किशोर चे जुने अंक आणि त्यातील निवडक लेखांची सूची

Submitted by वैनिल on 27 November, 2017 - 21:56

किशोरचे सर्व अंक सर्वांसाठी आंतरजालावर सहज उपलब्ध करून देऊन किशोरच्या व्यवस्थापनाने एक अतिशय सुखद धक्का दिला आहे. ह्या उपक्रमाबद्दल त्यांचे आणि संबंधितांचे कौतुक करावे तितके कमीच ! जवळपास ५५० अंक आता किशोरचा खजिना ह्या दुव्यावर उपलब्ध आहेत.

किशोर एकदा हातात आल्यानंतर त्यातल्या दर्जेदार लेखांचा आणि कवितांचा फडशा पाडल्याशिवाय अंक काही खाली ठेववत नसे. कित्येकदा जेवतानाही त्यावरून बोलणी खाल्ली आहेत आणि एकदा शेजार्‍यांच्या घरात अडकून राहण्याचा पराक्रमही केला आहे. Happy किशोरच्या जुन्या अंकांनी कित्येकांच्या लहानपणीच्या गोड आठवणींना आता उजाळा मिळेल.

'अजब देशात', 'सागरकैद', 'चीनचे प्राचीन शोध', 'ज्ञानवृक्षाच्या पारंब्या' अशा कित्येक लेखमालांच्या आठवणी माझ्या मनाच्या एका कप्प्यात कित्येक वर्षे दडून राहील्या होत्या. आता ह्या खजिन्यात त्या मिळतील, पण अर्धसहस्र अंकांमध्ये त्या शोधता शोधता इतर लेखांमध्ये हरवून जायला होतंय. तोही एक सुखद अनुभव आहेच, परंतु त्या सदाबहार लेखांची एक सूची बनवून इथे ठेवण्याचा विचार आहे. ज्यांना ठराविक लेख हवे असतील, त्यांना ही सूची उपयोगी पडू शकेल. तुम्हाला आणखी काही लेख माहिती असतील किंवा सापडले असतील तर सांगा, तेही ह्या सूचीत जोडले जातील.

लेखमाला

कथा / लेख

लघु लेख

  • माझे १४ वे वर्ष - लता मंगेशकर, ना.ग.गोरे, मालती बेडेकर, ना.श्री.बेंद्रे, चंदू बोर्डे, विजय तेंडुलकर, रा.ज.देशमुख - नोव्हेंबर १९७२
  • अशी होती आमची शाळा - ना.सी.फडके, अनंत काणेकर, व्हा.अ‍ॅ. भास्करराव सोमण, सौ. कमला फडके, अजित वाडेकर, उमाकांत ठोमरे - नोव्हेंबर १९७३
  • मला आठवते ते असे - यशवंतराव चव्हाण, व्ही. शांताराम, डॉ. वसंतराव देशपांडे, मंगेश पाडगांवकर - नोव्हेंबर १९७६
  • बालपणीचा काळ सुखाचा - पु.ल.देशपांडे, सुनिल गावस्कर, डॉ. श्रीराम लागू, जयवंत दळवी, मु.शं.किर्लोस्कर - नोव्हेंबर १९७८

नाट्यछटा

  • अर्जुन साखरे - वडापाववाला - सौ. वसुधा पाटील - मे १९८१

कविता

नाटुकली / एकांकिका

चित्रकथा

तळटीपः
किशोर, चांदोबा आणि इतर मासिकांबद्दल चर्चा करण्याकरता हा अजून एक धागा: "किशोर, चांदोबा, चंपक, ठकठक, आनंद, गंमतजंमत - आपलं भावविश्व व्यापून टाकलेली मासिकं"

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

च्यामारी! मी लेखातली भा रा भागवतान्ची लिस्ट वाचली पण त्यात दिसलं नाही म्हणून नेटवर सर्च दिला तर 1978 सालातला संदर्भ मिळाला मग पहिल्या भागाचा अंक शोधला. Lol

'सारा प्रकार असा घडला' (ग्रीक कथेवर आधारित) ही कथा कम कविता आणि को आईचा बूट ही कथा शोधत आहे.
कोणाला साधारण कुठल्या साली किंवा कुठल्या अंकात (दिवाळी/मे) या प्रकाशित झाल्या होत्या ते आठवत आहे का?
धन्यवाद!

को आईचा बूट कथा सापडली एप्रिल १९७४ च्या अंकात आहे. शांता शेळकेंनी लिहिलेली आहे. काटा आला वाचून!

सारा प्रकार असा घडला कथा/कविता शोधत आहे. कुणाला माहिती आहे का साधारण कुठे सापडेल?

कोणत्या कथा कविता? लहान मुलांच्या की प्रौढांच्या ही?? >>>>

किशोर मासिकात आली होती 'सारा प्रकार असा घडला' ही कथा (किंवा कविता असेल). वरती आधीच्या पानांवर मामींनी उल्लेख केला आहे तिचा. ती शोधत आहे.

तसंच ' सारा प्रकार असा घडला' नावाची एक कविता कम गोष्ट होती. त्यात त्या राजाच्या राणीचं नाव प्रोक्न असं असतं.
प्रोक्न राणीला तिची बहीण भेटायला येते आणि राजाला ती आवडायला लागते म्हणून तो राणीला मारायचं ठरवतो. शेवटी दोन्ही बहिणी आणि राजा पक्षी होतात. राजा ससाणा पक्षी बनतो. अशी ती गोष्ट आहे.
त्यातलं एक वाक्य मला व्यवस्थित आठवतंय ..
" कोण बरं ही प्रोक्नहून छान? नितळ कांती गोरी गोरी पान">>>

मागच्या पानांवरील मामींचा प्रतिसाद इथे डकवत आहे. कोणाला माहीत असेल तर सांगा.
किशोरचे जुने अंक चाळताना अनेक इतरही मस्त गोष्टी मिळाल्या Happy ही पण मिळाली तर छान होईल!

सरळ नाक, गोरी पान, लाल गाल, जिवणी छान

पिंगट केस, मऊ किती ! प्रोक्‍न राणी अशी होती -

मेजवान्या झडल्या, बँड आले, टेरियसचे लग्‍न प्रोक्‍नशी झाले

राणीला दुःख ठाऊक नव्हते, प्रोक्नचे सुख आभाळाहून मोठे -

एकदा काय झालं -

राणीच्या घरी पाहुणी आली, स्वागताची खूप धांदल झाली.

"फिलॉमेला आली ! फिलॉमेला आली !

राणीची धाकटी बहीण आली."

गाणी म्हटली, नृत्य झाले

फिलॉमेलाचे मन आनंदून गेले -

"ताई ग ताई !

निघू मी आता ? मन खूश झाले

आठ दिवस कसे भुर्रकन गेले !"

"अग पण थोडी थांबशील ना !

माझा महाल आवडला ना ?"

ताईचा आग्रह मोडायचा कसा !

फिलॉमेलाचा मुक्काम लांबला असा -

संध्याकाळी राजा महालात आला

फिलॉमेलाकडे बघतच राहिला.

"कोण बरं ही प्रोक्नहून छान ?

नितळ कांती, गोरी गोरी पान - "

"ही किनई फिलॉमेला !

थोडेसे हिला फिरवून आणाल ?

बागेत पुष्करणीवर नेऊन आणाल !"

फिलॉमेला निघाली नटून थटून

"खूप खूप फिरायचं बग्गीत बसून !"

"असं कर राणी -

तूही जरा फिरुन ये

सुंदर बनात जाऊन ये -"

राणीचा रथ वेगात निघाला

सारथ्याशी राजा काही बोलला -

फिरता फिरता रात्र झाली

राणीच्या महालाशी फिलॉमेला आली -

"प्रोक्‍न प्रोक्‍न !" उत्‍तर नाही

"कुठे आहे सांगा माझी ताई ?"

"तुला सांगू फिलॉमेला,

आत्‍ताच दूत येऊन गेला,

बातमी देऊन निघून गेला.

प्रोक्न राणी रथातून पडली

घोडयाच्या टापांखाली आली.

क्षणात तिचा जीव गेला

सारा प्रकार असा घडला - "

फिलॉमेला तेव्हा खूप रडली

सर्वांनी तिची समजूत घातली -

"जाते मी आता बाबांकडे

निळ्या डोंगराच्या पलीकडे -"

"फिलॉमेला, फिलॉमेला,

प्रोक्‍नची तू बहीण ना !

तिच्या जागी राहशील ना ?

तूच हो आता माझी राणी

तुझ्याशिवाय मला नाही कुणी !"

फिलॉमेलाने मग डोळे पुसले

आणि राजाला ’हो’ म्हटले.

लग्नाची घटका भरत आली,

प्रोक्‍नची दासी हळूच म्हणाली -

"फिलॉमेला, माहीत आहे तुला,

टेरियस राजा खोटे बोलला.

म्हणाला , ’प्रोक्न राणी मेली.’

तिला किल्ल्यात कोंडून ठेवली

मखमली हिरवळ संपते जिथे

प्रोक्‍न राणी वाट पाहाते - "

फिलॉमेला हळूच जायला निघाली

समोरुन टेरियसची स्वारी आली

(आता कसं करायचं ?)

गुपित फुटलं, घोटाळा झाला,

भेट घ्यायचा मार्गच खुंटला.

"फिलॉमेला, ऐक -

प्रोक्‍नला काही सांगायचं नाही

काय म्हणतो मी, समजलं नाही ?"

फिलॉमेला मुळी ऐकेच ना

"ताई ग ताई, आहेस ना ?" -

(असं काय ?)

राजाने तिची जीभच कापली

फिलॉमेला तेव्हा धावत सुटली

बहिणींची एकदा भेट झाली

दोघींची जोडी हळूच निघाली.

प्रवास त्यांचा सुरु झाला

राजा मागून मागून आला

पळता पळता दमछाक झाली

देवाला दोघींची दया आली.

प्रोक्न राणी चिमणी बनली

धाकटी बहीण नायटिंगेल झाली

फिलॉमेलाची जीभ अजून दुखते

करुण गाणे गात सुटते.

त्यांचा पाठलाग संपला का ?

छे ! मुळीच नाही !

ससाणा पक्षी पाहिलात का ?

बहुतेक आक्टोबर किंवा नोव्हेंबर १९७७ च्या अंकात होती. चुभुद्याघ्या !
मुळ लेखक कवी - माहिती नाही. किशोरचे अंक आता आंतरजालावर उपलब्ध नाहीत. Sad
रचाकने याबद्दल गुगल जेमिनी ला विचारलं तर चक्क त्याने मायबोलीवर विचारा असं सांगून या धाग्याची लिंक दिली.

@Sparkle कुठली लिंक?
तुम्ही सामो यांनी दिलेली लिंक म्हणत असाल तर , तिथे "किशोर" विभागात , "किशोर" वयातील मुलांसाठी असलेल्या फक्त १३ पुस्तकांचा / गोष्टींचा समावेश आहे. किशोर मासिकाशी काही संबंध नाही. मासिक विभागातही किशोरचे अंक नाहीत. तुम्हाला दुसरी लिंक माहिती असेल तर कृपया इथे द्या.

धन्यवाद माने गुरुजी Happy

नोव्हेंबर १९७७ च्या अंकात दिसली नाही पण आजूबाजूला शोधून बघीन!

Pages