Submitted by नानाकळा on 10 November, 2017 - 13:36
ती आत शेवटच्या घटका मोजत होती. मृत्यू कणाकणाने जवळ येत होता.
हा बाहेर दोन गोजिर्या पोरांना कसलीशी गोष्ट सांगत होता.
'...ह्यांना आपल्याला एकट्याने सांभाळायचंय, आपण कुठेच कमी पडू नये...'
याच विचारात असतांना नर्सने आत बोलावले.
आत डॉक्टर बोलले, "त्यांना त्रास नको व्हायला..."
तो शेजारी बसला, हात हातात घेतला. तिने उठण्याचा प्रयत्न करताच त्याने बजावले, हालचाल नको.
तेवढेही श्रम झेपले नाहीत. रया अजून बिघडली.
क्षणाक्षणाला चेहरा फिकटतोय. प्राण एकवटून बोलली, '' मला.... तुला.. सांगायचंय... "
“शांत राहा, बोलू नकोस”.
शब्द बुडबुड्यासारखे फुटलेच, "... आपल्या दोन मुलांपैकी.... एक.... तुझं नाही."
जणू वीज कोसळली,
"कोण...? कोणता मुलगा माझा नाही...?"
तिला गदागदा हलवत तो विचारत राहीला,
पण...
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारी
भारी
ऑन ए सिरीअस नोट
ऑन ए सिरीअस नोट
डीएनए टेस्टमध्ये समजते ना हल्ली..
ऑन ए सिरीअस नोट
ऑन ए सिरीअस नोट
डीएनए टेस्टमध्ये समजते ना हल्ली..
जुनी कल्पना आहे हो, कदाचित
जुनी कल्पना आहे हो, कदाचित शंभर वर्ष जुनी असेल. ह्या कल्पनेवर बर्याच कथा-चित्रपट बनलेत. ही कल्पना १०० शब्दांत मांडायचं आव्हान होतं.
भारीये.. "कोण...? कोणता मुलगा
भारीये..
"कोण...? कोणता मुलगा माझा नाही...?" >>>
१०० वर्ष्या पुर्वी "तुझं" कोण
१०० वर्ष्या पुर्वी "तुझं" कोण म्हणनार नवर्याला?
भारी आहे डार्क कॉमेडी!
भारी आहे डार्क कॉमेडी!
अरेरे!
अरेरे!
भारी
भारी
गोष्ट आजचीच आहे, कल्पना जुनी
गोष्ट आजचीच आहे, कल्पना जुनी आहे. मी 2 मराठी चित्रपट पाहिलेत या कल्पनेवर.
गोष्ट आजची असल्याने नायक आता जरी उध्वस्त झाला तरी नंतर करेल डीएनए टेस्ट.
काय लोक तुम्ही.... डिएनए
काय लोक तुम्ही.... डिएनए टेस्ट हा काय मुद्दा आहे का?
"कोण....?" हे शिर्षक काय सुचवतं....? जरा डिपमंदी जावा ना....
"कोण....?" हे शिर्षक काय
"कोण....?" हे शिर्षक काय सुचवतं....???????? ते कळलं ओ नाना.
अरे ती गेल्यावर आता तो कोण
अरे ती गेल्यावर आता तो कोण शोधून काय फायदा. आता आपला कोणता हेच शोधण्यात त्याला ईंटरेस्ट असेल.
आता बिचार्याला स्मरणशक्तीला
आता बिचार्याला स्मरणशक्तीला ताण द्यावा लागेल DNA नको असेल तर.
डीएनए टेस्टमध्ये समजते ना
डीएनए टेस्टमध्ये समजते ना हल्ली..>>>
समजा कलप्रिट नायकाचा सकखा भाऊ असेल तर?
समजा कलप्रिट नायकाचा सकखा भाऊ
समजा कलप्रिट नायकाचा सकखा भाऊ असेल तर?
>>>>
आमच्या शाळेत डीएनए वगैरे शिकवले नाही. पण दोन भावांच्या डीएनएमध्येही फरक असणार ना? असं सगळच्या सगळं डीएनए कसे मॅच होईल.. नक्की असते काय हे डीएनए कोणी सांगेल का?
Deoxyribonucleic acid
Deoxyribonucleic acid
छान आहे कथा. कोण, कोणता, बरेच
छान आहे कथा. कोण, कोणता, बरेच प्रश्न!
Katha vachun saglyache
Katha vachun saglyache pratisad vachale ani Katha visarlech.... Chan ahe story
मला नाही कळालं काही क्या मै
मला नाही कळालं काही क्या मै अकेली हुं इस कॅटेगरीमे? )
दोघांपैकी कुठलाही त्याचा नसला तरी काय फरक पडणारेय चिटिंग तो हो गयी ना!!!
फनी काये यात?
रिया... यु आर अॅब्सोल्युटली
रिया... यु आर अॅब्सोल्युटली राईट....
ही वीज जेव्हा मुलांवर कोसळते
ही वीज जेव्हा मुलांवर कोसळते तेव्हा फार वाईट परिस्थिती होते त्यांची, मानसीक विकार होण्या पर्यंत.
haha...
haha...
In a light mood; Shirish Kanekar yanchya Fillambaji cha ek part athavla.. Aplya don mulapaiki ek tumch nahi DDDDHHHHHAAAANNNNNN!!!!!!!!!!!!
छान कथा
छान कथा
ही कल्पना १०० शब्दांत
ही कल्पना १०० शब्दांत मांडायचं आव्हान होतं.<<
>> हे आव्हान आपण पूर्ण केलंत .. कथाही आशयपूर्ण आहे..पण रिया म्हणतात तसा बोध मलाही झाला नाही. नेमकं काय?? हा प्रश्न पाडलाय.
अरेरे! बिच्चारा
अरेरे!
बिच्चारा
पडछाया आणि कलावंतीण असे दोन
पडछाया आणि कलावंतीण असे दोन चित्रपट पाहीलेत याच कथानकावरचे.
मस्त!
मस्त!
तिला मरताना कशाला मरायला अशी
तिला मरताना कशाला मरायला अशी कबुली द्यायची होती... शांतपणे मरावं ना