Ghanya varche tel kuthe milel?

Submitted by Geetanjalee on 18 March, 2018 - 13:20

Punyat ghanyavarche khatriche ani shudhha godetel kuthe milel?

Rate kay asel.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://woodenchurner.com/pune

http://woodenchurner.com/pune/about-us/
बिगरीतल्या मास्तराने घाण्याला विंग्रजीत काय म्हणत्यात ते शिकीवलं नाई व्हयं ग. फी परत माग त्यास्नी.

मयूर कॉलनी मध्ये जोग शाळे जवळ "लाकडी घाणा" याच ब्रँड चे तेल मिळणे.
शेंगदाणा, नारळ, तीळ बरोबरच बदाम, आक्रोड वगैरे एक्झॉटिक तेले पण मिळतात, अर्थातच महाग असतात.
खोबरेल तेलाची 200ml ची बाटली 85रु ला आहे
गोडेतेल कधी वापरले नाही, त्यामुळे किंमत माहीत नाही.

लाक्डी घाणा ची वर वेब साईट दिलीय त्यांची तेले ऑनलाईन मिळतात.
कोथरुड, कर्वेनगर, पुणे सिटी, पिंपळे सौदागर वॉलनट, औंध वॉलनट, बाणेर सगळीकडे मिळतात.क्वालिटी चांगली असते.
ती न मिळाल्यास जेमिनी किंवा रॉकेट चे 'फिल्टर्ड ग्राऊंडनट' ऑईल कुठेही मिळते.

ते लाकडी घाणा प्रकार नेहेमीच्या खायच्या तेलातुलनेत लयच महाग.
शेंगदाण्याच्या तेलाचा १५ किलोचा (हो, किलोचा) डबा घरी मात्र १२००/१३००/- ला घेतात. घरी म्हणजे अकोल्यात.
इथे फारच कायच्या काय भाव सांगतात, मुख्य म्हणजे ते फिल्टर्ड वगैरे तेल असते आणि लिटर मध्ये माप.
घाणीवर जाऊन घेतल्यानं आपल्या समोरच सगळा कारभार असतो त्यामुळे क्वालिटीची खात्री असते माझ्यामते तरी.
वन टाईम १५ किलो तेल घेतलं की पुढे काही महिने ददात नसते आणि आला गेला पै-पाहुणा इ गोष्टी सहज निपटतात, स्वस्तही पडतेच.

अप्पा बळवंत चौकात नारळीकर इन्स्टिट्युट शेजारी व प्रभात् टॉकीजसमोरच कॉर्नरला घाण्याच्या तेलाचे दुकान आहे तिथे सर्व तेले मिळतात.

योकु >> 1200 , 1300 ला घाण्यावरचे तेल 15 kg चा 1 डबा मिळतो ?

धनकवडीत हत्ती चौकातून गुलाबनगरकडे जाताना उजव्या हाताला एक बालाजी लाकडी घाणा आहे. तिथे तेलही मिळते व आपण आपले सामान देऊन (शेंगदाणे वगैरे) तेल काढून घेऊ शकतो.

शेंगदाणा बाजारात 150 च्या आसपास किरकोळीत आहे. ठोक 100 असावा. मागे मी युसूफ मेहरअली सेंटरला भेट दिलेली, जिथे घाण्यावर मोहरी, तीळ, दाणे, खोबरे वगैरेचे तेल काढतात. त्यांनी सांगितले होते की 1 किलो दाण्यातुन साधारण 400 ते 450 ग्राम तेल निघते. शेंगदाण्याच्या जातीवरही तेल किती निघणार हे अवलंबून असते. तिळाचे अजून कमी निघते. यावरून किमतीचा अंदाज सहज बांधता येतो. ही तेले जर आपल्या अंदाजापेक्षा खूप स्वस्त मिळत असतील तर त्यात भेसळ होत असणार हे नक्की. मोहरीसारखेच दिसणारे एक कमी प्रतीचे धान्यतेल मोहरी तेलात सर्रास मिसळतात. युसूफ मेहरली सेंटरचे शेंगदाणा तेल किलोला 280 ते 290 पर्यंत मिळते, तीळ व मोहरी 425 ते 450 पर्यंत मिळते. खोबरेल पण तेवढेच असावे. मी गेल्या वर्षभरात खोबरेल घेतले नाही त्यामुळे आठवत नाही.

घाण्यावर तेल एकतर महाग मिळणार नाहीतर भेसळ तरी असणार. स्वतः मशीन घरी विकत घेऊन तेल काढणे जास्त फायद्याचे.

http://www.seeds2oil.com/index.php?route=product/product&product_id=50

स्वतः मशिन वाले तेल खूप महाग पडतेय.
शिवाय कोणत्या तरी स्टेज ला 'कोल्ड प्रेस' होत नाही, हिट होते आणि ते फायदे जातात असे एका टेक्निकल नातेवाईकांनी अभ्यास करुन सांगितले होते.(ती चर्चा व्हॉटसप वर अजून असेल तर नीट मुद्दे लिहीते.)

मूळ तेलबियांच्या किमतीचा व बियातून मिळणाऱ्या तेलाच्या प्रमाणाचा विचार केला तर घाणीवरची किंमत योग्य वाटते. त्या तुलनेत काही साईट्सवर मिळणारे तेल खूप महाग आहे. मशीनचा काही अनुभव नाही पण व्हिडिओत दाखवतात तितके ते सोपे नसणार...

रिफाईंड तेलावर प्रक्रिया करून त्याचे आयुष्य वाढवले जाते. 30-35 वर्षांपूर्वी रिफाईंड तेलाचे नावही ऐकिवात नव्हते तेव्हा खोबरेल, शेंगदाणे वगैरे तेले 2 -3 महिन्यात खवट व्हायची. हे होऊ नये, तेलाचे शेल्फ लाईफ वाढावे म्हणून तेलातील काही घटक काढून टाकले जातात, ते काढायला कॉस्टिक सोडा वापरला जातो. नंतर जरी सोडा पूर्णपणे काढून टाकला तरी त्याचे ट्रेसेस राहतात जे आपल्या शरीरात स्लो पॉइयजनिंग करतात. रीफाईन करताना जीवनसत्वे नाश पावतात, म्हणून कृत्रिम जीवनसत्वे घातली जातात व फोर्तीफाईड विथ व्हिटॅमिन ए एन्ड डी अशी जाहिरातही केली जाते. आपल्यालाही घेताना बरे वाटते. Happy आपल्या लक्षात येत नाही की जी जीवनसत्वे नैसर्गिकरित्या होती ती काढून टाकली व कृत्रिम घातली. :).

हे नको असेल तर घाणीवरचे तेल उत्तम. ते कोल्ड प्रेसड असते व गाळलेले असते. (युसूफ मेहरली सेंटरला तरी ह्या दोन्ही गोष्टी पाहिल्यात)…

त्यांच्या किंमती रिफाईंडच्या मानाने जास्त वाटल्या तरी कच्च्या मालाची किंमत व तेलाचे यिल्ड लक्षात घेता योग्य असतात. फारतर पेंड विकून झालेला फायदा तेलाची किंमत थोडी कमी करायला मदत करेल.

अन्नपदार्थात भेसळ व छुपी रसायने खूप वाढलेली आहेत. अशा वेळी थोडे पैसे जास्त देऊन खात्रीचा माल मिळत असेल तर तो जरुर घ्यावा. ब्रँडेड कपडे, चपला, मोबाईल इत्यादींवरचा जास्तीचा खर्च आपल्याला चालतो, पण शुद्ध अन्नधान्याची योग्य किंमत देणे आपल्या जीवावर येते . योग्य ठिकाणी पैसे खर्च करायला आपण शिकलो तर आपली तब्येत चांगली राहणार आहे. शेवटी इतकी धडपड आपण करतोय ते निरोगी आयुष्यासाठीच. तेच नसेल तर उत्तम चैनीच्या वस्तूंपासून काय सुख मिळू शकणार?

साधना +१
दुसरी सोपी गोष्ट/ चाचणी करता येते तेलाला. तापवलं चांगलं धूर येईस्तोवर तरीही चांगल्या शुद्ध तेलाचा अपेक्षित सुवासच येतो, वेगळा गंध जाणवत नाही.

साधना, प्रतिसाद आवडला. आम्ही नागपूरला आमच्या निसर्गायण ग्रुपतर्फे एकाला हा व्यवसाय करायला प्रोत्साहित केलं..... 200 रु. लिटरप्रमाणे देतो महाग आहे पण आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा नो कॉम्प्रमाईज. ...

साधना ताई चांगला प्रतिसाद. आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा नो कॉम्प्रमाईज. ...

एक कोल्डप्रेसवाल्या शेतकर्‍याला विचारले तेव्हा त्याने एक किलो तेलासाठी तीन किलो शेंगदाणे लागतात असे सांगितले. त्याच्या हिशोबाप्रमाणे त्याला खर्च २२० ते २६० पर्यंत सीझननुसार जातो. वरुन काही प्रॉफिट जोडून २९० ते ३२० पर्यंत किलोला विकतात.

बाराशे तेराशात १५ किलो कसे परवडते हा इचार करतुया..