सुके बोंबिल - १०/१२
लाल मिरच्या - ७/८
कांदा - १
लसूण पाकळ्या - १०/१२
आल - १ छोटा तुकडा
जीरा - १ चमच
मीठ - चवीनुसार
साखर - १ चमच
पाणी - १/४ कप / गरजेनुसार
तेल - २ चमचे / गरजेनुसार
१. सुके बोंबिल नेहमीप्रमाणे साफ करून घ्या. त्याचे डोके, शेपूट कापून टाका व धुवून घ्या. तुकडे करू नका. तो पूर्ण फ्राय करायचा आहे.
२. मिक्सरमध्ये कांदा, लाल मिरच्या, लसूण, आल, साखर, मीठ, जीरा जाडसर वाटून घ्या. आवश्यक तेवढच पाणी टाका. पातळ करू नका. (Fine paste is required) .
३. नंतर बोंबीलला वरील वाटप लावून घ्या.
४. गॅसवर पॅन ठेवून तेल टाका. नंतर त्यात बोंबिल टाका.
५. नंतर १/४ कप किंवा बोंबिल बुडतील एवढ पाणी टाका.
६. ढाकण ठेवून बोंबिल शिजू द्या. पाणी सुकल म्हणजे बोंबिल शिजले का पाहा. आवश्यक वाटल्यास किंचित पाणी टाका.
पाणी सुकले की बोंबिल फ्राय तयार.
७. गरमागरम चपाती / भाकरीसोबत सर्व्ह करा.
तुमच्या रेसिप्या छान आहेत.
तुमच्या रेसिप्या छान आहेत. पण तयार पदार्थाचा, जमल्यास साहित्याचाही फोटो टाकालात तर अजून चांगली कल्पना येईल.
छान रेसिपी! चिंच लावायची नाही
छान रेसिपी! चिंच लावायची नाही का? आणि साखरेचे प्रयोजन काय?
हा माझा खूप आवडता पदार्थ..
हा माझा खूप आवडता पदार्थ.. स्पेशली तांदळाच्या भाकरीसोबत.. किंबहुना मला असेही ते भाजलेले लांबलचक सुके बोंबील पापडासारखे तोंडी लावायला आवडतात.. स्पेशली पावसाळ्यात गरमागरम कुळदाची पिठी भात आणि बोंबील बेस्ट !
येनीवेज, फोटो मिसींग ...
तयार पदार्थाचा, जमल्यास
तयार पदार्थाचा, जमल्यास साहित्याचाही फोटो टाकालात तर अजून चांगली कल्पना येईल.>>>+१
कधी कधी फक्त फोटो बघून पदार्थ करायला हुरुप येतो.
आज करून पाहिले, छान लागतात.
आज करून पाहिले, छान लागतात.
कधी कधी फक्त फोटो बघून पदार्थ
कधी कधी फक्त फोटो बघून पदार्थ करायला हुरुप येतो. << फोटो नसला तर रेसीपी वाचायचाही कंटाळा येतो.
बोंबील नसल्यामुळे करुन बघता येणार नाही. पण मस्त लागत असणार..
फोटो नसला तर रेसीपी वाचायचाही
फोटो नसला तर रेसीपी वाचायचाही कंटाळा येतो.>> +२
फोटो तो मंगताय.. रेस्पी बाकी मस्त..
सुके बोंबिल फ्राय
सुके बोंबिल फ्राय
तोंडाला पाणि सुटलं..!
तोंडाला पाणि सुटलं..!
फोटो....
फोटो....