किशोरचे सर्व अंक सर्वांसाठी आंतरजालावर सहज उपलब्ध करून देऊन किशोरच्या व्यवस्थापनाने एक अतिशय सुखद धक्का दिला आहे. ह्या उपक्रमाबद्दल त्यांचे आणि संबंधितांचे कौतुक करावे तितके कमीच ! जवळपास ५५० अंक आता किशोरचा खजिना ह्या दुव्यावर उपलब्ध आहेत.
किशोर एकदा हातात आल्यानंतर त्यातल्या दर्जेदार लेखांचा आणि कवितांचा फडशा पाडल्याशिवाय अंक काही खाली ठेववत नसे. कित्येकदा जेवतानाही त्यावरून बोलणी खाल्ली आहेत आणि एकदा शेजार्यांच्या घरात अडकून राहण्याचा पराक्रमही केला आहे. किशोरच्या जुन्या अंकांनी कित्येकांच्या लहानपणीच्या गोड आठवणींना आता उजाळा मिळेल.
'अजब देशात', 'सागरकैद', 'चीनचे प्राचीन शोध', 'ज्ञानवृक्षाच्या पारंब्या' अशा कित्येक लेखमालांच्या आठवणी माझ्या मनाच्या एका कप्प्यात कित्येक वर्षे दडून राहील्या होत्या. आता ह्या खजिन्यात त्या मिळतील, पण अर्धसहस्र अंकांमध्ये त्या शोधता शोधता इतर लेखांमध्ये हरवून जायला होतंय. तोही एक सुखद अनुभव आहेच, परंतु त्या सदाबहार लेखांची एक सूची बनवून इथे ठेवण्याचा विचार आहे. ज्यांना ठराविक लेख हवे असतील, त्यांना ही सूची उपयोगी पडू शकेल. तुम्हाला आणखी काही लेख माहिती असतील किंवा सापडले असतील तर सांगा, तेही ह्या सूचीत जोडले जातील.
लेखमाला
- अजब देशात [Wizard of Oz - L. Frank Baum] - भा.रा.भागवत
- भाग १ - फेब्रुवारी १९७८ ... भाग ८ (अंतिम) - ऑक्टोबर १९७८
- अमित शोध [Silvertip's search - Max Brand] - सौ. शुभदा खरे
- भाग १ - मार्च १९८३ ... भाग ७ (अंतिम) - सप्टेंबर १९८३
- असे हे विलक्षण जग - वसंत शिरवाडकर
- भाग १ - नोव्हेंबर १९७१ ...
- चीनचे प्राचीन शोध - सुरेश मथुरे
- रेशीम - जून १९८०
- होकायंत्र- जुलै १९८०
- कागद - ऑगस्ट १९८०
- कुंचला - सप्टेंबर १९८०
- चिनी माती - ऑक्टोबर १९८०
- फटाके - नोव्हेंबर १९८०
- अॅक्युपंक्चर - डिसेंबर १९८०
- घड्याळ- जानेवारी १९८१
- छपाई यंत्र - फेब्रुवारी १९८१
- कागदी नोटा - मार्च १९८१
- रुप्या बुरुज आणि धाडशी चमू [Famous Five - Enid Blyton] - ज्ञानदा नाईक
- भाग १ - जून १९८५ ... भाग ५ (अंतिम) - ऑक्टोबर १९८५
- विज्ञानाचे वाटाडे - सुरेश मथुरे
- हिपॉक्राटेझ - मार्च १९७६ ... (भाग अंतिम) आर्किमिडीझ - ऑक्टोबर १९७६
- सागरकैद [20000 Leagues under the Sea] - प्रकाश प्रभू
- भाग १ - फेब्रुवारी १९७९ ... भाग ८ (अंतिम) - सप्टेंबर १९७९
- सागरराजाच्या राज्यात - रा. वि. रानडे
- भाग १ - ऑगस्ट १९८० ... भाग ६ (अंतिम) - जानेवारी १९८१
- ज्ञानवृक्षाच्या पारंब्या - सुरेश मथुरे
- कणाद - जानेवारी १९७८
- चार्वाक - फेब्रुवारी १९७८
- पाणिनी - मार्च १९७८
- पिंगल - एप्रिल १९७८
- कात्यायन - मे १९७८
- भरतमुनी- जून १९७८
- भृगू - जुलै १९७८
- चाणक्य - ऑगस्ट १९७८
- चरक - सप्टेंबर १९७८
- सुश्रुत - ऑक्टोबर १९७८
- सप्तर्षी- नोव्हेंबर १९७८
- नागार्जुन - डिसेंबर १९७८
- आर्यभट - श्री. रा. टिकेकर - ऑगस्ट १९७५
कथा / लेख
- भा.रा.भागवत
- हावरट हेमा - भा.रा.भागवत - नोव्हेंबर १९७५
- महेश उडाला भुर्रर्र - भा.रा.भागवत - नोव्हेंबर १९७६
- धिटुकली शकू - भा.रा.भागवत - नोव्हेंबर १९७८
- अलकनंदा आणि जादूगार - भा.रा.भागवत - नोव्हेंबर १९७९
- गड आला आणि सिंहही आला - भा.रा.भागवत - नोव्हेंबर १९८०
- मोगलगिद्दीकरांची रद्दी ( फा फे कथा) - भा.रा.भागवत - नोव्हेंबर १९८१
- काठे-आजोबा - भा.रा.भागवत - नोव्हेंबर १९८२
- पक्याचे पोस्मनकाका - भा.रा.भागवत - नोव्हेंबर १९८३
- पिवळ्या पट्ट्याचा प्रताप - भा.रा.भागवत - नोव्हेंबर १९८५
- विविध लेखक / लेखिका
- बासुन्दी घट्ट होऊ दे ! - हेमा परुळेकर - फेब्रुवारी १९७२
- छुम् छुम् जाणार ... झूम् झूम् येणार - केशव मेश्राम - मार्च १९७२
- मिशीवर कर्ज - विनोद घारपुरे - मार्च १९७२
- श्रीखंडाचे बोट - श्री. दा. पानवलकर - ऑगस्ट १९७५
- बिली आणि ठेंगूजी - सविता जाजोदिया - नोव्हेंबर १९७६
- किटलीचा काटा काढला - सौ. शोभा बोन्द्रे - फेब्रुवारी १९७८
- अज्ञानाची काशीयात्रा - सौ. मंदा बोडस - मार्च १९७८
- कुस्तीगीर देऊ देवल - नीलिमा गोखले - जुलै १९७८
- वस्तुचे मोल - विलास गिते - सप्टेंबर १९७८
- छोटूचा रुसला टॉवेल - सौ. पद्मजा फाटक - ऑक्टोबर १९७८
- छोटा सैनिक - वसंत पोरेडी - नोव्हेंबर १९७८
- अर्थ की निरर्थ - बाबामोहम्मद अत्तार - जानेवारी १९७९
- निळा हत्ती (स्वप्नवासवदत्ता) - कमलाबाई टिळक - जुलै १९७९
- पैज - दि. मा. प्रभुदेसाई - फेब्रुवारी १९८०
- आकाशातील चांदण्या - सौ. मुमताज रहिमतपुरे - जून १९८०
- शकुनाचे वेड - बा. अ. देसाई - ऑक्टोबर १९८०
- इंगा - प्रकाश प्रभू - जानेवारी १९८१
- जितूचा इंटरव्ह्यू- सौ. सुमती इनामदार - जून १९८१
- दोन्ही मागे उभयान्वयी- भगवंत रघुनाथ आगास्कर - जुलै १९८१
- फुलवा - विजया वाड - नोव्हेंबर १९८२
- जौळ - तु.बा.नार्वेकर - नोव्हेंबर १९८२
- बक्षीस समारंभ - दिलीप प्रभावळकर - नोव्हेंबर १९८२
- बाबा जित्तो - मोरेश्वर माधव वाळिंबे - नोव्हेंबर १९८३
लघु लेख
- माझे १४ वे वर्ष - लता मंगेशकर, ना.ग.गोरे, मालती बेडेकर, ना.श्री.बेंद्रे, चंदू बोर्डे, विजय तेंडुलकर, रा.ज.देशमुख - नोव्हेंबर १९७२
- अशी होती आमची शाळा - ना.सी.फडके, अनंत काणेकर, व्हा.अॅ. भास्करराव सोमण, सौ. कमला फडके, अजित वाडेकर, उमाकांत ठोमरे - नोव्हेंबर १९७३
- मला आठवते ते असे - यशवंतराव चव्हाण, व्ही. शांताराम, डॉ. वसंतराव देशपांडे, मंगेश पाडगांवकर - नोव्हेंबर १९७६
- बालपणीचा काळ सुखाचा - पु.ल.देशपांडे, सुनिल गावस्कर, डॉ. श्रीराम लागू, जयवंत दळवी, मु.शं.किर्लोस्कर - नोव्हेंबर १९७८
नाट्यछटा
- अर्जुन साखरे - वडापाववाला - सौ. वसुधा पाटील - मे १९८१
कविता
- टपटप- शांता शेळके - एप्रिल १९७२
- प्रश्नोतरे - बा.भ.बोरकर - नोव्हेंबर १९७२
नाटुकली / एकांकिका
- अलिबाबाचे खेचर - रत्नाकर मतकरी - नोव्हेंबर १९७६
- भोपळ्या राक्षस - रत्नाकर मतकरी - नोव्हेंबर १९७८
- मोठं व्हायचं मला ! - सौ. अनुराधा खोत - जून १९८०
चित्रकथा
- बोलके खांब - प्रभाशंकर कवडी - भाग १ नोव्हेंबर १९७१ ... भाग ५ (अंतिम) मार्च १९७२
- दर्यादेशची राजकन्या - भा.रा.भागवत - भाग १ एप्रिल १९७२ ... भाग ७ (अंतिम) ऑक्टोबर १९७२
- घाटातले रहस्य - वसंत सबनीस - नोव्हेंबर १९७९ ... भाग ३ (अंतिम) जानेवारी १९८०
- सुवर्ण घंटा - मधुकर टांकसाळे - नोव्हेंबर १९८२
तळटीपः
किशोर, चांदोबा आणि इतर मासिकांबद्दल चर्चा करण्याकरता हा अजून एक धागा: "किशोर, चांदोबा, चंपक, ठकठक, आनंद, गंमतजंमत - आपलं भावविश्व व्यापून टाकलेली मासिकं"
@यक्ष, एवढी 'धन्य'राशी फक्त
@यक्ष, एवढी 'धन्य'राशी एक यक्षच देऊ शकतो. आनंदाने स्वीकारु.
@anudon, 'छोटूचा रुसला टॉवेल' - बरोबर. धमाल नाट्यछटा आहे ती.
@अंजली_१२, नक्की काय दिसत नाहीये? browser बदलून पहा.
धन्यवाद सर्वांना. सूची वाढवलीये. अजून येऊ द्या ...
वैनील - खूप उपयुक्त धागा.
वैनील - खूप उपयुक्त धागा..धन्यवाद !!!!!!!
आत्ताच पिवळ्या पट्ट्याचा प्रताप वाचले... टू गुड !
किशोरमध्ये लिहिणारे प्रा. ना.
किशोरमध्ये लिहिणारे प्रा. ना. वा. कोगेकर म्हणजे फर्गसन महाविद्यालयाचे प्राचार्य कोगेकर का? त्या काळी तिथे शिकलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या लेखनात/आठवणींत त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख वाचायला मिळतो.
फुलवा,१९८२ च्या दिवाळी अंकात
फुलवा,१९८२ च्या दिवाळी अंकात आहे.
>> किशोरमध्ये लिहिणारे प्रा.
>> किशोरमध्ये लिहिणारे प्रा. ना. वा. कोगेकर म्हणजे फर्गसन महाविद्यालयाचे प्राचार्य कोगेकर का?
हे "विज्ञानयुग" मध्ये पण लिहित असत. लेख अतिशय छान असायचे. खूपच माहितीपूर्ण आणि रस निर्माण होईल असे लिखाण.
browser बदलून पहा.>>> येस्स
browser बदलून पहा.>>> येस्स ... झाले काम... थँक्यू सो मच.
खजिना मिळाला....
दुर्गा भागवतांच्या लहानपणच्या
दुर्गा भागवतांच्या लहानपणच्या आठवणी भन्नाट आहेत. त्यांचा उपद्व्यापीपणा, जखमा, वेदना सहन करायची जिद्द ही त्यांच्या पुढील आयुष्याची चुणूक दाखवते. त्या सर्व गोष्टी ह्या त्यांच्या आत्मचरित्रातून घेतल्या आहेत असे वाटते. आत्तापर्यंत फक्त नोव्हेंबर १९७४ चा अंक मिळाला ज्यात त्यांनी लिहिलेली गोष्ट आहे पण अजूनही वाचल्या आहेत.
शांता शेळके, वसंत बापट, विंदा करंदीकर ह्यांच्यासारखे प्रसिद्ध कवी आणि अनेक मोठे लेखक ह्या अंकाकरता नियमित लेखन करत असत हे मोठे कौतुकाचे आहे.
मस्त इन्डेक्स!!
मस्त इन्डेक्स!!
किशोर छानच होते.
चांदोबा चे अंक मिळू शकतील काय
चांदोबा चे अंक मिळू शकतील काय
मस्त. ही अनुक्रमणिका वाढत
मस्त. ही अनुक्रमणिका वाढत जावो.
सरोजिनी बाबरांची एक लघुकथा वाचली. अतिवास यांच्या आंजीच्या कथांची आठवण झाली.
चांदोबा चे अंक मिळू शकतील काय
चांदोबा चे अंक मिळू शकतील काय >>
www.chandamama.in इथे काही हिंदी, इंग्रजी आणि तमीळ अंक आहेत चांदोबाचे, पण मराठी नाहीयेत.
एक कथा आठवते, किशोरमधली आहे
एक कथा आठवते, किशोरमधली आहे का ते ठाउक नाही पण एक छोटी मुलगी नाराज असते मम्मीवर. मम्मी जाहिरातीतल्या बाईसारखी आक्खी विक्सची डबी बोटावर घेवुन विक्स लावत नाही, पावसात भिजुन आलं की न ओरडता हसतमुखाने केस पुसुन देत नाही, चॉकलेट बिस्कीट्स देत नाही, छोट्या भावाकडेच जास्त लक्ष देते वगैरे वगैरे. मग तिच्या वाढदिवसाला मम्मी पपा, आजोबा वगैरे काहीतरी सरप्राईझ देतात अशी. कुणाला आठवली तर प्लीज सांगणे.
एका मुलाची गोष्ट होती. तो
एका मुलाची गोष्ट होती. तो सकाळी उठायला त्रास देतो मग आई त्याला सरळ नळाखाली बसवते मग तो चहा अन दहा असा हट्ट करतो. म्हणजे चहा अन दहा बिस्किटं. माहितीय का कोणला? ही बातमी कळल्यापासून उगीच ही गोष्ट आठवतीय सारखी.
फाफे कथा वाचली... मस्तच
फाफे कथा वाचली... मस्तच
एक ठमाकाकूंच्या मोहन ची गोष्ट
एक ठमाकाकूंच्या मोहन ची गोष्ट होती ना.
इलेक्ट्रिक शॉक बसतो आणि वायर ला २ जण चिकटतात आणि लहान मुलगी वर्गात शिकलेल्या सायन्स चा उपयोग करुन धुण्याच्या काठीने त्यांना सोडवते अशी काहीतरी.
'छोटूचा रुसला टॉवेल' आणि
'छोटूचा रुसला टॉवेल', 'भोपळ्या राक्षस' आणि 'अज्ञानाची काशीयात्रा' मिळाले ! ... सूचीत जोडले आहेत.
एक (बहुतेक शोभा बोंद्रे लिखीत
एक (बहुतेक शोभा बोंद्रे लिखीत) मस्त गोष्ट होती. लहान मुली आपल्या साध्या बाहुल्यांशी खेळत असतात आणि मैत्रिण चकाचक बार्बी घेऊन येते, मग यांच्या बाहुल्या फिक्या वाटू लागतात, मग या खूप मेहनत करुन एक बाहुला लग्नासाठी सजवतात तितक्यात ती मैत्रिण बार्बीचा मित्र केन विकत घेऊन येऊन त्यांचा पोपट करते अशी काहीतरी(मी नीट सांगत नाहीय पण छान होती ती गोष्ट.)
same pinch mi_anu
same pinch mi_anu
कालच reply लिहिणार होते तुझ्या post वर. किशोर बद्दल वाचून मला सगळ्यात आधी ह्याच दोन गोष्टि आठवल्या होत्या.
पहिल्या गोष्टितल्या मुलीचे नाव बबली आहे. आणि barbie च्या गोष्टितल्या दोन बहिणी अंजू-मंजू बहुतेक. त्याची मामेबहिण आलेली असते अमेरिकेवरुन barbie gheun. खडूस मामी पण असते. मस्त होती ती गोष्ट.
सही, म्हणजे गोष्टी नक्की
सही, म्हणजे गोष्टी नक्की किशोर मधल्याच आहेत
शोधायला हव्यात
आईचा वाढदिवस नावाची गोष्ट
आईचा वाढदिवस नावाची गोष्ट कोणाला मिळाली तर कळवा.
तसंच एक मुलगी तिचा वाढदिवस अगदी वेगळ्या प्रकारे घरात कामं करणार्या लोकांना भेटी देऊन करते अशी एक कथा होती. तिचाही ठावठिकाणा कळवा.
आज एक गंमत नोटीस केली.
आज एक गंमत नोटीस केली.
वर लिहिलेल्या तिन्ही चित्रकथा आणि त्याचे सगळे भाग (जवळजवळ 15) हे किशोरमध्ये पान 44 वरच छापले आहेत. शेवटी शेवटी तर मी अनुक्रमणिका बघणं सोडून डायरेक्ट पान 44 वर उडी मारली
तिन्ही चित्रकथा आणि त्याचे
तिन्ही चित्रकथा आणि त्याचे सगळे भाग (जवळजवळ 15) हे किशोरमध्ये पान 44 वरच छापले आहेत >> तो तत्कालीन (डीटीपीपूर्व) टाईपसेटिंगचा परिणाम असावा.
पियू? कोणत्या ३ गोष्टी
पियू? कोणत्या ३ गोष्टी?बाहुलीचं लग्न वगैरे का?
कोणत्या सालच्या पान ४४ वर?
एक 'दूधपाक' नावाची कथा होती.
एक 'दूधपाक' नावाची कथा होती. त्यात प्रवासाला जायला निघालेल्या आपल्या भाच्यांसाठी मामी सकाळी दूधपाक बनवतात आणि वरचा काढून त्यांना डब्यात देतात. नंतर उरलेला दूधपाक काढून ठेवत असताना त्यांच्या लक्षात येतं की त्या भांड्यात पाल पडली होती आणि त्यामुळे तो दूधपाक विषारी बनला होता. मग भाच्यांपर्यंत पोचण्यासाठी, त्यांना दूधपाक खाण्याच्या आधी थांबवण्यासाठी मामा/मामी/त्यांची मुलं जिवाचा आटापिटा करून त्यांचा पाठलाग करतात अशी काहीशी कथा होती. कोणाला माहिती आहे का की ती कुठल्या अंकात आहे?
मागे बालभरतीने जुने अंकाचे एक
मागे बालभरतीने जुने अंकाचे एक निवडक किशोर म्हणून संच प्रकाशित केले होते त्याचे ४ संच (छान हार्ड बाऊंड ) संग्रही मी बालभारती मधून घेऊन आलो!
इलेक्ट्रिक शॉक बसतो आणि वायर
इलेक्ट्रिक शॉक बसतो आणि वायर ला २ जण चिकटतात आणि लहान मुलगी वर्गात शिकलेल्या सायन्स चा उपयोग करुन धुण्याच्या काठीने त्यांना सोडवते अशी काहीतरी. > हो, शौर्याचे राष्ट्रपती पदक मिळालेल्या मुलीची कथा होती ती. मी वाचली गेल्या आठवड्यात पण कोणत्या अंकात ते आता लक्षात नाही.
एक पिंकीचा उरक दांडगा अश्या
एक पिंकीचा उरक दांडगा अश्या नावाची लहान मुलीची कथा होती ती पण क्युट होती.
एक 'बिली आणि ठेंगूजी' कथा
एक 'बिली आणि ठेंगूजी' कथा माझ्या आवडीची होती. १९७६ च्या दिवाळी अंकात आहे, पान नं १०९ वर. त्यातील बुधले च्या बुधले भरलेली सरबतं बघायला (चित्र) मला फार आवडायचं
पियू? कोणत्या ३ गोष्टी
पियू? कोणत्या ३ गोष्टी?बाहुलीचं लग्न वगैरे का?
कोणत्या सालच्या पान ४४ वर?
>> अगं चित्रकथा.. बोलके खांब, दर्यादेशाची राजकन्या आणि सुवर्णघंटा. कोणत्या अंकात ते मूळ लेखातच दिलंय बघ वैनील यांनी
वोके.एकंदर पूर्ण किशोरच परत
वोके.एकंदर पूर्ण किशोरच परत सगळे डोळ्याखालून घालायला हवे.
एक हातूपातू ची गोष्ट होती.लहान मुलाकडून हातूपातू नावाच्या लहान भावाचा मृत्यू होतो अशी कहीतरी.किशोर मध्येच होती का आठवत नाही.
Pages