विश्वास संपादन करून विणलेली फसवणुकीची जाळी (कॉन स्किम्स)

Submitted by अमितव on 19 March, 2018 - 18:04

पाँझी स्किम, बॅजर गेम, स्पॅनिश प्रिझनर, नायजेरिअन स्कॅम ते चेन मार्केटिंग आणि भविष्यकथन अशी अनेकविध नावं विविध ठिकाणी आपल्या कानावर पडत असतात. हॉलिवुडने तर कॉन आर्टिस्टना (कॉन्फिडन्स आर्टिस्ट) टोटल रोमॅंटिसाईझ केलंय. या वेगवेगळ्या क्लुप्त्या नक्की आहेत काय आणि त्यात आपण कसे फसवले जातो याची लिस्ट करायचा प्रयत्न करतोय.

ही सगळी माहिती पब्लिक डोमेन मधूनच शोधून लिहिली आहे. ही फसवणूक करण्यासाठी लिहिलेली कृती नसून मला याविषयावर माहिती एकत्र करावीशी वाटली म्हणून लिहिलेली वेब एन्ट्री आहे. कुणाला घोटाळ्यात अडकण्यापासून किंवा 'घोटाळा आहे' हे समजायला या माहितीचा उपयोग झाला तर उत्तमच.
अशा प्रकारची फसवणूक "भारताच्या" राजकारणात घडली असेल तरी हा धागा भारताच्या राजकारणावर नाही याची नोंद घ्या आणि शक्यतो कृपया इथे त्याचा रेफरन्स देणे टाळा.

कॉन्फिडन्स गेम किंवा विश्वास जिंकून फसवणूक करताना फसवणूक करणारी व्यक्ती मानवी मनाच्या सहज आणि पुरेशा पुराव्याशिवाय विश्वास ठेवणे, अती-निरागसता (नाईव्ह), सहवेदना आणि त्यातून पटकन मदत करणे, स्वतःच्या कर्तृत्वावर/ गुणांवर/ क्षमतेवर असलेला फाजील विश्वास, कधीतरी फायद्यासाठी अनैतिक वागणूक करणे पण ती नैतिक नाही याचे पुरेपुर भान असणे, अप्रामाणिकपणा, लोभ, संधीसाधूपणा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हाव इ. सहज प्रेरणांच्या वापर आपल्या फायद्या साठी करतात.

अशी विश्वास जिंकून फसवणूक करताना साधारण या सहा पायऱ्या वापरल्या जातात.
१. तयारी: आधी फसवणुक कशी करायची याची जय्यत तयारी केली जाते. कोणी मदत करणारा लागणार असेल मदतनिसाची नेमणूक होते.
२. सावज (व्हिक्टिम) हेरणे आणि त्याच्याशी संपर्क करणे
३. बिल्ट अप: या अन्यायग्रस्त व्यक्तीला फायदा मिळण्याची संधी उपलब्ध करणे. जेणेकरून त्याच्या मनात हाव निर्माण होईल आणि ती हाव सारासारविचार क्षमतेवर हावी होईल.
४. फायदा होणे: यात त्या व्यक्तीला थोडाफार आर्थिक फायदा होईल, आणि व्यक्तीचा एकुणात स्कीमवरचा विश्वास दुणावेल.
५. गोंधळाची परिस्थिती निर्माण करून अन्यायग्रस्त व्यक्तीला चटकन निर्णय घेण्यास भाग पाडणे
६. त्याच वेळी आजूबाजूच्या व्यक्ती (ज्या फसवणुकीत सामील आहेत) त्याच स्कीम मध्ये गुंतवणूक करत आहेत असा भास निर्माण करणे जेणे करून जे चालू आहे ते योग्य आहे हा भास कायम राहील.

काही प्रसिध्द फसवणुकीची जाळी

१. स्पॅनिश प्रिझनर: किंवा अ‍ॅडव्हान्स फी, नायजेरिअन पत्र इ. : यात फसवणूक करणारी व्यक्ती आपण एका श्रीमंत माणसाच्या संपर्कात आहोत जो/ जी स्पेन मध्ये जेल मध्ये आहे असं सांगते. त्याची श्रीमंत व्यक्तीची ओळख जाहीर केली तर त्या व्यक्तीला भयानक परिणामांना सामोरे जायला लागेल हे ही सांगते. यात कधीकधी ती व्यक्ती लांबची नातेवाईक आहे, परिचित आहे असंही भासवले जाते. त्या व्यक्तीच्या तुरुंगातून सुटकेस पैसे उभे करण्यासाठी जर तुम्ही मदत केलीत तर नंतर तिच्या संपत्तीतला वाटा आणि संपतीशिवाय काही फायदा जसे... तिच्या सुंदर मुलीशी विवाह इ. आमिष दाखवले जाते. तुम्ही एकदा मदत केलीत की थोडे दिवसांनी, त्याच्या सुटकेत आणखी काही विघ्ने येतात आणि आणखी जास्त पैशांची गरज भासू लागते.
ही फसवणूक तुमच्याकडचे पैसे संपे पर्यंत किंवा तुम्ही पैसे देणे बंद करे पर्यंत चालू रहाते.
यात कुठेतरी ठेवलेली मौल्यवान वस्तू वेअरहाउस मधून सोडवून घेणे, हरवलेल्या सामानात काही मौल्यवान आहे ते एअरपोर्ट वरून सोडवून घ्यायचे आहे, कोणा आफ्रिकन माणसाला कोट्यावधी हवाला करायचे आहेत त्यासाठी इनिशिअल रक्कम भरा, फेसबुक अकौंट हायजॅक करुन सगळ्या फ्रेंडलिस्टला ही व्यक्ती परदेशी अडचणीत आहे पैसे पाठवा मेसेज पाठवणे अशी अनेक व्हेरीएशन आज काल करण्यात येतात.

२. सोन्याची फवारणी करुन खाण आहे भासवणे (सॉल्टिंग/ सॉल्टिंग द माईन): : सोन्याच्या खाणीवर शॉटगन मधून चक्क सोने फवारणे आणि भावी खरेदीदाराला प्रचंड मौल्यवान साठा सापडला आहे असं भासवून पैसे उकळणे. डायमंड होक्स, ब्रेक्स इ. ठिकाणी याचा वापरा केला गेलेला.

३. झाकली मूठ (पिग इन अ पोक/ कॅट इन अ बॅग) : पिशवीत डुक्कर (काही तरी मौल्यवान) आहे सांगून ती विकायची, आणि न उघडताच खरेदी करणारा जेव्हा उघडून बघेल तेव्हा कवडीमोल मांजर (मीटच्या दृष्टीने कवडीमोल, मांजरप्रेमींनी स्वतःला दुखापत करून घेऊ नये) बाहेर पडेल.
letting the cat out of the bag ह्या वाक्पाराचाराचा उगम ह्या हातचलाखीत आहे म्हणतात.
ह्याचा बळी आपण कधी कधी झालोय असं वाटत रहातं.

४. बॅजर गेम: : ही अशी फसवणूक लग्न झालेल्या संसारिक माणसाची केली जाते. समजा 'क्ष' या पुरुषाचे 'य' ह्या स्त्रीशी लग्न झाले आहे. तर त्याला 'ज्ञ' ही स्त्री आपल्या प्रेमात अडकवून विवाहबाह्य संबंधात अडकवते आणि हे 'फ' बघतो, जो 'ज्ञ' चा नवरा/ भाऊ असतो. तो 'क्ष' कडून हे गुप्त ठेवण्यासाठी पैसे मागतो.
यात ज्ञ ही हा संबध जबरदस्ती तून होता सांगून बलात्कार/ विनयभंग इ. आरोप करू शकते. यात समलिंगी संबंध, लहानमुलांबरोबर संबंध,
पॉर्नोग्राफी, समाज 'अ'मान्य पद्धतीने लैंगिक भावनाचा निचरा इ. बदल असू शकतात.
आणखी एक प्रकार म्हणजे आजारी असण्याच्या बहाण्याने डॉक्टरकडे जाऊन फिजिकल चेकप मध्ये डॉक्टरने अतिप्रसंग केला असा बहाणा करणे. लैंगिक भावनाचा वापर न करता, समाजात टॅबू असणाऱ्या गोष्टी जसे दारू पिणे, मांस भक्षण इ. केल्या तर त्या झाकायला ही हा प्रकार वापरला जातो.

५. बोगस लाँड्री बिल पाठवणे: गावातल्या एखाद्या खऱ्या लाँड्रीच्या बिलाच्या अनेक प्रती सगळ्या महागड्या उपहारगृहांना पाठवून तुमच्या वेटरने अंगावर अन्न/ पेयं/ वाईन सांडली त्यामुळे आलेलं हे कपडे धुवायचं बिल भरा असं पत्र पाठवणे. 'थोडक्यात निभावलं' म्हणून अनेक उपहारगृहे हे बिल भरून मोकळे होतात. पत्ता अर्थात मेल बॉक्सचा असतो.

६. आजी/ आजोबांची फसवणूक: आजोबांना नातवाचा/ नातीचा फोन किंवा मेल येतो की तिला दुसऱ्या देशात अटक केली आहे आणि जामिनासाठी पैसे हवे आहेत. आणि तिला हे आई वडिलांपासून लपवून ठेवायचं आहे. मग काय दुधावरची साय विरघळते.

७. भविष्यकथन: अस्पष्ट दावे ऐकले की माणूस ते आपापल्या बकुवा प्रमाणे आपल्याला चिकटवून घेतो. शारीर हालचाली इ. वरून चुकीच्या माहिती वरून पटकन दूर जायचे आणि बरोबर माहिती ठसवत रहायची... की विजय असत्याचाच होतो. भविष्यकथन काही आपल्याला नवीन नाही.

८. थाई मोती (आपण श्रीलंकन मोती, केरळची वेलची, म्हैसूरचे चंदन, आणि कुठली साडी/ रेशीम इ. म्हणू): परदेशी प्रवाश्यांना ड्युटी फ्री मौल्यवान रत्ने दाखवत अनेक दुकानातून हिंडवणे आणि शेवटी आपल्याच दुकानातून साध्यासुध्या गोष्टी भरमसाठ भावात विकणे. यात अनेक स्तरांत अख्खीच्या अख्खी इंडस्ट्रीही सामील असते.

९. मेरे पिया रहे रंगून (रोमान्स स्कॅम) : ऑनलाईन डेटिंग इ. च्या माध्यमातून रोमँटिक संबंध प्रस्थापित करून मग भेटायचं आहे पण तिकिटाला पैसे मागणे. अर्थात पैसे मागण्यासाठी अनेकविध कारणे सांगता येतात. किंवा पैसे न मागता एनकॅश न होणारे चेक्स पाठवणे आणि पैसे रेमिट करायला सांगणे.

१०. वैयक्तिक माहिती जमा करणे: पे-डे लोन, किंवा इतर लोन देतो म्हणून ग्राहकांकडून माहिती मागवणे आणि नाव, पत्ता, वाहन चालक परवाना इ. माहिती मिळाली की टी विकणे ज्यातून आयडेंटिटीची चोरी करुन त्याच्या नावावर लोन घेणे, खोटी कर भरल्याची पत्रे सरकारला देऊन सोशल सिक्युरिटी इ. चे पैसे घेणे इ.

११.विमा घोटाळा : मुद्दाम वाहनाचा अपघात घडवून आणणे. जसे हा बदमाश सावजापुढे वाहत्या रस्त्यात आपली गाडी आणतो आणि त्याचा दुसरा साथीदार त्या बदमाशाच्यापुढे गाडी आणतो. आता अपघात वाचवण्यासाठी ती बदमाश व्यक्ती अचानक ब्रेक दाबतो. साथीदार वेगात पुढे जातो पण मागून सावज त्या बदमाशाच्या गाडीवर आपटतो. मग इंश्युरंस कंपनीला अवतीर्ण व्हावेच लागते आणि केस आणि खर्च वाचवण्यासाठी कितीही खोटी केस वाटली तरी ती कॉनला पैसे देऊन मोकळी होते.

१२. फिडल गेम : याच्यात दोन व्यक्ती सामील असतात. एक गबाळ्या कपड्यात भारी उपहारगृहात खायला जातो. खाऊन झाल्यावर पैशाचं पाकीट तपासतो तर ते घरी राहिलेलं असतं. मग त्याच्या जवळची कुठली तरी मौल्यवान वस्तू जसं व्हायोलीन इ. तारण ठेऊन घरी पैसे आणायला जातो. तो गेल्यावर दुसरा तिकडे येतो आणि काही अचाट रक्कम देऊन ते फिडल खरेदी करू इच्छितो. पण मग तेवढ्यात त्याला एक फोन येतो आणि तो आपलं कार्ड आणि नंबर देऊन जातो.
थोड्यावेळाने पहिला फाटका माणूस पैसे घेऊन आपलं व्हायोलीन परत न्यायला येतो. पण रेस्टॉरंट ओनर त्या दुसऱ्या व्यक्तीची ऑफर आहे समजून ते जास्त पैशात विकत घ्यायला त्याला पटवतो. नाखुशीनेच फाटका माणूस ते विकायला तयार होतो. रेस्टॉरंट ओनरला आता फायदा होणार वाटते, पण तो दुसरा कधी उगवतच नाही.

इंटरनेट वापरून अजून अनेक प्रकारे फसवणुकीचे सापळे लावलेले सापडतील. वेळ मिळाला की त्यावर लिहितो. तुम्हाला आणखी माहिती असतील तर लिहा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका मूवर्स आणि पॅकर्स कंपनीचा मला फार वाईट अनुभव आलाय. अग्रवाल मूवर्स आणि पॅकर्स ही एक प्रसिद्ध कंपनी आहे आणि त्या नावाशी साधर्म्य दाखवणार्या अनेक कंपन्या आहेत. त्यातल्या बर्याच फ्रॉड आहेत. साधारणपणे आपण सध्याच्या काळात फक्त वेबसाईट पाहुन वगैरे पुढचे निर्णय घेतो. माझयही बाबतीत असेच झाले. एकाच प्रसिध्द नावाशी साधर्म्य दाखवणार्या अनेक वेबसाईट असु शकतात हे न समजल्याने जी वेबसाईट योग्य वाटली त्यावर कॉल केला. कॉल ही व्य्वस्थित रिसिव वगैरे केला गेला व बोलणे वगैरे व्यावसायिक वाटल्याने काही शंका आली नाही म्हणुन पुढचा व्यवहार ठरवला. व त्यांच्या व्यक्तीने घरी येऊन व्य्वस्थित सामान नेले. खरा खेळ इथुन पुढे चालु झाला. दुसर्या दिवशी फोन आला कि सामान जास्त आहे अमुक अमुक रुपये जास्त द्यावे लागतील. किंमत ठरवल्यापेक्षा ५-६ हजार रूपये जास्त होती पण आम्हीही ते शहर सोडुन (बंगळुर) नवीन शहरात आल्याने काही जास्त करु शकत नव्हतो व एव्हाना जाणीव झाली होती कि ट्रॅपमध्ये फसलोय. अगदी विनवणी वगैरे करुन त्या व्यक्तीचा अहंकार साभाळून पैसे वगैरे पाठवले. त्यानंतर ही आठवडाभर काहीच हलचाल नाही. बिल पाहिले त्यावरचा जी.एस.टी नंबर फेक होता. (माझ्या सी.ए मित्राने कन्फर्म करुन सांगितले.) दुसरे फोन दिले होते त्यातला एक कुणा दुसर्याचाच होता व तो ही त्रस्त झालेला दिसला. (बरेच फोन आले असावेत.) अजुन एक फोन होता तो डिलिवरी सर्विस कंपनीचा होता व त्याने सांगितले तुमचे सामान अजुन गोडाऊन मध्ये पडले आहे मला पेमेंट मिळाली नही. तुम्ही पैसे भरा मी लगोलग पाठवतोय. हे म्हणजे डबल्क्रॉस करण्याचा प्रकार होता. पुढे काही जास्त पै से भरले नाहीत व सरळ पोलिसात तक्रार केली. जवळपास महिन्याभराने सामान आले. फोन वर ज्या व्यक्तीशी बोल्णे व्हायचे त्याचे लोकेशन हरियाणामधले दिसत होते. दुसर्या दिवसापासुन त्या इसमाची भाषा मग्रुरीची होती.

१. Google वरून कोणते तरी कर्ज देणारे ॲप डाऊनलोड केले त्या द्वारे झटपट कर्ज घेतले.
=>
२. प्रश्न हा आहे की ह्या frud करणाऱ्या कडे सर्वांचे मोबाईल नंबर कसे गेले?
३. त्यांनी मोबाईल कसा हॅक केला असेल.
Submitted by Hemant 33 on 23 January, 2022 - 09:26
>>
Rofl

व्हिक्टिम = सावज ?
मस्त आहे धागा. लहानपणी खूप ऐकलेला प्रकार, प्रौढ स्त्रियांना टार्गैट करायचे, इथे जवळ एक बाईफुकट साड्या वाटत आहे, पण तुमच्या सोन्याच्या बांगड्या काढून ठेवा. नाहीतर फुकट साडी मिळणार नाही (!)असं सांगून बांगड्या पळवणे!!
असं वाटतं की कसं खरं वाटत असेल कुणाला!!

Submitted by maitreyee on 19 March, 2018 - 18:36>>>>>>>>>

माझी मावशी याला बळी पडली होत। गळ्यातील मोहनमाळ लंपास केली आणि भूल दिल्यामुळे ती इकडे तिकडे भटकत राहिली जेव्हा भूल उतरली तेव्हा ती आमच्याकडे आली होती (भांडुप हुन जोगेश्वरीला )

I got a call from 964675397 'FedEx' customer care saying a package attached to my Aadhar ID had been flagged because it contained illegal items. >>
किती वाईट वाटतंय की मला असे कॉल कधीच येत नाहीत. चांगला विरंगुळा होईल माझा. Lol

आज रात्री तुमची विज खंडीत होइल, ताबडतोब अमुक नंबरवर फोन करा किंवा आज तुमचे बँक अकाऊंट ब्लॉक होइल, फोन करा असे मेसेज मधुन मधुन येत राह्तत. मी ते नंबर ब्लॉक करते, पाठवणारे नव्या नंबरावरुन पाठवत राहतात. मी मेसेज उघडतही नाही, प्रिव्यु दिसतो ते बघुन ब्लॉक करते.

सगळे फोन नंबर विक्रिला इपलब्ध आहेत. हल्ली कुठेही गेले की तिथल्या बुकात नंबर लिहावा लागतो. मी मनाला येइल तो दहा आकडी नंबर माझा फोन म्हनुन लिहुन देते..

हल्लीच पाहिलेला एक नवा स्कॅम

भारती आक्सा चा एक एलिट वगैरे नाव असलेला प्रसिद्ध प्लॅन तुम्ही अमुक वर्षापुर्वी घेतला, एक वर्ष भरुन विसरलात. आता ते सगळे एकरकमी भरा, पुधच्या वर्षी मच्युरिटी आहे, अमुक तमुक मिळतील. ०पोलिसि नंबर देतात. हा नंबर कंपनीत फोन करुन्तुम्ही चेक करु शकता पण तशी बुद्धी झाली नाही व तुम्ही विश्वास ठेवलात की फसला. आणि एकच माणुस फोन करत नाही तर वेगवेगळे लोक करतात. त्यामुळे कंपनीतुनच फोन आलाय असे वाटते. तुम्ही पैसे भरता त्याची नवी पोलिसी तुम्हाला मिळते आणि त्याना कमिशन. तुमचे म्हटले तर नुकसान नाही, पोलिसी खरीच असते, पण नको असताना तुमच्या गळ्यात पडते. तुमच्याकडुन अजुन पैसे मिळतील असे वाटले तर नानाविध कारणे सांगुन अजुन पैसे घेतात व अजुन पॉलिसिज गळ्यात मारतात. पॉलिसी घेताना कंपनीचा फोन येतो तर आधीच पढवुन ठेवतात असे बोला म्हणुन.

हा स्कॅम बहुतेक कंपनीचेच लोक कंपनीचा सेटप वापरुन करतात. कंपनीची पॉलिसी विकली जाते आणि याना कमिशन मिळते.

काल दुपारी एक फोन आला. मी हळक्ष बँकेतून बोलतोय. तुमच्या (पाच आकडे - जे बरोबर होते) अकाउंटचं के वाय सी ओव्हरड्यु आहे. पॅन दिला नाहीए. तुम्हांला ईमेल्स केल्यात. अकाउंट ब्लॉक करावा लागेल.
मी - मी हल्लीच दिलाय पॅन आणि इतर पेपर. तेही कितव्यांदातरी.
तो - नाही झालाय. तुम्ही तुमची जन्मतारीख सांगा. मी व्हेरिफाय करतो.
मी - मी हे ब्रँचमध्ये जाऊनच करेन.
तो - मी ब्रँचमधूनच बोलतोय.
मी - ठीक आहे. मी येतो ब्रँचमध्ये.
तो - पण आता तुमचा अकाउंट के वाय सी नाही म्हणुन ब्लॉक होईल. अनब्लॉक व्हायला चार्जेस लागतील.
मी - हरकत नाही. मी ब्रँचमध्ये येऊ़नच भेटेन.
फोन कट.

वॉव! या स्कॅमला लोक सहज बळी पडत असतील. जिकडे आपण पॅन कार्ड आणि आधार कार्ड फुटाणे वाटावे तशी वाटतो तिकडे जन्मतारखेचं काय!
हल्ली इकडे 'एअर डक्ट क्लीनिंग' सर्विसच्या कोल्ड कॉल्सनी वात आणला आहे.
'बेट अँड स्विच' प्रकारे उल्लू बनवतात. लोकल नंबरवरुन कॉल येतो, एअर डक्ट क्लिनींगची एक किंमत सांगून माणूस पाठवतो सांगतात. तो/ती आली की डिसइनफेक्टंट आणि फलाणा गोष्टी गळ्यात मारुन दाम दुप्पट किंमत लावतात.

<< हल्ली इकडे 'एअर डक्ट क्लीनिंग' सर्विसच्या कोल्ड कॉल्सनी वात आणला आहे.
'बेट अँड स्विच' प्रकारे उल्लू बनवतात. >>
भलत्याच पत्त्यावर बोलावून घ्या.

Cold calls is a resolved problem as far as I am concerned.
- Use Lenny
- Use Google voice
- फोन आला की मराठीत बोला
- मालक/मालकीण घरात नाही असे सांगा
- गप्पा मारा आणि शेवटी फोन कट करा
- दुसरा फोन आला म्हणून त्याला होल्डवर ठेवा आणि काहीच बोलू नका
- स्वतःच बोला "You have reached voicemail of xxx. Please leave a message after the beep" आणि मग स्वतःच बीप असे म्हणा आणि गंमत ऐका.

Proud पण इतका वेळ नाही उबो. अनोळखी नंबरचा फोन न घेणे, घेतला आणि देसी अ‍ॅक्सेंटचा आवाज आला की सॉरी, नो थॅक्स म्हणून कट करणे हेच करतो. ते लोक निगरगट्ट असतात, तुम्ही कितीही त्रास दिलात तरी परत येते माझ्या मागल्या प्रकार होतात. डू नॉट कॉल वगैरेला कसं बायपास करायचं ते ही ठाऊक असते. सो आपला वेळ न दवडता हॅंग अप करणे हेच मला बरे वाटते.

भरत तुम्ही योग्यच केलेत.
मला उत्सुकता आहे की जन्म तारीख घेऊन काय करतील..? बँक पासवर्ड आजकाल जन्म तारीख कोणी ठेवत असेल का शंका आहे.

त्रास हा फोनवर बोलण्याचा नसतो. हातातले काम टाकून फोन घ्यावा लागणे जास्त त्रासदायक आहे. पण मला फारच कमी स्पॅम कॉल येतात त्यामुळे असे कॉल आले की खूप मनोरंजन होते.

सगळ्यात त्रासदायक प्रकार म्हणजे कस्टमर सर्व्हिसला फोन केला की कंपन्या आटोकाट प्रयत्न करतात की तुम्ही प्रत्यक्ष माणसाशी बोलूच शकणार नाही, मुद्दाम automated मेनू मध्ये फिरवत बसतात किंवा बराच वेळ होल्डवर ठेवतात. तो प्रकार माझ्या डोक्यात जातो. मी शक्यतो अश्या कंपन्यांना माझा बिझनेस देत नाही.

मग स्वतःच बीप असे म्हणा>>> उबो Lol
अनोळखी नंबरचा फोन न घेणे, घेतला आणि देसी अ‍ॅक्सेंटचा आवाज>>> जमतारा वाले विदेशि अक्सेंट पण लिलया काढतात हो. फोन न उचलणे बेस्ट.

उबो पण आजकाल स्पॅम कॉल्स ब्लँक येतात आणि आपण हॅलो पण नाही म्हटले तरी काही सेकंदात फोन हॅक्/मिरर का काय करतात.
ओटीपी न देणे हे आता बहुतांश लोकांस माहित आहे, दुसरे उपाय सुरू झालेत.

अगदी नुसता अ‍ॅक्सेंट नाही हो. बोलण्याची पद्धत, जेन्युअन व्यक्ती माझं नाव घेऊन माझ्याशी बोलायचंय सांगते. पहिल्या वाक्यात मुद्द्यावर येते. इ. इ.

आणि नुसता फोन करुन आपण कानाशी धरुन ऐकत असताना तो कोणी हॅक करू शकेल असं मला वाटत नाही. करत असेल तर तो कसा त्याची काही लिंक असेल तर द्या. वाचायला आवडेल.
आयपी फोन मी फक्त हातावर मोजता येतील अशा व्यक्तींचे एकाच अ‍ॅप मधले घेतो. बाकी कोणी करतही नाही आणि केले तर मी घेत नाही. पैशाचे कसलेही व्यवहार फोन वरुन करत नाही. तसेही देसी नंबर नसल्याने भारतात गेलो तरी एकही मोबाईल पे कॅटेगरी अ‍ॅप चालत नाही. त्यामुळे ओन्ली कॅश/ कार्ड व्यवहार होतात. विदेशात फक्त आणि फक्त कार्ड. फारतर गूगल वॉलेट मधुन एनएफसीने कार्ड किंवा इमेल ट्रान्सफर. शंभर अ‍ॅप आणि त्यातुन क्यूआर कोड स्कॅन करुन पे करणे माझ्या कम्फर्ट झोन बाहेरील आहे.

<< स्पॅम कॉल्स ब्लँक येतात आणि आपण हॅलो पण नाही म्हटले तरी काही सेकंदात फोन हॅक्/मिरर का काय करतात. >>
हे शक्य नाही. फोनवर एखादे सॉफ्टवेअर लागेल त्यासाठी आधी, त्यासाठी फोनचा प्रत्यक्ष access लागेल किंवा मालकाने चुकून एखादे malware सॉफ्टवेअर एखाद्या लिंकवरून उतरवले असेल तरच.

फोनवर एखादे सॉफ्टवेअर लागेल त्यासाठी आधी, त्यासाठी फोनचा प्रत्यक्ष access लागेल किंवा मालकाने चुकून एखादे malware सॉफ्टवेअर एखाद्या लिंकवरून उतरवले असेल तरच.>>> ओके तसे असावे.
लिंक नाहिये तशी पण कुठलासा व्हॉट्सॅप मेसेज होता. आता आठवत नाही.
पण ब्लँक कॉल्स येतात आणि माझ्या काही मैत्रिणींना ही आलेत. त्याचा उद्देश कळत नाही. कुठुनही येतात. रशिया, युके ..

a WhatsApp missed call (yes, you heard it right….a missed call) can make the Pegasus Spyware hack your device. Other than that, based on various standard reports, it has been observed that Pegasus is using a variety of endpoints to attack the devices such as it is using iMessage to attack iPhones.

The noticeable thing here is that it follows the zero-click method i.e, the device owner even isn’t required to click on the message, mail, link, etc. or to give any input to make the malware wor

a WhatsApp missed call (yes, you heard it right….a missed call) can make the Pegasus Spyware hack your device. >>> रिअली? मला वाटते हे एखादे हॅकिंग सॉफ्टवेअर/मॅलवेअर फोनवर ऑलरेडी इन्स्टॉल झाले असेल तर शक्य आहे.

नाहीतर फोनची ऑपरेटिंग सिस्टीम असते त्यात हे चेक्स असतात. मेसेजेस मधे वाचले जाणारे निव्वळ टेक्स्ट मेसेज, अगदी इतर अ‍ॅप मधे वाचले जाणारे टेक्स्ट मेसेज - केवळ यातून फोन मधल्या इतर "रिसोर्सेस" चा अ‍ॅक्सेस अशा अ‍ॅप्सना मिळत नाही. एखाद्याने आवर्जून अ‍ॅक्सेस दिला, किंवा मेसेज मधल्या लिन्क्स क्लिक केल्या तर गोष्ट वेगळी. उदा: इव्हन तुमच्या फोटोज चा अ‍ॅक्सेस तुम्ही आवर्जून दिल्याशिवाय अ‍ॅप्स ना नसतो.

हा फोन्सच्या बेसिक सिक्युरिटीचा भाग आहे. तोच जर रिलाएबल नसेल किंवा पेगासस सारख्यांनी ब्रेक केला असेल तर फोनवर फक्त विरंगुळा टाइप अ‍ॅप्स व व्हॉइस कॉल इतकेच ठेवावे लागेल.

मला जॉब अप्लाय करते वेळी दोन चार वेळा स्कॅमचा अनुभव आला. रिक्रुटरने फोन नंबर दिलेला नसणे हा रेड फ्लॅग समजावा.

कालच झालेली घटना, इथे लिहावीशी वाटली.

आमच्या एका आम्ही कोणालाही नंबर देत नसलेल्या नवऱ्याच्या मोबाईल नंबरवर कॉल आला.फोन माझ्याकडे होता.ती बाई साधारणपणे लेडी इन्स्पेक्टर बोलतात त्या अथोरिटी ने बोलत होती.हा नंबर आम्ही कोणालाच(म्हणजे आई बाबा दीर जाऊ भाऊ बहीण) दिलेला नाही.तरी त्यावरून कॉल आला.बाईला म्हटलं मीच आशिष आहे मला सांग की तुला हा नंबर कुठून मिळाला.ती मला आशिषशीच बोलायचं आहे, तू कोण आहेस आधी मला सांग वगैरे वर आली.तिला तरीही मी बरंच विचारलं की हा नंबर तुला नक्की कुठून मिळाला, आम्ही दिलेला नाही, कॉल हिस्टरी नुसार तुझं या नंबर वरून काल कोणाशीही संभाषण झालेलं नाही.मग या नंबरवर फोन कसा केलास?मग म्हणाली आमच्या डाटाबेस मध्ये हाच नंबर आहे.(आता हे नंबर यांच्याकडे कसे आले याचं सरळ सोपं उत्तर: आपण सिम कार्ड घेताना डॉक्युमेंट जमा करतो त्यात आधार कार्ड कॉपी, नावांनी तपशील त्या नंबर सह.हा डाटा दुकानाकडून किंवा ज्या थर्ड पार्टी एजन्सी प्रोसेस करतात त्यांच्याकडून पुढे अनेक जणांना बेकायदेशीर विकला जातो.अगदी आपण 'अमुक अमुक वापरासाठी अमुक अमुक तारखेला व्हॅलीड' लिहून दिलं हार्ड कॉपी वर तर तेही कोणत्याही इमेज किंवा pdf एडिटर मध्ये सहज एडिट करता येतं.(कितना भी ढकने की कोशिश करो यहां सब नंx है)

तिला म्हटलं मला मॅटर सांग.तर म्हणाली नाही सांगणार,तू कोण आहेस हे आधी सांग(हिंदीत बोलत होती), त्यांचं इन्श्युरन्स बद्दल इन्व्हेस्टीगेशन चालू आहे.मी काल त्यांच्याशी याच नंबरवर बोलले मी म्हटलं शक्यच नाही.मला प्रूफ दे या नंबरवर बोलल्याची.मग म्हणाली मी बोललेय. तू त्यांना फोन दे.मग नवऱ्याला फोन लावला तो म्हणाला हा नंबर कोणालाही दिलेला नाही.तोवर तिने नवऱ्याच्या दुसऱ्या नंबरवर मेसेज केला आणि तिसर्या माणसाचा नंबर दिला.की हा आमचा लोकल ऑफिसर आहे.नवऱ्याने त्याला फोन केला.तर तो त्याला मला kyc डॉक्युमेंट पाठवा म्हणाला.त्याला तुझ्या आयडेंटिटी ची खात्री काय म्हटलं तर त्या एजंटने आयडी कार्ड चा फोटो पाठवला.त्यातही स्पेलिंगच्या चुका आहेत.डॉक्युमेंट अर्थातच पाठवली नाहीत किंवा डिटेल्सही.नवऱ्याला म्हटलं तू यांना हे स्कॅम आहे स्पष्ट दिसतंय तरी इतका भाव का देतोयस, तर म्हणाला पोलीस केस करण्यासाठी डाटा गोळा करतोय.मग या मुद्द्यावर माझा आणि त्याचा बराच प्रेमळ संवाद झाला.आपले आयडी सगळीकडे गेलेले असणं वेगळं आणि आपण हाताने पाठवणं वेगळं.विषाची परीक्षा कशाला.आपण काही cid किंवा सायबर सेल नाही.यांना अडकवण्याच्या नादात किती पावलं पुढे टाकू सांगता येत नाही.
ती बाई माझ्याशी बरंच उद्धट बोलत होती.जितकं अथोरिटी ने बोलणार तितकं समोरचा लवकर विश्वास ठेवणार.

यांची काम करण्याची पद्धत:
कोणी इंटेग्रेटेड ग्रीव्हन्स मॅनेजमेंट सिस्टम मधून बोलतोय सांगून फोन केला आणि:
1. तुमची अमकी पॉलिसी एक्सपायरी झालीय.पण पैसे मात्र अडकून आहेत, रक्कम मोठी आहे(50 किंवा 60 हजार रुपये.) आम्ही ग्रिव्हन्स सेल चे असल्याने याचा तपास करत आहोत.तुम्ही पॉलिसी चे पाहिले पान, kyc डॉक्युमेंट आणि चेक आमच्या लोकल माणसाकडे पाठवा.तो केस प्रोसेस करेल
2. ही पॉलिसी तुमची आधी होती ती फ्रॉड आहे.यावर खूप तक्रारी जमा झाल्यात.आम्ही ही पॉलिसी कॅन्सल करून तुम्हाला दुसऱ्या कंपनी ची पॉलिसी विकत घ्यावी लागेल त्याच रकमेची.यासाठी डॉक्युमेंट पाठवा.
3. तुम्हाला बोनस मिळतो आहे.पण तो मिळायला जो फॉर्म आहे त्याची प्रोसेसिंग फी अमुक आहे, ती भरा मग इंडेंट टाकतो

असे या स्कॅम चे व्हेरियंट आहेत.कॉल करणारे खूप वेळा पेशन्स ने फोन करतात.आणि प्रचंड कॉन्फिडन्स आणि अधिकार वाणीने बोलतात.लोकल अधिकाऱ्याचा नंबर देतात.यांना एकच उत्तर :' ऑफिस मध्ये मी येऊन मॅटर सोडवतो.ऑफिस चा पत्ता द्या.'

कोणीही 'पैसे अडकले आहेत तुमचे, आणि आम्ही स्वतःहून केस प्रोसेस करतो म्हटलं तर विश्वास ठेवू नका, घरातल्या ज्येष्ठ नागरिकांनाही सांगा.आवाजात प्रचंड उद्धटपणा, आत्मविश्वास आणि अर्जन्सी याने समोरच्याला गोंधवळणे हे पहिलं अस्त्र आहे.

मला नवऱ्या कडून हे प्रकरण थोडं माहीत होतं.त्याला आधी ज्यांनी फोन केला त्यांनी 'अमुक पैसे परत करायला तमुक टॅक्स भरावा लागेल, तो असा पैसे म्हणून घेणं आम्हाला अलाउड नाही, त्यामुळे तुम्हाला त्या रकमेची एक पॉलिसी विकत घ्यावी लागेल ही पॉलिसी त्याने विकत घेतली.त्याला खरी पॉलिसी आणि खरी कागदपत्रे मिळाली हे खरं असलं तरी हा अनएथिकल पॉलिसी सेल आहे.यातही अडकू नका. पैसे परत मिळवायचेत, स्वतः ऑफिसात खेटे घाला.ते जास्त सुरक्षित.

नाही पाठवला गं आयडी अंजू, पण हे सगळं 'ते किती पुढे जातात हे मला बघून त्यांच्या मोडस ऑपरेनडी चा अभ्यास करून पोलीस केस करायचीय' या आग्रहाखातर चालू होतं.आता बंद केलं.(हे बंद कर सांगण्यातही बरीच शक्ती खर्च पडली )

बरं केलंस बंद कर सांगितलंस ते. कोणीतरी धडा शिकवायला हवा असं वाटत असले तरी फार वेळ जातो आपला यात.

कधी कधी काही नंबर रेड कलरमध्ये दाखवतात spam म्हणून येतात, असं आलं की सावध होता येतं.

अशाच प्रकारचा फोन मागच्या वर्षी मला आला होता. इन्शुरन्स संदर्भात कोणताही फोन आला की मी सरळ तुमच्या ब्रँचला भेट देऊन चौकशी करतो म्हणून सांगतो. त्यावरही हे महाभाग काहीतरी पाल्हाळ लावतात तेंव्हाच यांचे बिंग फुटलेले असते. काही नंबर सायबर क्राईमला रिपोर्ट सुद्धा केलेत परंतु त्याचा कितपत परिणाम होतोय शंकाच आहे.

Pages