मामेभावाशी लग्न

Submitted by राव पाटील on 18 March, 2018 - 19:45

माझ्या ओळखीत मराठवाड्यातील मराठा कुणबी समाजाच्या एका जोडीचा थोडा घोटाळा झाला आहे, मुलीचं आपल्या सख्ख्या मामेभावाशी प्रेम जमलं आहे. मामेबहिणीशी सर्रास लग्न होतात. पण उलटे नाते असल्याने प्रश्न पडला आहे. मुलगा कमावता असून मुलगी अजून शिकतेय. मुलाच्या घरून नाहरकत संमती मिळाली आहे, आणि मुलीच्या घरून देखील होकार मिळेल अशी अपेक्षा आहे. तर प्रश्न असे की
१.हा विवाह कायद्याच्या चौकटीत बसतो का? बसत नसेल तर या विवाहावर हरकत घेण्याचा अधिकार नेमका कुणाचा असू शकतो?
२. या विवाहातून जन्मणाऱ्या अपत्याला काही शारीरिक अपाय होऊ शकतो का? (हा सर्वात महत्वाचा प्रश्न)
३. कावकाव करणाऱ्या नातेवाईकांना फाट्यावर मारण्याची तयारी आहेच, पण असा विवाह सर्वसाधारणपणे कश्याप्रकारे स्वीकारला जातो?

तुमच्या माहितीत असा विवाह असेल तर त्यांचा अनुभव सुद्धा कळवावा.

उत्तरांच्या अपेक्षेत,

राव पाटील

Group content visibility: 
Use group defaults

हो. अशा विवाहापासून होणार्या अपत्यास एक कन्डिशन असते तिला एक्टोडर्माप्लासिया म्हणतात. हा शब्द गुगळा म्हणजे सर्व माहिती मिळेल. अशा व्यक्तीला केस नसतात व त्वचेवर च्चिद्रे नसतात. माझ्या एका ओळखीच्या मुलीला ही कन्दिशन आहे.

१.हा विवाह कायद्याच्या चौकटीत बसतो का? बसत नसेल तर या विवाहावर हरकत घेण्याचा अधिकार नेमका कुणाचा असू शकतो? >> बसतो. मुलगा, मुलगी दोघेही सज्ञान, अविवाहित असतील तर इतर कोणीच हरकत घेऊ शकत नाहीत.

२. या विवाहातून जन्मणाऱ्या अपत्याला काही शारीरिक अपाय होऊ शकतो का? (हा सर्वात महत्वाचा प्रश्न) >> जवळच्या नात्यात लग्न करू नयेत अस माझं वैयक्तिक मत. नात्यातच काय कमी लोकसंख्या असलेल्या जाती, समाजानी आपापल्यात लग्न करू नयेत असेदेखील मला वाटत.

३. कावकाव करणाऱ्या नातेवाईकांना फाट्यावर मारण्याची तयारी आहेच, पण असा विवाह सर्वसाधारणपणे कश्याप्रकारे स्वीकारला जातो? >> फाट्यावर मारायची तयारी आहे ना मग नका जास्त विचार करू यावर...

तुमच्या माहितीत असा विवाह असेल तर त्यांचा अनुभव सुद्धा कळवावा. >> माझ्या एका मल्लू मैत्रिणीने तिच्या कझिनशी लग्न केले आहे. आमच्या शेजारी FE नापास झाली म्हणून आत्तेमामाशी लग्न लावून दिलेली देशस्थ ब्राह्मण राहते.
स्कॅन्डलाईझ होण्यासारख ं म्हणजे आमच्या होस्टेलमध्ये एक मध्यप्रदेशतली मुलगी होती, जैन. तिच्या वडलांच्या चुलत भाऊ-बहीणने लग्न केलेल. त्यांना मुलंदेखील होती. सख्खे भाउ बहिण. incest! जेवढं मला माहितीय भारतात बेकायदेशीर नाही (जे कि योग्यच आहे) पण अर्थातच समाजाने, नातेवाईकने वाळीत टाकलेलं.

भारतात कायद्याने सज्ञान असलेल्या कोण्याही व्यक्तीला कोण्याही दुसर्‍या सज्ञान व्यक्तीशी लग्न, शरीरसंबंध व लिव्हइन ची परवानगी आहे.

दोघांच्याही घरून संमती असेल तर पालकच इतर नातेवाईकांना समजावतात. तरीही कोणी आडमुठेपणा करत असेल तर सरळ फाट्यावर मारावे.

https://www.quora.com/Is-cousin-marriage-legal-in-India-One-of-my-matern...

इकडे बरीच उलट सुलट माहिती आहे,
तुम्ही कायदेशीर आहे की नाही हे पाहण्यासाठी इच्छुक असाल तर वकिलाचा सल्ला घ्या,
नैयिक दृष्ट्या बरोबर आहे की नाही असे मत मागत असाल तर just go ahead and do it.त्यांना ऑल द बेस्ट सांगा.

कायद्याचे काय कळले नाही. मॅरेज रजिस्टर करताना/सर्टिफिकेट घेताना नात्यातले आहे का हे कसे कळणार?

कायदेशिर प्रॉब्लेम नाही, मावसबहीणिशी लग्न करुन सुखाने सन्सार करणार जोडप पाहण्यात आहे, आत्या घरी भाची चालते तर उलट पण चालेलच की बाकी " कुछ तो लोग कहेन्गे"

आमच्या इथे सातारकडच्या गावाकडले आहेत राहाणारे. त्यांच्याकडे मामेभावाशी लग्न ही खुप कॉमन गोष्ट आहे. आत्ताच त्यांच्या बहिणीचे लग्न मामेभावाशी झाले.

कायद्याचे काय कळले नाही. मॅरेज रजिस्टर करताना/सर्टिफिकेट घेताना नात्यातले आहे का हे कसे कळणार? >> सिम्बानी दिलेली लिंक वाचली. मला वाटत नात्यातील लग्न, द्विभार्या आणि समलैंगिकता यात 'कोणीतरी' तक्रार केली 'तरच' ते कायद्याने गुन्हे ठरत असतील. जोपर्यंत कोणी तक्रार करत नाही तोपर्यंत चालत. याला कॉग्निझेबल, non cognizable असे शब्द आहेत.

मामाच्या मुलीशी लग्न करतात. आत्याच्या मुलीशी लग्न झालेली पाहिलीत.
काही फरक पडत नाही. कायद्याच काही घेणं देणं नाही ह्यात.

मुलगा व मुलगी सज्ञान/विवाहयोग्य (अनु. २१ व १८ वर्षे) असल्यास कायद्यानुसार काहीही अडचण नाही.
माझ्या सख्ख्या आत्तेभावाने त्याच्या आतेबहीनीशी लग्न केले आहे. आतेभाऊ १५ वर्षांचा असताना माझी आत्या वारली त्यामुळे आत्येमामांनी (आमच्याकडे आत्याच्या नवर्याला मामा म्हणतात) दुसरे लग्न केले. मग आतेभावाची रवानगी त्याच्या आत्याकडे झाली, तिकडे शिक्षण होऊन उद्योग सुरु केला. इतक्यात त्याचे त्याच्या सख्या आतेबहिणीशी कधी सूत जुळले कुणालाच कळले नाही. नातेवाईकांमध्ये हळूहळू कुजबुज सुरु झाली, दरम्यान दोघांनाही चांगली स्थळ सांगून यायला लागली मात्र दोघेही शिताफीने टाळायचे. उभयतांना सर्वांनी खूप समजावले की मामेभाऊ-आतेबहीण असे लग्न होत नाही, पण ते समजावण्याच्या पलीकडे गेले होते. जरा वादावादी होऊन अखेर सर्वानुमते लग्नाचा प्रस्ताव मंजूर झाला. लग्न झाल्यावरही कित्येक वर्ष ह्या लग्नाची चर्चा असायची, किंबहुना आजही होतेच. तथापि दोघेही अत्यंत आनंदी आहेत, लग्नाला १८ वर्ष पूर्ण झाली आहेत. २ मुली व १ मुलगा आहे, दोघांचेही उत्तम पटत. मात्र आतेमामांचा भाचीला सून करायला अत्यंत विरोध असल्याने त्या दोघांचे कधीच जुळले नाही, नुकतेच आतेमामा वारले. आतेमामानी आपल्या बहिणीशीही (विहिनिशी) बोलणे टाकले होते, त्याही अकालीच गेल्या.

By the way, माझे बाबा, आईचे आतेभाऊ आहेत. बाबांची आई (आजी), आईची सख्खी आत्या तर आईचे वडील (आजोबा) बाबांचे सख्खे मामा. समाजमान्यतेनुसार मामेबहीण-आतेभाऊ अशी लग्न चालतात, मात्र मामेभाऊ-आतेबहीण अशी लग्न सहसा टाळल्या जातात. त्यामुळे ती क्वचितच दिसतात.

नात्यात कॉम्प्लेक्सिटी वाढतील.
आणि मुलगा मुलगी एकाच रोगाचे कॅरियर असतील तर पुढच्या पिढीत तो रोग होण्याची प्रॉबेबलिटी वाढेल.
(अवांतर साईडइफेक्टः सासर आणि माहेर यांच्या रितींबद्दल खुलेआम गॉसिप करता येणार नाही, कारण सासर्‍याबद्दल नाकं मुरडली तर तो आईचा सख्खा भाऊ असल्याने तिला वाईट वाटणार.याच कारणासाठी आतेभाऊ आणि मामेबहिण यांचीही लग्न होऊ नयेत. तसेच काही कुटुंबात लहानपणापासून मामेबहिणीवरुन किंवा आतेभावावरुन चिडवून मेंटल कंडिशनिंग केले जाते आणि मग दोघांपैकी एकाला थर्ड पार्टी नॉन नातेवाईक उमेदवार आवडला मोठेपणी तर इमोशनल गुंता होतो.)
बाकी या सगळ्याला दोन्ही घरांची हरकत नसेल तर गो अहेड.कॅरियर आजारांवर रिसर्च होईलच त्यांची मुलं होठी होईपर्यंत.

सासर आणि माहेर यांच्या रितींबद्दल खुलेआम गॉसिप करता येणार नाही, >>> खरंच! विचार करण्यायोग्य मुद्दा आहे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार! आपलेच ओठ आपलेच दात!

सासर आणि माहेर यांच्या रितींबद्दल खुलेआम गॉसिप करता येणार नाही, >>> खरंच! विचार करण्यायोग्य मुद्दा आहे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार! आपलेच ओठ आपलेच दात!>>>>>>>>>. काय ढेकळं फरक पडत नाही. सख्खी आत्या सासु झाल्यवर दोघींमधुन विस्तव ही जात नाही अशा केसेस पाहिल्यात. तर मामाच्या मुलीशी लग्न करुनही पटत नाही म्हणुन विभक्त झालेले ही पाहिलेत.

ईथे शंका समाधान झाल्यावर लग्नाचा निर्णय बदलण्याचे काही चान्सेस आहेत का? Happy
सहज विचारलाय हा प्रश्न.
माझ्यामते याचे ऊत्तर नाही असे असेल.

येनीवेज, नातेवाईकांना जसे फाट्यावर मारता येते तसेच कायद्यालाही फाट्यावर मारणे या देशात अवघड नाही. तर या दोन्हींचा लोड घेऊ नका. प्रेमात सारे माफ असते.

तरीही अश्या प्रकारचा कायदा नसावा.
काही धर्मात (बहुतेक पारशी धर्मात) सख्या भावाबहिणींचेही लग्न केले जाते.
अर्थात, आपल्याकडे धर्मानुसार कायदे बदलतात. त्यामुळे हिंदू धर्मात काय कायदे आहेत ते बघावे लागतील. अन्यथा धर्मांतर करायचे बिनधास्त. प्यार किया तो डरना क्या Happy

मात्र होणारया मुलात काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात याबाबत स्पेशालिस्ट डॉक्टरचा सल्ला घ्या. काही टेस्टस चेकिंग वगैरे असतील तर त्या देखील करून घ्या. ईनफॅक्ट हल्ली बरेच जण लग्नाआधी असे दोघांची मेडीकल चेकिंग करून घेतात. एकमेकांशी लग्न केल्याने काय प्रॉब्लेम होऊ शकतात वगैरे जाणून घ्यायला. आमचाही तसे करायचा विचार आहे. पत्रिका तर जुळत नाही निदान हे तरी जुळवूया. त्यासंदर्भात काही माहिती मिळाली तर जरूर शेअर करा.

तसेच काही कुटुंबात लहानपणापासून मामेबहिणीवरुन किंवा आतेभावावरुन चिडवून मेंटल कंडिशनिंग केले जाते आणि मग दोघांपैकी एकाला थर्ड पार्टी नॉन नातेवाईक उमेदवार आवडला मोठेपणी तर इमोशनल गुंता होतो. >> कुटुंबातच कशाला मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमधेदेखील कोणी कोणाला चिडवू नये ! लहानपणी, मोठेपणी, कधीही. Its matter between two people. ज्याला जो आवडतो/ते त्याला विचारावे आणि मिळालेले उत्तर मान्य करावे. लोकं उगाच सेक्स स्टारव्हड असल्यासारखी ठरकीपणा करत असतात.

===
काही धर्मात (बहुतेक पारशी धर्मात) सख्या भावाबहिणींचेही लग्न केले जाते. >> I don't think so.

सख्ख्या भाऊबहिणींचे लग्न कोणत्याही जाती धर्मात केले जात नाही.
पार्श्यांमध्ये ओव्हर ऑल चॉइस कमी आणि लोकसंख्या कमी असल्याने कझिन्स मध्ये लग्न होतात.

इथे येण्याआधी quora धुंडाळून घेतला होता, पण त्यात नीट काही उमगलं नाही. धन्यवाद सर्वांना.. लग्न तर नक्की होणार. फक्त कायदेशीर आणि आरोग्य विषयक बाबी कळत नव्हत्या. हिंदू marriage law कोण ठरवतात? त्यांना कायदेशीर रित्या फाट्यावर मारता येते का? धर्मांतर वगैरे न करता.. सदर मुलगी बऱ्याच हूच्चशिक्षित लग्नाळू मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या हिटलिस्टवर असल्याने इतका प्रश्नप्रपंच!

मामेभावाशी लग्न होते. माझ्या कलिग चे लग्न त्याच्या आते बहिणी सोबत झाले आहे. तो बारामतिचा आहे. त्यांच्यात लग्न होतात. त्याला मुलगी शोद्द्त असताना आत्यानेच मागणे घातले. त्याच्या मोठ्या भावाचे लग्न चुलत आत्या च्या मुलीशी झाले आहे. दोघांनाही दोन मुले आहेत.

मी जे लिहिले आहे त्यविषयी वन्दनला (त्याला किम्वा तिला) आश्चर्य वाटले आहे. त्यान्च्य प्रतिसादावरून मी काही तरी खोटे सान्गतो आहे असे त्याना वाटते आहे असे दिसते. अशी कन्डिशन असलेली व्यक्ती माझ्याकडे ६ वर्शे राहिली होति. मी लिहिलेल्या प्रतिसादाविषयी काही शन्का घेण्यापेक्शा गुगळा असे मी सान्गीन. माझ्याविषयी काही महिती नसताना येथे लिहुन माझ्याविषयी शन्का घेतल्याबद्धल माझी माफी मागावी असे मला वाटते.

"नात्यात लग्न केल्यास ' एक्टोडर्माप्लासिया' ही कंडिशन (त्याचे रिसेसिव्ह जीन्स आधीच दोघांमध्ये असतील तर) होऊ शकते"

आणि
"असे कधीकधीच होते, दर नात्यातल्या लग्नात नाही"

या २ विधानांनी ही मतांतरे एक्सप्लेन करता येतील.

मामेबहिणीशी सर्रास लग्न होतात. पण उलटे नाते असल्याने प्रश्न पडला आहे.

>> हे काय तर्क(ट)शास्त्र? मामेबहिणीशी सर्रास लग्न जिथे होतात तिथे मामेभावाशी का होऊ नयेत किंवा झाले तर उलटे का? हे म्हणजे तीन अधिक दोन करायला चालते पण दोन अधिक तीन केले तर उलटे म्हणायचे? अहो रिझल्ट तोच येणार न शेवटी?

अशा विवाहापासून होणार्या अपत्यास एक कन्डिशन असते तिला एक्टोडर्माप्लासिया म्हणतात

>>>> हे कुणी सांगितले? एकतर एक्टोडर्माप्लासिया हा शब्द मूळ अमराठी आहे तो तुम्ही इथे मराठीमधून लिहिलाय आणि दुसरे म्हणजे तो थेट चुकीचा लिहिलाय. कारण एक्टोडर्माप्लासिया शब्दाची विविध इंग्लिश स्पेलिंग बनवून शोधले तरी गुगलवर सापडत नाही. म्हणजे मुळातच तो शब्द चुकीचा लिहिलाय. तुम्हाला Ectodermal_dysplasia म्हणायचे आहे का? जेनेटिक डिसऑर्डर शी संबंधित आहे. पण त्याचा आणि नात्यातल्या लग्नाचा संबंध दाखवणारे एकतरी आर्टिकल दाखवा. विकीपिड्या वर जवळच्या नात्यातल्या लग्नाबाबत भलेमोठे आर्टिकल आहे. इतका घनिष्ट संबंध असता तर त्यात या शब्दाचा उल्लेखसुद्धा येऊ नये?

१) नात्यातल्या लग्नाने संततीत शारीरिक दुबळेपणा वाढतो.
२) कायद्याचं काही बंधन नाही॥
३) हिंदू धर्मशास्त्राची अडकाठी नाही कारण ते धर्मशास्त्र नसून विधि आहे - जाणतेपणा , विवाह सूचना उर्फ काय कुठे कोणाशी कधी इत्यादी आमंत्रणपत्रीका ( नोटिस), आमंत्रक आणि आमंत्रितांच्या उपस्थितित ( witness) ,मंत्र संमती (acceptance and agreement) अतिशय सुसंगत असल्याने कोर्टास मान्य असते.
४) याव्यतिरिक्त कुणाची अडकाठी ( challange) असल्यास त्याचे स्पष्ट कारण - फसवणूक/खोटे दस्तावेज/अगोदरचा विवाह अशी सबळ कारणेच ग्राह्य असतात.

मी मागू माफी? घंटा.....

तीन अक्षरी सदस्यनामापलिकडे कुणाबद्दल काही जाणून घ्यायची मला गरज नाही. तुम्ही तुमच्या घरी नोबेल पारितोषिक विजेते/त्या असलात तरी चुकीची माहिती देणार्‍यांना माफी आपण देत नसतो....

इनामदारांच्या प्रश्नाला उत्तर द्या. नै तर इथे धादांत ठोकून सामान्य नागरिकांत अवैज्ञानिक दृष्टीकोन वाढीला लागण्यास मदत होइल अशी बिनबुडाची अवैज्ञानिक विधाने केल्याबद्दल तुम्हीच माफी मागा...

खुशाल करावे लग्न... नो प्रॉब्लेम अ‍ॅट ऑल. आमच्या गावातील बरीच जोडपी आहेत तशी लग्ने झालेली. तिथे मामाचा मुलगा आत्याची मुलगी अथवा vice versa सर्रास चालतं. त्यांच्या मुलांनाही काही दोष असल्याचे ऐकीवात नाही.

होय कन्डिशनचे नाव लिहिण्यात माझी चुक झाली हे मी मान्य करतो. Ectodermal_dysplasia असे लिहायला पहिजे होते पण घाईत राहून गेले. मी यातला एक्सपर्ट आहे असे मी लिहिलेले नाही. माझा कोणाचीहि भूल करायचा किम्वा गन्डवायचा हेतु नव्हता. ज्याना असे वाटत असेल त्यानी माझ्या प्रतिसादाकडे लक्ष देऊ नये. मी काही नोबेल प्राइझ मिळवलेले नाही व ईतका काही मी हुशार नाही. याची मला पुरेपुर जाणिव आहे. मला फक्त लोकाना अधिक अभ्यास करायला सान्गण्यासाठी ते मी लिहिले. ज्यानी मला नावे ठेवली आहेत व उर्मट पणे माझ्याविषयी लिहिले त्याना मी म्हणेन गच्छ सूकर भद्रम ते वद सिम्हो मया जित:. इत्यलम.

**मी काही नोबेल प्राइझ मिळवलेले नाही व ईतका काही मी हुशार नाही.**

पण नामांकनाच्या यादीत असालच ना? हेही नसे थोडके. नाव चुकले तर हरकत नाही नेहमी दोन नावे असतात. एक विकिपिडिया नाव व दुसरे प्रचलित.
उदा०
मी सोनाराला विचारले " हे कॅडमियम डागाचे दागिने आहेत का?"
" छेछे, हे असली KDM आहेत."
---
लग्न /ठरल्यावर/झाल्यावर दागिने कोणते घेऊ हा उप परंतू महत्त्वाच विषय येणारच म्हणून अवांतर नाही.

या मुद्द्यांवर नेहमीच काथ्याकुट होत असतो. जवळच्या नात्यात लग्न करू नये हे खरेच आहे. पण सख्खे/चुलत/मावस (किंवा त्याची दुसरी-तिसरी पातळी. जसे चुलत-चुलत, मावस-मावस इत्यादी) यांच्यात लग्न असू नये असा एक प्रघात आहे. मामा किंवा आत्याकडून नाते लागत असेल तर लग्ने केली जातात. मामा-भाची अशीही लग्ने झाली आहेत. माझ्या माहितीनुसार कायद्याचे मात्र नात्याबाबत कोणतेही बंधन नाही. कायद्याने वयाचे बंधन आहे इतकेच. जवळच्या नात्यात (कोणतेही असो) लग्न झाल्याची जशी अनेक उदाहरणे आहेत हे जितके सत्य आहे तितकेच वैज्ञानिक संशोधनानुसार जवळच्या नात्यात (कोणतेही असो) लग्न केल्यास पुढच्या पिढीमध्ये दोष निर्माण होऊ शकतात हे सुद्धा खरे आहे. यासंबंधी काही माहितीपूर्ण लिंक्स:

1. https://www.facebook.com/MaherchaKatta/posts/808305329346729:0

2. https://balajirshinde.blogspot.in/2018/02/blog-post_7.html

3. https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-article-on-relation-marriage-b...

सदर मुलगी बऱ्याच हूच्चशिक्षित लग्नाळू मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या हिटलिस्टवर असल्याने इतका प्रश्नप्रपंच!>> मुलीने तिच्या ऑप्शनस एकदम क्लोज करून मामेभावावर झिरो इन करू नये. जरा इतर ऑप्शन्स काय आहेत ते निदान बघावे तरी. कदाचित शी विल गेट अ बेटर पार्टनर. जर लग्न बाजारात तिचा अपर हॅड आहे तर तिने तो पहिले एक्स्प्लॉइट करावा. जर पटले नाही कोणी तर मामे भाउ आहेच की.

या विवाहाला कायद्याची अडचण नाही. राहिला प्रश्न शारीरिक व्याधींचा तर त्यावर उपाय शोधता येऊ शकतील. मन जुळली असतील तर ती तोडून दोघांनाही दुःख देण्यापेक्षा अशी लग्न करायला काय हरकत आहे

>> प्रश्न शारीरिक व्याधींचा तर त्यावर उपाय शोधता येऊ शकतील

हो. माझ्या वरच्या प्रतिसादातील दिव्य मराठीच्या लिंक मध्ये या जोडप्यांनी काय काळजी घ्यवी हे दिलेले आहे.

अमा - हेच देशी मुलींचे दुखणे आहे. पोटेनशीयल आणखी चांगला पती मिळण्याचे असते पण लवकर zero in करून फायनल केले जाते.
खराब मिळण्यापेक्षा त्यातल्या त्यात बरा चांगला..

>> पोटेनशीयल आणखी चांगला पती मिळण्याचे असते पण लवकर zero in करून फायनल केले जाते.
+१ पण "केले जाते" नाही मुलगी फायनल करते. इथे मुलीचं आपल्या सख्ख्या मामेभावाशी प्रेम जमलं आहे

काही समाजांत मुलीचे लग्न आत्तेभावाशी केले तर चालते. किंबहुना आत्तेभाऊ ही जावई म्हणून सहज निवड असते. याचे कारण असे सांगतात की मुलगी आत्याकडे म्हणजे बाहेरच्या वंशात जाते. आत्तेबहीणीचे लग्न जर मामेभावाशी झाले तर ती मुलगी पुन्हा मागे आईच्या वंशात येते. मुलीचे असे मागे येणे चांगले मानले जात नाही. खरे तर जेनेटिकली या दोन्ही घटना जनुकांच्या विखुरण्याबाबतीत समान आहेत.

>>माझ्या माहितीनुसार कायद्याचे मात्र नात्याबाबत कोणतेही बंधन नाही.
आहे हो आहे, मी वर एक लिन्क दिलेली आहे, सवडीने त्यातली माहिती मराठीत टंकावी लागेल.
पण तूर्तास एवढेच सांगतो की हिंदू मॅरेज अ‍ॅक्ट नुसार आई आणि वडिल दोघांच्याही मागच्या काही पिढ्यांपर्यंत लग्नाळू मुलाचे आणि मुलीचे एकमेकांशी नाते असता कामा नये असा क्लॉज आहे.

गच्छ सूकर भद्रं ते वद सिंहो मया हृतः ।
पण्डिता एव जानन्ति सिंह सूकरयो र्बलम् ॥

हे सूअर ! जा तेरा कल्याण होगा । "मैंने सिंह को मार दिया है", ऐसा सबको कहता है; लेकिन सिंह विरुद्ध सूअर का बल कितना है, वह तो पंडित जानते हि है ।

Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl

एकूण काय तर स्वतःच तोंडावर पडायचं, मग म्हणायचं मला पुढचे दात तसेही काढायचेच होते, फुकटात काम झालं....

>> तिच्या ऑप्शनस एकदम क्लोज करून मामेभावावर झिरो इन करू नये. जरा इतर ऑप्शन्स काय आहेत ते निदान बघावे तरी. कदाचित शी विल गेट अ बेटर पार्टनर >> अरे प्रेम आहे!!! समजतय का???
आता दुसर्‍यावर प्रेम 'जमवून' ऑप्शन कसले ट्राय करायला सांगताय ? ती साडी नाही निवडायची आहे, की ठाण्यातली आवडली सांगितलं तर रानडे रोडला बघितली असतीत तर याहुन चांगली सापडली असती सांगायला. Angry

तसं पाहायला गेलं तर प्रत्येक प्रेमविवाह zero in करून च केला जातो असं म्हणाल तुम्ही.. आणि चांगला चांगला म्हणजे तरी काय? बऱ्यापैकी कमवणारा, वागण्याबोलण्याला आणि दिसण्याला अनुरूप असणे इतकेच criteria असतील तर त्या दोघांनी ते जुळवूनच निर्णय घेतला असावा. मुलगी शिकतेय अजून, मुलगा कमावतोय. आणि मराठवाड्यात थोडी लवकरच लग्ने उरकतात, explore करायला सुद्धा त्या मुलीला फारसा चान्स असा नाहीच, शिवाय गेल्या ७ वर्षापासून म्हणजे अगदी teenage पासून तर आता सगळं ठीकठाक लग्नाच्या वयात येईपर्यंतचं relation आहे तर compatibility नक्कीच असेल. सगळ्यात महत्त्वाचं आनंदी असणं, आणि त्या दोघांना एकमेकांसोबत असण्याने आनंद मिळत असेल तर कशाला अजून लोभी असल्यागत महत्वाकांक्षा बाळगायच्या?

. आणि चांगला चांगला म्हणजे तरी काय? बऱ्यापैकी कमवणारा, वागण्याबोलण्याला आणि दिसण्याला अनुरूप असणे इतकेच criteria असतील तर त्या दोघांनी ते जुळवूनच निर्णय घेतला असावा. मुलगी शिकतेय अजून, मुलगा कमावतोय. आणि मराठवाड्यात थोडी लवकरच लग्ने उरकतात, explore करायला सुद्धा त्या मुलीला फारसा चान्स असा नाहीच, शिवाय गेल्या ७ वर्षापासून म्हणजे अगदी teenage पासून तर आता सगळं ठीकठाक लग्नाच्या वयात येईपर्यंतचं relation आहे तर compatibility नक्कीच असेल. सगळ्यात महत्त्वाचं आनंदी असणं, आणि त्या दोघांना एकमेकांसोबत असण्याने आनंद मिळत असेल तर कशाला अजून लोभी असल्यागत महत्वाकांक्षा बाळगायच्या?>>>>>>

सहमत.

एकीकडे लग्नाचा बाजार झालाय म्हणत चिंता व्यक्त करायची व दुसरीकडे मुलीने या बाजारात भाव आहे तर भरपूर माल बघून निवड करावी असेही म्हणायचे... ही निवड करताना शेवटी काय पाहिले जाते? मुलाची निवड करायची तर सगळ्यात पहिले त्याची आर्थिक पत पाहिली जाणार, मुलगी असेल तर सौंदर्य... ही मुलगीही केवळ सौंदर्याच्या बळावर बाजारात पत बाळगून आहे ना?

मुलगा/मुलगी लग्न झाल्यावर एकमेकांची अपेक्षित जबाबदारी घेणार का व घेताना उपकार केल्याची भावना ठेवणार की प्रेमाने करणार हे तपासायची कुठलीही सुविधा आपल्या इथे सध्या उपलब्ध नाही. लग्नाआधी असली वचने देणाऱ्या/रे नंतर सगळे विसरतात. अशा वेळी दीर्घकाळ ओळखीत असल्याशी लग्न करणे जास्त सयुक्तिक आहे. तो आपल्याला हवा तसा आहे की नाही, कुठे तडजोड करावी लागेल, कुठे नाही हे निदान आधीच माहीत असेल.

हिंदू मॅरेज ऍक्टखाली दोघे नात्यात नसले पाहिजेत तर मामेबहीण, अतेभावाचे लग्न कसे होते? जर लग्न कोर्टात जाऊन केले तरच ते या कायद्याखाली येते का? कोर्ट लग्नाआधी ही माहिती लिहून घेते का दोघांकडून? ब्राम्हणाने विवाह लावला तर तो ही माहिती विचारतो का, तसे विचारणे त्याच्यावर बंधनकारक आहे का?

मामेभावाशी लग्न करण्यात काहीही अडचण नाही. किंबहुना अशी लग्ने होतातही. कुणबी- मराठा समाजात देखील. पूर्वी सहसा मामाच्या मुलीशी हक्काने लग्न होत असे. आणि भावाचाही बहिणीच्या मुलाशी लग्न करण्याचा अलिखित अधिकार असे. अगदी बहिणीने आपली मुलगी तिच्या मुलाला करून न घेतल्याने आयुष्यभर भावाबहिणीचा अबोला झाल्याची उदाहरणेही आहेत. धागा कर्त्याने विचारलेले नाते हे उलटे आहे तरी ते मान्य आहे. त्याला ग्रामीण भागात ' साटेलोटे ' असा शब्द प्रयोग आहे. त्यातून काही जेनेटिक प्रश्न निर्माण होत नाहीत. महेश यांनी हिंदू मेरेजकायद्याबद्दल लिहिले आहे पण त्यांनी नेमका सेक्शन दिलेला नाही. ठोकून देतो ऐसा जे.
सातार्यात तर मी भावकीतच (एकाच आडनावाच्या ) प्रेम लग्न झालेले पाहिले आहे.
सबब काहीही हरकत नाही.

हो. अशा विवाहापासून होणार्या अपत्यास एक कन्डिशन असते तिला एक्टोडर्माप्लासिया म्हणतात
>>
मुस्लिम समाजात चुलत बहिणीशी सर्रास लग्ने केली त्यापैकी हा विकार केती लोकाना झाला याबद्दल काही सांख्यिकी दिगोचि कडे आहे काय? मला तर कोणत्याच शांतिप्रिय मुस्लिम बांधवास असा विकार झाल्याचे दिसलेले नाही.... (विकाराचे नाव तरी नीट लिहीत जा हो. तुम्हीच आधी गुगळून पहा....)
रच्याकने, एका वकिलाने सख्ख्या मावशीशी लग्न केल्याचे मी पाहिलेले आहे. व्यवस्थित चालू आहे सगळे....

अरे काय हे दिलेली लिन्क वाचायचे देखील कष्ट घेत नाही तुम्ही Sad
Degree of Prohibited relationship as per the Hindu Marriage Act, 1955
Section 3 (f)
Section 3 (g)
Degrees of Prohibited relationship as per the Special Marriage Act, 1954
Section 2 (b)

रे काय हे दिलेली लिन्क वाचायचे देखील कष्ट घेत नाही तुम्ही >>
इथे लिहिलेलं सुद्धा लोक्स वाचत नाहीत, न वाचताच आपाआपली दैवतं, गफ्रे घेउन येतात आणि तुम्हि लिंका वाचत नाहीत म्हणुन सांगताय..

Pages