पॅन कार्ड असतांना आधार कार्ड ची गरज काय? गवर्मेंटनी बऱ्याच ठिकाणी आधार कार्ड मॅनडेटरी केले आहे, ते का?
त्याचा मागचा उद्देश्य काय आहे?
मुळात ही कल्पना/आईडिया कांग्रेस गवर्मेंट च्या वेळेस मांडल्या गेली होती हे खरे आहे का? त्या पाठीमागे काय हेतु होता - एकजे समजले ते म्हणजे, भारतातील प्रत्येक माणसाची माहिती ट्रेक करता आली पाहिजे, एकाच प्रकारच्या id कार्ड ने इंस्टेड ऑफ यूसिंग डिफ्फरंट कार्ड्स. हेड काउंट काढता आला पाहिजे. ह्याचा उपयोग बऱ्याच सर्वे मध्ये होउ शकतो, बऱ्याच स्कीम्स ह्याच्याशी लिंक केल्याने त्याचे बेटर ट्रेैकिंग होउ शकते जे पॅन कार्ड नी पॉसिबल नाही. आधार कार्ड मध्ये हाताचे ठसे आणि डोळ्याची स्कैन्ड इमेज रेकार्डेड असल्या मुळे ते फेक करणे अवघड आहे (पॅन कार्ड पेक्षा) हे खरे आहे का?
पण आधार कार्डशी रिलेटेड सिक्यूरिटी थ्रेट मुळे कांग्रेसनी हे इम्पलीमेंट केले नाही, हे खरे आहे का?
तसे असेल तर ह्याने जे फायदे होणार आहेत त्यासाठी आधार कार्डला दूसरे सबस्टीट्यूट काय, ह्यवर कांग्रेस गवर्मेंटच्या वेळेस चर्चा झाली होती का? त्याचे काय आउटकम निघाले? व्हॉट कुडबी सबस्टीट्यूट फॉर आधार कार्ड व्हिच केन अवॉइड इट्स ड्रॉबेक्स बट स्टील एबल टू अचीव इट्स बेनिफिट्स?
मला जास्त माहिती नाहीये, म्हणून विचारते आहे?
Bharat bas ki kiti dagadavar
Bharat bas ki kiti dagadavar doke aaptalay futel te take care
Till PM asked for voluntary
Till PM asked for voluntary waiving the LPG subsidy, even I was availing it. The primary reason I applied for adhar because it was published in newspapers that unless adhar is updated; LPG subsidy would be withdrawn and gas refill would be at market rate. I didn't want to lose out on one benefit I was getting from Government.
Later Government changed and new PM asked for gas subsidy waiver.
भरत. ओव्हरसिम्प्लिफिकेशन इज
भरत. ओव्हरसिम्प्लिफिकेशन इज परफेक्ट वर्ड.
एक जीवंत उदाहरण, सेंद्रिय शेतीऔषधांवर गेल्या महिन्याभरापासून बंदी लादलेली आहे मायबाप सरकारने. लायसन्सधारक दुकानदारांना मनाई करण्यात आली आहे. सेंद्रिय औषधांच्याबाबत गेल्या कैक वर्षापासून प्रमाणीकरणाची मागणी असून ते केले गेले जात नाहीये. सेंद्रीय च्या नावाखाली रासायनिक औषधे मिक्स करुन काही औषधनिर्माते शेतकर्यांना फसवतात. त्यामुळे रासायनिक औषधांच्या निर्मात्यांचा धंदा बसतो. ते ह्या सेंद्रियवाल्यांवर खार खातात. कारण चांगली प्रामाणिक सेंद्रिय औषधे जास्त महाग आहेत, तरीही धंदा ओढून नेतायत. मग रासायनिक वाले राजकिय पार्टीला पैसे चारुन काहीतरी शासकिय निर्णय घेउन बंदी आणवतात, मग बंदी आल्यावर सेंद्रीय वाले पैसे चारुन ती बंदी मागे घ्यायला लावतात. दुकानदार मधल्यामध्ये पिचले जातात, शासकीय अधिकार्यांचे एक पाहणी पथक -कम - वसुली पथक तपासणीवर निघतं प्रत्येक दुकानदाराकडुन चार पाच हजार (मिनिमम) उकळले जातात. औषधे विकू देत नाहीत, वरुन पैसेही उकळतात. शेतकर्यांना औषधे ब्लॅकने जास्त किंमत देऊन विकत घ्यायला लागतात कारण त्याच्याकडे पर्यायच नसतो, उभे पीक असेच सोडता येत नसते. मग दुकानदार संघटना काही पैसे चारायचे ते चारुन निर्णय शिथिल करवतात. अशा पद्धतीने सगळं चालतंय. यातल्या प्रत्येक घटकाला शिव्या घातल्या जात असतांना आपण नेहमीच बघतो. पण प्रत्येकाची स्वतःची स्थिती स्वच्छ काळीपांढरी अशी कधीच नसते.
२०१५-१६ मध्ये याचा प्रत्यक्ष नजारा बघितलाय. तेव्हा एका सेंद्रीय औषध बनवणार्या कंपनीसोबत काम करत होतो, पुण्याच्या सर्वशक्तिमान कृषीभवनापासून ते खेडोपाडीच्या छोट्यामोठ्या दुकानदारांपर्यंत, बिगशॉट औषध निर्मात्यांपासून सामान्य शेतकर्यांपर्यंत प्रत्यक्ष स्वतः जाऊन बघितलंय. तेव्हा कोणत्याही घटनेचे कोणीही ओवरसिम्प्लिफिकेशन करतं तेव्हा मौज वाटते.
बरं , राजसी आणि दुहेरी,
बरं , राजसी आणि दुहेरी,
परत एकदा सांगतोय,
योजनांचे फायदे मिळवण्या साठी आधार लिंक करायला कोणाचीच हरकत नाही, पण अंधाधुंद ठिकाणी आधार लिंक करायला ओंबजेक्शन आहे,
आणि आपली डिजिटल सिक्युरिटी कमी पडते आहे याची स्पष्ट कल्पना आली असताना , सगळी कडे आधार देण्याची सक्ती करणे याला विरोध आहे.
सरकरी योजनांचा लाभ मिळायला एलिजीबल लोकांना केवळ आधार नाही म्हणून लाभ नाकारणे याला विरोध आहे,
आधार नसल्याने कोणीतरी भुकेने मरते हे नृशन्स आहे.
कल्पना करा, दुकानात तांदूळ आहे, ती व्यक्ती तो मिळवण्यासाठी पात्र आहे, मात्र एक कार्ड नाही ,म्हणून तिची मुलगी डोळ्या देखत अन्न मागत प्राण सोडते.
एअर तिकीट बुक करण्यासाठी आधार का हो मागत असतील?
मी काही डॉक्टर्स चा एक कॅम्प एअरपोर्ट वर अरेंज करायच्या मागे आहे, तिकडे फक्त आणि फक्त आधार कार्ड मागत आहेत ka?
बाकी, सगळ्या ठिकाणी आणि सगळ्यांना आधार अनिवार्य करायलाच हवे या बाबत तुमचे मत नक्की झाले असेल तर ठीक आहे,
लेट्स agree to disagree.
बापरे इतके प्रतिसाद! आणि
बापरे इतके प्रतिसाद! आणि डीसक्शन भलती कडे वळले!
नाना- मला शब्दात आणि वाक्यात पकडू नका हो, 70 टक्के ही एक्साक्ट फिगर नाही पण मला काय म्हणायचं आहे ते समजून घ्या.
US, UK सारख्या देशांमध्ये जितके लोक टॅक्स भरतात किंवा इंदायरेक्ट टॅक्स भरतात त्या मानाने आपल्या कडे कमी.
आणि भरत असले तरी ते टॅप करायला , रेकॉर्ड करायला जर आत्ता पेक्षा बरी सिस्टिम मिळत असेल तर काय हरकत आहे.
भरत - आपण demonetization आणि आधार, GST च्या आयडियेला एक समान मानू शकत नाही.
आधार ची आयडिया इन प्रिंसिल्प वेलफेर स्कीम साठी ही तीच होती.
काही ideas मुळात भंकस असतात काही आयडिया नीट अमलात आणल्या तर बरच काही सध्य होऊ शकते, नाही तर बसा जैसे थे!
--------------------------------------------------------------
भाजप सरकारच्या हेतू विषयी शंका म्हणजे एक तर हे नीट अमलात आणणार नाही , व्यवस्थित स्टेप बाय स्टेप. लोकांना त्याचा त्रास न होऊ देता नीट मॉनिटर करून लागू करणार नाही. दुसरे म्हणजे एकदा आधार अकाउंटशी लिंक झाले की बेनामी अकाउंट्स बाहेर येतील जसे वेलफेर स्कीम मध्ये, कुणाची किती संपत्ती आहे आणि टॅक्स रिटर्न मध्ये ती दाखवली की नाही अश्या गोष्टी बाहेर येतील. ह्या सगळ्यांना समान वागणूक लागू झाली पाहिजे. X बीजीनेस मॅनची प्रॉपर्टी किंवा अकाउंट मध्ये पैसे आहेत आणि त्याने टॅक्स भरला नाही पण त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.म्हणून सरकार चांगलं हवं.
पण ह्या सोबत हे ही अरगुमेन्ट की मोठे बीजीसनेस मेन टॅक्स भरत नाही, प्रॉपर्टी लपवतात आणि त्यांचे तुम्ही खपवता तर तोस्तोवर आमचेही खपवा.हे अरगुमेन्ट पटत नाही.
अमलात आणणारी माणसं आहेत तेव्हा corruption होणार/राहीलच (ते तसे इतर देशांच्या गवर्मेंट सिस्टिम मध्येही राहतेच त्यात हा भारत)
पण तुमचे सगळे व्यवहार चोख असतील तर कुठलीही गवेर्मेंट असली तरी आधार नीट अमलात आणले तर आधार मुळे त्रास होणे नाही. फार तर पोटात दुखत राहील इतर खातात ते चालत मला मात्र सगळं भरायचं (आणि हे वाटणे चूक नाही)
पण चांगली सिस्टिम आणून ह्याचे प्रमाण कमी करता येइल. (आता परत सिस्टिम चांगली आहे की नाही ह्यावर वाद नको कारण हे डिस्कशन आधी झालय) निदान मनात भीती राहील की प्रणाली जास्त चांगली असल्या मुळे हे ट्रेस होण्याचे चान्सेस जास्त आणि हे कायम स्वरूपी राहील demonetisation सारखे नाही.
पूर्ण सरकारी bureacracy,रिटेल बीजीनेस, इतर किती तरी बीजीनेस मध्ये जे पैश्यांचे व्यवहार राज रोष चालतात आणि सामान्य/गरीब लोकांना पैसे डिमांड केले जातात कारण लपवायला जागा आहे.पैसे खाऊन बेनामी अकाउंट किंवा भाचा, आत्या चे अकाउंट काढून तिथे ठेवणे,
बेनामी अकाउंट उघडून किंवा नसलेली माणसं दाखवून ते पैसे खाणे (जसे वेलफेर स्कीम मध्ये ही शक्य) बऱ्याच प्रमाणात आळा बसेल आणि हे at source असेल. शिवाय लोकांनी काळा पैसा घरी आणला तरी तो कुठे तरी वापरतील साधारण प्रॉपर्टी घ्यायला, सोने घ्यायला - जे सहज शक्य आहेत असे बीजीनेस चे व्यवहार आधारशी जोडले आणि बँक थ्रू केले (आत्ता नाही काही वर्षांनी स्टेप बाय स्टेप ह्यात घाई करून चालणार नाही) तर खूप फायदा होईल.
भाजप मुळे ह्या सगळ्या गोष्टीं कडे पाहण्याचा दृष्टिकोनच (नेगेटिव्ह) बदलून गेला आहे, हे नक्की.
असो मी आता थांबते , मला जे सांगायचे ते सांगून झाले
>>>>भाजप सरकारच्या हेतू विषयी
>>>>भाजप सरकारच्या हेतू विषयी शंका म्हणजे एक तर हे नीट अमलात आणणार नाही , व्यवस्थित स्टेप बाय स्टेप. लोकांना त्याचा त्रास न होऊ देता नीट मॉनिटर करून लागू करणार नाही>>>
अच्छा म्हणजे फक्त एक्झक्युशन मध्ये प्रॉब्लेम होतील एवढाच संशय आहे, पाळत ठेवली जाईल वगैरे काही संशय नाहीये तर...
>>>>दा आधार अकाउंटशी लिंक झाले की बेनामी अकाउंट्स बाहेर येतील जसे वेलफेर स्कीम मध्ये, >>>
हे विधान तुम्ही किती जबाबदारीने करताय ते माहीत नाही, पण आत्ता या क्षणी देशात किमान 15-18 करोड अकाऊंट्स असे आहेत (जनधन चे टोटल 30 करोड अकाऊंट्स त्यातले फक्त 50% धरलेत, जास्त असू शकतील), जे जाणूनबुजून आधार शिवायच नाही तर KyC शिवायही काढले गेले आहेत, आणि त्याला आधार लिंक करण्याबाबत सरकार आग्रही नाही. Kyc व्हेरिफाय करायचे म्हणले तरी शक्य नाही.
या लूप भागदाडामुळे सरकार या बाबतीत सेरीअसं आहे असे वाटत नाही,
आधार जर आर्थिक बाबींसाठी वापरले जाणार आहे तर PaN दिसकॉन्टिन्यू का करू नये?
मोबाईल फोन, शाळेत/कॉलेजात ऍडमिशन आणि इतर गोष्टी आर्थिक बाबतीत येतात का?
सिम्बा,
सिम्बा,
>>>
योजनांचे फायदे मिळवण्या साठी आधार लिंक करायला कोणाचीच हरकत नाही, पण अंधाधुंद ठिकाणी आधार लिंक करायला ओंबजेक्शन आहे,
>>
अंदाधुंद ठिकाणी नाहीच म्हणत आहे मी. वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळी कार्ड आहेतच कि त्याच्या ऐवजी एक कार्ड आणा म्हणजे क्रॉस काय नॉर्मल connections ही कळतील.त्याने manage उत्तम करता येईल.
भाजप सारखं हागल्या मुतल्या ला जोडा असे म्हणते आहे, असं म्हणत नाही मी पण नीट विचार कळून काही ठिकाणी स्टेप बाय स्टेप जोडा म्हणजे एक संध माहिती मिळेल.
>>>आणि आपली डिजिटल सिक्युरिटी कमी पडते आहे याची स्पष्ट कल्पना आली असताना , सगळी कडे आधार देण्याची सक्ती करणे याला विरोध आहे.>>>
ती नेहेमीच कमी पडत राहील. आत्ता पूर्ण डिजिटल नाही तरीही कमीच पडते आहे. नॉन डिजिटल वर्ल्ड मध्ये पेपर ,सही सिस्टिम मध्येही घपले चालूच होते.
डिजिटल नी उद्या धोके संभावतील म्हणून जग डिजिटल कडे वळायचे थांबले का?नाही
त्यात आधाराने सगळे लिंक करणे म्हणजे सर्व माहिती मिळेल, ट्रॅक करता येईल ही एक गोष्ट आहे , तसे केले नाही तरी वेगवेगळी कार्ड आहेतच पॅन, राशन, पासपोर्ट त्यांनी माहिती मिळेलच फक्त वेळ लागेल.
दुसरं आधार ऑथेंटिकेशन ने पैसे काढणे, ह्यात 2 स्टेप ऑथेंटिकेशन वापरावे आणि आधार ऑथेंटिकेशन नी पैसे काढण्याचा हा भाग ऑप्शनल ठेवावा, मला ते सेफ वाटले नाहीतर मी डेबिट कार्ड ने पैसे काढेन. जोस्तोवर RBI च्या NEFT इतका अधारच्या ऑथेंटिकेशन चा विश्वास वाटत नाही तो पर्यंत.त्यातला ऑथेंटिकेशन चा भागाचे सूत्र UADAI पेक्षा RBI नी सूत्र हातात घेऊन , RBI च्या NEFT प्रमाणे चालवले तर जास्ती बरं.
कुठलीच डिजिटल सिस्टिम ही फुल प्रूफ नसते- काही दिवस आधी क्रेडिट डेबिट कार्ड ला बाहेर दुकानात खरेदी करताना पिन लागायचे नाही आता ते लागते.
>>>सरकरी योजनांचा लाभ मिळायला एलिजीबल लोकांना केवळ आधार नाही म्हणून लाभ नाकारणे याला विरोध आहे,
आधार नसल्याने कोणीतरी भुकेने मरते हे नृशन्स आहे.>>
ह्याला माझा ही विरोध आहे, हा प्रॉब्लेम टेम्पोरारी कार्ड देऊन पुरेसा अवधी देऊन solve करता येईल.
>>>एअर तिकीट बुक करण्यासाठी आधार का हो मागत असतील?>>
तिथे पॅन कार्ड मागतातच ना,ते आपण दाखवतोच ना मग आधार दाखवायला काय प्रॉब्लेम आहे.
तरिही हे अमलात आणण्याची घाई करू नये.हे भाजप नी एखाद वर्षांनी करावे म्हणजे लोकांचा विश्वास बसेल तसे हळू हळू.
>>लेट्स agree to disagree.>>
ओके, जर नीट स्टेप बाय स्टेप अमलात आणले आणि अमलात आणण्याची पद्धत नीट मॉनिटर केली, आधार ठेफ्ट ची पोलिसी आणली आणि नीट राबवली (UPA सरकार घ्या हवं तर) तर हे अमलात आणण्यास माझी हरकत नाही.सो ह्या बाबतीत लेट्स agree to disagree.भाजप ला अजून हे नीट पणे हाताळण्याचा स्कॉप आहे हे मान्य.
LPg subsidy in aadhar linked
LPg subsidy in aadhar linked bank account was introduced districtwise , giving sufficient time. Not all over india at once. That scheme was also scrapped as per order of supreme court.
Modi govt first asked for people to give up, but later started asking to give income declaration and now the subsidy is as good as scrapped for everybody.
We have been using piped gas for over 10 years now, so never faced the dilemma.
Did those people who got the subsidy credited to their bank accounts, pay income tax on it?
I didn't want to lose out on
I didn't want to lose out on one benefit I was getting from Government.
>> राजसी, तुम्ही असं म्हणताय का की तुम्हाला सरकारकडून 'एकमेव लाभ' मिळत होता तो का सोडा?
तुमच्या रेकमेनदेशन्स छानच
तुमच्या रेकमेनदेशन्स छानच आहेत,
पण या सूचना त्यांना आर्थिक सल्लागार, नीती आयोग, याहून कोणी कोणी दिल्या नसतील असे तुम्हाला वाटते का? यातल्या काही सूचना तरी आधार लागू करतानाच राबवता आल्या असत्या, त्या राबवल्या नाहीत म्हणून सरकार ला दोष दिला तर चूक आहे का?
या सुधारणा अमलात आणल्या तर आधार sys चांगली आहे, असे म्हणून आज ज्या प्रकारे sys राबवली जातेय तिला सपोर्ट करावा का? की आज मूर्खपणा चालू आहे तो निदर्शनास आणत रहावा?
डिजिटल सिक्युरिटी कमी पडत राहील, पण आज 100 घपले होतात ते 10 होतील, तेव्हा आधी सिक्युरिटी स्ट्रॉंग करा, मग लोकांचा सेन्सेटीव्ह डेटा आधार ला जोडा.
BTW, एअरपोर्ट ला आत जाताना id प्रूफ दाखवणे म्हणजे मी तोच माणूस आहे हे सांगणे असते,
तिकीट बुक करताना आधार नम्बर मागणे वेगळे असते.(अजून मागत नाहीयेत पण बातम्या येत आहेत)
तंबूत उंट शिरतो व नंतर तो
तंबूत उंट शिरतो व नंतर तो तंबू व्यापून मालकालाच बाहेर काढतो असे आधार चे झाले आहे. केवळ बेनिफिट साठी म्हणून आलेले हे कार्ड आता अक्षरशः जिथे तिथे मागितले जातेय. भारतात अमेरिकेतून साधी चॉकोलेट्स पाठवायची तरी नव्या नियमानउसार ज्याला ती पाठवली त्याचे आधार कार्ड / पॅन कार्ड/ पासपोर्ट मस्ट आहे. मायबोलेवरील अकाउंट आधार ला लिंक करायचे फर्मान निघाले की मग सर्व्हेलन्स स्टेट पूर्ण होईल.
सिम्बा,
सिम्बा,
मी सुरवातीलाच म्हणाले की भाजप आधारला नीट अमलात आणत नाही त्याला माझा विरोधच आहे.
माझे म्हणणे एवढेच आहे की ह्यासाठी आधारला बेनेफिट स्कीम आणि पॅन कार्ड अकाउंटशी जोडणे ह्या आयडियात घोळ आहे असे म्हणू नये. मुळात ही चांगली असेल आणि ती नीट अमलात आणली तर फायदेशिर असेल तर उद्या UPA सरकारने आल्यावर ही तशीच ठेवावी. रोलबॅक करू नये. निदान बेनेफिट स्कीम आणि अकाउंट लिंकिंग साठी तरी.बाकी भाजप हागल्या मुतल्या गोष्टीं साठी लिंक करते आहे ते काढावे.
तिकीट बुक करताना आधार ह्या साठी मागावे की तुमच्या ट्रिप्स ची माहिती काढता येईल. तुम्ही ह्या साठी वापरणारा पैसा white असला तरी बरेच लोक काळे पैसे वापरून ट्रीप बुक करतात. हा लालूच देण्याचा एक प्रकार झालाय, तू माझी अमुक अमुक गोष्ट दुर्लक्ष कर मी तुझी ही ही मोठी ट्रिपचा खर्च करतो काळ्या पैस्याने.
डिजिटल सिक्युरिटी आधी स्ट्रॉंग करा मग हे करा हे कारण वेल्फेर स्कीम ला ही लागू होते, तेच धोके तिथेही आहेत. आणि डिजिटल security स्ट्रॉंग करा हे खूप ओपन एनडेड स्टेटमेंट आहे.
आपण डिजिटल कडे वळलो आणि online transactions करू लागलो,online अँप्स वापरू लागलो, तेंव्हा काय डिजिटल स्ट्रॉंग होतं का? आज कितीतरी गोष्टी भारतात अश्या होतात ज्यात आपण स्ट्रॉंग नाही, बेताचे आहोत, पण सुरु झाल्यावर competancy निर्माण झाली. ह्या गोष्टी कॉडिपेंडंट आहेत. माझ्या मते आता आधार साठी ते तितके स्ट्रॉंग आहे जर ते नीट अमलात आणले तर, सो UPA निवडून आली तर त्यांनी हे रोलबॅक करू नये
डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड च्या बाहेरच्या खरेदी साठी पिन वापरावी हे ह्यांना कार्ड काढल्या नंतर किती तरी दिवसांनी सुचलं म्हणून तो पर्यंत कार्ड काढलच नाही असे झाले का?
............................................................................
बाकी भाजप ला विरोध करायचा नाही का? तर करायचा ते नीट न अमलात आणण्यासाठी, आणि पुढे ते त्यांनी सुधारावे ह्या साठी.
UPA सरकार निवडून आले तर आधार रोलबॅक करेल असे वाटत नाही, किंवा फक्त वेलफेर स्कीम साठी वापरतील असेही वाटत नाही.आत्ता भाजप नी जे केले आहे तेच नीट चालवतील.
आपण सध्या तरी आधार बद्दल जास्तीच जास्त माहिती मिळवून ह्यातले खाच खळगे लक्षात घेऊन, एक नागरिक म्हणून जागरूक राहू शकतो आणि जसे जमेल तसे ज्या काळज्या घ्यायच्या त्या घेऊ शकतो.
.{ हा लालूच देण्याचा एक
.{ हा लालूच देण्याचा एक प्रकार झालाय, तू माझी अमुक अमुक गोष्ट दुर्लक्ष कर मी तुझी ही ही मोठी ट्रिपचा खर्च करतो काळ्या पैस्याने.}
तलाच महणायचंय ना?
नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार कमी झाला( असला तर) त्यावरचा हा उतारा .
भरत,
भरत,
Demon ही idea मध्ये नुकसान जास्त होते. लोकांची नौकरी जाण्याचे ज्यांचे रोजगार daily wages वर असते.आणि ते पर्मनंट सोल्युशन नव्हते कारण ते at source नव्हते, नवीन पैस्या सोबत परत सगळे धंदे सुरु झाले असते.
त्यात भाजप सरकारने हातात हवी तेवढी नवीन करन्सी नसताना हे लाँच केले, त्या मुळे आणखीन त्रास झाला.
पण आधार चे तसे नाही त्यात कुणाची नौकरी, रोजी रोटी जाण्याची भीती नाही.शिवाय ते at source आहे.
ते जर नीट अमलात आणले तर ते फायद्याचे जास्त राहील.
रघुराम राजन ह्यांनी सुद्धा आधार लिंकिंग चे स्वागत केले आहे जे स्वतः demonetisation च्या विरोधात होते.
त्यांचे म्हणणे:-
With an UIDAI number, a person will be able to open a bank account as it will work as an identification document and will help in easier access to loans, he added.
“UID will ensure that people will not get multiple loans from different places. We can make sure that it does not happen. This is an example on how we can make more lending possible,” said Dr. Rajan.
http://m.indiatoday.in/story/raghuram-rajan-backs-aadhaar-seeks-more-cla...
https://www.google.co.in/amp/s/www.ndtv.com/india-news/watch-live-former...
माझी वरची कमेंट आधार नव्हे तर
माझी वरची कमेंट आधार नव्हे तर नोटाबंदीसंबंधाने होती.
{पण आधार चे तसे नाही त्यात कुणाची नौकरी, रोजी रोटी जाण्याची भीती नाही.शिवाय ते at source आहे.
ते जर नीट अमलात आणले तर ते फायद्याचे जास्त राहील.}
रेशन, पेन्शन न मिळाल्याने जीव गेले की बोलूया याबददल.
सरकारला आणि समर्रथकांना फरक पडणार नाही हेही नोटाबंदीत दिसलंच
जितेण्द्र आव्हाडांनी भारी
जितेण्द्र आव्हाडांनी भारी लिहिलंय आधारच्या सक्तीबद्दल, मला पोस्ट सापडली नाही, नाहीतर इथे टाकली असती. त्यांच्या मते आधार हे नागरिकांच्या अस्तित्वाचा आधार झाले तर उद्या सरकार विरोधात आवाज उठवणार्या कोणाचेही आयुष्य एक मिनिटात उद्ध्वस्त करता येऊ शकते. सरकार कडे अस्लेला आधार क्रमांक डिक्वालिफाय केला की आधारशी जोडलेल्या सर्व खात्यांचे, मोबाइलचे, सर्व सुविधांचे अॅक्सेस एका फटक्यात बंद करता येईल. किंवा हीच भीती दाखवून जनतेला आपल्या पायाखाली दाबून ठेवता येईल. परत याची सूत्रं एकाच संस्थेकडे असणे म्हणजे सर्व अॅटमबॉम्ब चे बटण एकाच व्यक्तीच्या हातात असण्यासारखे आहे. उद्या भाजप किंवा कोणीही पक्ष सत्तेवर आला की त्याच्या हातात हे अमोघ अस्त्र येणार आहेच.
जितेण्द्र आव्हाडांनी भारी
जितेण्द्र आव्हाडांनी भारी लिहिलंय आधारच्या सक्तीबद्दल, मला पोस्ट सापडली नाही, नाहीतर इथे टाकली असती.
>>>
आपल्या दैनंदिन जीवनातली प्रत्येक गोष्ट आधार कार्डाशी जोडण्याचा भाजपा सरकारचा अट्टाहास कशासाठी, हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते आता लक्षात घेतलं नाही तर केवळ मोदीविरोधक नाही तर मोदीभक्तही लवकरच भरडले जाणार आहेत.
आणिबाणीच्या काळात लालकृष्ण अडवाणी, जाॅर्ज फर्नांडिस असे नेते भूमिगत झाले होते. वेश, नावं बदलून ते भारतभर फिरत होते. इंदिराजींच्या विरोधात वातावरण तापवत होते. अशा अनेक नेत्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि अखेर इंदिरा गांधी यांची सत्ता गेली.
आज हे शक्य नाही. सरकारने संगणकावरचं फक्त एक बटण दाबून तुमचं आधार कार्ड "अपात्र" केलं की तुमचं अस्तित्वच संपलं. तुमचं बॅंक खातं, क्रेडिट कार्ड, वाहन परवाना, रेशन कार्ड, फोन, पासपोर्ट सगळंच गोठलं. रेल्वेचं तिकीट, विमानाचा बोर्डिंग पास याच्याशीही आधार कार्ड लिंक होणार आहे. तुम्ही नावगाव बदलून नवा अवतारही धारण करू शकणार नाही कारण तुमचे बायोमेट्रिक्स (डोळ्यांचा काॅर्निया, बोटांचे ठसे) हेही सरकारकडे आहेत. जे तुम्ही कधीच बदलू शकणार नाही. थोडक्यात, हे जिवंतपणी आलेलं मरण असेल.
आणखी वेगळ्या शब्दात सांगायचं तर तुमच्या आयुष्यात काहीही खाजगी राहणार नाही. तुमची प्रत्येक गोष्ट सरकारला माहित असेल आणि त्याहून भयंकर म्हणजे त्या प्रत्येक गोष्टीवर सरकारचं नियंत्रण असेल. हुकूमशाही यापेक्षा वेगळी काय असते?
मोदीभक्तांनी जरा असा विचार करावा की पुढचं सरकार समजा काँग्रेसचं आलं. राहुल गांधींवर जराशीही टीका केलीत. तर तुमची काय वाताहत करण्याचे "कायदेशीर" अधिकार, तुमच्या महान मोदींनी त्यांना देऊन ठेवलेले असतील. सुजाणपणे विचार करा. असं राक्षसी शस्त्र मोदीच काय, कुठल्याही नेत्याच्या हातात देता कामा नये. तुमचा जर समज असेल की ते फक्त आम्हालाच मारतील तर तो चूक आहे. नेल्सन मंडेला म्हणाले होते; एकदा का एखाद्याच्या हाती बंदूक दिली की, ती तो कोणावर रोखेल हे सांगता येत नाही. कारण आता तो त्याचा निर्णय असतो!
डाॅ. जितेंद्र आव्हाड
धन्यवाद सोनुतै
धन्यवाद सोनुतै
1) आधार मध्ये दोन भाग आहे,
1) आधार मध्ये दोन भाग आहे, आधार नंबर सगळ्या स्कीमशी जोडणे आणि त्यामुळे माहिती मिळणे हा एक भाग
2)
आणि दुसरा फक्त आधार ऑथेंटिकेशन थ्रू पैसे काढता येणे किंवा स्कीम चा बेनेफिट घेता येणे.
सध्या मला बँकेत आधार नंबर द्यायला लागला आहे लिंकिंग साठी पण पैसे काढताना किंवा transaction करताना माझ्या कडे आधार ऑथेंटिकेशन न वापरता ते करण्याची मुभा आहे.
पण उद्या जर असे झाले की फक्त आधार ऑथेंटिकेशन झाले तरच मला बँक मधून, PF मधून पैसे काढता येतील तर असल्या वेळेस माझे आधार कार्ड disable केले तर प्रॉब्लेम होईल.त्या मुळे हे तुमचे म्हणणे मान्य.
पण UIDAI ही स्वतंत्र statutory body असल्यामुळे आणि कोणत्या केसेस मध्ये हे असे होऊ शकते हे आधार ऍक्ट मध्ये नमूद केलेले असल्यामुळे ते 'अमुक एक सरकार ला विरोध करत आहे म्हणून आधार disable करा असे होईल असे वाटत नाही'
हा मुद्दा सुप्रीम कोर्टात मांडला असताना, UIDAI च्या माणसाने हे सांगितले की UIDAI ही एक statutory independent body आहे, तेव्हा कार्ड deactivate/disable करणे हे UIDAI च्या अंतर्गत येते. तसेच कुठलाही सर्व्हेलन्स चा डेटा त्यांनी गवर्मेंटला देण्यासाठी कोर्टची एक्सप्रेस ऑर्डर लागेल असे त्या ऍक्ट मध्ये म्हंटले आहे.आणि हे आधार ऍक्ट UPA च्या अंतर्गत आणखीन refine होऊ शकतो.
RBI ही इंडिपेंडंट बॉडी आहे ज्यात goverment directly हस्तक्षेप करू शकत नाही तसेच UIDAI.
पण असे सगळे त्या ऍक्ट मध्ये असले तरीही ते असेच पाळल्या जाईल अशी काहीही gurantee नाही.
तो तुम्ही म्हणत आहात ती रिस्क ह्यात आहे.
असे सगळे त्या ऍक्ट मध्ये असले
असे सगळे त्या ऍक्ट मध्ये असले तरीही ते असेच पाळल्या जाईल अशी काहीही gurantee नाही..
>> हो ना? मग इतकं काय सगळं वरचं लिहित बसता? आरबीआय, सीबीआय, इडी, निवडणूक आयोग सुद्धा सरकारच्या दावणीला बांधलेत .
युआइडिआय आकाशतून नाही पडलेत.
फक्त माहिती म्हणून:-
फक्त माहिती म्हणून:-
mAadhar app च्या मार्फत , किंवा UIDAI च्या website वर आपल्याला आपले आधारचे बायोमेट्रिक लॉक करता येते. ते transaction करताना टेम्पररी अनलॉक करता येते.मग ते पुन्हा लॉक होते.आणि वाटले की लॉकिंगच नको तर ते डिसेबल करता येते.
तसेच UIDAI च्या website वर आपल्याला आपले आधार ऍक्टिव्ह आहे की नाही हे ही चेक करता येते.
https://www.google.co.in/amp/s/m.economictimes.com/wealth/personal-finan...
https://m.economictimes.com/wealth/personal-finance-news/did-you-know-yo...
>>>>
>>>>

RBI ही इंडिपेंडंट बॉडी आहे ज्यात goverment directly हस्तक्षेप करू शकत नाही >>>>
डेमॉन च्या वर्षपूर्ती ला हे विधान करत आहात हे इंटरेस्टिंग आहे
>>>हे आधार ऍक्ट UPA च्या अंतर्गत आणखीन refine होऊ शकतो>>>>
नागरी जीवनावर पूर्ण कंट्रोल हे कोणत्याही सरकारचे स्वप्न असेल
आधीच्या सरकार ने असा कंट्रोल मिळेल अशी व्यवस्था करून ठेवली असेल, तर कोणताही पक्ष त्या गोष्टी रोल बॅक करणार नाही, (अगदीच लोकशाहीची चाड वगैरे असेल तर परिस्थिती जैसे थे ठेवेल, पण रिस्टोअर करणार नाही न्यायाधीशांची निवड, RBI मध्ये सरकारचा वाढवलेला स्टेक, नीती आयोगा मध्ये सरकार चा से, उदाहरणे अनंत आहेत)
त्यामुळे UPA आल्यावर (आलेच तर) परत स्ट्रक्चर बदलेल असे मला तरी वाटत नाही.
हो नाना,
हो नाना,
डिजिटल security चा मुद्दा मान्य नव्हता पण हा मान्य आहे, ही रिस्क ह्यात आहे.
तशीच ती वेलफेर स्कीम मध्येही आहेच.एखाद्याचे आधार disable केले तर ऑथेंटिकेशन होणार नाही आणि बेनेफिट मिळणार नाही.
मुळात आधार ऍक्ट मध्ये दिलेल्या रूल्स अंतर्गत किंवा त्या प्रमाणे UIDAI ला वागणे अपेक्षित आहे.आज असेच अमुक एकाचे आधार फालतू कारणांवरून disable केले तर ते आधार ऍक्ट च्या विरोधात होईल.मुळात extreme केसेस मध्ये आधार कार्ड disable होणे आधार ऍक्ट च्या अंतर्गत अपेक्षित आहे(आणि हे आणखीन ही refine होऊ शकते). कुठल्याही फालतू कारणांसाठी नाही.
तसे ते त्यांनी केले तर, ह्या साठी आपण UIDAI कडे जाऊ शकतो आधार enable करायला किंवा disable करण्या मागचे कारण विचारायला. आणि कारण आधार ऍक्ट च्या अंतर्गत येत नसेल तर त्यांनी ते enable करणे अपेक्षित आहे.
(एक genuine कारण:-जसे सलग 3 वर्ष कुठलेही transaction केले नाहीतर आधार disable होते पण आपण ते परत UIDAI च्या website मार्फत activate करू शकतो.तसेच काही कारणांमुळे बायोमेट्रिक change झाले तर आपण आधार वेबसाईट वर बायोमेट्रिक update करू शकतो )आधार ऍक्ट प्रमाणे ते जेनुईन कारण नसेल तरीही त्यांनी ते केले आणि enable करत नसतील तर कोर्टात ही जाऊ शकतो.
आणि अश्या जास्त cases झाल्या तर हे मीडियात येईल आणि दखल घेतल्या जाईल हे अपेक्षित आहे.पण तसेच होईल अशी gurantee नाही.
हे सगळे UIDAI च फक्त नव्हे तर सगळ्याच अश्या इंडिपेंडंट statutory बॉडी ना लागू होते. शेवटी सरकारने मनमानी करायची ठरवलेच तर काहीच होऊ शकत नाही कारण कायदा योग्य रीतीने राबवणे , स्टेटूटरी बॉडी जसे RBI, UIDAI etc मध्ये काही बाबीत सोडता फालतू हस्तक्षेप न करणे हे सरकारचे कर्तव्य आहे.
फायनली तुम्हाला डेन्जर कळलेले
फायनली तुम्हाला डेन्जर कळलेले आहे. ओके? आता थांबूयात की परत पहिले पाढे पंचावन्न?
फायनली तुम्हाला डेन्जर कळलेले
फायनली तुम्हाला डेन्जर कळलेले आहे. ओके? आता थांबूयात की परत पहिले पाढे पंचावन्न? >>> दर काहि पोस्ट नंतर परत पहिल्यापासुन चालु होते चर्चा.
नाना,
नाना,
प्लिज, एक शेवटचा प्रश्ण...
पैसे गवरमेन्टचे असतील आणि ते मला मिळत असतील तर ते फोर्स करू शकतात की स्कीमचे पैसे काढायला आधार ऑथेंटिकेशनच वापरावे लागेल, आणि त्या case मध्ये आधार नंबर जर UIDAI ने विनाकारण आधार ऍक्ट विरुद्ध disable केला (जे आधार ऍक्ट प्रमाणे rare चांचेस आहेत) तर ऑथेंटिकेशन होणार नाही आणि वेलफेर स्कीमचे पैसे एखाद्याला काढता येणार नाहीत.
पण माझेच पैसे जे माझ्या बँक अकाउंट मध्ये आहेत ते काढायला सरकार मला आधारचे फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशनच वापरायला लागेल, अकाउंट नंबर पासवर्ड वापरून, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वापरून पैसे काढलेले चालणार नाहीत, हे कसे म्हणू शकते?
UIDAI फार तर आधार नंबर अकाउंट उघडताना अकाउंटशी लिंक करा हे बँकेला म्हणू शकते. पण बँकेला ती हे कसे म्हणू शकते की लोकांना आपल्या स्वतःच्या अकाउंट मधले पैसे काढायला आधार ऑथेंटिकेशनच वापरायला लावा ? मी बँकेतून पैसे काढू घालू शकते की नाही हे बघणे बँकेचे काम आहे. त्याचे हक्क बँकेला आहेत, UIDAI ला नाही.त्यांनी ते नीट केले नाही तर लोक बँकेत पैसे ठेवणार नाहीत.
असे करणे आधार ऍक्ट मध्ये नाही , UIDAI आधार ऍक्ट च्या अंडर फार तर आधार नंबर अकाउंटला लिंक करा हे म्हणू शकते.
म्हणून आत्ता ही माझ्या बँकेतले पैसे डेबिट कार्डने काढायला किंवा online purchase ला मला आधार ऑथेंटिकेशन वापरणे बंधनकारक नाही.
दुहेरीतै. ८ नोव्हेंबर २०१६ ते
दुहेरीतै. ८ नोव्हेंबर २०१६ ते ८ नोव्हेंबर २०१७ या दरम्यान अर्थव्यवस्था, आरबीआय व बॅन्किंगव्यवस्थेचा जो बेकायदेशीर तमाशा सरकारने केला ते बघता आमची आधार बद्दलची भिती साधार आहे. त्यापुढे तुमचे कुठलेही प्रश्न, शंका महत्त्वहिन आहेत. जास्त काही बोलत नाही.
तुम्ही हव्या त्या पद्धतीनी
तुम्ही हव्या त्या पद्धतीनी पैसे काढा हो,
बँक तुम्हाला अमुक पद्धतीनेच पैसे काढा सांगत नाही/ सांगू शकणार नाही
पण सगळ्या खात्यांना जर अंगठा देऊन पैसे काढायची सोय आहे, आणि दुसर्या कोणी फेक data / प्रिंट वापरून तुमच्या अकौंट मधून पैसे काढले तर काय? हा प्रश्न आहे.
सिम्बा,
सिम्बा,
तुम्ही डिजिटल security बद्दल बोलताय, त्यावर बोलणे झाले.
शिवाय आपण बायोमेट्रिक लॉक करू शकतो त्या बद्दल मी वर पोस्ट टाकली आहे. मी माझे बायोमेट्रिक लॉक केले आहे mAdhar अँप वापरून. एकदा बायोमेट्रिक लॉक केले तर कुणीही तुमच्या नावाने ऑथेंतिकॅट करू पहिले तरी device बायोमेट्रिक डेटा लॉक अशी error देते आणि transaction होत नाही. मी कधी आपणहून बँकेतून फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन इंटरफेस वापरून पैसे काढायचे असे ठरवलेच तर माझे बायोमेट्रिक मी टेम्पररी अनलॉक करू शकते, ते transaction नंतर परत लॉक होते.जर लॉकिंग काढूनच टाकायचे असेल तर तशीही सोय आहे.
https://uidai.gov.in/your-aadhaar/help/faqs.html
UIDAI च्या website वर ही
UIDAI च्या website वर ही बिअमेट्रिक लॉक करता येते जर mAdhar वापरायचे नसेल तर. मी mAdhar वापरून लॉक केले.
How to lock/Unlock biometrics
*Access the url : https://resident.uidai.gov.in/biometric-lock
* Enter your Aadhaar number
* Enter security code/captcha
* Receive the OTP
* Lock your Aadhaar
सरकारकडून दिले जाणारे लाभ
सरकारकडून दिले जाणारे लाभ मिळण्यासाठी आधार अनिवार्य करायला सर्वोच्च न्यायायलाने का नकार दिला होता, याचं काही कारण दुहेरी यांनी दिलं होतं.
मला ऑगस्ट २०१५ चा हा निकाल मिळाला. ज्यात म्हटलंय की जोवर एका मोठ्या (घटना) पीठाकडून यावर अंतिम निकाल लागत नाही, तोवर
१. सरकारने "आधार अनिवार्य नाही" या गोष्टीला भरपूर प्रसिद्धी द्यावी.
२. आधार अभावी कोणालाही सरकारी लाभ नाकारले जाऊ नयेत.
३. सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि एल्पीजी सब्सिडी व्यतिरिक्त आधार कुठेही वापरू नये.
४. आधार कार्ड वापरून मिळालेल्या माहितीचा वापर दुसर्या कोणत्याही कारणासाठी करू नये. अपवाद : गुन्हे अन्वेषणात, न्यायालयाच्या निर्देशानुसार.
मला कळलंय त्यानुसार हा खटला खाजगीपणाच्या अधिकाराबद्दल आहे. याबाबतच सर्वोच्च न्यायालयाने मार्च २०१७ आणि ऑगस्ट २०१७ मध्ये दिलेले निकालही शोधून वाचेन. पण त्यातही लाभासाठी आधार अनिवार्य केलेलंच नाही. आणि न्यायालयाची ही भूमिका अगदी मार्च २०१३ म्हणजे युपीएच्या काळापासून कायम आहे.
It has started.
It has started.
First wicket down.
Abhishek Manu Singhvi from Congress has been imposed a fine of 57 crores by IT department. And the best justification he could give for his unaccounted money of 96 crores was that the termites ate all his documents.
Have patience guys, this is going to be much more interesting in the coming days.
http://indianexpress.com/article/india/india-others/singhvi-in-tax-soup-...
I feel only problem in getting Modi getting re-elected is because of steps /policies like demonetization, GST etc. He came into crosshairs of business community who also (apart from us general population) supported him in getting elected the first time
Now they must have gone against him - tyanchya potavarach pay aala ki home!
ताई, ती तीन वर्षं जुनी बातमी
ताई, ती तीन वर्षं जुनी बातमी आहे.
या गृहस्थांनी खरंच काही झोल
या गृहस्थांनी खरंच काही झोल केला होता का? गेल्या ३ वर्षात त्यांना खरंच दंड भरावा लागला की दुसरी काही शिक्षा झाली?
मुळात या जुन्या बातमीचा आधार कार्ड वाल्या या धाग्याशी काय संबंध?
राजसी ताई, तुम्ही याच जगात
राजसी ताई, तुम्ही याच जगात राहता? की काही पॅरलल युनिव्हर्स ला भेट देऊन आलायत?
मे 2014 ते नोव्ह 2017 या 3 वर्ष 7 महिन्यात भ्रष्टाचाराकेला म्हणून तुरुंगात गेलेला एक राजकारणी दाखवा,
मात्र भ्रष्टाचारचे आरोप असताना (चौकशी चुकवायचा) भाजपात आलेले राजकारणी दाखवतो.
<<मात्र भ्रष्टाचारचे आरोप
<<मात्र भ्रष्टाचारचे आरोप असताना (चौकशी चुकवायचा) भाजपात आलेले राजकारणी दाखवतो.>>
----------- जो पर्यन्त गुन्हा कोर्टात सिद्ध होत नाही तोपर्यन्त प्रत्येक आरोपीला निरपराधी मानावे हे तत्व ते पाळतात.
माझ्यामते रॉबर्ट वद्रा पण निरपराधी आहेत. त्यान्चावर पण केवळ आरोप झालेले आहेत.
हो उदय, बरोबर. पण, ते नारायण
हो उदय, बरोबर. पण, ते नारायण राणेसारखे लाभार्थी मात्र नाहीयेत. अजून वद्रा यांनी भाजपा प्रवेश केल्याचे ऐकिवात नाही.
आधार हा भारतीय नागरिकत्वाचा
आधार हा भारतीय नागरिकत्वाचा पुरावा नाही .
मग सक्ती का?
पावस्करानु, गपा की जरा...
पावस्करानु, गपा की जरा...
फुगडी साठी नवा उखाणा आठवून आले जणू?
आवं म्या नाय गोरमेन्ट
आवं म्या नाय गोरमेन्ट म्हंतीया.
की ह्यो आधार तुमचा नागरिकत्वाचा पुरावा नाय.
म्हंजी बायकोच सगळ्या प्रॉपर्टीवर नाव लावायचं अनं विवाहित म्हणून सांगायची बंदी
http://www.business-standard
http://www.business-standard.com/article/companies/uidai-suspends-airtel...
फोनचं आधार व्हेरिफिकेशन करायला आलेल्या लोकांची परस्पर बँक खाती उघडल्याचं प्रकरण.
कंडोम घेताना देखील आधार नंबर
कंडोम घेताना देखील आधार नंबर द्यावा लागणार
आता लोक दिवसातून कितीवेळा कंडोम वापरतात याचा डेटा घेऊन मोदी काय साक्षी महाराज , ज्ञान देव सारख्या लोकांना देणार आहे?
पाचशे रुपयांत आधार डेटा
पाचशे रुपयांत आधार डेटा (चोरून) मिळेल. तीनशे रुपयांत आधार कार्ड छापायचं सॉफ्टवेअर.
दरम्यान आधार केंद्रांत लोकांना नवी नोंदणी किंवा आधीच्या डेटात बदल करण्यासाठी तासनतास आणि दिवसचे दिवस रांगा लावायला लागताहेत. UIDAI च्या संकेतस्थळावर बोरिवली तहसीलदार कचेरीतील आधार केंद्राची नोंद आहे. पण ते चालवणार्या तरुणाला तिथे धड बसायची एक जागाही ठरवून दिलेली नाही. माझ्यासमोरच तो आणि त्याची सहकारी बोजड मशिनी घेऊन वर खाली करत होते. शेवटी त्यांना (आणि मलाही) उद्या येऊन 'चौकशी करा असं सांगितलं गेलं.
सर्व डाटा सुरक्षित आहे
सर्व डाटा सुरक्षित आहे म्हणार्या सरकारच्या समर्थकांची वाचा बसली असणार
देव करो त्यांची माहिती इतरत्र जावी म्हणजे त्यांना कळेल धोका काय आहे
मला एक मदत हवी आहे..
मला एक मदत हवी आहे..
माझं आधार कार्ड हरवल आहे.. माझ्याकडे त्याची फोटोकॉपी आहे आणि नंबर सुद्धा..
आधार नंबर देऊन परत मला माझ आधार कार्ड मिळू शकतं का?
पुण्यात कुठे मिळेल?
आधार कार्ड नाही मिळणार.
आधार कार्ड नाही मिळणार. स्मार्ट कार्ड मिळेल.
तसंही नंबर पुरेसा आहे.
माझ्या आईचं तर ओरिजिनल कार्डच आलं नाही.
Uidai.gov.in वर सेंटर्स शोधा.
https://eaadhaar.uidai.gov.in
https://eaadhaar.uidai.gov.in/#/popup
आधार कार्ड नाही मिळणार.
आधार कार्ड नाही मिळणार. स्मार्ट कार्ड मिळेल.>> यात फरक काय आहे? मला खरच माहिती नाही..
तसंही नंबर पुरेसा आहे.>>ओके धन्यवाद.. बरेच ठिकाणी त्याची झेरॉक्स मागतात आणि ओरिजिनल प्रत सुद्धा दाखवावी लागते ना म्हणुन विचारल..
यात फरक काय आहे? मला खरच
यात फरक काय आहे? मला खरच माहिती नाही.. >>> फरक काहि नाहि. स्मार्ट कार्ड ठेवायला सोपे आहे (लहान आहे)
पण तुम्हाला वर दिलेल्या साइट वर आधार डाउन लोड करता येइल . ते व्हैलिड आहे.
पण तुम्हाला वर दिलेल्या साइट
पण तुम्हाला वर दिलेल्या साइट वर आधार डाउन लोड करता येइल . ते व्हैलिड आहे.>> ओके.. धन्यवाद
Pages