Submitted by पुरंदरे शशांक on 8 February, 2018 - 01:39
विठू अनुभव
कंठात तुलसी । भाळी तळपती । चंदनाची उटी । विठ्ठलाच्या ।।
कटेवरी हात । खुणावितो भक्ता । भवाब्धि (भवसागर) इतुका । तुम्हालागी (भक्तांलागी ) ।।
परब्रह्म स्वये । जाहले सगुण । गुण विलक्षण । वर्णवेना ।।
संत गाती नित्य । जयाची महती । रखुमाई पती । ध्यानी मनी ।।
येका शुद्ध भावे । येताची शरण । देई प्रेमखूण । निज भक्ता ।।
दीनांचा कैवारी । बंधू अनाथांचा । मायबाप साचा ( खरा) । लेकुरांचा ।।
पुरवितो कोड (लाड) । भक्तिचे भातुके (खाऊ, खाद्यपदार्थ) । गर्जे एकमुखे । संतजन ।।
सत्संगे बरवा (चांगला)। विठू अनुभव । लौकिक तो वाव (तुच्छ)। अनायासे (सहज)।।
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त
मस्त
॥ येणे म्हणे साचे ॥
॥ येणे म्हणे साचे ॥
॥ भाव हे मनीचे॥
॥ ॠण विठ्ठलाचे ॥
॥ शशांक म्हणे ॥
यापरते काय म्हणू आता... _/\_
अप्रतिम __/\__
अप्रतिम __/\__
अप्रतिम अगदी.. ___/\___
अप्रतिम अगदी.. ___/\___
अप्रतिम ____/\_____
अप्रतिम ____/\_____