठेवायला हवा.
मॉल मधून सामान घेताना १
मॉल मधून सामान घेताना १ मोबाईल नंबर द्यावाच लागतो. >> मी मोबाईल नंबर न देता मॉलमधून खरेदी केली आहे.
नंबरचा अतिआग्रह झाला तेव्हा खरेदी न करता चालू पडलो किंवा चुकीचा नंबर दिला, हे प्रकारही केले आहेत.
>>मॉल मधून सामान घेताना १
>>मॉल मधून सामान घेताना १ मोबाईल नंबर द्यावाच लागतो.
मी कधीही मॉल मध्ये किंवा जिथे गरज नाही तिथे नंबर देत नाही. काही रिटर्न रिफंड घ्याय्चे असेल तर रिसीट जपून ठेवेन सांगतो. त्यामुळे तिकडच्या मार्केटिंग पासून वाचलोय पण तुम्ही एखादी क्रेडिट कार्ड ची पेमेंट लेट किंवा पार्शिअल करा, लगेच ५० पर्सनल लोन वाल्यांचे फोन येतात.
तुम्ही कॉल न उचलता फक्त ट्रू कॉलर वर ब्लॉक करू शकता पण ट्राय कडे रिपोर्ट करू शकत नाही. मग ते नवीन नवीन नंबर ने कॉल करत राहतात. ट्राय कडे रिपोर्ट करण्यासाठी कॉल उचलणे गरजेचे आहे. त्यामुळे ट्रू कॉलर वर लाल दिसले की एक सेकंड कॉल उचलून लगेच कट करतो आणि ट्राय कडे रिपोर्ट करतो. याचा अजून म्हणावा तसा फायदा झाला नाहीय पण कधी तरी होईल या आशेवर करतोय. बाकी डीएन्डी वगैरे मन के वहम है....
सध्या १४० आणि ७३१ ह्या
सध्या १४० आणि ७३१ ह्या नंबरवरुन प्रचंड प्रमाणात मार्केटिन्ग चे कॉल्स येतात
Submitted by भ्रमर on 23 December, 2024 - 10:25
@भ्रमर, तुम्हाला १४० ने सुरु होणाऱ्या क्रमांकावरून कॉल्स येत आहेत म्हणजे तुमचा मोबाईल क्रमांक DND (Do Not Disturb) मध्ये नोंदणीकृत नाही.
-----------------
DND नोंदणीसाठी - 'Fully Block' असा मेसेज '1909' वर पाठवा.
------------------
मेसेज पाठवल्यापासून ७ दिवसांनी 140 ने सुरु होणारे मार्केटिंग कॉल्स (जे legal असतात) ते बंद होतील. मात्र इतर साधारण १० आकडी क्रमांकावरुन येणारे मार्केटिंग कॉल्स (जे ill-legal असतात) ते लगेच बंद नाही होणार, त्यासाठी तुम्हाला त्या क्रमांकांची तक्रार नोंदवावी लागेल. आणि वर 'प्रविणपा' यांनी म्हटल्याप्रमाणे तक्रार नोंदवण्यासाठी तो कॉल किमान १ सेकंद तरी उचलावा लागेल. (कॉल 'received calls' या कॅटेगरी मध्ये जायला हवा, 'missed call' / 'rejected call' कॅटेगरीत जाऊन चालणार नाही.) शिवाय तक्रार ही कॉल / मेसेज आल्यापासून ३ दिवसांतच नोंद व्हायला हवी. म्हणजे आज २३ तारखेला एखादा मार्केटिंग कॉल आला तर २३, २४ किंवा २५ तारखेला रात्री २३.५९ पर्यंत तक्रार नोंद होणे गरजेचे आहे. (TRAI आणि Department of Telecom यांच्याशी या संदर्भात पत्रव्यवहार सुरु आहेत. तक्रार नोंदवण्यासाठी ३ ऐवजी ७ दिवस मिळावेत आणि missed / rejected call च्या बाबतीतही तक्रार नोंदवता यावी; कारण तो कॉल आपण उचललेला नसला तरीही रिंग वाजल्यामुळे आपण disturb झालेलोच असतो.)
---------------
DND violation (DND मध्ये नंबर नोंदवून देखील मार्केटिंग कॉल / मेसेज आल्यास) - TRAI (Telecom Regulatory Authority of India) चे स्वतःचे app आहे, TRAI DND 3.0 नावाचे. ते वापरून तुम्ही तक्रार नोंदवू शकता.
https://play.google.com/store/apps/details?id=trai.gov.in.dnd&hl=en
---------------
जर हे app नीट चालत नसेल तर आपले सिम ज्या कंपनीचे आहे (जिओ, एअरटेल, Vi इ.) त्यांच्या app मध्ये किंवा वेबसाईटवर customer login करूनही तक्रार नोंदवता येते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मॉल मधून सामान घेताना १ मोबाईल नंबर द्यावाच लागतो..... ह्यासाठी वेगळाच १ सिम ठेवायला हवा.
Submitted by aashu29 on 23 December, 2024 - 11:39
कायद्यानुसार कोणतेही दुकान / मॉल यांना ग्राहकांना मोबाईल नंबर देण्यासाठी जबरदस्ती करता येत नाही. मी स्वतः 'Star Bazaar' मध्ये नंबर मागितलाच तर मोबाईल नंबरशिवाय बिल बनवायला सांगतो.
अधिक माहितीसाठी हा video पहा (सुरवातीचे काही सेकंद timepass आहे) - https://www.youtube.com/shorts/J42YWcSqPjU
त्यामुळे ट्रू कॉलर वर लाल
त्यामुळे ट्रू कॉलर वर लाल दिसले की एक सेकंड कॉल उचलून लगेच कट करतो आणि ट्राय कडे रिपोर्ट करतो. याचा अजून म्हणावा तसा फायदा झाला नाहीय पण कधी तरी होईल या आशेवर करतोय. बाकी डीएन्डी वगैरे मन के वहम है....
Submitted by प्रविणपा on 23 December, 2024 - 12:36
प्रविणपा, ट्रायकडे तक्रार नोंदवत रहा, जितके जास्त जण तक्रार नोंदवतील तितक्या लवकर ही समस्या संपेल. कारण जेव्हा ट्राय एखाद्याचा नंबर बंद करते तेव्हा ते किमान २ वर्षांसाठी बंद करतात आणि त्या काळात त्या व्यक्तीला नवीन सिमही घेता येत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी अशा तक्रारी नोंदवून या ह** telemarketing वाल्यांची वाट लावत राहणे गरजेचे आहे. लोक 'चलता है' म्हणत सोडून देतात, हा मोठा प्रॉब्लेम आहे.
मी फोनमध्ये एक नवीन वैशिष्ट्य
मी फोनमध्ये एक नवीन वैशिष्ट्य समाविष्ट करण्याची शिफारस करू इच्छितो, जे पॅटर्न आधारित कॉल ब्लॉकिंगची सुविधा देऊ शकेल. ही सुविधा LG फोनमध्ये उपलब्ध आहे आणि वापरकर्त्यांना अनावश्यक कॉल्स अधिक प्रभावीपणे ब्लॉक करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. पण आता LG ने फोन बनवणे बंद केल्याने ह्या फिचरला मी मुकलोय.
पॅटर्न आधारित कॉल ब्लॉकिंग:
वापरकर्ते विशिष्ट क्रमांकांच्या पॅटर्न किंवा नियमांनुसार कॉल्स ब्लॉक करू शकतात.
उदाहरणे:
ठराविक क्रमांकाने सुरू होणारे कॉल्स ब्लॉक करा (उदा. +91 140 ने सुरू होणारे क्रमांक).
ठराविक क्रमांकावर समाप्त होणारे कॉल्स ब्लॉक करा (उदा. 000 ने समाप्त होणारे क्रमांक).
विशिष्ट अंक किंवा अक्षर असलेले क्रमांक ब्लॉक करा (उदा. "123").
हे असे फिचर जर मोबाईल फोन मध्ये असेल तर एक एक नंबर ब्लॉक करण्यापेक्षा बल्क मध्ये ठराविक नंबर ब्लॉक करू शकतो.
आजच्या वर्तमानपत्रात ही बातमी
आजच्या वर्तमानपत्रात ही बातमी वाचली. टेलिकॉम authority ऑफ इंडियाकडून बोलतोय असं सांगणारा रेकॉर्डेड फोन येतो. तुमच्या नंबरवरून बेकायदेशीर व्यवहार झाले आहेत त्यामुळे तुमचा फोन दोन तासात बंद होईल म्हणून सांगतात. अधिक माहितीसाठी अमुक नंबर दाबा. मग नेहमीचीच कहाणी. डिजिटल अरेस्ट आणि पैसे उकळणे.
मला असा फोन महिन्याभरापूर्वी आला होता. मी काहीही न बोलता फोन कट केला होता.
या माणसाचे ११.८ कोटी रुपये गेले
https://www.thehindu.com/news/cities/bangalore/man-held-under-digital-ar...
खरं तर, ११.८ कोटी रुपयांची
खरं तर, ११.८ कोटी रुपयांची वरील बातमीच मला खोटी वाटत आहे.
मी फोनमध्ये एक नवीन वैशिष्ट्य
मी फोनमध्ये एक नवीन वैशिष्ट्य समाविष्ट करण्याची शिफारस करू इच्छितो, जे पॅटर्न आधारित कॉल ब्लॉकिंगची सुविधा देऊ शकेल.
Submitted by योगी९०० on 24 December, 2024 - 19:19
शाओमीच्या Redmi Note 3 मध्ये (MIUI 10) ठराविक क्रमांकाने सुरु होणाऱ्या क्रमांकांना block करण्याचा पर्याय आहे.

पण असे settings फक्त फोनमध्ये नको, तर ते telecom service provider साईडला पाहिजेत.
सध्या माझी TRAI / Department of Telecom कडे मागणी आहे की operator side ला international calls block करा.
म्हणजे by default प्रत्येक सिम कार्डला असे setting हवे की 'Receive calls from India only (having prefix +91 only)'. ज्याला international calls हवे आहेत (येतात / येणे अपेक्षित आहे) त्यांना individually आपले setting बदलून calls allow करू देत.
by default setting याच्यासाठी कारण आपल्या जनतेमध्ये असलेली अनभिज्ञता / गांभीर्य नसणे इ. DND (Do Not Disturb) सेवा सुरु होऊन एक तप उलटून गेले, पण आजही कित्येकांना अशी काही सेवा आहे, ती मोफत आहे आणि त्याच्या साहाय्याने आपण बरेचसे मार्केटिंग कॉल्स / मेसेजेस बंद करू शकतो, हेच माहीत नाही. DND कसे सुरु करतात, हे तर खूप दूरची गोष्ट!!!
त्यामुळे फेरीवाले, घरकाम करणाऱ्या बाया, स्वच्छता कर्मचारी, निरनिराळ्या ऑफिस मधले ऑफिस बॉईज, शेतमजूर, वीटभट्टी कामगार, बांधकाम मजूर इ. अशा अनेक निरक्षर / अल्पशिक्षित लोकांना देशाबाहेरून येणारे कॉल बंद करण्याचा पर्याय दिला तरी ते वापरण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे सर्वांनाच हा पर्याय by default चालू ठेवावा. ज्याला int. call हवेत तो app मधून किंवा गॅलरीला भेट देऊन आपल्या क्रमांकावर incoming international call चालू करू शकेल.
उ.बो.
उ.बो.
छापील आवृत्तीत आली आहे बातमी, पोलिसांचा हवाला देऊन. त्या माणसाचं नावही आहे. ११.८ कोटी बँकेत होते म्हणून खोटं वाटतं बरोबर आहे, पण कदाचित शेअर्स वगैरे विकलेही असतील. महिनाभर डिजिटल अरेस्टमधे होता तो माणूस.
सॅमसंगचा फोन असेल तर
सॅमसंगचा फोन असेल तर पुढीलप्रमाणे करा.
Settings => Notifications मध्ये जा.
Turn on "Do not disturb" mode.
Allow Calls => Contacts only
Allow Messages => Contacts only.
Options are All/Contacts only/Favorite contacts only/None
विषय संपला.
त्रासाचे मुख्य कारण म्हणजे भारतात voicemail हा प्रकारच बहुतेकांना माहीत नाही किंवा माहीत असला तरी फारसे कुणी वापरत नाही.
काँटॅक्ट्स ओन्ली सेटींग केले
काँटॅक्ट्स ओन्ली सेटींग केले तर कुरियर वाले/ इतर जे खरंच जेन्युईनली संपर्क करू पाहत आहेत त्यांच्याशी संपर्क होणार नाही.
कुरियरसाठी पत्ता न्हवे, तर
कुरियरसाठी पत्ता न्हवे, तर फोन नंबर लागतो ही माहिती माझ्यासाठी नवीन आहे.
Pages