सुके बोंबिल फ्राय

Submitted by Darshna on 9 February, 2018 - 10:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सुके बोंबिल - १०/१२
लाल मिरच्या - ७/८
कांदा - १
लसूण पाकळ्या - १०/१२
आल - १ छोटा तुकडा
जीरा - १ चमच
मीठ - चवीनुसार
साखर - १ चमच
पाणी - १/४ कप / गरजेनुसार
तेल - २ चमचे / गरजेनुसार

क्रमवार पाककृती: 

१. सुके बोंबिल नेहमीप्रमाणे साफ करून घ्या. त्याचे डोके, शेपूट कापून टाका व धुवून घ्या. तुकडे करू नका. तो पूर्ण फ्राय करायचा आहे.
२. मिक्सरमध्ये कांदा, लाल मिरच्या, लसूण, आल, साखर, मीठ, जीरा जाडसर वाटून घ्या. आवश्यक तेवढच पाणी टाका. पातळ करू नका. (Fine paste is required) .
३. नंतर बोंबीलला वरील वाटप लावून घ्या.
४. गॅसवर पॅन ठेवून तेल टाका. नंतर त्यात बोंबिल टाका.
५. नंतर १/४ कप किंवा बोंबिल बुडतील एवढ पाणी टाका.
६. ढाकण ठेवून बोंबिल शिजू द्या. पाणी सुकल म्हणजे बोंबिल शिजले का पाहा. आवश्यक वाटल्यास किंचित पाणी टाका.
पाणी सुकले की बोंबिल फ्राय तयार.
७. गरमागरम चपाती / भाकरीसोबत सर्व्ह करा.

वाढणी/प्रमाण: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

तुमच्या रेसिप्या छान आहेत. पण तयार पदार्थाचा, जमल्यास साहित्याचाही फोटो टाकालात तर अजून चांगली कल्पना येईल.

हा माझा खूप आवडता पदार्थ.. स्पेशली तांदळाच्या भाकरीसोबत.. किंबहुना मला असेही ते भाजलेले लांबलचक सुके बोंबील पापडासारखे तोंडी लावायला आवडतात.. स्पेशली पावसाळ्यात गरमागरम कुळदाची पिठी भात आणि बोंबील बेस्ट !

येनीवेज, फोटो मिसींग ...

तयार पदार्थाचा, जमल्यास साहित्याचाही फोटो टाकालात तर अजून चांगली कल्पना येईल.>>>+१

कधी कधी फक्त फोटो बघून पदार्थ करायला हुरुप येतो. Happy

कधी कधी फक्त फोटो बघून पदार्थ करायला हुरुप येतो. << फोटो नसला तर रेसीपी वाचायचाही कंटाळा येतो.
बोंबील नसल्यामुळे करुन बघता येणार नाही. पण मस्त लागत असणार..