माझ्या ओळखीत मराठवाड्यातील मराठा कुणबी समाजाच्या एका जोडीचा थोडा घोटाळा झाला आहे, मुलीचं आपल्या सख्ख्या मामेभावाशी प्रेम जमलं आहे. मामेबहिणीशी सर्रास लग्न होतात. पण उलटे नाते असल्याने प्रश्न पडला आहे. मुलगा कमावता असून मुलगी अजून शिकतेय. मुलाच्या घरून नाहरकत संमती मिळाली आहे, आणि मुलीच्या घरून देखील होकार मिळेल अशी अपेक्षा आहे. तर प्रश्न असे की
१.हा विवाह कायद्याच्या चौकटीत बसतो का? बसत नसेल तर या विवाहावर हरकत घेण्याचा अधिकार नेमका कुणाचा असू शकतो?
२. या विवाहातून जन्मणाऱ्या अपत्याला काही शारीरिक अपाय होऊ शकतो का? (हा सर्वात महत्वाचा प्रश्न)
३. कावकाव करणाऱ्या नातेवाईकांना फाट्यावर मारण्याची तयारी आहेच, पण असा विवाह सर्वसाधारणपणे कश्याप्रकारे स्वीकारला जातो?
तुमच्या माहितीत असा विवाह असेल तर त्यांचा अनुभव सुद्धा कळवावा.
उत्तरांच्या अपेक्षेत,
राव पाटील
>>न वाचताच आपाआपली दैवतं,
>>न वाचताच आपाआपली दैवतं, गफ्रे घेउन येतात
साटेलोट्यात मुलाची आई (किंवा
साटेलोट्यात मुलाची आई (किंवा वडील) आणि मुलीचे वडील (किंवा आई) यांचे बहीणभावाचे नाते असलेच पाहिजे असे नाही. बरोबर ना?
साटेलोटे म्हणजे एकमेकांनी
साटेलोटे म्हणजे एकमेकांनी एकमेकांच्या बहिणीशी लग्न करायचे.
साटेलोटे म्ह़णजे बहिण भाऊ
साटेलोटे म्ह़णजे बहिण भाऊ यांनी दुसर्या बहिण भाऊ जोडीशी हेटरो सेक्श्युअल लग्न करणे ना?
हो. म्हणजे कोणी नणंद म्हणून
हो. म्हणजे कोणी 'मी नणंद' म्हणून वरचढपणा करायचे काम नाही. पाठ फिरवली की लगेच नणंदेची भावजय झालीच!
साठंलोटं असा शब्द आहे. अर्थ
साठंलोटं असा शब्द आहे. अर्थ असा की, आपली मुलगी द्यायची पाहुण्यांना आणि त्यांची मुलगी घ्यायची. अगदी असा लग्न व्यव्हार/ प्रकार. ह्यात एक प्रकारे सामाजिक दबावच असतो, आमची मुलगी तुमच्याकडे आहे, तुमची आमच्याकडे तर खबरदार! बरे राजकारण असते ह्यात हो. आहेत एक दोनओळखीचे.
पारसी आणि मुस्लिम बांधवात आहेत की बरीच उदाहरणं , काही न काही प्रॉबलेम्स असलेली मुलं असणे. गुगलून पहाच. हे अगदी प्रूव झालेले आहे. कमाल आहे की, ह्यावर एकीवात कसे नाही.
https://wikiislam.net/wiki/Cousin_Marriage_in_Islam
सख्ही भावंड सोडून करतात की ह्या दोन जमातीत.
https://www.economist.com
https://www.economist.com/news/middle-east-and-africa/21693632-marriage-...
https://www.economist.com/news/special-report/21731490-practice-cousin-m...
हिंदू विवाह कायद्यात प्रोही
हिंदू विवाह कायद्यात प्रोही बीट रिलेशन लिस्ट मध्ये मामेभाऊ आहे काय?
महेश, लिंक वाचली. पण दोन्ही
महेश, लिंक वाचली. पण दोन्ही सेक्शनच्या शेवटी त्यांच्या कम्युनिटीत प्रचलित असेल तर कायद्याची हरकत नाही असेच आहे (असे मला वाचून वाटले). आणि यातही कोणी तक्रार केली तरच कायदा हस्तक्षेप करणार हे आहेच.
बाबा कामदेव.. तिथे नात्यांची इतकी भलीमोठी जंत्री दिलीय की ती उलगडून त्यात सोप्या भाषेत कोण कोणाचे सांगणे सामान्याला थोडे कठीण. तिथे वकिली डोकेच हवे.
>>कोणी तक्रार केली तरच कायदा
>>कोणी तक्रार केली तरच कायदा हस्तक्षेप करणार हे आहेच.
होय, तसे तर ते अनेक बाबतीत असतेच,
मियाँ बिबी राजी तो क्या करेगा काजी (की काझी ?)
सतत( पिढ्यांनपिढ्या) अंतर्गत
सतत( पिढ्यांनपिढ्या) अंतर्गत लग्ने धोकादायक ठरते. यास शास्त्रिय आधार आहेच. इजिप्तच्या फराओंचे उदाहरण. क्वचित एखादे लग्न होणे वेगळे. लगेच परिणाम नाही दिसणार.
तुम्हाला उदाहरणच हवे असेल तर
तुम्हाला उदाहरणच हवे असेल तर माझ्या सख्या काका काकूचे असे लग्न आहे, आणि माझी दोन्हीही चुलत भावंडं अगदी नॉर्मल आहेत.
जवळच्या नात्यात लग्न केले व
जवळच्या नात्यात लग्न केले व पुढची पिढी व्यंग असलेली झाली असे दरवेळी होत नाही. फॅमिली जीन्स निरोगी असतील तर काहीही त्रास न होता पुढची पिढी वाढेल. तेच घराण्यात एखादा डिफेकटीव्ह जीन्स असेल जोडप्यामधल्या कॉमन डीएनए व जीन्स मुळे आणि जास्त जवळच्या रक्तसंबंधांमुळे तो डिफेकटीव्ह जीन्स पुढच्या पिढीत जास्त प्रकर्षाने परिणाम करत असल्याचे आढळते. जोडपे वेगवेगळ्या घराण्यातले असले तरीही हे होते पण एकाच घरातील जोडप्यात ही शक्यता जास्त असते.
आधीच्या जमान्यात असे काही रेसिसिव्ह जीन्स रक्तात आहेत का हे शोधण्याचे मार्ग नसावेत, पण जवळच्या नात्यात लग्न झालेल्या काहींची मुले किंवा पुढच्या पिढ्या बाधित झाल्याचे दिसत असल्याने अश्या प्रकारे जवळच्या नात्यातली लग्ने निषिद्ध मानली गेली असावीत.
आजच्या युगात सर्व प्रकारच्या चाचण्या करून घेता येतात. अशा वेळी ज्यांची नात्यात लग्न करायची इच्छा आहे त्यांनी या चाचण्या करून शारीरिकदृष्ट्या सर्व काही ठीक आहे याची खात्री करून खुशाल लग्ने करावीत.
जीवशास्त्रातील मेंड्लचे
जीवशास्त्रातील मेंड्लचे वाटाण्याच्या दाण्यावरचे प्रयोग सगळ्यांनी ऑप्शनला टाकले होते का? हिरवा आणि पिवळा वाटाणा.
स्पर्म आणि एग मध्ये कुठली गुणसूत्रे आहेत, डॉमिनंट/ रेसेसिव्ह.. मग पुढच्या पिढ्यात ३:१ रेशो. इ. इ.
आमच्या शेजारी भावा बहिणीत लग्न झालं आणि त्यांच्यात काही दोष नाही असल्या अॅनेकडॉटल उदाहरणांना काही अर्थ आहे का? कुठले आजार संक्रमित करणारी गुणसूत्रे त्या पुरुष आणि स्त्री मध्ये कुठे आहेत, दोघांत ती असली तरी ऑफस्प्रिंग मेल आहे का फीमेल, त्यावरुन ही रोग होईल का नाही ते ठरेल ना? तसेच त्यावर प्रेग्नंसी मध्ये इलाज ही असू शकते.
अॅनेकडॉटल उदाहरणांना काहीही अर्थ नाही.
जीवशास्त्रातील मेंड्लचे
जीवशास्त्रातील मेंड्लचे वाटाण्याच्या दाण्यावरचे प्रयोग सगळ्यांनी ऑप्शनला टाकले होते का? हिरवा आणि पिवळा वाटाणा.>>
आमच्या शेजारी भावा बहिणीत लग्न झालं आणि त्यांच्यात काही दोष नाही असल्या अॅनेकडॉटल उदाहरणांना काही अर्थ आहे का?>>
एक पिढी स्किप करुन होणार्या आजारांबद्दल काही देणेघेणे नाही, सध्याची मुले आहेत ना नोर्मल मग ओके..
पुढचं पुढची बघुन घेइल
त्यांच्यात अनेक मतभेद होऊन,
त्यांच्यात अनेक मतभेद होऊन, अखेरीस ब्रेक अप झालेला आहे!
Pages