कोण....? (शतशब्दकथा)

Submitted by नानाकळा on 10 November, 2017 - 13:36

ती आत शेवटच्या घटका मोजत होती. मृत्यू कणाकणाने जवळ येत होता.

हा बाहेर दोन गोजिर्‍या पोरांना कसलीशी गोष्ट सांगत होता.

'...ह्यांना आपल्याला एकट्याने सांभाळायचंय, आपण कुठेच कमी पडू नये...'
याच विचारात असतांना नर्सने आत बोलावले.

आत डॉक्टर बोलले, "त्यांना त्रास नको व्हायला..."

तो शेजारी बसला, हात हातात घेतला. तिने उठण्याचा प्रयत्न करताच त्याने बजावले, हालचाल नको.
तेवढेही श्रम झेपले नाहीत. रया अजून बिघडली.

क्षणाक्षणाला चेहरा फिकटतोय. प्राण एकवटून बोलली, '' मला.... तुला.. सांगायचंय... "

“शांत राहा, बोलू नकोस”.

शब्द बुडबुड्यासारखे फुटलेच, "... आपल्या दोन मुलांपैकी.... एक.... तुझं नाही."

जणू वीज कोसळली,

"कोण...? कोणता मुलगा माझा नाही...?"

तिला गदागदा हलवत तो विचारत राहीला,

पण...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी Lol

ऑन ए सिरीअस नोट
डीएनए टेस्टमध्ये समजते ना हल्ली..

ऑन ए सिरीअस नोट
डीएनए टेस्टमध्ये समजते ना हल्ली..

जुनी कल्पना आहे हो, कदाचित शंभर वर्ष जुनी असेल. ह्या कल्पनेवर बर्‍याच कथा-चित्रपट बनलेत. ही कल्पना १०० शब्दांत मांडायचं आव्हान होतं.

गोष्ट आजचीच आहे, कल्पना जुनी आहे. मी 2 मराठी चित्रपट पाहिलेत या कल्पनेवर.

गोष्ट आजची असल्याने नायक आता जरी उध्वस्त झाला तरी नंतर करेल डीएनए टेस्ट. Happy

काय लोक तुम्ही.... डिएनए टेस्ट हा काय मुद्दा आहे का? Happy

"कोण....?" हे शिर्षक काय सुचवतं....? जरा डिपमंदी जावा ना....

अरे ती गेल्यावर आता तो कोण शोधून काय फायदा. आता आपला कोणता हेच शोधण्यात त्याला ईंटरेस्ट असेल.

समजा कलप्रिट नायकाचा सकखा भाऊ असेल तर?
>>>>
आमच्या शाळेत डीएनए वगैरे शिकवले नाही. पण दोन भावांच्या डीएनएमध्येही फरक असणार ना? असं सगळच्या सगळं डीएनए कसे मॅच होईल.. नक्की असते काय हे डीएनए कोणी सांगेल का?

Katha vachun saglyache pratisad vachale ani Katha visarlech.... Chan ahe story

मला नाही कळालं काही Sad क्या मै अकेली हुं इस कॅटेगरीमे? )
दोघांपैकी कुठलाही त्याचा नसला तरी काय फरक पडणारेय Uhoh चिटिंग तो हो गयी ना!!!

फनी काये यात?

ही वीज जेव्हा मुलांवर कोसळते तेव्हा फार वाईट परिस्थिती होते त्यांची, मानसीक विकार होण्या पर्यंत.

haha...
In a light mood; Shirish Kanekar yanchya Fillambaji cha ek part athavla.. Aplya don mulapaiki ek tumch nahi DDDDHHHHHAAAANNNNNN!!!!!!!!!!!!

ही कल्पना १०० शब्दांत मांडायचं आव्हान होतं.<<
>> हे आव्हान आपण पूर्ण केलंत .. कथाही आशयपूर्ण आहे..पण रिया म्हणतात तसा बोध मलाही झाला नाही. नेमकं काय?? हा प्रश्न पाडलाय.