शेंगदाणा आमटी (खास उपवासासाठी)

Submitted by Darshna on 8 February, 2018 - 05:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

शेंगदाणा कूट - १ वाटी
पाणी - १ १/२ वाटी / गरजेनुसार
चिंचेचा कोळ - १ छोटी वाटी / आवडीनुसार (आंबट)
हिरवी मिरची - ५/६ / आवडीनुसार (तिखट)
मीठ - चवीनुसार
साखर - आवडीनुसार (गोड)
कोथिंबीर - १/२ छोटी वाटी

फोडणीसाठी :
तेल किंवा तूप - गरजेनुसार
जीरा - १ छोटा चमचा
लवंग - ४/५ तुकडे
दालचिनी - २/३ छोटे तुकडे
कडीपता - ७/८ पान

क्रमवार पाककृती: 

१. शेंगदाणे भाजून कूट करून घेणे.
२. त्यात १ वाटी पाणी घालून वाटून घेणे.
३. चिंच पाण्यात घालून ठेवा व नंतर त्यातील बीया काढून टाका.
४. मिरचया कापून घ्या. किंवा वाटून घ्या.
५. गॅसवर पातेले / टोप ठेवा.
६. त्यात तेल / तूप टाका.
७. ते गरम झाल की जीरा टाका. नंतर लवंग, दालचिनी, मिरची तुकडे टाका. कडीपत्ता टाका.
८. वाटलेले शेंगदाणा कूट मिश्रण टाका. १/२ वाटी पाणी टाका.
९. मीठ, साखर टाका.
१०. कोथिंबीर बारीक चिरून टाका.
११. शेंगदाणा आमटी तयार. गरमागरम वाढा.

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> लवंग दालचिनी??उपवासाला चालते का??
उपवासाचे कुठे कोण पोलीस असतात. घरगुती असले आणि त्यांनां पटणार नसेल तर घालू नये Wink
पण कोणी पोलीस नसले तर आपल्या मनाला पटेल ते करावं.

आमच्याकडे कोकम टाकतात यात. बटाटा टाकला की चांगली मिळून येते. लवंग दालचिनी नाही टाकत. पण लवंग टाकून बघेन आता. मिरची आलं दाणे कुट असं एकत्र वाटून घेतो आम्ही.

दही पण टाकतात छान लागते, शेंगदाणे दही , साखर ,हिरवी मिरची एकत्र पेस्ट करून घायवी. त्यात पाणी टाकून घुसळून आमटी करावी